Marriage Journey - 3 books and stories free download online pdf in Marathi

लग्नप्रवास - 3

लग्नप्रवास - ३

चला, नक्की आज भेटायचं ठरलं. संध्याकाळी ७ ची वेळ दिली. आता कोण वेळेवर येतेय? रोहन अगोदरच तिकडे जाऊन पोचला. त्याने प्रीतीला मोबाईल वर संदेश पाठवला. थोड्यावेळाने प्रीतीही तिथे आली. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. रोहनन प्रीतीसाठी orange juice मागवला आणि स्वतःसाठी mango juice. तेव्हा अचानक प्रितीने जे दोन दिवस तिच्या मनात होत ते बोलून मोकळी झाली. माझ्यावर असे नियम तू लावू शकत नाहीस. अंतिम निर्णय हा आपल्या दोघांचा असेल. तू एकटा निर्णय घेणार लग्नानंतर ते मला मान्य नाही आहे. माझ्याहि काही अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत. आणि मला साथ देण्याऐवजी तू माझ्यावर निर्बंध लावतो आहेस. हे मला चालणार नाही.तेव्हा हसत हसत रोहन म्हणाला,"एवढंच, सॉरी. मला तस बोलायचं नव्हतं. आयुष्यात नेहमी मी तुझ्याबरोबर असेन. मी माझी चूक मान्य करतो. मी बघताक्षणीच तुझ्या प्रेमात पडलो. तू सरळ, साधी, मन मिळवू, प्रेमळ आणि थोडी चंचल आहेस.तुझ्या कोणत्याही निर्णयांवर माझा विरोध नसणार. पण जर मला एखादी गोष्ट नाही पटली तर मात्र मी त्या गोष्टीचा विरोध करणार. आणि तू तेव्हा माझं ऐकायचं. चालेल. 'हो, चालेल! दोघेही खाऊन हॉटेल मधून बाहेर निघतात, रोहन प्रीतीला म्हणतो, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर आपण गिरगाव चौपाटी वर जाऊया का. पण प्रीतीं लगेच होकार दिला. सूर्य हळूहळू मावळत होता. अचानक जोरदार वारा आला आणि थोडं दचकून प्रितीने राहुलला मिठी मारली. मिठीत तुझ्या अडकले क्षण…
मिठीत तुझ्या
अडकले क्षण,
खेळताना कुंतलांशी
केसांत तुझ्या गुंतले क्षण.
चुंबीले तुला मी
ओल्या ओठांवर विरघळले क्षण,
लाजलीस अशी खुब तु
गालावर गुलाबी खुलले क्षण.
लकीर पाठीवर ओढिले मी
शहा-यात तुझ्या थरारले क्षण,
बंद डोळ्यांच्या त्या
नजरेत तुझ्या विखुरले क्षण.
अलगद मिठीत आलो मी
धुंद श्वासात तुझ्या मोहरले क्षण,
आयुष्यभर जपावे मी असे
मिठीत तुझ्या अडकले क्षण…

तेव्हा लगेचच प्रितीने स्वतःला सावरले. मग दोघे मस्त भेळ खाऊन दोघे घरी जाण्यास निघाले. शेवटी घरी जाताना प्रीती रोहन म्हणते, तू माझ्यासाठी खूप special आहेस आणि माझं पहिलं प्रेम आहेस. तू माझ्यासा ईश्वराने दिलेली अनमोल भेट आहेस. जिथे रक्ताची नाती दुरावली तिथे तू आठवतो प्रत्येक दुःखाच्या वेळी, सुखांच्या क्षणी ....रक्ताच्या तत्यापलीकडक, हवंहवंसं....समपिर्त, निस्वार्थ, मंगलमय, पवित्र, सात्विक. दोघेही ह्यभेटीनंतर भलतेच खुश दिसले. प्रीतीला जी शंका रोहन कडून होती त्या शंकेचे सुद्धा निरसन झाले होते. आता मात्र ते दोघांवर जीवापाड प्रेम करायला लागले. रात्री बराच वेळ दोघे chatting करत असे. स्वप्नांत तुझ्या जरूर येईन, पण कधीच स्वप्न दाखवणार नाही तुला घेऊन भरारी घेईन, याहून अधिक पंख फाकवणार नाही चंद्र, तारे चरणी वाहीन,असे कधीच वाचन देणार नाही समाधानाच्या पुढे कधीच, इच्छेची गती ठेवणार नाही चारबाय आठच्या खोलीत, राजवाड्याचा दरवाजा मावणार नाही माझ्यापाशी प्रेम व काळजी, ह्या गोष्टीची कोणतीच सीमा नाही अगणित हृदय शोधून बघ, इतकं प्रमाण कुठंच जमा नाही.

दुसऱ्या दिवशी प्रीती खूप खुश होती. कारण त्याला कारण हि तसच होत. काल रात्री रोहनने तिला अचानक मोबाईल वर संदेश पाठवला. तू मला खूप आवडतेस. पण तो संदेश काल रात्री न बघता प्रीती झोपून गेली. उठली ती सकाळी पहिला मोबाईल हातात घेतला बघते तर काय. त्यामुळे मॅडम भलत्याच खुश होत्या. आणि आज प्रीती आणि रोहनच्या लग्नाची तारीख ठरणार होती. प्रीतीच्या घरचे आज सर्व खुश होते.

"बाबा आज तुम्ही तुमच्या आणि आईच्या २५ व्या वाढदिवसाला घातलेली सफारी घाला आणि आई पण साडी नेस ग."

हो, नक्की.

सर्वांच्या भेटीने लग्नाची तारीख ठरली. मग प्रीती काय हवेतच. तिच्या मनात खूप प्लांनिंग चालू होत. की आता लग्नाच्या खरेदी निम्मत भेटू तेव्हा काय काय घालायचं. ती खूप त्या दिवसाची उत्सुकतेने वाट बघत होती. तसा रोहन खूप अबोल होता. मोजकंच बोलायचं. आणि त्या उलट प्रीती बोलण्यात नंबर पहिला. प्रीतीच्या वडिलांनी लग्नाची तारीख ठरल्यानंतर रोहनचे आणि त्याच्या आई व वडिलांचे गोड मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. प्रीती आतल्या खोलीत होती. तेव्हा रोहन ने तिला पटकन बाहेर यायला सांगितले, आणि म्हणाला आपण दोघे जरा समोरच्या गार्डन मध्ये जाऊया का. प्रीती तेव्हा थोडी लाजून मन खाली घातली. पण लगेचच प्रीतीच्या काकीने तिला हो म्हणून सांगितले. तशी प्रीती तयार झाली.

दोघेही गार्डन मध्ये आले. आजूबाजूला लहान मुल खेळत होते.

भाव तुझ्या प्रितीचे… लिहतो आहे तुझ्यासाठी
गीत ग मी प्रेमाचे
ओतशील ना शब्दात माझ्या
भाव तुझ्या प्रितीचे

शब्द माझे आहेत साधे
नाही ग ते नटले
विसरले ग ते बिचारे
नाही अलंकार ल्याले
शब्द माझे कोरडे
प्रेमासाठी आतुरलेले
देशील ना शब्दांना माझ्या
चुंबन तुझ्या ओठांचे
ओतशील ना शब्दात माझ्या
भाव तुझ्या प्रितीचे

तिचा चेहरा एकदम फुलासारखा फुलला. तिने लगेचच रोहनला विचारले,कि, तू कवी सुभाष सरांचा फॅन आहेस वाटत. काय तुझी गाणी आणि काय तुझ्या गझल. माझं मन ऐकून एकदम तृप्त झालं. मला गझल आणि कविता खूप आवडतात.काही प्रसिद्ध कवीची मी खूप मोठी फॅन आहे. भा.रा. तांबे, सुरेश भट, शांता शेळके. मला ह्यांच्या कविता खूप आवडतात.दोघांनी एक तास ह्या विषयांवर गप्पा मारल्या. दोघेही गप्पामध्ये रमून गेले. तेवढ्यातच प्रीतीची धाकटी बहीण अंकिता त्यांना दोघांना बोलवायला आली.थोड्यावेळाने रोहनची घरची मंडळी निघाली. तेव्हा मात्र सारखी प्रीती हळूच रोहनला इशारा करत होती.

नुकतीच लग्नाची तारीख ठरली होती. तशी दोघेही एकमेकांना अनुरूप. कुठं म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती.दोन्हीकडची मंडळी खूप खुश होती. इकडे सुनेच्या आगमनाची तयारी आणि तिकडे जावयाच्या खानपानाच्या तयारी. बैठकीत सगळ्याचा मान राखण्यात आला होता.

लग्न म्हणजे काय असत,

दोन जीवाचा मेळ असतो....

राजा राणीचा मांडलेला,

भातुकलीचा खेळ असतो....

म्हणतात मुलीचं घर,

सोडणं तिच्यासाठी खूप अवघड असत....

पण आपल्या जगात दुसऱ्यला आणण,

हे मुलांसाठी पण सोपं नसतं ............

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, नक्की मला तुमची प्रितिक्रिया कळवा. भेटू नक्की पुढील भागात.