मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा in Marathi Children Stories by शितल जाधव books and stories PDF | मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा

मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा

जंगलात खुप प्राणी राहत असतात. अशाच एका जंगलात भालू अस्वल आणि रेकू कोल्हाही राहत होता. दोघे एकमेकाचेे खुप चांगले मित्र होते. सुर्य मावळताच भालू अस्वल बाहेर निघायच तो अंधारातुन जाताना त्याचा काळा रंग चमकायचा. त्याचा वरच्या दातांपैकी पुढच्या दातांची जोडी गायब होती. त्यामुळे तोंड उघडल की तो एखाद्या पुढचे दात पडलेल्या मुला सारख वाटत असे. त्याचे मागचे पाय आखूड, बोटांवर पांढऱ्या रंगाचे नख्या होत्या. अंगावर लांब दाट काळेभोर केस होते. रात्री जेव्हा तो फिरत असे तेव्हा एखादा चमकदार मुलायमसा गोळा अंधारात पुढे पुढे सरकतो असे वाटे.
त्याचे तोंड छान लांबट व पांढरट होते. खालचा ओठ तर पुढे आलेला होता. तो त्यांचा नाकपुड्या वाटेल तेव्हा बंद करू शकत असे. हे भालू अस्वलाच रिकाम्या वेळात चालू असे. ह्याच रेकू कोल्ह्याला खुप कौतुक होते. अस्वल जमिनीवर झोपुन राहयच आणि कोल्हा तिथेच अजुबाजुला काही खायला मिळत का शोधत राहयच. जे मिळेल त्यातल थोड अस्वलाला ही द्यायचा. रेकू कोल्हयाचा हा परोपकारी स्वभाव भालू अस्वलाला खुप आवडायचा त्यामुळेच त्याची मैत्री झाली होती. कोणीही ती कधी तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ते दोघेही आनंदात राहयाचे.
एके दिवशी रेकु कोल्हा त्याला असच गमतीने म्हणाला "तुला किती बर आहे. दिवसभर झोपा काढायचा आणि संध्याकाळी बाहेर फिरायच."
भालू अस्वल वैतागुन म्हणाला, " त्यात बर काय आहे. दिवसाचा उकाडा सहन होत नाही मला. म्हणुन तर सुर्य मावळण्याची वाट बघतो. तु चल एकदा माझ्या बरोबर"
रेकु कोल्हयाला अंधाराची खुप खुप भीती वाटे. तरीही तो भालु अस्वला बरोबर जाण्यासाठी तयार झाला.
दोघे ठरल्याप्रमाणे निघाले. रेकु कोल्ह्याची अंधाराची भीती पण नाहीशी झाली. तोही मोठा एटीत वर बघुन चालत होता. वाटेत मुंग्याच वारूळ होत भालु अस्वलाला ते दिसल आणि रेकु कोल्हयाला तो म्हणाला, "खाली बघुन चाल. आता तुला त्या मुंग्यानी चावुन चांगलच फोडल असत."
"बर केलस तु मला वाचवलस. खुप खुप आभार."
मग भालुने झाडावर चढून मधाने भरलेले पोळे खाली पाडले व मध खाल्ले. तिथेच वाळवीची वारुळे होती ती फोडून त्यातली वाळवी त्याने खाल्ली. आणि निघाले.
सुर्य उगवण्याची वेळ झाली तसा रेकु कोल्हा म्हणाला, "अरे बापरे आज तर माझ चागलच जागरण झाल. तुझ्यासारख मलापण दिवसा झोपाव लागत की काय" आणि दोघे हसु लागले.

२. माकडाची झोप

गोलू माकड खुप हुशार होते. त्याचे केस लांब व करड्या रंगाचे होते. त्याची शेपटी लांब होती. तो जिथे राहयचा तिकडे आंब्याची, नारळाची खुप झाडे होती. तो नारळाचा झाडावरही भरभर चढायचा. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायचा. तिथेच भैरू अस्वल यायचे. त्या दोघांची खास मैत्री होती. माकड अस्वलाचा पाठीवर बसायचा. त्याचासोबत खेळायचे. दोघांचा वेळ चांगला जात होता. एके दिवशी माकड झाडाच्या फांदीवर झोपले होते. आणि अचानक कानात गुन गुन अस काही आवाज येत होता. त्याने डोळे उघडले तर दुरुन खुप साऱ्या मधमाश्या येताना दिसल्या. तो झरझर झाडावरून खाली उतरला. आणि अस्वलाकडे गेला. माकड म्हणाल, "मला आता तिथे झाडाचा येथे राहता नाही येणार. मला आता दुसरीकडे जाव लागेल" भैरू अस्वलाने विचारले, "का रे काय झाल?" माकड म्हणाले, "अरे मी राहतो त्या झाडावर मधमाश्यानी ताबा घेतलाय. मला चावतील त्या. म्हणुन तर तुझ्याकडे आलोय. मदत कर मला. तुला हव ते देतो."
अस्वल हसल ते म्हणाल, "तु थोडे दिवस इथेच राहा." माकड आणि अस्वल एकत्र राहू लागले. नंतर काही दिवसानी ते झाडापाशी गेले. मधाच पोळ झाडाला लटकत होत. त्यातुन मध खाली टपकत होत. अस्वल झाडावर चढल. त्याने पोळ झाडावरून काढल. मधमाश्या पोळ्यातून बाहेर निघाल्या आणि खुप दुर गेल्या. माकडाने अस्वलाचे आभार मानले आणि पुन्हा माकड त्या झाडावर राहू लागले.

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago

Mahesh

Mahesh 2 years ago

yuvika

yuvika 2 years ago

Uttam. B.Mhare

Uttam. B.Mhare 2 years ago

Aniket Patil

Aniket Patil 2 years ago