Narakpishach - 4 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | नरकपिशाच - भाग 4

The Author
Featured Books
Share

नरकपिशाच - भाग 4

द-अमानविय...सीजन 1
..आग्यावेताळ भाग 4
 
 
महांक्राल आश्रम पाषाणवाडी
------------------------------------
------------------------------------
 
वीज चमकताच क्षणी महांक्राल बाबांनी आपले डोळे उघडले. तस त्यांना आपल्या पुढ्यात पाषाणवाडीतली 10-12 लोक दिसली . आश्रमात जमलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर , सदरा , धोती , अशे विविध प्रकारचे कपडे घातलेले असून , त्या सर्वांच लक्ष महांक्राल बाबां वर होत .बाबांच्या चेह-यावर भीती, चिंता, थकल्यासारखे भाव होते . जे पाहुन जमलेल्या लोकांच्यात कुजबूज सुरु झाली. तिथे जमलेल्या प्रत्येक मणुष्याच्या नजरेस फक्त बाबांचा थकलेला, चिंतेने, भयाने फुललेला चेहराच दिसुन येत होता. परंतु विघ्नेश जे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होता. ते तिथे जमलेले साधारण मणुष्य आपल्या साधारण नजरेने पाहु किंवा जानु शकत नव्हते. जस की ज्याक्षणी बाबांनी आपले डोळे उघडले, त्यावेळेस त्या लोकांना बाबांचे डोळे साधारण मनुष्या प्रमाने घारे दिसले . परंतु विघ्नेशला त्या उलट दिसुन येत होत . त्याच्या पंचमहाभूतांच्या शक्तिने ती गोष्ट लपू शकली नाही. बाबांचे डोळे पुन्हा त्याच प्रकारे निळ्या रंगाने चमकत असून , चेह-यावर भय, चिंता, दिसून आली . त्यांच्या चेह-यावर पसरलेल भय जणू निलमंती विद्येमार्फत त्यांनी काहीतरी भयंकर पाहिल्याची ग्वाही देत होत. चिंतेचे भाव पाहुन तर एकवेळ विघ्नेशला सुद्धा भीती वाटायला लागली . कारण आजपर्यंत आपल्याकडे मंद स्मित हास्य करुन पाहणा-या गुरुंच्या चेह-यावरचे हे चिंता, भयग्रस्त भाव त्याने प्रथम दर्शनीच अनुभवलेले ,पाहिले होते. इतकी विद्या,पंचमहाभुतांची शक्ति ! असीम ज्ञान असलेला, स्व्त:चा गुरुच, अस एका दृष्याने भ्यायला आहे ।हे पाहून तो सुद्धा काहीक्षण महांक्राल बाबांकडे हक्का -बक्का होत पाहतच राहीला.
" बाबा ! तुम्ही सांगितल्या प्रमाण आम्ही त्या माणसांना तशी
ताकीद देऊन आलोय बघा
त्या गावक-यांन मधलाच एकजण आपले दोन्ही हात जोडत महांक्राल बाबांकडे पाहत म्हणाला.तस महांक्राल बाबांनी त्याच्या वाक्यावर
एक -दोनदा आपले डोळे मिचकावत ,हो असा इशार करत मान हलवली व म्हणाले .
" गावक-यांनो...... ! मला माहीतीये की तुम्ही सर्वांनी त्या
शहरातल्या माणसांना माझ्या सांगण्यानुसार ताकीद देऊन
आला आहात! ते सर्व मी माझ्या दिव्य शक्तिने पाहील आहे."
महांक्राल बाबांनी इतके म्हणतच आपले शब्द उच्चार काहीक्षण थांबवले , तसे एका गावक-याने आपल पुढील मत मांडल.
" पन बाबा ! आपण त्यासनी फक्त ताकिद दिलीया. आन ती समदी
ठरली शहरातली माणस! ती आपल ऐकतील अस वाटत नाय
बघा .. मला!" त्या प्रथम गावक-याच वाक्य संपल तस एक दुसरा
गावकरी सुद्धा त्या प्रथम गावक-याच्या वाक्यास दुजोरा देत म्हणाला .
" व्हय की ! ही शहरातली माणस आपल्यावर इश्वास ठेवणार
नाहीत ! आण कधी त्या समद्यांसनी त्यो मंदिर सापाडला तर..!"
त्या गावक-याने आपल्या थर-थरणा-या ओठांनी, भीतीने मोठे झालेल्या
डोळ्यांनी , पांढ-या पडलेल्या चेह-याने एकवेळ महांक्राल बाबांकडे पाहिल ,व आपल पुढच वाक्य पुर्ण केल .
" त्यो सैतान बाहेर येईल ! आ...आ...आण त्यो कधी बाहेर
आला . तर रक्तामांसाचा चिखल,आण पुर्णत पाषाणवाडीतल्या
लोकांच मढ पडायला येळ लागणार नाय..! "
त्या गावक-याच्या ह्या वाक्यावर बाबांनी फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, त्यांनी त्या गावक-याच्या वाक्यावर कसलेही प्रतिउत्तर दिले नाही. कारण त्या गावक-याची मनातली भीती 100 टक्के खरी ठरली होती. त्या गावक-या मुखातुन निघालेल्या प्रत्येक वाक्यासरशी महांक्राल बाबांच्या चेह-या समोर तो पुन्हा उघडलेला मंदिर .आत पसरल गेलेल अमानविय धुक , विज चमकताक्षणीच दिसलेला त्या वेताळाच्या मूर्तीचा भयानक रुप . सर्वकाही पिक्चर प्रमाणे दिसून आल. जे डोळ्यांसमोरुन तरळतावेळेस छाती रेल्वे इंजिन सारखी पळू लागली. धड, धड, करत काळीज जणू, भीतीने छातीत कळ मारु पाहू लागल. परंतु त्यांनी लागलीच आपल्या गळ्यात असलेल्या रुद्राक्ष हाती घेत मुखात महादेवाच नामस्मरण सुरु केल. त्यासरशी ती रुद्राक्ष माळ तांबड्या प्रकाशाने चमकली गेली .हे दृष्य फक्त विघ्नेशच आपल्या डोळ्यांनी पाहू शकलेला कारण त्याच्याकडे दिव्यशक्ति होती.रुद्राक्ष हातात घेताचक्षणी काहीक्षणातच त्यांना बर वाटू लागल. फुललेले श्वास कमी होत , धड--धडणारी छाती पुनर्वत झाली. भयाने फुललेला चेहरा सामान्य झाला त्या चेह-यावर प्रसन्न मुद्रा पसरली .
जणु महादेवाच्या नामस्मरणाने त्यांच्या शरीरात एक नवि उर्जा संचारली.
चेह-यावर तेज पसरल, मंद स्मित हास्याने चेहरा उजळला गेला.
" गावक-यांनो! "
काहीक्षणा अगोदर आलेला गुरुजींचा अशक्त आवाज, आता कुठल्या कुठे गायब झाला होता . आता त्यांच्या आवाजात पहिल्या सारखी भारदस्त धार आली होती ,तस ते पुढे म्हणाले.
" गावक-यांनो तुम्ही कसलीही चिंता करु नका ! जो पर्यंत मी जिवंत
आहे! तो पर्यंत ह्या पाषाणवाडीवर कोणतच संकट येऊ
शकणार नाही..! तुम्ही सर्वांनी आता फक्त एक काम करा ..?"
महांक्राल बाबांनी आपल्या भारदस्त आवाजात हे वाक्य उद्दारल होत . जे ऐकून काहीक्षण का असेना ,परंतु गावक-यांच्या मनातली
भीती दुर हिबाळली गेली होती. एक नवी उर्जा, चेतना, त्या सर्वांच्या मनास भिडली जात चेहरा फुलला गेला होता. शेवटला आलेल्या महांक्राल बाबांच्या प्रश्नावर सर्वांनी" काय बाबा?"म्हणुन विचारल तस ते पुढे बोलू लागले .
" मी आता जे काही नियम तुम्हा सर्वांना सांगणार आहे ! त्या
नियमावळीस तुम्हा सर्वांना आपल्या अंगी जोपासायच आहे .! " महांक्राल बाबांनी सर्व गावक-यांकडे आली-पाळीने पाहिल व ते पुढे बोलू लागले.
" आजपासुन पाषाणवाडीत दर दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर कोणीही घराबाहेर,....वाडीच्या वेशीवर.... , किंवा वाडीत भटकू नका , ! नियम क्रमांक दुसरा ! "बाबांनी आपल्या हाताची दोन बोट हवेत उंचावली व पुढे म्हणाले. " रात्री आप-आपल्या घरांची दार -खिडक्या , आतुन गच्च लावुन घ्या? छोटीशी फट सुद्धा उघडी असता कामा नये ?" बाबांनी आता आपले तीन बोट हवेत उंचावली व पुढे बोलू लागले." नियम क्रमांक तीन! रात्री तुम्ही गाढ झोपेत असतांना, जर रात्री-अपरात्री घराबाहेर कुत्री -मांजर भांडल्याचा आवाज , आला !तर त्या प्राण्यांना हाकलण्यासाठी घराबाहेर पडू नका! कारण ते पाळीव प्राणी नसुन दुसर काहीतरी क्लिष्ट, भेसूर त्यांच्या रुपाने अवतरलेल असेल . जे तुम्ही बाहेर आल्यावर तुमच घात करण्यासाठी टपुन बसलेल असेल . " हे वाक्य संपताच बाबांनी एक दिर्घश्वास घेत सोडला व पुढे बोलू लागले. आता राहीला आंतिम नियम
ते अमानविय ध्यान खुपच शक्तिशाली आहे, रक्ताच्या चवीसाठी एक-नी-एक थेंबासाठी हवरटलेल आहे . मणूष्याच्या मांसाकरीता भुकेलेल अहे. वर्षानु-वर्ष न मिटलेली त्याची भुक आता उफालेलून आहे. आणी रक्तमांसाकरीता तो हैवान तुमच्या जवळच्या माणसांची ,मेलेल्या आई-वडिल सर्वांची रुप घेऊन येईल, तुम्हाला प्रेमाने साद घालेल . रडेल , विव्हळेल," बाबांनी अस म्हंणतच आपले डोळे मोठे केले व पुढे बोलू लागले. " परंतू त्याच्या दया याचनेवर जराही लक्ष देऊ नका. कारण तुम्हाला घराबाहेर आल्यावर , त्याच्या कचाट्यापासुन , तावडीपासुन वाचण्यासाठी कोणताच मार्ग नसेल!" बाबांनी अस म्हंणतच बोलायच थांबवल, व त्यांनी विघ्नेशला आपल्या जवळ बोलावला, व काहीतरी खुसूर -पुसूर करत त्यास आश्रमातल्या देवघरात
पाठवल. तिथे जमलेले गावकरी फक्त त्यांच्या ह्या कृतीच दर्शन पाहत होते. काहीवेळाने विघ्नेश परत आला, परंतु रिकाम्या हाताने आला नाही! त्याने आपल्या हाती एक सोनेरी रंगाच गोल ताट आणल, त्या ताटात सफेद कागदाच्या बांधलेल्या खुप सा-या पुड्या होत्या. त्या पुड्यांवर सर्वांच लक्ष गेल , तस एकाने विचारल .
" बाबा हे काय आहे ..? "
" बाळांनो! ही एक-एक पुडी तुम्ही सर्वांनी आप-आपल्या घरी घेऊन जा! ह्या पुडीमध्ये ........महादेवाच्या नामस्मरणाने शक्तिहिंत बनवलेली राख आहे! जी की तुमची रक्षा करेल! ह्या राखेचा एक कण जरी त्या अनैसर्गिक शक्तिंवर पडला .तर त्या ध्यानाच अंत निश्चिंत असेल.ही एक-एक पुडी घ्या , आणि मी सांगितलेले नियम आपल्या घरातल्यांनाही कळवा ?"बाबांनी विघ्नेशला हात दाखवत पुड्या वाटण्याचा इशारा केला. त्यासरशी विघ्नेशने एक -एक पुडी गावक-यां मध्ये वाटण्यास सुरुवात केली . तस एका गावक-याने ती पुडी आपल्या हाती घेतच बाबांना प्रश्न केला.
" बाबा ! मला एक गोष्ट कळाली नाय ? हे संमद नियम? आण
इभुती कशापाई देताय-तुम्ही ..?"
त्या गावक-याच्या ह्या प्रश्नावर महांक्राल बाबा काहीक्षण शांतच राहीले , मग त्यांनी एक मोठा श्वास घेऊन , नाकावाटे बाहेर सोडला व बोलू लागले.
" गावक-यांनो ! तुम्हा सर्वांन पासुन मी कोणतीही गोष्ट लपवुन
ठेवणार नाही ! जे आहे , ते यथाथतित मी इथे वर्तवत आहे. " बाबांनी सर्व गावक-यांकडे पाहील व पुढे बोलू लागले.
" त्या शहरातल्या कामगार माणसांना तो मंदिर मिळाला असुन!
त्यांनी त्या मंदिरात प्रवेश केला आहे ."
मंदिर मिळाल हे समजताच गावक-यांच्या पोटात गोला आला. भयंकर
हाहाकार,माजवणारा आग्यावेताळच रुप आठवुन त्यांच्या डोळ्यांसमोर
गेल्या वेळेस घडलेल्या भयंकर सैतानाचा , त्रिकाल तांडाव, नंगानाच आठवला.
" हे पाहा ! तुम्ही घाबरु नका ! "
.घाबरलेल्या , भिथरलेल्या त्या
....गावक-यांच्या चेह-याकडे पाहत बाबा त्यांना धीर देत म्हणाले.
"अद्याप त्या सैतानाचा आपल्या वाडीस कसलाही धोका नाही ..!
कारण जो पर्यंत माझ्या देहांत प्राण शिल्लक आहे. तो पर्यंत तो
तो आपल्या वाडीची वेस ओलांडू शकणार नाही ! ते त्याच्या असीम शक्तिच्याही..मर्यादे पलीकडे आहे ! म्हणूनच तो त्याच्या भुतावळी मार्फत तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढेल, त्याच्या भुतावळीस गावात शिकार आणण्यास पाठवुन तो वेशीबाहेर दबा धरुन बसेल. म्हणूनच मी तुम्हाला जे नियम सांगितले आहेत ! ते कठोरतेने पाळा!"
महांक्राक बाबांच वाक्य संपल त्यासरशी गावक-यांनी त्यांना वाकून
नमस्कार केला , व ते सर्व जन एक-एक करत आश्रमा बाहेर पडु लागले.काहीवेळाने सर्व गावकरी निघुन गेले. तस बाबा सुद्धा आपल्या जागेवरुन उठले व त्यांनी विघ्नेशकडे स्मित हास्य करत पाहील . मग त्यांची नजर विघ्नेशच्या हाती असलेल्या ताटात गेली, ज्यात एक पुड अद्याप सुद्धा शिल्लक राहीलेली. ज्या पुडेला पाहुन बाबांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला , कारण त्यांनी स्व्त:हा त्या पुड्या राखेसहित बांधल्या होत्या त्याही मोजून . कोणीतरी होत, की जो आता ह्याक्षणी आश्रमात नियम सांगतावेळेस , पुड देतावेळेज़ उपस्थीत नव्हत. बाबांच्या मनात घालमेल सुरु झाली. कारण शिल्लक राहीलेली पुड एका व्यक्तीच जीव वाचवणारी होती. बाबांनी नाही-नाही म्हणतच डोक हलवत बोलायला सुरुवात केली .
" बाळ विघ्नेश ! तु सर्वांना ही पुड दिलीस का बाळा? कोणी
राहील तर नाही ..! एकदा आठवुन बघ..?
" नाही गुरुवर्य! मी तर सर्वांना एक-एक पुडी दिलीये..!"
विघ्नेशवर महांक्राल बाबांचा पुर्ण विश्वास होता. तो खोट बोलत नाहीये हे त्यांना माहीती होत.
" विघ्नेश !...याचा अर्थ कोणाच्यातरी जिवास धोका आहे!"
महांक्राल बाबांनी आश्रमात असलेल्या महादेवाच्या व्याघ्रांबर वर विराजमान असलेल्या मूर्तीकडे पाहील , त्या मूर्तीस शिल्पकाराने आपल्या पुर्णत भक्तिभावाने घडवल असाव अस दिसुन येत होत, कारण ती महादेवाची मूर्ती एका दगडाने कोरलेली होती, नागराज , व्याघ्रांबर, गळ्यातळ्या रुद्राक्ष माळा , जटा, चंद्र, त्रिशूल ,सर्व अगदी खरे असल्यासारखे भासुन येत होते. महांक्राल बाबांनी आपले पाऊल त्या महादेवाच्या मूर्तीच्या दिशेने वाढवले व मूर्तीजवळ पोहचताच, समोर असलेल्या समईत गोड तेल ओतल . ज्याने समईत असलेली वात आणखीणच दीपप्रकाश प्रज्वलीत झाली.
" हे महाकाल ! तो जो कोणी असेल. जो ह्या संकटापासुन
अनभिज्ञ आहे. त्याची रक्षा कर !"
महांक्राल बाबांनी अस म्हणतच महादेवाच्या मूर्तीस हात जोडले.
□□□□□□□□□□□□□□□□
पाषाणवाडीतल्या स्मशानात आज एक प्रेत जळून खाक झालेल .
स्मशानभूमीत सफेद रंगाची राख जी पसरलेली , प्रेत आणि लाकड़ दोघांच्या ही राखेच मिश्रण होत तिथे एक छोठासा ढिगच तैयार झालेला. आणि त्या सफेद रंगाच्या राखेतल्या ढिगामधुन मंद अस धुर बाहेर पडत होत.काहीवेळाने अचानक स्मशानाच्या आजूबाजुला असलेली झाड हळू लागली, ती झाड हवेने मुळीच हाळत नव्हती. कारण त्या सर्व झाडांच्या फांद्यांवर चुना पोतलेल्या, चेह-याचे हाताच्या बोटांवर न मोजली जातील इतकी पिशाच्च, वेताळाची सेना बसली होती . जखीण,हडळ, काटकुळ्या, पाहाडी हडळ, मुंजा, काटेरी चेटकीण, कंडार, नाना त-हेचे पिशाच्च त्या स्मशानात अवतरलेले .कोणाच्या तोंडात, टोस्कुले दात होते, तर कोणाच्या तोंडात नुस्तीच लांब सरड्यासारखी विचित्र काळ्या रंगाची जिभ होती,कोणाच्या चुना पोतलेल्या चेह-यावर आसुरी हास्य, तर कोणाच्या शुन्यातले भाव पसरलेले , त्या उलट कोणी आपल तोंड , जबडा उघडून वेड्या-वाकड्या प्रमाणे हलवत होत. कोणाचा चेहरा जळालेला होता, तर कोणाच शरीर नुस्त हवेच पुंजक होत, .इकडे स्मशानात ढीगभर साचलेल्या राखेत अचानक हालचाल होऊ लागली,ती राख हालचालीने हालू लागली . तस त्या भुतावळीची हालचाल , हसण, खिदळन थांबल, सर्वांनी एकदाच , आपल्या पिवळ्या, लाल , सफेद , अंगार भरलेल्या आग ओकणा-या डोळ्यांनी त्या राखेतल्या ढीगाकडे पाहील .ज्याप्रकारे क्रिकेट मध्ये 1 बॉलमध्ये 6 रन हवे असतात, आणि सामना रोमांचकारक बनला जात , सर्वांच्या नजरा बैट्समैन वर खिळलेल्या असतात, आणि त्याचवेळेस तो बैटस्मेन सिक्स मारत मैच जिकुन लावतो. मैदानात रसिकांच्या मुखातुन जल्लोषमय आवाज बाहेर पडतात व पुर्णत मैदान दणाणुन निघतो. त्याच प्रकारे त्या स्मशानातल्या राखेच्या ढिगाखालुन एक हात, आतीवेगाने , सर्प आपल्या बिलातुन बाहेर पडावा असा बाहेर आला, आणि त्याचक्षणी त्या भुतावळीच्या
तोंडून, चित्र-विचित्र आवाज बाहेर पडु लागले, कोणी झाडांवरुन खाली ऊतरत येड्या माणसांप्रमाणे कमरेला खाजवणा-या माकडाप्रमाणे उड्या मारत नृत्य करु लागल. जखीन हडळ आपळ डोक गोल-गरा गरा फिरवू लागल्या . ढोल , बदडवले जाऊ लागले. धम, धडा, धम , धडा ,धम..! आणि त्या वाजणा-या मृत्युगीतावर ही भुतावळ नाचू लागली...धम, धम, धडाम, धमम्मंं..
□□□□□□□□□□□□□□□□□
 
" मायरा ..? ही का फोन करतीये ..?"
सिद्धांत आपल्या आईफोन स्क्रीनवर पाहत म्हणाला . तस त्याच्या मागुन राकेश म्हणाला..
" अरे तु कॉल तर उचल ..?!" .तस सिद्धांत ने त्याच्या कडे पाहतच डोक हलवत हो असा इशारा करत कॉल उचलून आईफोन कानास लावला . तस समोरुन एका स्त्रीचा आवाज आला .
" सिद्धांत कोठे आहेस तु? आणि केव्हापासुन कॉल करतीये मी?
अस फोन का स्वीच-ऑफ़ करुन ठेवला होतास..?"
मायराने कॉल उचलला गेला तस सिद्धांतवर प्रश्नांचा अनुबॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. मायरा म्हंणजेच सिद्धांतची लव मेरेज झालेली
बायको .
" का ग काय झाल ? सर्व ठिक आहे ना..!"
सिद्धांत म्हणाला .
" सिद्धांत ! तु पुन्हा विसरलास का ..? मी तुला सकाळी सांगितल
होत ना? आज मनस्वीचा वाढदिवस आहे ते !"
सिद्धांतला मायराने घरुन निघतावेळेस मनस्वी म्हंणजेच त्या दोघांची एकुलती लेक तिचा आज वाढदिवस असल्याच सांगितलेल , , त्यासोबतच वाढदिवसाला लागणार डेकॉरेशन सामान आणण्यास कळवलेल, परंतु सिद्धांत फार्म हाऊस जवळ सापडलेल्या मंदिरातली वेताळाची मूर्ती पाहण्याच्या नांदात सर्वकाही विसरुन गेला होता.परंतु मायराने त्याला पुन्हा कळवल होत. कारण तिला त्याच भुलक्कड स्वभाव माहीती होता .इतक प्रेम जे करायचे ते स्व्त:च्या जोडीदारावर , कि लग्नाला अकरा वर्ष होऊन गेली होती . तरीसुद्धा प्रेम तसुभरही कमी झाल नव्हत .
मायराच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने हळकेच जिभ चावली ,
" म्यावु आहे माझ्या लक्षात मी कधी विसरेल का..? "
सिद्धांत मायराला लाडात म्यावु म्हणायचा .
" सिद्धांत . ...मी तुझी लव -मेरेज झालेली बायको आहे !
अरेंज-मेरेज नाही ? समजला ना ? त्यामुळे माझ्याशी खोट बोलू नकोस! आता तु जे फार्म हाऊस .....पाहण्यासाठी गेलायेस ना..! तिकडून लागलीच निघ ? आणि राकेश भावोजींना घेऊन केक शॉप मधुन केक व वाढदिवसाला लागणार डेकोरेशनच ... सामान घेऊनये !
मायराने हुकूम सोडला.
"ok बेब! तु टेंशन घेऊ नकोस ! मी सर्वकाही घेऊनच पोहचतो
i love you.....❤"
"i love you 2 dear.🤗😘." अस म्हणतच फोन दोन्ही कडून कट झाला. सिद्धांतने आईफोनवर वेळ पाहिली 5:30 झाले होते.
तस त्याने घाई-घाईतच राकेशला सर्वकाही सांगितल .मग दोघेही मंदिराबाहेर आले .बाहेर फुग्या बाकीचे मजुर उपस्थीत होते . त्यांच्याशी मग राकेशने थोडफार काय ते त्यांच कामाच बोलून घेतल , मग तो सिद्धांतच्या गाडीत बसला. त्यासरशी सिद्धांतने चावी फिरवत गाडी चालू केली तस एक विशिष्ट प्रकारचा मोठा आवाज झाला , व गाडी धुर उडवत निघुन गेली.आता ह्या क्षणी त्या मंदिराजवळ फक्त फुग्या, त्याचे मजूर मित्र उपस्थीत होते....!
त्या सर्वांच्या कानांवर एक आवाज येत होता ...धम, धम,धम..💤💤💤💤💤💤
□□□□□□□□□□□□□□□□□□□
 
 
 
पुढील भागात होईल घात..😈
रक्ताच वाहील पाट... हिहिहिही ,खिखिखी स्स्स
कारण वेताळ फ़िरेल आज.
 
क्रमश :
मित्रांनो कंमेंट नाहीतर रेटिंग न्क्कीच द्या...
😊🙏🏼