Aatmahatyes kaaran ki... - 3 books and stories free download online pdf in Marathi

आत्महत्येस कारण की.... - 3

मिताली ने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तन्मय ला काहीच सुचत नव्हते. त्याने मिताली च्या आई बाबांना फोन केला. मिताली च्या आई ला त्याने थोडक्यात सांगितले. आईला मिताली बद्दल ऐकून शॉक च बसला . तिने बाबांना सांगितले. दोघेपण हॉस्पिटलमध्ये पोहचले. तन्मय राव हे असे कसे झाले. तन्मय ला काय बोलावे सुचेना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिताली च्या आई बाबांना त्याने सांगितले की निशा सिरीयस आहे. तन्मय चा मित्र जय पण आला. "जय अरे काय होवून बसलं रे हे. मिताली वाचेल ना." जय तन्मय ला बोलला सगळे ठीक होईल तन्मय ."तन्मय ला आपली चूक लक्षात आली होती.पण आता खूप उशीर झाला होता.
तन्मय ला मिताली ची आणि त्याची पहिली भेट आठवली. मिताली ज्या ऑफिस मध्ये कामाला होती. तन्मय य पण त्याच ऑफिस मध्ये कामाला लागला. पहिल्या दिवशी जेव्हा त्याने मिताली ला बघितले तेव्हा च तो तिच्या प्रेमात पडला. मिताली दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग, काळेभोर डोळे, सडपातळ बांधा. तिने बेबी पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. तो तिला खूप च उठून दिसत होता. तन्मय ला ती खूप आवडली . तो सारखा तिला चोरून चोरून बघायचा. मिताली च्या पण ते लक्षात आले होते. तन्मय ची पण पर्सनॅलिटी खुप भारदस्त होती. जीमने कमावलेले शरीर, गोरा पान रंग, कुरळे केस, घारे डोळे, क्लीन शेव. त्यामुळे मिताली ला पण तो आवडला होता. तन्मय ने मिताली ला लग्नासाठी विचारले. मिताली पण हो म्हणाली. दोघांच्या ही घरी जेव्हा दोघांनी सांगितले तेव्हा घरचे पण सहज तयार झाले त्यांच्या लग्नाला . तन्मय ला त्यांचे लग्नानंतरचे सोनेरी दिवस आठवले.
इतक्यात कोणीतरी त्याला आवाज दिला आणि तन्मय ची तंद्री तुटली. तो भानावर आला. डॉक्टर त्याला बोलवत होते. मिस्टर तन्मय आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. उद्या पर्यंत जर मिताली शुद्धीत आली नाही तर तिच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तन्मय ने तिला एकदा भेटण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली. पण तुम्ही तिला लांबूनच बघा असे डॉक्टरांनी सांगितले. एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. तन्मय ने तिला लांबूनच बघितले. मिताली च्या हाताला, छातीला, नाकाला नळ्या लावल्या होत्या. तिच्या कडे बघून त्याला फार वाईट वाटले. आपल्या मुळे तिची ही अवस्था झाली आहे. आपण तिला समजून घेतले नाही. कामामध्ये तीचे प्रमोशन होणार होते. पण आपण तिला काम सोडायला लावले. तिने सुद्धा आपल्या आनंदासाठी काम सोडले.
तरीसुद्धा आपण सतत तिला गृहीत धरत गेलो. ती सुद्धा आपल्या वरच्या प्रेमासाठी, संसारासाठी सगळे सहन करत गेली. आपण आपल्या आईला खूष ठेवण्याचा नादात मिताली च्या आनंदाचा बळी दिला. तिला काय वाटत असेल याचा देखील विचार केला नाही. तिने आपल्या ला खूपदा सांगायचा प्रयत्न केला पण आपण तिचे काहीही ऐकून घेतले नाही. नंतर नंतर ती सुद्धा आपल्याला उत्तरे देऊ लागली. मिताली आपले उलट बोलते म्हणून आपण तिचा राग राग करू लागलो. तिची मानसिक घुसमट होत गेली. त्यामुळे च तिने असा टोकाचा निर्णय घेतला.
त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. त्याने वर बघितले तर आई होती. आईने त्याच्या साठी खायला आणले होते. त्याची भूक कधीच मेली होती. आई त्याला म्हणाली, " तन्मय थोडं खावून घे. "तन्मय त्यावर बोलला, " आई, मला भूक नाही आहे. " त्यावर त्याची आई म्हणाली, "काय पोरगी आहे, एवढ्याशा गोष्टी चा किती बाऊ केला तिने. . आईचे हे वाक्य ऐकताच तन्मय चा राग अनावर झाला. तो आईला म्हणाला, " आई ती मरणाच्या दारात आहे ग. आता तरी तिचा पिच्छा सोड. तुझ्यासाठी मी उगाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत राहिलो. ती बरी होण्यासाठी प्रार्थना करायची सोडून तू तिलाच दोष देते आहेस. "आई म्हणाली, " तन्मय प्रॅक्टिकल वाग, भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस. " आईच्या बोलण्याचा तन्मय खूप राग आला . तो तिथून उठला आणि बाहेर जाऊन बसला.
मिताली आई खूप रडत होती. बाबांना तर आपली लहानपणी ची मितू आठवायला लागली. देवा माझ्या मुलीला वाचव असे ते मनोमन प्रार्थना करत होते. मिताली आई मिताली च्या बाबांना म्हणाली, "मिताली च्या सासूबाई हल्ली तिला खूप त्रास देत होत्या. मिताली ने मला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मीच काही तिचं ऐकून घेतले नाही. मला वाटले मी तिची बाजू घेतली तर ती तिचे सासर सोडून भांडून आपल्याकडे निघून येईल. लोक काय म्हणतील म्हणून मीच तिला बोलले की, तू आपल्या मर्जीने पसंतीने लग्न केले आहे स. तर सगळे सहन कर. मला वाटले होत थोड्या दिवसांनी सगळे ठिक होईल. पण हे काय होऊन बसले. "मिताली च्या आईला वाटले की, मिताली च्या बाबांना कळले तर ते तिला आपल्या घरी परत घेऊन येतील.

जेव्हा मिताली च्या बाबांना मिताली बद्दल कळले तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया काय असेल?

मिताली शुद्धीत येईल की नाही ?
हे बघुया पुढच्या भागात. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला विसरू नको.