Narakpishach - 1 books and stories free download online pdf in Marathi

नरकपिशाच - भाग 1

॥ श्री ॥
 
#भयकथा #
लेखक: जय zomate ...
 
.... कथेचे नाव :- .नरकपिशाच
 
भाग 1
 
 
वाचक मित्रांनो ! ह्या कथेचा आपुल्या वास्तविक जीवनाशी काहिच संबध नाही. ह्या कथेत उच्चारल्या जाणा-या नाव, गाव , घटना,चमत्कारीक थरारक दृष्य सर्वकाही काल्प्निक असुन ते भयकथेच्या सादरीकरणासाठी वापरले गेलेत..!
 
पिवळ्या रंगाची एक मारुती विटारा ब्रेजा कार, शहरातल्या हायवेवरुन
हवेला ही लाजवेल अशी गति पकडून पळत होती , आणि आपल्या पुढे धावणा-या गाड़यांना ती ओव्हरटेक करत मागे सोडत पुढे-पुढे जात होती . कार मध्ये ड्राइव्हर सीटवर एक 32 वय असलेला पुरुष बसलेला . त्याच्या अंगावर एक निळ्या रंगाचा कोट , व कोटच्या आत एक निळ्या रंगाचा शर्ट होता, आणि खाली कोटला शोभेल त्याच प्रकारची निळी पेंट होती . हातात एक महागडी ब्रेंडेड वॉच, पायांत महागडे शूज असा त्याचा पेहराव असुन त्याच नाव सिद्धांत होत , तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता. उच्च शिक्षित आताच्या पिढीत जगणा-या सिद्धांतचा देवावर विश्वास नव्हता , त्याच्या उच्चशिक्षित विज्ञानवादी बुद्धीत देव हा फक्त आणि फक्त एक दगड, निर्जीव वस्तु आहे . असा त्याचा समज होता . सिद्धांतच्या परिवारात आई सुलक्षणाबाई नावाप्रमाणेच सुलक्षण, प्रेमळ स्व्भावाच्या होत्या. वडिल-गंगाधार सुद्धा स्वभावाने खुपच छान होते. सिद्धांत मायरा दोघांचही प्रेम विवाह झाल होत. दोघांचहि कॉलेज पासुन प्रेम होत. त्यासमवेतच मायराचे वडिल गंगाधर रावांचे मित्र होते. दोघांचीही मैत्री अगदी जिवाभावाची होती . सिद्धांत पाहिल्या पासूनच मेहनती, हुशार वृत्तीचा असल्याने त्याला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर काम मिळालेल. मग ज्यासरशी सिद्धांत कामाला लागला गेला. मग ह्या दोघांचही रितिरिवाजानुसार अगदी धुमधडाक्यात लग्न लावुन दिल गेल.
मायरा - सिद्धांत दोघांच्याही लग्नाला 11 वर्ष पुर्ण झाली गेलेली ,लग्नाच्या दोन वर्षानंतरच त्या दोघांच्याही प्रेमस्पर्शातुन एक कळी फुल्ली जात एक सुंदर कन्यारत्न त्या दोघांनाही प्राप्त झाल. त्या दोघांनाही एक लाडकी लेक मनस्वी 9 वर्षाची होऊन जात ती दुसरी इयत्तेत शिक्षण घेत होती. नावा प्रमाणेच ती छान, थोडीशी खोडकर,अभ्यासात खुपच हुशार ,दिसायला सुंदर सर्वांची लाडकी होती. मनस्वीला गणपत्ती बाप्पा खुप आवडायचे, इतके की त्यांच्या घरी दीड दिवसाच्या
विराजमान होणा-या बाप्पांच पाहुणचार तिच्यामुळे 10 दिवसाच करण्यात आल होत. मनस्वी सर्वांची आवडती व त्यासमवेतच सगळ्यात जास्त सिद्धांतची एकुलती एक लाडाची लेक असल्याने त्याने सुद्धा बाप्पांच आगमण तिच्या सांगण्यानुसार वाढवल होत. परंतु आरती वगेरेला तो जास्त येत नसे. त्याला हे सर्व बोरिंग वाटायच.कधी-कधी मनस्वीने बोलावल तरच तो टाईमपास म्हणून यायचा. सिद्धांत व त्याची फैमिली शहरातल्या एका मोठ्या फ्लैट मध्ये रहात होते. परंतु शहरातल्या दैनंदिन अस्वच्छ वातावरणापासुन काहिक्षणांसाठि सुटका होऊन जात आपल्या फैमिलीला थोडफार चांगल हवेशीर वातावरण मिळाव ह्या हेतुने , त्याने शहरापासुन दुर एक फार्म हाऊस बांधण्यास घेतला होता , आणि आता ह्या क्षणी तो एकटाच आपल्या गाडीने फार्म हाऊसच काम कस चालु आहे , हे पाहण्यासाठी तिकडेच निघाला होता. काहीक्षणापुर्वी हायवेवरुण वेगाने धावणारी सिद्धांतची कार आता एका खडकाळ रसत्यावरुण धावू लागलेली , कारच्या डाव्या व उज्व्या बाजुला दोन्ही तर्फे हिरवीगार झाडी होती . एकप्रकारे जंगलच होत ते जिकडे -नजर जाईल तिक्डे झाडेच-झाडे . 10-15 मिनिंटांत सिद्धांत आपल्या कारने हव्या त्या ठिकाणावर येऊन पोहचला, तस त्याने कारची चावी फिरवत इंजिन बंद केल , व कारचा दरवाजा उघडून बाहेर आला बाहेर आल्यावर त्याने कोटची बटन लावत एक कटाक्ष आजुबाजुला टाकला तस त्याच्या नजरेस जंगलातील झाडे, बिगारी कामगार, व अर्धवट पुर्ण झालेला फार्महाऊस दिसला. काहीवेळ तो असच नेहमीप्रमाणे आजुबाजुचा परिसर , तर कधी कामगारांच काम , पाहत होता . इथे आल्यावर त्याला थोडास रिलेक्स वाटायच , का तर जागा शहरातल्या अस्वच्छ हवेपासुन , शहरी वर्दळीपासुन थोडीशी आगळी-वेगळी होती . कृत्रीम एसीच्या हवेपेक्षा ही हवा नैसगिर्क असुन थंड होती. ज्याप्रकारे शहरातला माणुस रिलेक्स होण्यासाठी, डोक्यावरच ताण हलक करण्यासाठी माथेरान फिरण्यासाठी येतो , व त्या वातावरणाचा लाभ होताक्षणीच फ्रेश होऊन जातो . तसच सिद्धांत च्या बाबतीत होत-होतं.
सिद्ध्यंत असच आजुबाजूला पाहण्यात व्यस्त होता. की अचानक पाठीमागुन त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला.
......" अहो..सिद्धांतराव ?"
.... आवाज आला तस सिद्धांतने एक गिरकी घेत मागे वळून पाहील. मागे एक इसम उभा होता , त्याच्या अंगात एक सफेद शर्ट, खाली एक काळ्या रंगाची पेंट, पायांत काळे बुट व डोक्यावर एक पिवळ्या रंगाची गोल टोपी होती ( safety hat) . त्या इसमाला पाहून सिद्धांतच्या चेह-यावर एक हसू आल ब त्याने आपल्या बिल्डर मित्राशी हात मिळवणी केली . सिद्धांतच्या ह्या मित्राच नाव राकेश तो एक बिल्डर होता. मोठ-मोठ्या बिल्डींगस , बंगले, फार्म, हाऊस सर्व काही तो बांधून द्यायचा , त्याच स्व्त:च्या मालकीच राकेश construction होत .
" काय सिद्धांत राव..? आज पुन्हा आलात इकडे ?"
राकेश थोड हसतच म्हणाला.
" अरे राकेश ! मला तर अस झालय , की कधी हा फार्म हाऊस एकदाच बांधुन होतोय! आणि मी इकडे माझ्या परिवार समवेत रहायला येतोय " सिद्धांत आजुबाजूच्या नैसगिर्क सुखाचा आनंद घेत म्हणाला .
" अरे हो-हो भावा ! मी समजु शकतो तुझी तळमळ! लवकरच बांधून होईल तुझ फार्म हाऊस! " राकेशने अस म्हणतच सिद्धांतच्या खांद्यावर हात ठेवला व थोड धीर गंभीर आवाजात म्हणाला .
" सिद्धांत! मला तुला काहीतरी सांगायचय !"
" काय रे....... ?....बोलना !"
" सिद्धांत! तुझ्या फार्म हाऊस पासुन आणि ह्या जंगलापलीकडे
20 मिनीटांवर एक आदिवास्यांच गाव आहे.!" राकेश च्या वाक्यावर सिद्धांत ने फक्त हूंकार भरला. तस राकेश पुढे बोलू लागला .
" तर तु येण्या अगोदर इथे काही आदिवासी माणस आली होती .!
" त्या गावातली का..?"
" हो! त्या गावातलीच ..!"
" अच्छा ! .... मग....काय म्हणाली ? " सिद्धांत आपले डोळे छोठे करत म्हणाला. तस एकवेळ राकेशने आजुबाजुला पाहतच एक आवंढा गिळला व पुढे म्हणाला.
" सिद्धांत ! ते म्हणाले की ह्या जागेत एका सैता ..!" राकेश पुढे काही बोलणार की तोच अचानक एक मजूर तिथे धावत आला .
तस त्या दोघांचही लक्ष त्या मजुरावर पडल. दिसायला तो मजुर तस शरीरयष्टीने जाड-जुड व रंगाने काला होता. त्याला धावतावेळेस धाप लागलेली, ज्याने श्वास जोरात घेतले जात त्याच सुटलेल पोट एका बेडका सारखा फुगून कमी -जास्त होत-होत .
" काय रे..फुग्या ? काय झाल ..? काम का सोडून आलायेस.. "
त्या फुग्या नाम्याक मजुराकडे पाहतच राकेश म्हणाला. तस त्या फुग्याने आपल तोंड उघडल.
" अव....साहेब..मगाशी आलेल्या त्या माणसांच्या बोलण्यानुसार इथ खरच त्यो हाय..! ह्यो त्याचा इलाका
हाय साहेब....! इथ फार्म हाऊस नका बांधु..!" "
फुग्या त्या दोघांकडे भेदरलेल्या चेह-यानेच पाहत म्हणाला.
" राकेश काय चाललंय हे? काय बोलतोय हा..?"
सिद्धांत राकेशला पुढे काही बोलणार , की तोच अजुन 3-4 मजुर फुग्या प्रमाणे तिथे धावत पोहचले.
" अहो साहेब..! इथ घर बांधु नका..? ह्यो त्याचा इलाका
आहे..!
पुन्हा एकदा एक मजुर म्हणाला. आणि त्याला जोड म्हणून बाकीच्यांच ही तेच म्हणण होत. " की इथे घर बांधू नका हा त्याचा इलाका आहे ..!"
" wait..! काय झालय निट सांगाल का जरा..? मला "
सिद्धांत मेन मुद्यावर येत म्हणाला. तस त्या कामगारांच्या चेह-यावर एक भितीदायक सावट पसरल, जो तो कामगार आपल्या जोडीदाराकडे भेदरलेल्या नजरेने, आवंढा गिळून पाहू लागला . तस सिद्धांत पुन्हा म्हणाला.
" हे पाहा ! कोणि गुंड वगेरे आहे का...? कि ते गाववाले काहि
धमकी वगेरे देऊन गेले आहेत!" सिद्धांत सिरियस होत
म्हणाला.
" नाय नाय साहेब! कोणी गुंड वगेरे असता तर आम्ही बघून
घेतला असता की..!" फुग्या म्हणाला.
" मग अस काम थांबवुन इथे का आला आहात..? आणि कोणाचा इलाका आहे हा..?!"
सिद्धांत जरा मोठ्यानेच म्हणाला . त्याचा आवाज आता ह्याक्षणी जरा कणखर, मजबूत, भारदस्त, जरब बसवणा-या प्रमाणे निघालेला . ज्याने आधीच भीतीने गर्भगळीत झालेल्या त्या सर्व कामगारांच शरीर लटलट कापू लागल. फुग्याने एकवेळ आपल्या बाकीच्या साथीदारांकडे मग राकेश आणि सिद्धांत कडे पाहतच पुर्ण हिम्मत एकटवत पुढील वाक्य उदारल .
" स्स्स स्स्स ...! .. साहेब .....आ...आ.....आम्हाला तिथ येताळाची मूर्ती सापडलीया....!"
 
 
 
 
 
क्रमश:
 
 
कातर ...येळ......अवसेची झालीये ...रात ... !
कालोखात ..पसरलीये ..थंडगार प्रेत..मृत्युची लाट....!
मांस ...नी ...रक्ताचा होणार नाच.........कारण....
येताळ ......फिरेल ....आज...! हिहिहिही..खिखिखी स्स्स्स्स्स....
 
 
 
..