School of Shantinagar books and stories free download online pdf in Marathi

शांतीनगरची शाळा

शांतीनगर नावाचे राज्य होते. त्या नगराचा अरीहंत नावाचा राजा होता. राजा खुप हुशार, प्रजेची काळजी घेणारा होता. त्याने त्याचा राज्यात पक्के रस्ते, नदीवर सुंदर असा लांबेलांब घाट बांधला होता. मुलांना खेळण्यासाठी मैदाने, बगीचे निर्माण केले होते.
राजा प्रजेची खुप काळजी घ्यायचा. लोकाचां तो समस्या सोडवत असे. त्यासाठी आठवडयातुन एक दिवस राखलेला होता. दुर दुरून राज्यातील लोक येत असत. राजा सर्व नोंदी ठेवत असे. तो त्या नियमीत वाचुन मार्ग काढत असे. राज्यातील लोक मेहनती होते. कष्टाळु होते. राजा राज्याचा विकासासाठी लोकांकडून सल्ले घ्यायचा. राजा दुरदर्शी आणि हुशार होता. त्याला समाजकारणाची आवड होती. तो नेहमी म्हणायचा, "उत्तम समाज हा कष्टाळू लोक आणि त्याना लाभलेल्या दुरदर्शी नेतृत्वामुळे बनतो."
एके दिवशी राजाला भेटायला खुप लोक आले. त्यात काही सुतार होते तर काही शिंपी, कुंभार असे अनेक लोक आले होते. राजाने सुताराला बोलावले. सुतार राजाला त्याची व्यथा सागुं लागला. तो म्हणाला, "महाराज गेले दोन महिने झाले. काम नाही. काम नाही तर पैसे कोठुन येणार. जेवढे पैसे शिल्लक होते ते हि संपत आलेत. तुम्हीच सांगा आम्ही गरीबानी कस जगायच?"
राजा त्याला दिलासा देत म्हणाला, "तु घरी जा. पुढच्या महिन्यात तुला काम मिळेल." अस सांगुन राजाने त्याला जायला सांगीतल.
नंतर एक माणुस आला. त्याचा पेहरावावरून तो गरीब तर वाटत नव्हता. तो राजासमोर आपली समस्या सांगु लागला,
"मी एक शिंपी आहे. माझ चांगल चालु होत. पण अचानक काम मिळेनास झाल. आता तर माझ्याकडे काम नाही."
राजा त्याला म्हणाला, "पुढच्या महिन्यात तुला काम मिळेल." अस सांगुन राजाने त्याला जायला सांगीतल.
त्यानंतर कुभांर आला, "महाराज मी खुप मेहनत करतो. मातीची छान छान मडकी, कुंड्या तयार करतो. पण ग्राहकच नाही. तुम्हीच सांगा आमचा धंदा कसा होणार?"
राजा त्यालाही तेच सांगतो, "येत्या महिन्यात तुला काम मिळेल." अस सांगुन राजाने त्याला जायला सांगीतल.
तिथे बाजुलाच वहीत नोंद करणारे प्रधानजी त्याना म्हणतात, "खजिन्यातील पैसा संपत आलाय. आणि तुम्ही सर्वाना सांगताय पुढचा महिन्यात तुम्हाला काम मिळेल. आता खजिण्यात पैसे नाहीत." राजा म्हणाला, "तु चिंता नकेो करू. तो बघ आपला राजवाडा." राजवाड्याचा खिडकीतुन दुर एक पडकी दुमजली इमारत दिसत होती. त्याला राजा राजवाडा म्हणत होता.
प्रधान म्हणाला, "या पडक्या इमारतीच काय? दुरूस्त करण्यासाठी आता खजिन्यात पैसे नाहीत."
राजा म्हणाला, "कोणाला पैसे हवेत. तु आता सर्व राजा, धनिक, व्यापारी याना पैसै माग ते देतील."
प्रधान म्हणाला, "पण ते का देतील?"
राजा म्हणाला, "आपल्या राज्यातील शाळा खुप दुर आहे. आपण त्या इमारतीत शाळा सुरू करू. दुरदुरच्या दानशुर लोकांची त्यासाठी मदत मागु. शाळा सुरू करायला ते नक्की मदत करतील. आजपासुनच सुरवात करू."
प्रधानजीनी सर्व राजा, धनिक वर्ग, व्यापारीवर्ग, दानशुर लोक यांची यादी केली. त्याने सर्वाना मदत करण्याचे आवाहन केले आणि मदतीचा ओघ सुरू झाला. आठवड्यातच खजिना पैसाने भरला. शाळेसाठी आवश्यक वस्तुची यादी तयार केली.
राजाने पडकी इमारत दुरूस्त करून घेतली. मग त्याने सुताराला बोलावले. तो त्याला म्हणाला, "शाळेसाठी पन्नास बाक आणि शंभर खुर्च्या लागतील. तु त्या बनवुन दे."
सुतार काम मिळाले म्हणुन खुश झाला. राजाला धन्यवाद म्हणुन तो निघुन गेला.
नंतर शिंपी आला. राजा त्याला म्हणाला, "राज्यात शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी शभंर गणवेश लागतील. तु ते बनवुन दे."
शिंपी काम मिळाले म्हणुन खुश झाला. राजाला तो धन्यवाद म्हणाला व निघुन गेला.
नंतर कुंभार आला. राजा त्याला म्हणाला, "शाळा सुरू होणार आहे. शाळेचा मैदानाचा कडेने, शाळेमध्ये प्रसन्न वाटावे यासाठी आम्हीलखुप सारी रोप लावणार आहे त्यासाठी आम्हाला पन्नास कुंड्या बनवुन दे. शिवाय पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी माठ लागतील. ते ही करून दे. "
कुभार काम मिळाले म्हणुन खुश झाला. राजाला तो धन्यवाद म्हणाला व निघुन गेला. अशाप्रकारे राजाने सर्वाना काम दिले. सहा महिन्यातच शाळा सुरू झाली. राज्यात खुप आनंदाचे वातावरण झाले. सर्व खुशीत राहु लागले.