Umber - Rising spring books and stories free download online pdf in Marathi

उंबर - उगवता झरा

अंबिकावाडीत सुशीलाबाई राहत होती. त्या गावातील शाळेत ती शिक्षिका होती. तिचा मुलगा शशांक खुप हुशार होता. त्याला शेतात जायला खुप आवडायचे. तो दुपारी शाळा सुटल्यावर शेतात एक चक्कर मारून देवळापाशी उंबराच्या झाडापाशी खेळायचं. तो खुप वेळ उंबराच्या झाडाभोवती घालवत असे.
शशांकचा आईला त्याची खुप चिंता वाटायची. तो शाळेत कोणाशीच बोलत नाही. त्याचे कोणी मित्र नव्हते. त्याला काही सांगाव तर आईला सांगायचा, "अग हे झाडे, वेली, पाने आणि फुले हेच माझे मित्र आहेत. ते माझ्यावर खुप खुप प्यार करतात."
त्याचा प्यार या शब्दावर आईला खूप हसु आल.
तो आता पाचवीत होता. त्याला या वर्षापासुन हिंदी हा विषय होता. त्यामूळे तो असा अधिकाधिक हिंदी शब्द प्रयोग करायचा.
सुशीला हसत म्हणाली, "बेटा मी पण तुझ्यावर खुप खुप प्यार करते हा."
तो म्हणाला, "मला उंबराच्या झाडाबद्दल सांग ना."
सुशीला म्हणाली, "हे झाड येथे खुप वर्षापासुन आहे. तुझ्या जन्माचा आधीपासून आहे. अस म्हणतात की हे झाड जमिनीत पाण्याचा साठा निर्माण करतो. शिवाय हे दिवसरात्र प्राणवायू हवेत सोडते. त्यामुळे ते आपल्याला उपयुक्त आहे. पिंपळाच झाड रात्री खुप मोठ्या प्रमाणात कार्बन वायू सोडतो. जितके झाड मोठे तितका जास्त वायु हवेत सोडला जातो. अशी हवा आपल्याला घातकच म्हणुन गावाबाहेर पिंपळाचे झाड सावली साठी लावलेले असतात. दिवसा ते खूप गार हवा आणि आल्हाददायक सावली देतात. उन्हाचा थकवा नाहीसा करतात. पण पिंपळाचे झाड मात्र रात्री खूप घातक. या झाडाच्या खाली झोपल्यावर प्राणवायू अपुरा पडल्याने मृत्यू ही होऊ शकतो. बर्‍याचदा लोक त्याला भूत चेटूक समजतात. उंबराच्या झाडाखाली आपल्याला गार हवा दिवस रात्र मिळते. "
शशांक साठी इतक्याने समाधान झाले नाही. तो म्हणाला, "अजुन माहिती सांगना."
मग ती सांगु लागली, " उंबराची उंची साधारणपणे एका पाच मजली इमारती इतकी असते. पाने गडद हिरवी, मोठी, एकाआड एक आणि मोठ्या चमचाचा आकाराचीअसतात. साल पिंगट करडी, गुळगुळीत आणि जाड असते. झाडाच्या वयाप्रमाणे सालीची जाडी वाढते. तसेच खोडाच्यावर पांढर्‍या सालीचे आवरण वेगळे होताना दिसतात. फळे लिंबाच्या आकाराची असून जांभळट व मोठ्या फांद्यांवर लटकलेली असतात. त्यांना आपण उंबर म्हणतो. पक्षी ही फळे खातात."
"हो ना आपल्या परसात किती उंबर खाली पडतात. मला ते अंजीर सारखेच लागतात." शशांक आईला सांगत होता.
सुशीला विज्ञानाची शिक्षिका तिला अजून माहिती सांगावी म्हणुन तीने प्रश्‍न विचारला, "उंबर फूल आहे की फळ?"
तो म्हणाला "ते तर फळ आहे ना."
सुशीला म्हणाली, "उंबराचे फळ म्हणजे त्या झाडावरील अनेक फुलाचा गुच्छच. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात तीन प्रकारची फुले असतात. उंबराच्या खालच्या बाजूने चिलटा सारखी माशी अंडी घालण्यासाठी आत प्रवेश करते. 'ब्लास्टोफॅगा सेनेस' अस त्या माशीच नाव."
"बापरे कीती त्रास होत असेल ना ग झाडाला. मला तर डास चावले तर रात्री झोप येत नाही. हे बिचारे झाड काही बोलू पण शकत नाही." शशांकने काळजीने विचारले.
"तस नाही आहे. हे एक निसर्ग चक्र आहे. ते एकमेकांना मदत करतात." सुशीलाने त्याला समजावले.
"ते बरे कसे? सांग ना."
ती म्हणाली " ती माशी फुलामध्ये आपली अंडी घालते. तिच्या अंगावर दुसर्‍या फुलाकडून येताना अनेक कण माखलेले असतात. जिथून ती आत शिरते, तेथून तिला काही वेळा बाहेर पडता येत नाही. ती आतच मरून जाते. नंतर काही दिवसानी अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. वरच्या बाजूने माद्या वरच्या बाजूने काही माश्या मार्ग शोधून तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसर्‍या कच्च्या उंबराकडे जातात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते. शिवाय या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले आहे."