Pheasant eggs books and stories free download online pdf in Marathi

टिटवीची अंडी

टुटु टिटवी समुद्राजवळ राहत होती. समुद्राचा किनाऱ्यावरून दिसणारा लांबेलांब समुद्र तिला खुप खुप आवडायचा. ती आकाराने लहानशी असली तरी ती कोणालाही घाबरायची नाही. समुद्राचा लाटावरून उडायला तीला खुप मजा वाटायची. ती जमिनीवरच तुरुतुरू चालत असे. तिची चोच लाल रंगाची होती. त्यामुळे ती इतर पक्ष्यापेक्षा वेगळी वाटे. तीचे डोके आणि पाठ काळ्या रंगाची होती तर तीचा खालील पोटाकडील भाग पांढरा रंगाचा तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा होता. पाय लांबट पिवळ्या रंगाचे होते आणि तिच्या दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले होते.

तिथेच समुद्रकिनारी काहीवेळा कॉडी कासवीन येत असे. कॉडी कासवीनीला जेलीफिश व मासे खायला खुप आवडत असे. कधी कधी कॉडी कासवीन किनाऱ्यावर शिंपले, झिंगे, खेकडे खाण्यासाठी येत असे. तिथे कॉडी कासवीनीशी तिची गट्टी झाली. ति जेव्हा जेव्हा तिथे येई तेव्हा तेव्हा ति कॉडी कासवनीला भेटायची,.

टुटु टिटवीची अंड घालायची वेळ आली तेव्हा किनाऱ्यापासुन जरा लांब पायाचा नख्याने वाळू उकरून तिने छोटासा खड्डा केला आणि त्यात अंडी घातली. कडेने गारगोटीचे दगड गोलाकर लावले. नंतर ती अन्नाचा शोधात निघुन गेली. आल्यानंतर तिला तिची अंडी सापडेना. तशीच ती समुद्र किनारी उदास बसली होती. कॉडी कासवीनने दुरून तिला पाहील. ती तिचा जवळ गेली व विचारले, " अग तु अशी दु:खी का आहेस बर? काय झाल." तर टुटु टिटवी म्हणाली, "अग मी घातलेली सारी अंडी हा समुद्र घेऊन गेला. बघ ना किती दृष्ट आहे हा समुद्र! आता मी काय करू. माझी अंडी परत कशी मिळवु?" कॉडी कासवीन म्हणाली, "अग तु अशी नाराज होऊ नकोस. समुद्र तर त्याच काम करत होता. तो का तुझी अंडी घेऊन जाईल. लाटा येतात आणि परत आत जातात. तु जरा वाट बघ. समुद्राने तुझी अंडी नेली आहे ना मग तोच तुला देईल. तुझी अंडी तुला मिळतील."

मग एक मोठी लाट आली. लाटेसोबत टिटु टिटवीची अंडीपण आली. कॉडीला ती दिसली. तिने लगेच ती टिटुला दाखवली. टिटु खुप खुश झाली. तिने कॉडी कासवनीचे आभार मानले.

कॉडी म्हणाली, "आपली वस्तु आपल्यापाशी परत येतेच."


२. पांढरे ठिपके

बेबी बकरी रंगाने काळी होती. कान लोम्बकळणारे, शिंगे मागे वळलेली अशी बेबी बकरी चालताना तोऱ्यात चालायची. तीला बानु बकरी बगळा म्हणायची. बानु बकरी ही बेबी बकरी सारखी रंगाने काळी होती. तिच्या अंगावर पांढरे ठिपके होते. ते पांढरे ठिपक्यामुळे अतिपावसातही ती तग धरू शकत असे. दोघी जिथे जातील तिथे एकत्र असायचा. त्या दोघी गवत चरण्यासाठी टेकडीवर, रानात जायच्या.

पावसाळ्याचे दिवस होते. जोराचा पाऊस सुरू झाला. बेबी बकरी ईकडे तिकडे पाहु लागली. तिला एक झाड दिसल. पाऊसापासुन वीचण्यासाठी ती त्या झाडापाशी गेली. तिने बानु बकरीलाही बोलावल. बानु पाऊसात भिजत राहीली मग थोड्या वेळाने आली. बेबी बानुला म्हणाली कि, "तुला देवाने माझ्यापेक्षा बळकट शरीर दिलय. तु पाऊसातही बराचवेळ उभी राहू शकते."

त्यावर बानु बकरी तीला म्हणायची " अग आपण दोघही शरीराने निरोगी, चपळ, काटक आहोत. आणि म्हणुन तर आपण दोघी खास मैत्रीण आहोत."

तितक्यात फुफू कुत्रा आला. फुफूचा रंग पांढरा होता. त्याची शेपुट झुपकेदार होती. फुफूला थट्टा मस्करी करायला सवय होती. फुफू पाऊसात भिजलेला होता. तोही झाडाखाली आडोश्याला उभा राहिला. तो बानु बकरीला म्हणाला, "अग तु म्हातारी झालीस की तुझे केस बघ पांढरे झालेत." बेबी बकरी चिडून म्हणाली, " काही पण काय बोलतो. तीचा पांढऱ्या ठिपक्यामुळेच तिच पाऊसापासुन संरक्षण होत." फुफू म्हणाला, "माझ्या शेपटीकडे बघ. ती बानुला छान म्हणतेय. होना ग शेपटी बानुचे पांढरे ठिपके छान आहेत." आणि सर्वजण हसु लागले.