लग्नप्रवास - 2 in Marathi Love Stories by सागर भालेकर books and stories Free | लग्नप्रवास - 2

लग्नप्रवास - 2

लग्नप्रवास- 2

प्रीती घरी आली. आणि रडक्या स्वरात आत मध्ये गेली आणि रूमचा दरवाजा बंद केला. आई व वडील काळजीत पडले. असं झालं तरी काय प्रीतीला. सकाळी रोहनला भेटायला जाणार म्हणून भलतीच खुश दिसत होती.थोड्यावेळाने प्रितीने दरवाजा उघडला, तेव्हा आई व वडिलांना सर्व पहिल्या भेटी मध्ये काय झालं ते सांगितले. वडिलांनी आणि आईने तिला खूप समजावलं, ज्यावेळी एक मुलगी आपलं घर सोडून जाते तेव्हा तीच खरं घर सासरचं असत. आणि पती हा साक्षात परमेश्वर असतो. त्याच्यामुळे त्याच्या निर्णय प्रथम. आणि रोहन हा खूप चांगला मुलगा आहे. देखणा, गोरापान, इंजिनियर आणि महत्वाकांशी, समजूतदार आणि तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुला नेहमी साथ देणारा. बराच वेळ दोघांनी समजावल्यानंतर प्रीती थोडी भानावर आली. आणि तिला आई व वडील सांगतात ते पटलं.

दुसऱ्या दिवशी प्रीतीच्या वडिलांनी रोहनच्या वडिलांना फोन करून साखरपुडाच्या तारखेबद्दल विचारले. तारीख ठरली. प्रीतीच्या घरी सर्वानी साखर एकमेकांना भरवून आनंद साजरा केला.

साखरपुडा म्हणजे विवाह बंधनात अडकण्या अगोदर केला जाणारा सोहळा. या संभारंभाचे महत्व म्हणजे वधू व वर पक्षाकडील मंडळी कडून होकार आल्यानंतर हा केला जाणारा विधी. ह्यादिवशी वर पक्षाकडून खास मुलीला दिली जाणारी सौभाग्यवतीची पहिली भेट. मुलाकडील सुवासिनी मुलीला साडी, चोळी, हिरवा चुडा, हळदी कुंकू व खणा नारळाने ओटी भरून तिला साखर देऊन तोंड गोड करणे ह्यलाच साखरपुडा असे म्हणतात. तो असो ती...दोघांसाठी साखरपुड्याचा दिवस असतो खास. आयुष्याला नवीन कलाटणी देणारा हा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो. तुमच्या प्रेमाच्या गाडीला मिळालेला हा हिरवा सिग्नल तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोचवतो.

चला तर सर्व तयारी झाली साखरपुड्याची. रोहन आणि प्रीती दोघेही भलतेच खुश होते. नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते. थोड्यावेळाने साखरपुडा चालू होणार म्हणून सगळे भलतेच खुश होत. भटजीच आगमन व्यासपीठावर झालं, आणि भटजींनी सूचना केली. वाड:निश्चय विधीस उपस्थित वरिष्ट मंडळीना यजमानांनी नमस्कार करून वाड:निश्चय विधीला सुरुवात करत आहे असे नम्रतापूर्वक सांगावे दोन्ही यजमानांनी स्वत:च्या भली कुंकूम टिळक लावावा. (अत्यंत लहान आवाजात मंगल स्वरात सनईची ध्वनिफीत लावावी.) वधूला सुवासिनीच्या हस्ते (भावी सासूने भावी सुनेला) हळद पिंजर लावून तिच्या हातात साडी चोळी-वेणी द्यावी. वधूने देव, ब्राम्हण व वर माता-पिता यांना नमस्कार करुन साडी परिधान करण्यासाठी जावे. यजमानाने दिपपूजन, घंटापूजन, कलशपूजन, कुळदेवता, ग्रामदेवता ईष्टदेवता यांचे पूजन करावे.

चला शेवटी एकदाच साखरपुडा झाला. आता आयुष्यभरासाठी रोहनची सुटका नाही. प्रीती म्हणते,"“मी तुला निवडलं आहे आणि …... तुलाच सदैव निवडेन. पुन्हा.. पुन्हा..न थांबता...न शंका घेता. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. सो हॅपी टू इंगेज्ड टू यू.”.

ह्यात रोहनही म्हणाला,“ज्याने माझं हृदय चोरलं आणि त्याचं हृदय मला दिलं त्या प्रिन्स चार्मिंगशी अखेर इंगेज झालो .” साखरपुडपर्यंतचा प्रवास पण काही सोपा नव्हता. रोहन आणि प्रीतीच्या आयुष्याच्या नव्या चॅप्टरला सुरूवात अखेर झाली.

मन माझं आहे तुझ्याकडेच,

हाती फक्त माझा हात घे....

असेन सदैव मी तुझाच,

अन तुझ्यासाठी सर्वकाही....

तु ही मला जन्माची साथ दे......

मध्येच प्रीती हसून म्हणाली, “किती छान ना. आयुष्यभर पिडण्यासाठी एकमेकांना स्पेशल व्यक्ती मिळाली.”

त्यावर रोहनने आपली लगेच प्रितिक्रिया दिली, “साखरपुडा झाला आणि ती माझी झाली. आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली. आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे.”

“यापुढे नसेल एकट्याने चालणं कारण आता हातात असेल तिचा हात आणि डोक्यावर प्रेमाचं छप्पर.”

हाती आलेल्या हातांसोबत,

स्वप्न एक पाहिलं होत....

निरागस कोऱ्या मनावर माझ्या,

अलगद तुझं नाव कोरल होत......

“तुझ्या हातात माझा हात आहे. सुख अजून काय हवं. साखरपुड्याच्या आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा.”

स्पर्श मखमली तुझा,

माझ्या वेडावलेल्या मनास,

एक दिलासा आहे....

कारण, तू स्पर्शातूनच केलेला,

तुझ्या प्रेमाचा तो खुलासा आहे.....

अशापद्दतीने छोटासा, छानसा, सुंदर साखरपुडा पार पडला. सर्व मित्र-परिवारांनी रोहन आणि प्रीतीला त्याच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे सोहळा अंत्यत सुंदररीतीने पार पडला.

             आपल्या सावलीपासून, आपणच शिकावे........... कधी लहान, तर कधी मोठे होऊन जगावे........ शेवटी काय घेऊन, जाणार आहोत सोबत....... म्हणून प्रत्येक नात्याला, हृदयापासून जपावे........ प्रीती साखरपुडा झाल्यानंतर भलतीच खुश होती. सगळ्यांनी प्रीतीला आणि रोहनला भरपूर शुभेच्छा दिल्या त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. दुसऱ्या दिवशी प्रीती ऑफिस मध्ये आली. तेव्हा cakeआणि कोल्ड्रिंक्स आणून मोठ्या थाटामाटात आनंद साजरा केला. पण तरीही प्रीती कुठेतरी हरवलेली होती. कोणत्यातरी विचारात, काय झालेले कुणासठाऊक. तिच्यावरती तो उत्साह, आनंद दिसत नव्हता. तेव्हा रश्मी म्हणजे प्रीतीची मैत्रीण. रेश्मा आणि प्रीती दोघेही एकाच वेळी कंपनी मध्ये जॉईन झाले होते. आणि ऑफिसमधली प्रीतीची सगळ्यात चांगली मैत्रीण. तिने विचारले. "काय प्रीती काय झालं. खुश नाही आहेस का? नाही. आहे खुश. पण असं का विचारतेस तू. (आणि परत कसल्यातरी विचारात प्रीती हरवून गेली,) प्रीती काय झालं मला सांगशील. माझ्याशी मनमोकळेपणे बोल. काही नाही गं! मनात शंकाच थैमान मांडलंय . समजत नाही काय करावं. साखरपुड्याच्या आधी मी रोहनला जेव्हा पहिल्यन्दा भेटले. तेव्हा ठीक वाटलं. पण नंतर त्याने सगळे निर्णय मी स्वतःच घेणार. तेव्हा कुठेतरी चुकतंय. नंतर आई व बाबानी खूप समजावलं. पण हे बरोबर नाही. जरी पण तुमच्या हक्काचा माणूस असला तरी तुम्ही त्याच्या स्वप्नांशी, आयुष्याशी खेळू शकत नाहीत ना? बरोबर आहे. माझा असा सल्ला आहे कि, तू आणि रोहन एकदा भेट.ह्या गोष्टीवर व्यवस्थित बोला. कारण, आयुष्य हे दोघांच आहे. त्यामुळे महत्वाचे निर्णयही दोघांनी एकमेकांना विचारून घेतले पाहिजे. प्रत्येक मुलींसाठी तिचा लग्नसोहळा हा कभी ख़ुशी कभी गंम असा असतो. कारण जिकडे आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. तेच घर सोडून आपल्या दुसऱ्याच्या घरी जायचे असते. लग्नानंतर लेक माहेर सोडताना आई वडिलांची होणारी तगमग आणि मुलीच्या मनातील घालमेल सारं काही शब्दात न व्यक्त करणारच क्षण असतो. "दिल्या घरी सुखी रहा..., 'मुलगी म्हणजे परक्याचं धन' ही मानसिकता समाजात आजही खोलवर रुजलेली आहे." ह्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकरिता जगायचं राहून जातो...पहिल्यादा आई वडिलांच्या इच्छा-आकांशा, स्वप्न करीता झटतो.... मग प्रियकर असेल तर प्रेयसी आणि प्रेयसी असेल तर प्रियकराच्या, कधी मित्र-मैत्रणीच्या.... आणि नवरा असेल तर बायकोच्या आणि बायको असेल तर नवरायच्या, शेवटी मुलगा-मुलगी यांच्या.... स्वप्नकरिता आपण जगत राहतो. इतरांच्या स्वप्नांना आपण आपली स्वप्न मानतो. त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील लग्नाबद्दल तो अगदी विचारपूर्वक घे. एकदा रोहनची भेट घे. ह्या विषयवार थोडं वार्तालाप करा. आणि मुख्य म्हणजे मनातील शंका दूर करा. रेश्मा म्हणाली ते प्रीतीला पटलं. लगेचच तिने रोहनला फोन लावला आणि संध्याकाळी एकदा भेटू म्हणून सांगितलं. रोहनने ही प्रीतीला हो म्हणून उत्तर दिल. आणि तो तिच्या स्वप्नांमध्ये हरवून गेला. प्रेमाचे गीत गाशील का, स्वप्नांत साजणी येशील का? बैसूनि साजणी मज जवळ तू, गीत प्रेमाचे गाशील का? थकलो रे विरहात जगुनी, प्रेमात साथ तू देशील का? स्वप्नं माझे जरी भंगले, तू साद मजला देशील का? पाहता फिरून मजकडे साजन, हातात हात तू देशील का? 

तुम्हला आजचा भाग कसा वाटला, नक्की मला तुमची प्रितिक्रिया कळवा. भेटू पुढील भागात.............