Satyamev Jayte - 13 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

सत्यमेव जयते! - भाग १३ (शेवट)

भाग १३(शेवट)



काही वर्षानंतर:-



"मम्माऽऽऽऽऽ मम्माऽऽऽऽऽऽ" एक छोटीशी मुलगी पळत येत महालक्ष्मीला शोधत आवाज देत असते. तशी महालक्ष्मी तिला रूममध्ये दिसताच ती पटकन जाऊन तिला बिलगते.




"मम्मा, डॅडला बेश अवॉल मिलाल. तू मीच केलं",ती हातात एक ट्रॉफी दाखवत आनंदी होऊन बोबड्या स्वरात बोलते. तिचं बोलणं ऐकून महालक्ष्मी हसते.




"रक्षु, तुझे डॅड आहेच हिरो. मग मिळणारच ना त्यांना अवॉर्ड. चला आता, पिल्लू हात धुवून फ्रेश होऊन या. मग आपण मस्त जेवण करू.",महालक्ष्मी गुढग्यावर बसून तिची बॅग काढत म्हणाली. तशी ती छोटी मुलगी आपली हातातील ट्रॉफी ठेवून पळतच आतमध्ये निघून जाते. महालक्ष्मी फक्त तिला पाहत राहते.




"तुझे डॅड, नेहमी हिरोच राहतील!! तुझे हिरो आणि माझे पण हिरोच !!",महालक्ष्मी अस बोलून बेडवरचे आपले कपडे घडी करायला लागते.




"कोणाचे हिरो? मी नाही हिरो. तूच रिअल हिरो आहेस!! माझ्या घरची माझ्या आयुष्याची. यू नो आय एम लकी पर्सन इन वर्ल्ड!!",राजवीर मागूनच येऊन तिला मिठीत घेत म्हणाला. त्याला अस अचानक आलेलं पाहुन आधी तर ती दचकते. नंतर मात्र रिलॅक्स होऊन गालातच हसत असते.





"रक्षिता, येईल राज...सोडा ना मला", ती आता आसपास पाहत घाबरून म्हणाली.






"आजी आजोबांकडे गेली ती. रूम पण बंद आहे. त्यामुळे सध्या तरी कोणीच येऊ शकत नाही इथे.", राजवीर अस बोलून तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवतो. महालक्ष्मी नाही मध्ये मान हलवून शांत राहते.





"अति रोमँटिक होऊ नका. आपली पाच वर्षांची एक मुलगी आहे. हे लक्षात घ्या तुम्ही आणि आता निघा बर इथून.",ती राजवीरच्या हातातुन सुटत म्हणाली.





"ओहऽऽऽ मला वाटलं आपण अजूनही जवान आहोत ना? त्यामुळे चालत की. माझी मुलगी मॅच्युअर आहे. ती तुझ्यासारखी नाही आहे.",राजवीर मुद्दाम तिला छेडत म्हणाला.





"माझ्यासारखी म्हणजे?मी जन्म दिला आहे. मग? हा तुम्ही आसपास असायचा म्हणून तुमचा लळा लागला आहे.",महालक्ष्मी हसूनच त्याला म्हणाली. राजवीरचा रक्षिता आणि तिच्यावर भरपूरच जीव होता. तो सगळं काही त्यांना देत असायचा.





रक्षिता वर त्या दोघांनी चांगले संस्कार केले होते. ती राजवीरसारखी दिसायची. थोडेफार महालक्ष्मीचे गुण तिच्यात आले होते. लहान वय असून पण ती सगळ्यात हुशार होती. ट्रेकिंग आणि कराटे आवडीचा विषय होता तिचा. महालक्ष्मीने डान्स क्लासला टाकण्याचा प्रयत्न केला . पण ते काही तिला आवडलं नाही. त्यामुळे तो विषय तिने सोडून दिला. राजवीर मुळे ती स्वीमिंग पासून ते गेम पर्यंत सगळं काही शिकत होती. आज राजवीरला त्याच्या कामाबद्दल पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार त्याने तिच्या हातात दिला होता. त्यामुळे ती आनंदी होऊन घरात घेऊन आणून महालक्ष्मीला दाखवत होती.




"अहो, अभिनंदन तुम्हाला. तुमच्या कामगिरी बद्दल मिळाला ना पुरस्कार? मला खूप भारी वाटलं. दुर्गा पथकाची दखल इतर राज्यांनी पण घेतले. आता दुर्गा पथक सगळीकडे पसरणार आणि भारतातील मुली तुमच्या या कार्याने सुरक्षित होणार!!",महालक्ष्मी आनंदी होऊन म्हणाली.





"हो, पण यात तू तेवढीच भागीदार आहेस. तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे मही. ही एक छोटीशी भेट आहे सर्वांना आपल्याकडून. लव्ह यू महालक्ष्मी.",राजवीर अस बोलून तिला स्वतःच्या मिठीत घेतो. कारण आता त्याला खूप भारी वाटत होतं. हे सगळं काही महालक्ष्मी मुळे झालं होतं. दुर्गा पथकाचे पूर्ण श्रेय त्याने महालक्ष्मीला दिले होते!!





दुर्गा पथकातिल स्त्रिया या देखील बेधडक होत्या!! जिथं मुलींना रात्र अपरात्री गरज लागली की, एका कॉल वरून दुर्गा पथक त्यांच्या मदतीला पोहचत होते. ऑन ड्युटी चोवीस तास हे काम करत असायचे. त्यामुळेच दिल्लीतील महिला सुरक्षित झाल्या होत्या!! याचीच दखल सर्वांनी घेऊन या पथकासारखे पथक आपल्या प्रत्येक राज्यात निर्माण व्हावे, यासाठी काही लोक प्रयत्न करत होते. हळूहळू हे पथक पसरत चालले होते. याचे खरे शिल्पकार राजवीर आणि महालक्ष्मी होते!! सर्वांना त्यांचे कौतुक देखील वाटायला लागले.




एका काळी हरलेल्या महालक्ष्मीला बाहेर काढून राजवीरने तिला एक नवीन आयुष्य जगायची संधी दिली. ती देखील आता तिचा संसार थाटून इतर मुलींसारखे मानाने या समाजात पुन्हा एकदा वावरायला लागली. तिला पाहून आता अश्या काही मुली देखील बाहेर पडत होत्या. पण त्यांच्याकडे राजवीर सारखा सखा वगैरे नसल्याने समाजाच्या बोलण्याने त्या मागे जाऊन आपलं जीवन संपवत असायच्या!! महालक्ष्मीच्या आयुष्यात जर राजवीर नसता? तर आज ही तिने तिचं काय केलं असत? याची कल्पना करून आजही तिच्या आई वडिलांना भीती वाटते. पण आता सगळं व्यवस्थित पाहून ते शांत राहायचे. आता त्यांच्या जोडीला रक्षिता होती. महालक्ष्मीचे आई बाबा आता घरात राहून रक्षिताच्या मागे पुढे करत असायचे. एकदम सुखी परिवारासारखे ते सर्वजण राहत होते!!





दिल्लीच्या लोकांनी मात्र डीएसपी साहेबांना त्यांची बदली करायला दिली नाही. हट्टाने काही लोकांनी त्यांना दिल्लीतच ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आजही राजवीर आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत वावरत होता. मात्र त्याच्या आई वडिलांनी कधीच त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी राजवीर सोबतचे सर्व संबंध मोडून टाकून आपलं नवीन जीवन सुरू केलं होतं. राजवीर देखील आता सगळं विसरून आपल्या परिवारात आणि कामात पूर्णतः गुंतून गेला होता. त्याच्या परिवाराने त्याने आपल मानलं नसलं तरीही दिल्लीतील कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक त्याला आपला मुलगा मानून त्याचे भरपूर कौतुक करत असायचे. कारण राजवीर सत्याच्या मार्गाने चालत असायचा!! सत्यमेव जयते!! हेच त्याने लोकांना पटवून दिले होते. खऱ्या बोलणाऱ्या लोकांच्या मागे तो खंबीरपणे उभा असायचा.






अपर्णा देखील आपल्या कुटुंबात बिझी झाली. मात्र ,ती राजवीर महालक्ष्मीला कधीच विसरली नाही आणि ती केस देखील नाही!!





---------------- समाप्त -------------------



आज ही कथा संपत आहे. त्यामुळे वाईट ही वाटत. पण ओके. मनात ठरल्या प्रमाणे एक वेगळा विषय घेऊन मी कथा निर्माण केली आणि तुमच्या सपोर्ट मुळे ही कथा आज इथपर्यंत पोहचून पूर्ण झाली. छोटीशी कथामालिका होती ही. राजलक्ष्मी या जोडीला प्रेम देणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!


महालक्ष्मी आणि राजवीर(राजलक्ष्मी) यांचा हा आगळा वेगळा प्रेमाचा प्रवास कसा वाटला? हे देखील आज कंमेंट मध्ये सांगा..


पुन्हा एकदा अश्याच स्टोरी सोबत भेटत राहू..!!चला बाय बाय..