Premacha chaha naslela cup aani ti - 52 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५२.



दिवस, दिवसाचे महिने, महिन्यामागे परत वर्ष उलटतात..... आपली सुकन्या आता बऱ्यापैकी मोठी आणि समंजस झालेली....

सहा वर्षांनंतर.....

सुकन्या तिच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकायला असते..... वयाचा विशिष्ट पल्ला तिने गाठलेला म्हणजे, साधारण बऱ्यापैकी ती समंजस झाली असणार हे नक्की....

आज घरी सगळे सकाळी लवकर उठले..... सुकन्याला मात्र कोणीही उठवलं नाही.... सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये येऊन बसले होते..... सुकन्या चांगलीच उशिरा उठली.... कॉलेजच्या प्रोजेक्टमुळे, ती उशिरा पर्यंत झोपली त्यामुळे, तिला लवकर जाग आली नाही......

उठली आणि घड्याळ बघून जाम रागात.....

सुकन्या : "कसं शक्य आहे यार हे..... कोणीच मला आज उठवायला आलं नाही.... शिट...."

ती उठली आणि पटकन आवरून घेतलं..... आवरून, पटकन फ्रेश होऊन आली.... मस्त पैकी ड्रेस विअर करून, खाली हॉलमध्ये आली आणि बघून शॉक..... सगळे तिथे बसले होते..... हिला बघून, तोंड दाबून हसत होते.... डोळे मोठे करत, ती सर्वांना एक रागीट लूक देते.....

सुकन्या : "निन्नी..... व्हॉट्स धिज....."

आजी : "कम..... मेरा बच्चा.... तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे....."

ती तशीच जागेवरून उठून उभी राहत.....

सुकन्या : "वेट.... सरप्राइज.... बट टुडे इज नॉट माय बर्थ डे..... सो...."

आजी : "बर्थ डे नाही म्हणून काय झालं.... हो की नाही...."

सगळे : "हो....."

सुकन्या : "नींनि...... डोन्ट चेक माय पेशन्स...... लवकर सांग...."

आजी : "जा..... तुझ्या ऑल टाइम फेवरेट रूम मध्ये जाऊन बघ....."

सुकन्याची ऑल टाइम फेवरेट रूम म्हणजे, ऑबविअस्ली हर स्टडी रूम..... अभ्यासू पोरींच असंच असतं...

सुकन्या : "माय स्टडी रूम.... काय आहे तिथे....."

आजी : "जाऊन बघ तरी....."

सुकन्या पळतच जाऊन, डोअर ओपन करते अँड बघते तर बघतच बसते..... जोरात किंचाळत.....

सुकन्या : "कली मासी..... सच्चू काका...."

कलिका : "हे डियर लिट्ल प्रिन्सेस..... हाऊ आर यू बेबी....."

सुकन्या : "आय एम गूड मासी...."

सचिन : "हे... मासी की फेवरेट प्रिन्सेस.... काका को भूल गयी...."

सुकन्या : "नो यार काका.... यू आर माय डियर चाचू....."

सगळे मिळून हॉलमध्ये येतात.....

आजी : "काय मग आवडलं का सरप्राइज....."

सुकन्या : "खूप....."

सल्लू : "कली, अपने भाई से नहीं मीलेगी...."

कलिका जाऊन सल्लुला वन साईड मीठी मारते..... त्यांना बघून, सुकन्या ही त्यांना येऊन मीठी मारते.....

सल्लू : "कितने दीन हो गये ना कली ये मिस किया सबने..."

कलिका : "हा ना...... जेव्हा लिट्ल प्रिन्सेस सुकू छोटी होती.... तिची तिसरी मिठी ही छोटी होती..... बट, टुडे... ती मोठी झाली सो.... मिठी बराबरी वालों में होती हैं.... अशी फिलिंग आली....."

सल्लू : "तू नहीं सुधरेगी...."

सगळे : "कभी नहीं....."

कलिका : "देख सभी को पता हैं..."

आजी : "छोटी कली किधर हैं...."

तिकडून कलीकाची, छोटी कली पळत येते....

@@@ : "हे सुपर ग्रँड मॉम.... आय एम डोरा दि एक्सप्लोरा..... क्या आप मुझे देख पा रहे हैं..."

आजी : "बाई ग.... कली, हीचं नाव डोरा का ठेवलं तू आता समजलं.... त्या कार्टून गर्ल ऐवजी ही पाहिजे होती...."

सल्लू : "जाम नौटंकी हा दोनो आम्मीजी...."

तिकडून जया सर्वांना खायला काही घेऊन येत.....

जया : "या सगळे...... इट्स फुडी टाईम....."

कलिका : "नो डाऊट, तू काही तरी माझं फेवरेट नक्कीच बनवलं असणार, जया दी....."

जया : "येस..... युअर् फेवरेट.... पकोडे, मसाला चाय...."

कलिका : "ओहह.... हाऊ स्वीट ऑफ यू....."

जया : "कारण, आमची कली अजुन आमच्यासाठी आमची ती नटखट वाली कलीच आहे...

डोरा : "नॉट फेअर हा मासी....."

आजी : "आला राग....."

जया : "क्या आप सब इस इत्तू से नाक पर जो गुस्सा हैं वो देख पा रहे हैं..." (डोरा चे डायलॉग)

सगळे : "आम्ही बघू शकतो...."

आजी : "जयाला ही लागली हवा डोरा ची...."

सगळे मस्त फूड एन्जॉय करतात..... थोड्या वेळाने....

कलिका : "सो, लिट्ल प्रिन्सेस..... आज काय प्लॅन आहे...."

सुकन्या : "नथींग...... कॉलेज देन स्टडी...."

कलिका : "ग्रॅण्ड मॉम..... हिला स्टडी शिवाय दिसतं का काही...."

आजी : "डोन्ट से धिज.... राग येतो तिला...."

सुकन्या : "मासी.... यार..... हेट यू फॉर धीस....."

कलिका : "ऑ....."

आजी : "बेटा कली.... डोरा आता घरी येऊन किती वर्ष झालीत.....?"

कलिका : "हा म्हणजे तिला आम्ही ऑर्फनेज मधुन आणलं तर झाली तीन वर्ष..... बट असं वाटतंच नाही की, ती दुसरी आहे.... आमचीच वाटते....."

आजी : "कली बेबी असं वाटायला मोठं मन लागतं.... जेव्हा सचिन आणि तू आम्हाला ही इच्छा बोलून दाखवली होती..... तेव्हा, वाटलं खरंच आपले संस्कार हे योग्य दिशेने वाटचाल करत आहेत..... रवीला खूप जास्त आनंद झाला होता तेव्हा...."

सचिन : "मला याची जाणीव आहे.... अनाथ मुलांसाठी बाहेरचं जग कसं असतं... वेळेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर, किती तरी मुलं चुकीच्या गोष्टी करायला लागतात.... मागेच एक केस आलेला आमच्याकडे त्यात अनाथाश्रमातून एज लिमिट संपल्याने, बाहेर पडलेली मुलं होती.... त्यांच्याकडून नको ते उद्योग करवून घेतले जायचे...."

आजी : "हो ऐकण्यात आलेलं....... पण, मग त्यांचं रीहॅबिलिटेशन कसं केलं तुम्ही....."

सचिन : "त्यांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं..... ॲक्च्युली, आम्ही अशा मुलांसाठी एक प्रोजेक्ट राबवायचा विचार करतोय..... ज्यात ही मुलं अनाथाश्रमातून बाहेर आलीत की, त्यांना कुठेही भटकावं लागणार नाही...."

आजी : "पण मग हे पूर्ण महाराष्ट्रभर शक्य आहे??"

सचिन : "आधी आम्ही आपल्या डिस्ट्रिक्ट मध्येच राबवतोय...... कारण, यासाठी परवानगी घेऊन, रीतसर हे सर्व करावं लागेल.... सो, जर हे सक्सेस झालं..... तर, बघूया मिनिस्ट्री जो निर्णय घेईल त्यानुसार....."

आजी : "पण, मला काय वाटतं सचिन बाळा..... एखादी अशी केस उघड होईल आणि मग त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल त्यापेक्षा मग आधीच असं काही राबवून प्रयत्न केलेले कधीही चांगले..... नाही का!?"

सचिन : "आई आता आपण सगळेच हे जाणतो चांगलं काम करणाऱ्याला कुठेही लवकर मान्यता मिळत नाही..... कोणाच्याही दबावाखाली न येता चांगलं काही केलं गेलं तर, त्या वागणुकीला आत्मघाती ठरवतात लोकं..... मी भ्रष्टाचार करून, पैसा कमवत नाही म्हणून, मी माझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही असं वाटतं बाकीच्यांना.... ही मानसिकता आहे लोकांची आणि ह्याच मानसिकतेमुळे किती तरी चांगल्या कल्पना मागे पडतात.... चांगल्या कल्पना पोहचायला ही वेळंच लागतो..... पोहचल्या तरी त्या इम्प्लीमेंट व्हायला वेळ लागतो..... कारण, परत कोणाचा तरी इगो आड येणार....."

आजी : "हो ना, खरंय तुझं.... आता हेच बघ तू इतके चांगले विचार ठेवतोस तर, तुझं प्रत्येकच वर्षी ट्रान्स्फर करतात.... पण, जाऊदे ते..... मी काय म्हणते, आपण आपल्या स्व: खर्चातून हे केलं तर......"

सचिन : "चालेल..... हे तर अजूनच चांगलं.... म्हणजे आपल्याकडे तितकी क्षमता असल्यावर आपण करूच शकतो..... पण, मग याचं एडमिनिस्ट्रेशन??"

सुकन्या : "मी बघितलं तर, चालेल का....."

सचिन : "अरे वाह..... तुझ्यासारखी हुशार विद्यार्थिनी सोबत असली की, खूपच फायदा होईल...."

सुकन्या : "तसंही शिकुन जर सोसायटी साठी काही केलंच नाही मग काय अर्थ, नाही का?"

आजी : "अगदी माझी नात शोभतेस बघ...."

सचिन : "आई मी यावर अजुन विचार करून, तुम्हाला कळवतो...."

आजी : "चालेल.... जमल्यास लवकर सुरू करूयात..... नेमकं यात काय येईल पण?"

सचिन : "आपण ऑर्फनेजशी कॉन्टॅक्ट करू तिथून जितके मुलं प्रत्येक वर्षी बाहेर पडतील त्यांना पुढे ते काय - काय करू शकतात याची योग्य ट्रेनिंग देऊ.... नंतर, एकदा का त्यांना त्यांची दिशा मिळाली ते त्याच दिशेने जातील..... काहींना नोकरीच्या विविध संधी सांगू...."

आजी : "खूप मस्त कल्पना आहे बाळा....."

सल्लू : "हा छान कल्पना आहे.... यात मी ही माझे लेक्चर्स घेऊ शकतो..... ज्याने मुलांना माईंड कसं स्टेबल ठेवायचं हे समजेल...."

आजी : "गूड सल्लू......"

सचिन : "खरंच आई, हे सर्व तुमच्यामुळे शक्य होतंय.... तुम्ही सर्वांना कसं एका धाग्यात बांधून ठेवलंय...... कुठेही कोणाच्या मनात कोणा विषयी शंका नाही.... स्वार्थ तर नाहीच नाही.... अशी फॅमिली खरंच..... ग्रेट आहात आई, तुम्ही...."

सुकन्या : "हो ना..... वुई आर प्राऊड निंनि....."

आजी : "तेच ना मोठ्यांनी मोठ्यांसारखं वागावं म्हणजे लहान त्यांच्या मर्यादा सोडून वागत नाहीत...."

जया : "खरंच..... आई तुम्ही भेटलात हे नशीब...."

सल्लू : "मेरे लिये तो आम्मीजी तू ना भगवान से भी बढकर हैं रे..... हर बार तुने मुझे बढावा दिया..... सिर्फ मुझे अच्छा लगे इस लिये अच्छा नहीं कहा.... मेरी गलतीयों को सुधारा.... मैं आज जो कुछ हू तेरी वजह से..... इस परिवार ने जो दिया हैं ना... मैं जिन्दगी भर नहीं चुका पाऊगा इतना हैं....."

सगळे इमोशनल होतात.... मग आता आजींना जोक तर मारावाच लागेल ना.....

आजी : "बस करा रे..... आताच खाल्लं मी.... इतकं सगळं चांगलं बोलताय माझं पोट बिघडेल...."

कलिका : "धिस इज युअर् स्पेशालिटी ग्रँड मॉम..... कोणी किती ही सिरीयस असू देत.... तू १००% तो मोमेंट, फनी मोमेंटमध्ये कन्व्हर्ट करणार...."

आजी : "हो नाही तर काय..... किती इमोशन्स.... बाबारे.... चला थोड्या वेळात रवी येतोय..... आपण सगळे आज फिरायला जातोय..... सचिन, आज तू फ्री आहेस ना.....??"

सचिन : "हो आहे आज.... तसंही इकडे यायचं असलं की, सुट्टी घेतोच... कारण, मला इकडे यायलाच सुट्टी लागते..... बाकी दिवशी तर, ऑन ड्युटी चोवीस तास...."

आजी : "हो ना..... चला मग रेडी व्हा.... रवी येतोय बोलला एका तासात.... हा बघा मॅसेज आलाय..... चलो....."

सचिन : "माझं कॉलेज...."

कलिका : "लिट्ल प्रिन्सेस एक दिवस तर दे आम्हाला तुझा...."

सुकन्या : "ओके..... "

सगळे तयार व्हायला निघून जातात.....

पाऊण तासांनी.....

आजी : "चला बाळांनो मस्ती नंतर..... डोरा, कम....."

ती पळत आजी जवळ येते.....

सल्लू : "उर्वी चल..... निघायचं...."

उर्वी : "हो......"

सगळे खाली येतात.....

सचिन : "आई, अग बाबा....."

आजी : "पार्कींग मध्ये आहो बोलला..... चला...."

सगळे पार्कींगमध्ये येतात..... आजोबा तिथे ऊभे असतात.....

आजोबा : "काय सरकार, जाम खुश दिसताय..... सगळे आले की, तुमची वेगळीच मजा असते.."

आजी : "तू का जळतोय..."

कलिका : "सल्लू ये दोनो का बाँड अभी भी वैसा ही हैं रे....."

सल्लू : "हा यार.... किसी की नजर ना लगे..."

आजोबा : "चला....."

सगळे जायला निघतात...... मस्तपैकी आधी ते एका मंदिरात जातात.... दर्शन आटोपून सगळे मिळून एन्जॉय म्हणून, मॉल जातात..... सगळे वेगवेगळ्या कंपार्टमेंटला ज्याला जे घ्यायचं ते घेऊन परत इथेच भेटायचं असं ठरतं.... त्यानुसार सगळे जातात..... सुकन्या काय घेऊ या विचारात उभी राहून, सगळीकडे नजर फिरवत असते..... गोंधळून शेवटी तिचं एकदाचं ठरतं.... आधी छान ड्रेस घेऊया या विचारात तिकडे जायला वळणार की, कोणी तरी जोरात येऊन तिला धडकतो आणि दोघेही खाली पडतात.... जेव्हा तो तिला धडकतो, ती डोळे मिटून, त्याच्या शर्टला घट्ट पकडुन ठेवते..... खाली पडत असता ती आधी पडणार म्हणून, तो तिला स्वतःकडे ओढून घेतो आणि मग दोघेही आदळतात....

थोड्या वेळाने, ती हळूच डोळे उघडून बघते..... त्याला जास्तच लागलं असतं..... स्वतःचे हात - पाय झटकत, तो उठून उभा होतो आणि सुकन्याला हात देतो..... ती त्याच्याकडे बघते तेव्हा तिला जाणवतं की, तो खूप गोंधळला आहे..... तो सतत सुकन्याच्या मागे बघत असतो..... आणि थोड्याच वेळात तिथून पसार होतो..... तिला काहीच समजत नाही..... इतका विचित्र मुलगा तिने कधीच बघितला नाही या विचाराने ती एक रागीट लूक देत आत जाणार, तोच दोन - तीन माणसं तिला येऊन थांबवतात.....

त्याचा फोटो दाखवत एक जण.....

@@@ : "मॅडम..... इस लडके को देखा हैं क्या....?"

सुकन्या गोंधळून त्यांच्याकडे बघते...... दुसरा लगेच

@@@ : "बे चल ना.... ये टाईम खोटी करेगी अपना....."

ते जायला निघणार की.....

सुकन्या : "एक मिनट....."

ते थांबतात......

@@@ : "हां अब क्या हैं.... पता होगा बोल.... टाईम मत वेस्ट कर...."

सुकन्या : "आप लोग क्यूँ ढुंड रहे हो इस लडके को.....?"

@@@ : "तुझसे मतलब..... देख दिमाग मत खा पहले ही टेन्शन में हैं अपून.... चलो भाई लोग.... फोकट में टाइम खोटी की मॅडम...."

ते पळत सुटतात...... सुकन्या ही त्यांच्या मागे जाते.....

एका गाडीजवळ उभे राहून, ते लोकं बोलत असतात.... ही त्यांना लपून ऐकायचं असं ठरवून, तिथेच थांबते.....

@@@ : "अगर अपून को आज ये नहीं मिला ना तो सेठ अपन को नहीं छोडेगा...."

@@@ : "हां ना अपने धंदे में सोने का अंडा देने वाली मुर्गी आयी थी वो भी उड गयी.... वो लडका, उस लडकी को टकराया लेकीन उसने भी कुछ नहीं बोली.... नसिब ही नहीं साला अपुन का...."

@@@ : "ढुंडो अच्छेसे मिलेगा...... अब तक तो निकल भी गया होगा साला..... चलो...."

ते लोकं त्याला शोधायला निघून जातात.... मात्र, सुकन्याला प्रश्न पडतो..... ती तशीच गोंधळलेल्या मनःस्थितीत उभी असता, तिला खांद्यावर कोणी तरी थोपटल्याचं जाणवतं पण, हा तिचा भास असेल म्हणून ती इग्नोर करते...... तोच तिला पकडून झटक्याने कोणी तरी स्वतःकडे फिरवून घेतो.... ती किंचाळणार तर तिचं तोंड दाबण्यात येतं.....
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️