Narakpishach - 5 books and stories free download online pdf in Marathi

नरकपिशाच - भाग 5

द- अमानविय..... सीजन 1 ...
..... आग्यावेताळ भाग 5 ...

पाषाणवाडीत उगवणारे सूर्यदेव आज जरा घाईतच होते.कारण आज एन सहा वाजताच पाषाणवाडीत सुर्यदेव बुडाले जात कालोख पसरायला सुरुवात झालेली. डोळ्यांत काजळ फासाव, असा कालोख चौहू दिशेंना अंधकाळ प्रमाणे मिरवू लागलेला. काळ्या रंगाचे कावळे थव्या-थव्याने काव, काव करत आकाशातुन उडून घरी जाण्यासाठी निघालेले. तर त्या विरुद्ध रक्तपिपासु वटवाघळू आप-आपल्या घरातुन बाहेर पडलेले, महांक्राल बाबांनी सांगितलेल्या नियमावलीच पाळन सर्वांनी कठोरतेने पाळण्यास सुरुवात केलेली , कारण एन सहा वाजताच पुर्णत पाषाणवाडी सुनसान झालेली, स्मशान शांततात पसरलेली पुर्णत गावात .जणु कोणी मेल असाव, वारल असाव, दुर कोठून तरी जंगलातल्या कोल्ह्ययांचा भेसूर रडण्याचा आवाज येत होता , जो त्या सांजवेळीच रुप भयाण भासवत होता.
अचानक एक काळ्या रंगाचा कावळा उडत, उडत पाषाणवाडीतल्या एका कौलारु घरावर जाऊन बसला, व मोठ-मोठ्याने काव, काव, करत ओरडू लागला. आपल्या भारतीय संस्कृती नुसार घरावर जर कावळा संध्याकाळी-रात्री ओरडत असेल तर त्यास अपशकुम मानल जात.
एकप्रकारे धोक्याची , मृत्युची जाणीव तो करुन देत असतो. त्या कौलारु घरावर बसलेला कावळा अद्याप सुद्धा काव, काव करत ओरडत होता. इकडे त्या कौलारु घराच्या आत एक इसम दोन्हीपाय मूडपुन आपल्या गुढग्यांत डोक खुपसुन बसला होता. परंतु कावळ्याचा काव-काव आवाज ऐकून , त्याने गुढग्यांमध्ये खुपसलेल डोक वर काढल . तस त्या इसमाचा चेहरा दिसुन आला. त्या इसमाचे डोळे रडून-रडून सूजले होते. रडल्याने डोळ्यांच्यातल्या रक्तासारख्या वेड्या-वाकड्या शिरा उठून दिसत होत्या. ज्याने डोळे लाल-लाल झालेले. ह्या इसमाच नाव होत, गोपीनाथ (गोप्या ) तो 27 वर्षाचा धडधाकट गडी असुन पाषाणवाडीत लोहाराच कामकरायचा .स्वभावाने तो -प्रेमळ, हलव्या मनाचा होता . त्याच दीड वर्षा-अगोदर लग्न झाल होत . दीड वर्षानंतर, आताच 2 माहिन्यांन अगोदरच त्याच्या बायकोला दिवस सुद्धा गेले होते . गोप्या आपण बाप होणार ह्या आनंदात आपुल्या बायकोस शांताला जड काम करु देत नव्हता, तिच्या वाट्याची अर्धी काम तर तोच करत होता, त्यासोबतच आपल काम सुद्धा अगदी वेळेवर करायचा . त्याच्या अंगात मेहनत जणू ठोसुन-ठोसुन भरलेली, की कितीही काम केल तरी त्यास कमीच वाटायचं. परंतु क्प्टी नियतीला त्याच हे सुख पाहावल नव्हत. शांताला कसलातरी आजार झाला आणि त्याच आजारात तिच्या पोटातल्या 2 महिन्याच्या गर्भासहीत तिची प्राणज्योत माळवली. आज जो स्मशान पेटला होता. तो ह्याच कमनशीबी गोप्याच्या बायकोच्या चित्त्याने पेटला होता. आनंदाचे क्षण, स्वप्न जणू आगीत होरपळले गेलेले. बायको शिवाय गोप्याला जगात कोणीही नव्हत. बायकोच्या जाण्याने त्याची अवस्था , दुख शब्दांत वर्णन करण्या पलिकडचे होते. रडून-रडून गोप्याचे डोळे सूजले जात लाल-लाल झालेले . आणि त्याच डोळ्यांनी त्यांने घराबाहेरच्या दरवाज्याकडे पाहील होत. गोप्याच्या घरापासुन 200 मीटर अंतरावर वाडीची वेस दिसून येत होती, आणि त्या पुढे जंगलात जाणारी, कालोखाच्या अंधकाळ राक्षसाची जबडा वासलेली वाट दिसुण येत होती. गोप्या न जाणे कित्येक ऊशीर होऊन गेला असेल, एकटक त्या कालोखाच्या वाटेकडे टक लावुन पाहत होता. कारण त्या कालोखात एक-एक करत शेकडोने मशाली पेटायला सुरुवात झाल्या होत्या. गोप्या आवासुन हे दृश्य पाहत होता, त्याच्या उघड़ झाप होणा-या डोळ्यांच्या झप-झपणा-या पापण्यांसरशी एक-एक मशाल भडकत होती .अचानक त्या तांबड्या प्रकाशात एक केस सोडलेली , खांद्यावरचा पदर जमिनीवरुन घासत येणारी, एक आकृती दिसली . ज्या आकृतीला पाहुन गोप्याच्या चेह-यावर हास्य पसरल , तस तो आपल्या जागेवरुन उठला , मग त्याच्या तोंडून दोन शब्द निघाले . शांता.. ...!!!!!!!!!!!
इकडे त्या आकृतीला जणु त्याचे शब्द ऐकू गेले असावेत की काय..? तीने आपली मान हो असा इशारा करत हळवली आणि विशिष्ट प्रकारचा हाडांच्या वाजणा-या आवाजा सहित गोप्याच्या दिशेने आपला पांढरा फट्ट हात उंचावला . व हाताची तर्जनी त्याच्या दिशेने दाखवत तिला विशिष्ट प्रकारे हळवत गोप्याला आपल्या दिशेने बोलावु लागली.गोप्या आपल्या बायको साठी इतका वेडा झालेला,की अक्षरक्ष त्यास हे सुद्धा ठावूक राहील नव्हत , की मेलेला माणुस कधी परत येत नसतो.
त्याने आपले आसवांचे डोळे शर्टच्या बाह्यांनी पुसले, आणि चेह-यावर एका वेड्यासारख हास्य करत .आपल्या घराच्या दरवाज्याची चौकट ओलांडली. गोप्याने ज्यासरशी दरवाज्या बाहेर पाऊल ठेवल त्यासरशी घरात देवांसमोर जळत असलेला तांबड्या रंगाचा दिवा झप दिशी विझला. गोप्याला दरवाज्याबाहेर आलेल पाहुन शांता रुपी पिशाच्चीनीच्या चेह-यावर एक छद्मी हास्य पसरल .
" अहो............! इकडे याना....!"
प्रेमळ आवाज, मंत्रमुग्धींत करणारा प्रेमळ आवाज . जो की शांताच्या तोंडून निघाला होता. आवाज इतका प्रेमळ होता की पुर्णत पाषाणवाडीतल्या हवेत तो आवाज काहीक्षण घुमतच राहीला. आवाजासरशी गोप्याने एका बैला सारखी मान हलवली व एक -एक पाऊल वाढवत तो शांताच्या दिशेने जाऊ लागला.
□□□□□□□□□□□□□□□□□
आज महाराष्ट्रात परप्रांतातुन कामाकरीता येणा-या लोकांच्यात खुप वाढ झाली आहे. त्यातलेच फुग्या आणि त्याचे मजुर मित्र होते . ते सुद्धा अशेच परप्रांतातुन महाराष्ट्रात कामाधंद्या करीता आले होते . फुग्यासहीत सर्वांच शिक्षण कमी होत. परंतु अंगात, नसानसांत मेहनत भिरभिरलेली होती . कोणतही काम करण्यास ते तत्पर होते . ते कितीही का नाही जड असो, किंवा उन्हा- ताहानात असो. अशातच त्यांची ओळख राकेश बिल्डरशी झाली . राकेशना त्या सर्वांची मेहनत, वेळेवर काम करन खुप आवडल. तस त्याने फुग्या व त्याचे 4 मित्र गंग्या, भग्या, कमल्या, परश्या ह्या सर्वांना आपल्या क्ंस्ट्रक्शन साईटवर कामाला लावल . तसही राकेशकडे बिल्डींग, बंगले, अशा इत्यादि कामांची ऑर्डर येतच असायची . ज्याने त्या सर्वांना पहिल्या सारख नाक्यावर उभ राहायची गरज नव्हती. जिथे काम सुरु व्हायच तिथे त्यांना पत्र्याच घर बांधुन रहायला लागायच. मग काम संपल की दुसरीकडे सुद्धा हाच प्रकार करायला लागायचा. कधी-कधी पाच -सहा महिन्यांतुन ते आपल्या परप्रांती गावी जायचे . मग दोन-तीन आठवडे तिकडे घालवले की पुन्हा इकडे कामासाठी याव लागायच. त्या सर्वांच आयुष्य असच चालू होत .
परंतु नियती कोणाला चांगल जगू देइल तर नवळच म्हणावी लागेल .
सिद्धांत-राकेश दोघेही जसे निघुन गेले . तस आताह्याक्षणी फुग्या, भग्या, कमल्या,परश्या, गंग्या. हे पाचजण तिथे उरले गेले .
" अय भग्या ! तुला आवाज येतो का बे ..?"
फुग्या आपले डोळे डावी-उजवीकडे हळवत म्हणाला.
" कसला..?" काळ्या रंगाचा, फुग्या प्रमाणे जाड-जुड शरीर डोक्यावर टक्कल असलेला भग्या वटारलेल्या डोळ्यांनीच म्हणाला. तस म्हणायला त्याचे डोळे घुबडा येवढे मोठे होते. ज्यांची कधी -कधी त्याचारही जनांना भितीच वाटायची .
" अर ! ढोल वाजवाचा आवाज येतोय ..! "
फुग्याने आपले कान टवकारले . व आजुबाजुला पसरलेल्या जंगलातल्या झाडांच्या फांद्याकडे पाहु लागला.
" फुग्या ! आर साहेब म्हणाले ना ! इथ जवळच वाडी हाय
त्या वाडीत त्यांचा कायतरी लग्न समार्ंभ असल .! म्हणून वाजत
असतील ढोल!"
काटकुल्या शरीराचा गंग्या आपल मत मांडत म्हणाला. तस त्याच्या ह्या वाक्याला दुजोरा देत परश्या उद्दारला .
" व्हय की! आण साहेब हे बी म्हणाले, की आत सोन्याची तलवार
हाय म्हणून !"
परश्याच्या डोळ्यांत हे वाक्य उद्दारताक्षणीच एक वेगळीच चमक त्या सर्वांना दिसुन आली. मोह , लालच ....
" परश्या ! माझ ऐक लेका ? त्या तलवारीच्या नांदी नको लागू
हकनाक मरशील !"
फुग्याने परश्याकडे पाहिल व म्हणाला.
" फुग्या! .....अर ...जरा...इचार ...कर ? ती तलवार कधी खरच
सोन्याची असली ! तर जाम पैशे भेटतील..!"
परश्या आपली जीभ ओठांवर फिरवत म्हणाला.
" परश्या ! त्याच्या जवळ जायची बी लोकांना भीती वाटती..! आण
तु त्याची तलवार चोरुन इकायच म्हंतुस .? आर जिव घेईल लेका तुझा
त्यो !..कोपल तुझ्यावर -..कोपल लेका ..!" फुग्या परश्याला सतर्क करत म्हणाला .
" अस काय बी नस्तय ..! लेका ..!" परश्या आपल्या मतावर ठामपणे उभा होता.
" बरोबर हाय तुझ परश्या ..! " अचानक एक आवाज आला . कारण की येवढ वेळ गप्प बसलेल्या कमल्याने तोंड उघडल, आणि तोंडात एक बिडी ठेवली .मग खिशातुन चाचपडत माचीस बाहेर कढ़ुन एक कांडा पेटवला , आणि तो पेटलेला कांडा तोंडाजवळ घेऊन जात बिडी पेटवली . सर्वांच लक्ष कमल्या पुढे काय उद्दारेल ह्या वरच होत. बिडी पेटली तस त्याने एक झुरका मारला. मग नाका तोंडावाटे धुर बाहेर सोडून बिडी हातात धरुन पुढे म्हणाला .
" हे देव , कोप -बिप लय जुन झालय आता ..! आता फक्सत एकच देव ह्या दुनियेत उभा हाय ..!.. तो म्हंजी? " कमल्याने आपला आंगठा तर्जनी विशीष्ट प्रकारे एकमेकांना जोडत चोलले व पुढे म्हणाला .
" पैसा..! आण.....पैश्याचा देव..! आण हाच देव कोपतो.हिहिहिही..!" निर्लज्जपणाचा आव दाखवतच कमल्या फुग्याकडे पाहत हसू लागला .त्यारशी परश्या हळूच चालत फुग्याजवळ आला . त्याने आपला एक हात फुग्याच्या खांद्यावर ठेवला व समजावण्याच्या सुरात म्हणाला .
" अरे फुग्या ! कशापाई येळ घालवतुस ? जाऊन बघुयात की..!
ती तलवार खरच सोन्याची हाय !का अशीच हाय ..?"
" आर पण....!"
फुग्या आपल पुढच वाक्य पुर्ण करणार की तोच मध्ये गंग्या म्हणाला .
" फुग्या चल की लेका बघुन येऊ मस्त ? तस बी आपल्या
सारख्या माणसांसनी सोन्याची तलवार हातात घ्याला भेटल
म्हंजी ! लय नशीबवान असु बघ..आपण..!"
परश्याने बिडी ओढणा-या कमल्याकडे पाहील. आणि नजरेनेच मंदिरात जाण्यास कळवल . फुग्या सुद्धा मग तैयार झाला परंतु त्याने मंदिरात जाण्यास साफ नकार दर्शवला. मग अस ठरल की फुग्या आण भग्या मंदिराबाहेर थांबतील. आणि गंग्या, परश्या,कमल्या मंदिरात जातील .
" फुग्या तुझा फोन दे..? " परश्याने फुग्याकडे पाहत हात वाढवला .
" माझा फोन कशापाई? तुमच्याकडे आहेत की तुमच फोन..?"
" आर लेका ! आत मधी लय कालोख असल ,उजेडाची गरज
पडल ! आण माझ्या फोनची बैटरी बी संपत आलीया!"
परश्याने आपला स्मार्टफोन त्याला दाखवल. ज्यात खरच बैटरी संपत आलेली.फुग्याने मग त्याला आपला स्मार्टफोन देऊन टाकला .
तस परश्या , गंग्या, कमल्या आप-आपल्या फोन ची टॉर्च चालू करत मंदिराच्या दाराची चौकट ओलांडून मंदिरात शिरले. सर्वात पाहिला कमल्या, त्याच्या मागे परश्या, शेवटला गंग्या असे ते तिघे चालले होते.
चार टॉर्चचा प्रकाश सुद्धा मंदिरातल्या जाड पडद्याच्या कालोखाला भेदु शकत नव्हता इतका अंधार त्या मंदिरात पसरलेला. त्यासोबतच शांतता इतकी होती की त्या तिघांचेही श्वास स्व्त:च्या कानांना ऐकू येत होते .2 मिनीट चालून झाली असतील तस त्यांच्या नजरेस सर्व प्रथम खाली जाणा-या दगडाच्या काळ्या रंगाच्या पाय-या दिसल्या. ज्या की खाली घेऊन जात होत्या. जणु रहस्यमय तळघरच असाव खाली.
" पाय-या आहेत रे खाली जायला ...!.... निट या..? "
कमल्याचा आवाज त्या मंदिरात गुंजला , एकदा उच्चारलेला आवाज दोन वेळा ऐकू आला. कमल्याने आपल पाऊल हलकेच वाढवत त्या दगडाच्या पायरीवर ठेवल. तस त्याच्या पायाला ती पायरी थंड बर्फाच्या लादी सारखी भासुन गेली.सर्रकन पुर्णत अंगावर काटा आला, अंग शहारल गेल .
राकेशला सुद्धा अशाच प्रकारचा अनुभव आलेला . परंतु राकेश, सिद्धांतला दिसलेल धुक मात्र आता ह्या क्षणी मंदिरात पडलेल नव्हत. काहीतरी माया होती आग्यावेताळाची .टॉर्चच्या प्रकाशात एक -एक पाऊल वाढवत परश्या पुढे जात होता. त्याच्या मागो-माग कमल्या, ग्ंग्या, सुद्धा येत होते . एकदाच्या पाय-या संपल्या तस ते तिघेही खाली येऊन पोहचले .
" कमल्या पायांना खाली ले थंड-थंड वाटू राहील बे..?"
गंग्या टॉर्च पायांवर मारतच म्हणाला. कारण खाली कालपट पड़लल्या दगडी जमिनीतुन मंद वाफा निघत होत्या.
"व्हय की ! तेच समजना झालय ..! हे इतक थंड कस लागतय..!"
परश्या सुद्धा ग्ंग्याच्या वाक्याला दुजोरा देत म्हणाला . परंतु कमल्याच लक्ष त्या दोघांच्या बोलण्यावर नव्हत. कारण तो आपल्या हातात असलेली टॉर्च मंदिरातल्या काळ्या पडलेल्या भिंतींवर फिरवत काहीतरी शोधत होता .वेताळाची मूर्ती, त्याची सोन्याची तलवार . कमल्याने हलके-हलके फोनची टॉर्च पुढ्यात असलेल्या भिंतीच्या दिशेने आणावयास सुरुवात केली . तस अचानक कमल्याच्या टॉर्चच्या प्रकाशात समोर एक पाषाण स्वरुपी मूर्ती तिथे अवतरली गेली. जणु कालोखाच काला पडदा खाली पडला जावा आणि समोर जो कोणि लपलेला आहे त्याच आस्थित्व दिसुन याव. समोर अचानक दिसलेली वेताळाची मूर्ती तीचे भयानक क्रोधहिंत अंगार भरलेले पिवळे डोळे जणू ते प्रत्येकावर एक सुडभावनेचा कटाक्ष टाकत आहेत , टोस्कुले दात जणू रक्तनटीका फाडून रक्तपिण्यासाठी तैयार आहेत , एक मोठी रुबाबदार मिशी,व हातात एक कायमस्वरुपी लढाऊ पवित्रा घेतलेली सोनेरी रंगाची तलवार , ! काटकुल्या ग्ंग्याने हे येवढ भयानक रुप पाहून जणु वाघ दिसाव आणि माकडासारख जोरात झप,झप करत झाडावर चढाव तस परश्याच्या खांद्यावर चढला . जणू परश्या विक्रम आणि ग्ंग्या वेताळ असावा. परश्या, ग्ंग्या दोघांचीही शरीरयष्टी मिलती-जुलती असल्याने. परश्या काही ग्ंग्याच भार सांभाळू शकला नाही. दोघेही धाडदीशी जमीन-दोस्त झाले. ग्ंग्या मागे आण त्याच्या अंगावर परशा अशा अवस्थेत दोघेही पडले .
" ए ग्ंग्या तुह्या आईशी×××××ड! तुहे भो××××च्या! हाड तोडली माझी ..! आय, अय अय, ! "
परश्या आपल्या कमरेला एक हात लावतच उठला .
" शुश्श्श...! " कमल्या आपला एक हात तोंडावर ठेवतच , त्याने परश्याला पुढे पाहण्यास सांगितल. तस पुढच दृश्य पाहुन परश्याची वेदना कुठच्या -कुठे पळाली , व त्याच्या चेह-यावर एक आनंदित हसू पसरल.
□□□□□□□□□□□□□□□
महांक्राक बाबा आपल्या आश्रमात असलेल्या महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडून डोळे बंद करुन उभे होते.त्यांच्या पुढ्यात असलेली महादेवाची मूर्ती एका दगडाने कोरलेली होती, नागराज , व्याघ्रांबर, गळ्यातळ्या रुद्राक्ष माळा , जटा, चंद्र, त्रिशूल ,सर्व अगदी खरे असल्यासारखे भासुन येत होते. काहिवेळात महांक्राल बाबांनी बंद केलेले डोळे झपकन उघडले, त्यांचे डोळे निळ्या रंगाने चमकत होते.कारण त्यांनी मंदिरात गेलेल्या परश्या, ग्ंग्या, कमल्या ह्यांस आपल्या निलमंती विज्ञेने पाहिल होत .
" पैशाच्या मोहापायी बिचारे जिव गमावुन बसतील. कोण सांगेल
त्यांना की बाळांनो त्या मंदिरात क्षणभर ही थांबु नका! तो सैतान
एकेकाचा बळी घेईल.! मृत्युचा खेळ-खेळतोय. सोंगाट्या सारख कट रचतोय " बाबांच्या डोळ्यांतुन हे वाक्य उद्दारताक्षणीच अक्षरक्ष दुख थेंब अश्रु बाहेर पडले . काहीवेळानी त्यांनी आपले डोळे पुसून घेत पुन्हा महादेवा समोर हात जोडून बोलायला सुरुवात केली .
" महाकाल ! माझ्या चुकीची ही ..शिक्षा त्या बिचा-यांना भोगावी
लागतीये ..! त्यांची ह्यात काय चुक म्हणायची ! त्यांची रक्षा कर महाकाल.. रक्षा कर ..!" बाबांनी पुन्हा आपले हात जोडले . तस त्यांच्या मागुन आवाज आला .
" गुरुवर्य , जेवन तैयार आहे ..!" विघ्नेश म्हणाला . तस महांक्राल बाबांनी महादेवांकडे पुढे पाहतच आपले डोळे पुसले. मग विघ्नेश कडे स्मित हास्य देत ते निघुन गेले. परंतु विघ्नेश मात्र आपले गुरु असे का बोलले असतील ह्याचाच विचार करत महादेवाच्या मूर्तीकडे पाहू लागला.
परंतु महांक्राल बाबांच जस त्याला बोलावण्याच आवाज आल तस तोही जेवन करण्यासाठी निघुन गेला . महादेवाच्या मूर्तीपाठीमागेच एक मोठी उघडी खिडकी होती. त्या खिडकीतून सांजवेळीची थंड हवा आत येत होती . अचानक एक थंड हवेचा झुळुक आत आला आणि महादेवाच्या पुढ्यात जळनारी समई विजवुन गेला. तस त्या उघड्या खिडकी पासुन दुर एक वेड्यासारखी धावणारी आकृती दिसुन येऊ लागली जी की गोप्याची होती .
□□□□□□□□□□□□□□□□
गोप्याच आपल्या बायकोवर जिवापाड प्रेम होत . ती मेलीये , आपल्या स्व्त:च्या ह्या हाताने तिला , तिच्या चितेस स्मशानभूमीत अग्नी दिलीये ह्यावर त्याचा विश्वासच किंवा आठवणच राहीली नव्हती . समोर वेशीबाहेर शांता ऊभी आहे आणि ती आपल्याला बोलावत आहे हेच त्याला दिसुन येत होत .काळ्या रंगाची तीची साडी, पांढ़रट त्वचा, काळे ओठ,काळी जिभ, पिवळ्या रंगाचे डोळे, गळ्यात कसल तरी , विचीत्र सैतानाच लॉकेट, होत . आणि हाताला उगवलेल्या मोठ-मोठ्या नखांनी ती गोप्याला आपल्या दिशेने बोलावत होती . मोठ-मोठ्या ढेंगा टाकत गोप्या शांता रुपी मंदाकीणी पिशाच्चीनी योनीत गेलेल्या भुताच्या दिशेने धावत निघाला होता . त्याच लक्ष फक्त शांताकडे होत. परंतु तिच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या महाशक्तीशाली वेताळासारखाच असणारा देव, ज्याची मंदाकीणी दासी आहे तोच शांताच्या मागे उभा होता .कै:-कृलाक साक्षात वेताळाच्या हुकूमावरुन प्रथम पृथ्वीतळावर अवतरला होता . एक -दोन -तीन - चार वेगाने पडणा-या गोप्याच्या पावलांनी अखेर आतीवेगाने वेस ओळांडली .
□□□□□□□□□□□□□
इकडे गुरुजींनी आपल्या तोंडात जेवनाचा प्रथम घास कोंबला होता .
की प्रथम घासातच त्यांच्या खडा आढळून आला. त्यासरशी कसल्यातरी भयंकर अनाहूतपणाची चाहूल त्यांच्या मनाला लागून गेली.
□□□□□□□□□□□□□
" शांते ..! शांते ..? तू परत आलीस ..? " अस म्हंणतच गोप्याने शांताच्या
चेह-याला हात लावला, तस त्याच्या हाताला थंड, प्रेताच्या शरीरावर हात ठेवल्यासारख जाणवल . हाताला एकवेळ थंड , बर्फाच्या लादीला स्पर्श व्हावा, अशी त्याची अवस्था झाली . अचानक गोप्याच्या कानांवर हिंस्त्र श्वापद गूर, गुरण्याचा आवाज आला . आणि त्या गुर,गूरण्यासरशी , एक
भयंकर खोल गेलेला ,भरडा मिश्रित भयंकर क्रोधहिंत भरलेला आवाज
त्या वेशीबाहेर घुमला .
" हात काढ! न्हाय तर चाऊन खाईल ..?????स्स्स्स्स!"
आता आलेला आवाज गोप्याच्या कानांनी बरोबर हेरला होता , तो आलेला आवाज शांताच्या मागुन आलेला ,काजळी फासलेल्या अंधारातुन आलेला , एकवेळ गोप्याने शांताच्या गालांवर ठेवलेला हात तसच ठेऊन घेत तिच्या मागे पाहील , तस एकवेळ, काहीक्षण त्या अंधारात कसलीतरी हालचाल झाल .गोप्याने आपल्या प्त्नीच्या गालावर अद्याप सुद्धा हात ठेवलेला त्याच्या हुकूमास त्याने कसलाही प्रतिसाद दिला नव्हता. त्याचाच कै-:कृलाक ला भयंकर राग आला , चवताळून उठला तो , कारण शांता आता शांता राहीली नव्हती. तो आता मंदाकिणी पिशाच्च योनीत गेली होती. तिच्या शरीराव आता फक्त कै:-कृलाकचा हक्कक होता .की अचानक काळ्याकुट्ट अंधारात एका-पाठोपाठ तीन लाल रंगाचे डोळे चमकले , आणि त्या चमकणा-या डोळ्यांसरशी शांताच्या डोक्याजवळून एक काळाकुट्ट हाताचा पंजा बाहेर पडला , आणी त्या अमानवीय पंजाने गोप्याचा हात धरला , जो की शांताच्या गाळावर होता .गोप्याचा हात ज्यासरशी त्या कै:-कृलाक ने आपल्या हाती धरला तस त्याच्या हाताची चामडी करपळी जाऊ लागली. विशीष्ट प्रकारचा फ्स्स आवाज झाला .करपल्या जाणा-या हातुन करपट वास बाहेर पडू लागला , जो की शांता रुपी पिशाच्चीन मंदाकीणी आपल्या नाकपुड्या फुग-फुगवुन श्वासान वाटे आत घेऊ लागली . अचानक आकाशात एक मेघ-गर्जना करणारी मृत्युंजय मण्याची लाल रंगाची कधीही न पाहीलेली वीज चमकली . गावातली लहान-मोठी -प्रौढ सर्वजन भीतीने शहारली गेली . एका-पाठोपाठ ढगांच्या होणा-या घर्शनाने तीन चार लाल रंगाच्या विजा एका-पाठोपाठ चमकल्या आणि त्या रक्तासारख्या लाल उजेडात अंधारातुन एक 8-9 फुट दैत्यरुपी कै:-कृलाक गोप्याच्या समोर अवतरला . कै-कृलाकच्या चेह-यावर एक सोन्याचा मुखवटा होता. जो त्याने आपल्या हातानेच बाजुला केला

. तस त्याच भयानक रुप दिसून आल .पुर्णत काळ्या रंगाची त्याची त्वचा होती. डोक गोल असुन धार-धार कान होते , लाल रंगाच्या दोन डोळ्यांसहीत कपाळावर सुद्धा एक उघडा डोळा होता.गळ्यात एका विशिष्ट प्रकारचा मोठा सोन्याचा हार घातलेला . हाताचे पंजे काळेच असून त्यावर धार -धार नख होती .हा असा पाताळातला पिशाच्चदेव कै-कृलाक आपल्या , पत्नी मंदाकीणी सहित अवतरला होता . हा असा भयंकर , मणुष्याच्या आकळन क्षमतेच्या बाहेरचा प्रकार पाहून वेड्याच्याही तोंडून किंकाळी फुटावी.
गोप्याने सुद्धा आपल तोंड उघडल होत . कारण इतकवेळ दाबुन धरलेल भय बाहेर पडन आवश्यक होत . परंतु त्याची किंकाळी बाहेर पडण्या अगोदरच शांताने आपला हात त्याच्या छातीत रुतवला. चिखलात जावा तसा हात अलगद छातीत घुसला गेला. करंट बसाव तस गोप्याच शरीर झटका लागल्या सारख हलल गेल . गोप्याच्या प्राण जाणा-या शरीरातुन कै:-कृलाक ने लागलीच आपल तोंड उघडुन त्याच्या शरीराच्या आतील आत्मा शोषण्यास सुरुवात केली . तस गोप्याच्या तोंडामधुन लाल गरम रक्ताची पिशवी फुटावी तस गरम ताज्या रक्ताच्या चिलकांड्या , थेंब-थेंबाने शांताच्या चेह-यावर उडाल्या जाऊ लागल्या . ज्या तिने आपल्या कालपट सरडया सारख्या लांब जिभेने चाटून घेतल्या.व एका झटक्यात छातीत रूतवलेला हात , ह्दया सहित बाहेर काढुन घेतला.व एकटक त्या वाफा निघणा-या धड-धडणा-या हदयाकडे जिभळ्या चाटत पाहू लागली .कै:-कृलाकने सुद्धा गोप्याचा आत्मारुपी उर्जा शोषुन खाऊन टाकली . तस कै-:कृलाकने गोप्याच्या निर्जीव प्रेताकडे पाहिल जे की उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होत .
" मालक आम्हाला बी लय भूक लागलीया..!" कै:-कृलाक च्या मागुन कालोखातुन एक भसाडा आवाज आला, त्यासरशी
कै-:कृलाकने गोप्याच प्रेत अलगद आपल्या एका हाताने वर उचल्ल व आपल्या धार-धार दातांनी त्याच्या मानेचा लचका तोडला , आणी राहीलेल बाकीच शरीर मागे-पेटलेल्या मशालींच्या दिशेने भिरकाऊन दिल . तस त्या कालोखातुन हाड, तोडून खालल्याचा, मांस ओरबडून टाकल्याचा आवाज बाहेर येऊ लागला. मग ज्यासरशी तो आवाज थांबला गेला .त्यासरशी ढोल बदडवण्याचा आवाज घुमू लागला. मशाली जागेवरुन हलू लागल्या कारन आग्यावेताळची सेना मंदिराच्या दिशेने निघाली होती....


क्रमश:

रेटिंग, समीक्षा , फॉलो, नक्की द्या मित्रांनो


स्टीकर्स नकोयेत...