Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 15

"बोल "
"आज मी बाईक वरून जात होतो.. तर ती वाटतं कुठेतरी चालली असेल, ती दिसली. तिने माझ्याकडे पाहिलं. एक स्मित तिने मला दिलं.. आणि ती निघून गेली "हे असं बोलून त्याने मेसेज टाकला.. वैदेहीच्या ओठांवर मिश्किल हास्य उमटलं..तिने त्याला रिप्लाय केला.

"भाई तुझ्याकडे कामं धंदे नाहीत का?? एवढंसं सांगायला माझा वेळ वाया घालवला.तू रिकामटेकडा आहेसइ नाहीये.. हं आता लक्षात आलं, कॉमर्स शिकतोस ना तू 👏अपेक्षित होतं "तिने त्याला मस्तीत टोमणा मारला.

"हे बघ माणसाला त्याचं बोलणं संपवायची संधी द्यायची असते. अगोदरच ठरवून मोकळं व्हायचं नसतं"
"हा बोल बोल चल. मस्करी करतेय मी.
बाळाला राग आला?अले अले अले "ती त्याला चिडवत होती.त्याने त्याकडे लक्ष न देता मुख्य गोष्ट type करायला सुरवात केली.वैदेहीच नंतर गप्प बसली.

"बाब अशी आहे कि ती मला एवढे का आकर्षित करते. मी एक तुला गोष्ट सांगतो. माझ्यात दडलेल्या रहस्याप्रमाणे मला कोणतीही ऐरीगैरी मुलगी कधीच आकर्षित करू शकत नाही. त्या सगळ्या मला गोपिका समान आहेत. पण ज्या कोणी आकर्षित करतात त्यांच्यात काहीतरी खास आहे. ती वेदिका तुझ्यासारखीच एक pure soul आहे.. पण तिच्यात काय वेगळं आहे कि तिच्या soul ला जर मी बघायचा प्रयत्न केला ना, तर एक प्रकाश दिसतो.. हा प्रकाश या जगात खूप खूप म्हणजे खूप निवडक माणसांकडे आहे. तीच माणसं जी pure आहेत.. जशी कि तू. मला तो प्रकाश तुझ्याकडेच दिसतो. ना सिद्धी, न्क यधण्या, ना पायल ना कोणती मुलगी किंवा मुलगा.

या सगळ्यांकडे मला फक्त अंधार दिसतो...ही लोकं pure नाहीयेत. ही सगळी मतलबी, कटकारस्थान या गटात बसतात."त्याने तो मेसेज पोस्ट केला.
खरंतर यधण्या पायल विषयी हे ऐकून तिला प्रश्न संशय आला कि ही सगळी तिला दगा तर देणार नाही ना... शिवने तिचे मन लगेच हेरले 

"काळजी नको करुस, ही लोकं तुला मुळीच दगा देणार नाहीत. पण मी इन general सांगतोय कि दुनिया ही अशी आहे."
"मी तुला का pure वाटते?"तिचा रिप्लाय आला 
"Good question.. मला अपेक्षित होतं हे. तुला इतरांपासून जे वेगळं करतं ते तुझे विचार आहेत.. तुझं वागणं आहे.
साधारण दुनिया जो त्याचं वाईट करेल त्याच्या विरुद्ध कधी त्या माणसाच्या मनात दया नसते, किंवा तो त्याला माफ करणारा नसतो.. त्याला सुद्धा घ्यायचा असतो. किंवा अगदीच माफ जरी केलं तरी त्या माणसांविषयी द्वेष असतोच.. त्याचे विचार असे असतात कि माझं तर बिघडवलं, तुझं पण काही चांगलं होणार नाही.सहाजिकच आहे ह्या भावना जागृत होणं..पण तुझ्यात बाबतीत वेगळं असं आहे कि त्या व्यक्तीने कितीही तूझ्या विषयी वाईट बोलूदे, कितीही तुझा कामापुरता वापर करुदे..काही क्षण तूझ्या मनात राग येऊ शकतो त्या व्यक्तीविषयी पण तरी देखील तुझं भोळं भाबडं मन त्याला नेहमी माफ करते, कारण तुला कोणाला अस वाईट treat करायला आवडत नाही.. तूझ्या मनाला ही गोष्ट पटतच नाही,म्हणून तू माफ करून टाकतेस लगेच. लोकं ह्याला मूर्खपणा म्हणतील, पण ह्यात तुझी काही चूक नाहीये. तूझ्या soul ला इतरांना जो त्रास तुला मिळाला तो इतरांना द्यायला आवडत नाही म्हणून तू अशी आहेस.Pure Soul!!"प्रत्येक शब्द वाचताना वैदेहीला स्वतःविषयी जाणीव होतं होती.खरं कि खोटं हे तिला उमगत नव्हते..पण तिला माहित होतं,'कि ती अशीच होती आधीपासून.

पुढे शिव म्हणतो "तुला पीडितांना बघून देखील खूप त्रास होतो. त्यांचं दुःख तू अनुभवू शकतेस, त्यांच्या भावना तुला कळत असतात."

प्रत्येक शब्दांशब्द शिव जो लिहत होता सगळं खरं होतं.
"मला आता देखील दिसतंय कि तुला अजिबात या गोष्टीमुळे शॉक लागला नाहीये, कारण तूझ्या मनाला मी तेच सांगितलं जे त्याला पहिल्यापासूनच माहित होतं. फक्त तूझ्या मेंदू ला माहित नव्हतं.. आता मीच सांगून टाकलं 😉"

"मी काय बोलू मलाच कळत नाहीये. मीच निःशब्द झाले 😅"
"होता है होता है, कोई ना. छोटी बच्ची "तिला तो चिडवत म्हणाला.
"ए मी छोटी बच्ची नाहीये.."

"हो हो राहूदे...., छोटी बच्ची 😂. बरं अजून एक मी तुला सांगतो.. वेदिका मध्ये जसं काहीतरी गुपित आहे तसंच तुझ्यात देखील दडलं आहे.. म्हणून तू मला आकर्षित करतेस. तुमच्या दोघींमध्ये काय आहे हे कळेलच." असं बोलून तो ऑफलाईन गेला...

वैदेही मात्र ते शब्द बघतच राहिली.
"माझ्यात काहीतरी आहे??? मी कोण आहे??"

कथा आवडली तर रेट करा ✌️