Mitranche Anathashram - 16 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १६

रजनी बोलायला लागली,

जेव्हा समीरने तुझ्याकडे चिठ्ठी दिली, त्यानंतर समीर खोलीमध्ये त्याचे सामान एकत्र करून बॅग भरायला लागला. मी त्याच्या मागे गेले, त्याची बॅग भरून झाल्यावर तो मागे वळला तेव्हा मी तिथेच उभी होती.
समीर, "काय आहे ?"
मी, "कुठे चालले तुम्ही"
समीर, "मी चाललो माझ्या मार्गाने, मी तुझ्या बरोबर नाही राहू शकत, मला माफ कर"
मी, "मग मी जगून काय करू"
समीर, "माझ्या मागे पुढे कोणीच नाही, पण तुझ्यासाठी तुझा दादा आणि आई काकू सर्व जण आहेत, ते काय म्हणतील"
मी, "काही नाही मी प्रेम केला आहे तुमच्यावर, बाकी मला काहीच माहिती नाही"
समीर, "मी जातो मला जाऊदे"
समीर जायला लागला, पण मी त्याचा हात पकडला आणि त्याला एका खुर्चीवर बसवले आणि बोलले "तुम्हाला जायचं आहे ? कुठे जाणार ?"
समीर, "मी कुठे जाणार ते मला माहित नाही, पण ज्याच्या हातात मी चिठ्ठी दिली तो त्याला मी तुझ्याबद्दल सांगितले आहे, त्याने मला शब्द दिलेला आहे तो कुणालाच नाही सांगणार"
मी, "पण तुमचं जाणे गरजेचेच आहे का ?"
समीर, "हो दुसरा पर्याय नाही आणि तु माझं ऐकत नाही, जीव द्यायला निघाली"
मी, "मी नाही म्हणणार यापुढे तसे काही, पण तुम्ही जाऊ नका, तुम्ही जे सांगाल तेच करेल"

आणि तितक्याच खूप मोठा आवाज झाला, तिकडे गोंधळ उडाला धावपळ सुरू झाली. कुठेतरी मोठा स्पोट झाला आहे, हे समजायला आम्हाला जास्त उशीर नाही लागला.
असं वाटलं की मी आणि समीर ज्या रूम मध्ये होतो, त्याच्या बाजूच्या रूममध्ये स्फोट झाला असावा. पाहता पाहता पूर्ण रूम मध्ये आग लागली. समीर आणि मी बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होतो. आगीतून मार्ग काढत आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडण्यासाठी एक जागा दिसली. समीरने मला हाताला पकडून बाहेर काढले.
आम्ही बाहेर पडलो तोपर्यंत स्फोट होऊन दहा मिनिटे झाली होती. आम्ही दोघेही बाहेर पडणार तितक्यात रडण्याचा आवाज आला. खिडकीतून आत पाहिले तर बाजूच्या खोलीत पिंकी रडत होती. समीरने मला बाहेरच थांबवलं माझी ओढणी घेऊन ती तोंडाला बांधली. दरवाज्याला ही आग लागली होती, बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले. समीरने खिडकीला लाथ मारून खिडकी तोडली आणि पिंकीला माझ्याकडे दिले. तो बाहेर येण्याची वाट शोधत होता.
मी, "मागे जा छत कोसळत आहे"
पण समीर मागे सरकला नाही लाकडाने तयार केलेले छत जमिनीवर कोसळले. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला जिकडे जायचंय तिथेच गेला. माझं प्रेम अपूर्णच राहिले, मी आणि पिंकी दोघी आगीतून मार्ग काढत बाहेर आलो.


सर्वांचे डोळे पाण्याने भरलेले होते.
डोळे पुसत मी बोललो, "आता कुणीच रजनीला काही बोलणार नाही"
संजय, "तु समीर वर प्रेम करायची मला का नाही सांगितलेस तु"
छोटी आई, "इतक्या चांगल्या मुलाला कोण नाही म्हटले असते, प्रश्न गरीब श्रीमंती नाही, फक्त प्रेमाचा होता."
रजनी, "विवेक दादा समीरचं पूर्ण नाव काय होतं" विवेक, "समीर हरी देशमुख"
रजनी, "एस डी कंपनीचा एकुलता एक मालक होता तो आणि त्याच्या या जगात कुणीच नव्हतं, आई-बाबा आपण मागेच वारले होते."
सुरेश काका, "नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत आहे"
आम्या, "इतक्या मोठ्या कंपनीचा मालक मग नाव तर ऐकलेच वाटणार ना"
संजय, "इतके शोधले तरी त्याचा मृतदेह नाही सापडला"
रजनी, "दादा, तुम्हाला समीरने चिठ्ठी दिली होती, ती कुठे आहे."

मी माझ्या बॅग मधून डायरी काढली, त्यात ती चिठ्ठी ठेवली होती. सर्वांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या.
ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.

- क्रमशः