Gift from stars 16 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १६

पावसाचा जोर ओसरलेला नव्हता. त्यामुळे सगळीकडे पाणी भरलेले होते. कॅब सुद्दा मिळणे मुश्किल होते. काय करावं सुचेना. भूमी खूप वेळ वाट बघत कंपनीच्या बाहेरील एरियात थांबली होती. इथे तसे कोणीही विशेष ओळखीचे नसल्याने सांगणार तरी कोणाला? बराच वेळ ती इथे उभी असल्याने ऑफिस रिसेप्शनिस्टने हे ओळखलं असावा, तिने आत फोन केला आणि या बद्दल सांगितलं. ‘’मॅम सर येतायत, ते सोडतील तुम्हाला.’’

असं म्हणत तिने हातातला फोन ठेवला, भूमी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती एवढ्यात मिस्टर सावंत आणि क्षितीज बाहेर आले होते.

''हेवी रेन सुरु आहे. सगळे रोड अल्मोस्ट ब्लॉक आहेत. शक्य असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये वरती थांबू शकता. काही दूरच्या एम्प्लॉईज साठी तिथे इमर्जन्सी सर्विस दिलेली आहे.'' क्षितीज तिच्या दिशेने येत म्हणाला.

''नाही, मला थांबता येणार नाही.'' दिवसभर त्या साडीत अवघडलेली भूमी हे ऐकून फार वैतागली होती.  

''मी बघतो, काही करता येत का?''  म्हणत मिस्टर सावंत कॉन्फरंस रुमकडे वळले. हातातील मोबाइलवर नंबर लावून करून ते गाडीसाठी चोकशी करत होते.

ते बघून क्षितिजने परत भूमीला विचारले. ''जायलाच पाहिजे का? आज थांबू शकलात तर बघा. रोडवरती पाणी आहे खूप, अडकण्याची चान्सेस आहेत.''

''पण मी अशी इथे नाही थांबू शकत, आधीच मला खूप अवघडल्यासारखं वाटतंय. घरी गेलेलं बरं.'' आपली साडी सावरत ती म्हणाली.

काहीतरी विचार करत क्षितिजीने हातानेच रिसिप्शन वरती इशारा केला. आणि तो निघाला. ''ओके, मी निघालोच आहे, तर सोडतो तुम्हाला.''

आता हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न उरला नव्हता. त्यामुळे भूमी त्याच्या बरोबर निघाली.

एड्रेस सांगण्यापलीकडे  बराच वेळ झाला कोणीही काही बोलले नाही. मुसळधार पाऊस सुरु होता. खूप ठिकाणी पाण्यामुळे गाडी मागे घ्यावी लागली. दुसऱ्या रोडने जायचं तर जवळपास सगळीकडेच पाणी भरलेले दिसत होतं. तरीही स्लो मोशनमध्ये गाडी पुढे घेत क्षितीज निघाला होता. त्यात दोन-तीन वेळा मेघाताईंचं फोन येऊन गेला पण क्षितिजचे त्याकडे लक्ष नव्हते. शेवटी न राहवून भूमीने फोन त्याच्याकडे देत तो घ्यायला सांगितले.

''आई, लेट होईल, पाण्यात फ़सलोय. सोबत भूमी आहे, तिला सोडून येतो.'' एका वाक्यात विषय संपवून त्याने फोन कट केला. एव्हाना त्याच्या चिडलेला अवतार भूमीच्या लक्षात आला होता.

 ''एक करत का? मला इथेच सोडा, मी रिक्षा वगैरे बघून जाईन.'' भूमी एवढं बोलली नसेल तोच कर्कशून ब्रेक लावून क्षितिजने गाडी जागच्या जागी थांबवली होती.

''रिक्षा मिळणार नाही इथे, हेलिकॉप्टर मिळेल, NDA ची एखादी बोट सुद्धा असेल इथे.  पूरग्रस्तांसाठी तातडीची सेवा सुरु आहे... चालेल?''  तिच्याकडे बघत तो म्हणाला.''

''सॉरी, मला माहित नव्हतं एव्हढं पाणी वाढलं असेल ते. माझ्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास झाला.'' म्हणत नाराजीच्या सुरात भूमी दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा तयारीत होती. पण डोअर लॉक असल्याने तिला बाहेर पडत आले नाही.

''मॅम डोअर लॉक आहे, पुढचा रस्ता बंद केला गेला आहे, थोडं पाणी ओसरल्यावर निघू, बसा आरामात.'' म्हणत क्षितिज मस्त पाठीमागे रेलून बसला होता.

''दुसरा काही पर्याय?'' भूमी 

''हा दुसराच पर्याय आहे. पहिला पर्याय हा कि पुढे जायचं आणि पुराच्या पाण्यात बुडून स्विमिंग करायचं. कोणता पर्याय ओक वाटतो?'' क्षितीज

''अश्या परिस्थिती तुम्ही एवढे रिलॅक्स कसे राहू शकता? पाऊस खूप आवडतो वाटतं?'' भूम

''नाही, बाहेरचा पाऊस खिडकीतून पाहायला आवडत. मग ती गाडीची खिडकी का असेना. आणि सोबतीला कोणी असेल तर अजून काय पाहिजे.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता, हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होत. आपली नजर खिडकी बाहेर वाळवून भूमी शांत बसली.

''किती लिटर?'' क्षितिजने पुन्हा तिला गमतीने विचारले. तिने काय असं मानेनेच विचारल्यावर, 'केव्हापासून बघतोय, तुम्ही बाहेर एकटक पाऊस मोजताय, म्हणून विचारलं किती लिटर आहे?' तो पुढे म्हणाला.

''खूप पडून गेलाय पाऊस आयुष्यात... समजण्याच्या आणि मोजण्याच्या अगदी पलीकडे. पण आजचा पाऊस वेगळा वाटतो, तो मोजता नाही येत पण समजून घेण्याचा प्रयत्न करते.''  भूमी एकटक बाहेर बघत बोलत होती.

''म्हणजे?'' काहीही न समजल्याने त्याने पुन्हा प्रश्न केला.

''पाऊस दरवर्षी पडतो, तेच थेंब, तेच पाणी पण पाऊस वेगळा असतो.'' भूमी

''ते कस काय?'' क्षितिज

''आज तुमचा मूड चांगला असलं तर आजचा पाऊस आनंदी आहे, उद्या तुम्हाला काही वाईट बातमी मिळाली तर, उद्याचा पाऊस तुमच्यासाठी वाईट असणार. म्हणजे आपापल्या मूड नुसार आपण पावसाला अनुभवत असतो.''

''माहित नाही, पण आज खरतर माझा मूड मस्त आहे, आणि बाहेर पडणारा पाऊस सुद्धा मस्त, प्रसन्न वाटतोय. तोच पाऊस काही वेळापूर्वी चिडचिडा वाटत होता. आता अगदी धुंद वाटतो. हवाहवासा... ''   बाहेर बघणारा क्षितीज एकटक तिच्याकडे बघत म्हणाला. ती मात्र अजूनही बाहेर डोळे लावून आपल्याच विचारात गढून गेली होती. हळूच म्युझिक प्लेअर ऑन करून क्षितिजने रेडिओ सुरु केला. रस्ताच्या कडेला उभी असणारी गाडी, बाहेर दुतर्फा पसरलेले पाणी आणि आतमध्ये वाट बघत बसलेले ते दोघे, यातच रेडिओवर मस्त मंद म्युझिक वाजत होते.

महफ़िल में कैसे कह दें किसी से,

दिल बंध रहा है किस अजनबी से

हाय करे अब क्या जतन,  सुलग सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम मेंलगी कैसी ये अगन

रिम-झिम गिरे सावन ...


क्रमश 

https://siddhic.blogspot.com/