Premgandh - 35 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ३५)

आपण मागच्या भागात पाहीलं की कुसुम राधिकाच्या बाबांना त्यांच्यासोबत येऊन राहायला सांगते... भीम्या गोविंदसोबत काम का करू लागला हे सगळं सुमीने राधिकाला सांगितलं... अजयची आई अजूनही शांतच होती कोणासोबत काहीच बोलत नव्हती. सगळे शेतात फिरत होते त्याचवेळी तिथे गोविंद येतो आणि भीम्याच्या कानाखाली वाजवतो... आता पुढे...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


गोविंदने भीम्याला मारायला सुरूवात केली... पण भीम्याने गोविंदवर अजिबात हात उचलला नाही...


सुमीने गोविंदसमोर जाऊन हात जोडले आणि रडू लागली. कृष्णा खूप घाबरला तो रडू लागला... राधिकाने त्याला जवळ घेतलं आणि आतमध्ये घेऊन गेली...


"मालक, हात जोडते तुमच्यासमोर... सोडा माझ्या नवर्‍याला..." - सुमी...


"गोविंदा सोड त्याला, काय चालवलंस तू? प्रत्येकवेळी तूझी दादागिरी खपवून घेतली नाही जाणार इथे..." कुसुम.


"ए म्हातारे, तू मध्ये पडायचं नाही... सांगून ठेवतो तूला..." गोविंद चिडूनच बोलला.


"मालक, तुम्हाला जेवढं मारायचं मला तेवढं आज मारून घ्या... पण आज शेवटचं असेल हे... पण यापुढे तुम्ही माझ्या अंगाला हात पण लावू शकणार नाही... तुमच्या चांगल्या कामात मी तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला... पण वाईट धंद्यात यापुढे मी तुमची कधीच साथ देणार नाही... - भीम्या...


"म्हणजे? यापुढे तू माझ्यावर हात उचलणार असं...? बघतोच मी... तू माझ्यावर हात कसा उचलतोस ते...? हि का तूझी इमानदारी हां..." - गोविंद... गोविंदचं लक्ष खिडकीतून बघणार्‍या अजयकडे गेलं... गोविंद त्याच्याकडे रागानेच बघू लागला.


"तूला तर मी अजिबात सोडणार नाही लक्षात ठेव तू... एकदा भीम्याच्या हातून वाचलास तू... पण माझ्या हातून तूला कोणीच वाचवणार नाही... या सगळ्या गोष्टींचा जड तू आहेस... आणि राधिकाशी लग्न करण्याचं स्वप्न तू बघू नकोस... दूर राहायचं तिच्यापासून... नाहीतर फुकटचा जीव गमावून बसशील... ती फक्त माझी आहे आणि माझीच राहणार..." - गोविंद रागानेच बोलत होता...


राधिकाच्या बाबांचा, कुसुमचा राग खूप अनावर झाला...


"तू कोण आहेस कोण? तूला काय वाटलं तूझ्या धमक्यांना घाबरून जाऊ आम्ही...? आणि माझ्या मुलीचं लग्न कोणाशी होणार हे माझं मी ठरवेन... तिचा बाप जिवंत आहे अजून, समजलं का..." राधिकाचे बाबा.


"मामा, मी गप्प आहे ना तो फक्त राधिकासाठी... नाहीतर तुम्हाला सगळ्यांना एका रात्रीतच गायब करायला वेळ लागणार नाही..." - गोविंद. कुसमने त्याच्या कानाखालीच मारली...


"कोणाला धमक्या देतोस तू इथे येऊन? जे काही इथे आहे ते सगळं त्याचंच आहे आणि आता त्याच्याच जागेवर तू उभा आहेस आणि त्यालाच धमक्या देतोस तू...? चल चालता हो इथून... परत पाय नको ठेऊस इथे..." - कुसुम.


"स्वतःच्या पोटच्या पोराला घराबाहेर काढून या लोकांना घरात घूसवून ठेवलंस तू? आणि तूला काय वाटलं? ही सगळी संपत्ती एवढ्या सहजासहजी यांच्या हाती लागून देईन का मी? मी काय करतो ना... ते तू आता बघच..." - गोविंद.


"हो जा तूला काय करायचं ते कर... मी पण बघतेच तू अजून किती खालच्या थराला जातोस ते..." - कुसुम.


गोविंद रागानेच तिथून निघून गेला... भीम्याला तीथून उठवून घरात नेऊन झोपवलं आणि कुसूमने डाॅक्टरांना बोलवून घेतलं...


"अमृता, अर्चू चला सामान आवरा आपलं. आता या घरात एक क्षणही राहायचं नाही मला... आत्ताच्या आत्ता मला इथून निघायचं आहे..." अजयची आई रागासंतापात बोलत होती.


"अगं सावी, एवढी चिडतेस का तू? निघू आपण, पण शांततेने घे जरा..." - अजयचे बाबा.


"शांत शांत शांत... एवढे दिवस शांततेनेच घेतले ना... अजून किती शांत राहू मी तुम्हीच सांगा... आता सगळं सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलंय माझ्या..." अजयची आई चिडूनच बोलत होती.


"आई अगं शांत हो थोडी... तू फक्त स्वतःला त्रासच करून घेत आहेस बाकी काही नाही..." - अजय.


"हो त्रास होतोय मला सगळ्या गोष्टींचा... कारण माझ्या एकुलत्या एक मुलाच्या जीवावर उठलेत सगळे... आता हे सगळं नकोसं झालंय मला..." - अजयची आई.


"अगं आई हे काय बोलत आहेस तू...?" - अजय.


"अहो ताई, अजयरावांना काही होत नाही... हा शब्द आहे माझा तुम्हाला... माझ्या मुलासारखाच आहे तो पण... त्याच्या केसांनासूद्धा धक्का लागू देणार नाही आम्ही..." - कुसुम...


"तुमच्यासमोर हात जोडते मी... नका माझ्या पोराच्या जीवावर उठू तुम्ही... माझ्या पोराचा पिच्छा सोडा तुम्ही आणि तुमच्या मुलीसाठी तुम्ही दुसरा मुलगा शोधा किंवा तुमची सून करून घ्या तिला आम्हाला काही फरक पडत नाही... पण तुमच्या मुलीसाठी मी माझ्या पोराचा बळी नाही देऊ शकत..." - अजयची आई...


"अगं आई हे काय बोलतेस तू?" - अजय.


"अगं सावी डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू काय बोलत आहेस कळतेय तरी का तूला...?" - अजयचे बाबा.


"आधी नव्हतं ठिकाणावर... पण आत्ता चांगलंच डोकं ठिकाणावर आलंय माझं... आता यापुढे मला कोणाचंही काहीही ऐकायचं नाही..." - अजयची आई.


"राधिका, तू खूप चांगली मुलगी आहेस... तूला कोणीही चांगला मुलगा मिळून जाईल... पण माझ्या मुलाला आता तू विसरून जा... माझा एकुलता एक मुलगा आहे तो आणि त्यालाही मी तुझ्यासाठी त्याचा बळी नाही देऊ शकत... तुझ्यासमोर माझा पदर पसरते मी हवं तर... पण माझ्या पोराचा जीव फक्त तूझ्या हातात आहे... तू विसरून जा माझ्या पोराला... हात जोडते तुझ्यासमोर मी..." - अजयची आई...


"अहो आई असे हात नका जोडू हो माझ्यासमोर..." - राधिका रडतच म्हणाली... सगळ्यांनाच गहिवरून आलं होतं.


अजयच्या आईने अजयचा हात पकडून त्याला घेऊन जाऊ लागली... राधिकाचे आईबाबा, अजय, अजयचे बाबा, कुसुम सगळेच तिच्या मागेच चालत येत होते आणि सगळ्यांनी तीला समजावण्याचा, थांबवण्याचा खूपच प्रयत्न केला पण अजयच्या आईने कोणाचं काहीच ऐकलं नाही... ती अजयला घेऊन सरळ निघून गेली. राधिका मात्र खूप रडू लागली... तिला सुमी आणि मेघा, मीरा, सोनालीने समजावण्याचा प्रयत्न केला... पण राधिका मात्र खूप रडत होती... राधिकाची आईपण रडू लागली... सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं...


"माझ्या पोरीनं कोणाचं काय वाईट केलंय की तिच्याबाबातीतच हे सगळं घडत आहे..." - राधिकाचे बाबा.


"नाम्या, काही वाईट झालेलं नाही अजून... मी स्वतः जाईन अजयरावांच्या घरी. त्यांच्या आईला मी समजावेन हवं तर त्यांचे पाय पकडेन... पण आपल्या राधीचं लग्न अजयरावांसोबतच होईल... हा शब्द आहे माझा तूला..." - कुसुम...


"नाही ताई आता काही होईल असं मला अजिबात वाटत नाही... कोण आपल्या मुलाचा स्वतःहून जीव धोक्यात घालेल... शेवटी आई आहे त्यांची ती... आता परिस्थितीच अशी आहे की त्यांच्या जागी त्या पण बरोबरच आहेत..." - राधिकाचे बाबा.


"असा हारून नको जाऊस नाम्या... काहीही वाईट होणार नाही आणि मी होऊही देणार नाही... मी स्वतः राधिकाचं लग्न अजयरावांसोबत लावून देईन..." कुसुम...


"नाही ताई, एवढी वर्षे झाली ही परिस्थिती आहे तशीच आहे आणि आताही बदलेल असं वाटत नाही मला..." राधिकाचे बाबा.


"नाही नाम्या, आता सगळंच बदलायची वेळ आलेली आहे. आणि ते मी बदलून दाखवेन... बस झालं आता हे सगळं... आता एका मुलाच्या विरोधात एक आईच उभी राहील आणि त्याचा काटा काढेल..." - कुसुम.


"कुसमे, काय करणार आहेस तू...?" - सावित्रीमाय.


"माय, आता मी ठरवलंय गोविंदला माझ्या परीनेच मी धडा शिकवेन... पण मी एकटी काहीच करू शकत नाही... यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची आणि आपल्या सगळ्या गावकर्‍यांची साथ पाहीजे बस... मग बघा मी काय करते... माय, माझ्या पोराला मीच बिघडवलाय... आणि आता मीच सुधरवेन त्याला आणि नाहीच सुधरला तरी जन्माची अद्दल घडवेन त्याला..." - कुसूम.


"मावशी, मी आहे तुमच्यासोबत... काहीही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही मी..." - भीम्या.


"हो आत्या, मी पण आहे तुमच्यासोबत..." - सुमी.


राधिकाच्या आईबाबांनी, सावित्रीमायने पण कुसुमला साथ देण्याचं ठरवलं...


"भीम्या, सगळ्यांत आधी तर आपण जे काही करणार आहोत, त्या गोष्टीची भनकदेखील गोविंदला लागायला नको... जे काही करायचं ते सगळं गुपचूप करायचं... आपल्यामुळे गावातल्या एकाही माणसाला धोका निर्माण होता कामा नये..." - कुसुम...


"ती पूर्ण जबाबदारी माझी असेल... मी करतो कसं काय करायचं ते..." - भीम्या.


गोविंदला धडा कसा शिकवायचा याबातीत सगळे मिळून ठरवू लागले...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इथे अजयच्या घरी मात्र सगळेच अजयच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होते... पण ती कोणाचंच ऐकत नव्हती...


"अगं सावी, राधिका एक चांगली मुलगी आहे आणि दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर... हा तरी विचार कर जरा..." - अजयचे बाबा...


"चांगल्या मुलींची काही कमी नाही या दुनियेत... तिच्यापेक्षा चांगली मुलगी शोधून आणेन मी माझ्या अजयसाठी..." अजयची आई...


"अगं पण आपल्या अजयला नको का आवडायला? का अशी हट्टाला पेटतेस तू सावी? अगं अजयच्या मनाचा तरी विचार कर जरा..." - अजयचे बाबा.


"मी त्याचाच विचार करत आहे... तुम्हाला नसेल त्याची काळजी पण मला आहे.... माझ्या मुलाचं भलं कशात आहे ते चांगल्या प्रकारे कळतेय मला..." अजयची आई.


"पण आई तू माझं एकदा तरी ऐकून घे प्लीज..." - अजय.


"आतापर्यंत ऐकत आली ना तुमचं तेवढं बस झालं... यापुढे मला तुमच्या दोघांचं काहीच ऐकायचं नाही... मला या घरात ती मुलगी सून म्हणून अजिबात नकोय... बस्स..." - अजयची आई.


"आई, मी लग्न करेन तर फक्त राधिकासोबतच... नाहीतर लग्नच करायचं नाही मला..." - अजय.


"बरं ठिक आहे... ज्यादिवशी तू त्या मुलीसोबत लग्न करशील त्याच दिवशी तूला माझं मेलेले तोंड दिसेल लक्षात ठेव तू..." - अजयची आई.


"आई असं नको गं बोलूस... तूला काही झालं तर तुझ्याशिवाय मी कसा जगेन...?" अजय आईला मिठी मारून रडू लागला. अजयच्या बाबांच्या डोळ्यांत पण पाणी आलं...


"असं का बोलतेस सावी? अगं तुझ्याशिवाय आमचं दोघांचं आहे तरी कोण?" - अजयचे बाबा.


"पण आई राधिकावर मी प्रेम करतो गं... नाही जगू शकत तिच्याशिवाय..." - अजय.


"मग ठिक आहे... एकतर मी नाहीतर राधिका... दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल तूला... आणि राधिकाची निवड करायची असेल तर करू शकतोस पण नंतर या जगात तूला कुठेच दिसणार नाही मी..." अजयची आई.


"आई, असं नको बोलूस गं... मला तुम्ही दोघीही हव्या आहेत गं..." अजय...


"पण ते आता शक्य नाही..." अजयची आई.


"सावी, का रडवतेस गं अशी पोराला...? त्याला पण समजून घे ना थोडं... अगं लग्न त्याला करायचं आहे... पुर्ण आयुष्य त्याला काढायचं आहे... होऊ दे त्याच्या मनासारखं..." अजयचे बाबा.


"अहो पुर्ण आयुष्य काढायला माझा पोरगा जिवंत तर राहायला हवा ना... तुम्ही सगळे त्याच्या जीवावर उठलेत... पण आता बस झालं हे सगळं... पुढे आयुष्यभर आपण रडत राहायला नको म्हणजे झालं...." अजयची आई.


"अगं आई, काही होत नाही मला... तू का असा विचार करत आहेस...?" - अजय.


"अजय, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आता... आणि तुला पुढे काही होण्याची वाट बघत बसू का मी...? ते काही नाही... जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच आणि आत्ताच... तूला मी हवी आहे की राधिका...?" अजयची आई.


सगळे शांतच बसले होते... अजयला तर काय बोलावं काही समजतच नव्हतं... त्याचंं तर विचाराने डोकंच गरगरायला लागलं होतं आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. अमृता आणि अर्चनाने त्याला सावरलं...


"ताई. अगं तू तरी समजाव ना आईला... मी खरंच नाही राहू शकत राधिकाशिवाय... मला फक्त तिच्यासोबतच लग्न करायचं आहे..." अजय...


"अजय, खरं तर मला पण आईचं बोलणं पटतंय... कारण माझ्या एकुलत्या एक भावाला मला पण नाही गमवायचंय..." अमृता...


"ताई, तू पण अशी बोलतेस?" अजय... त्याने अर्चना आणि अर्चनाच्या आईकडे पाहीलं पण दोघींनीही माना खाली घातल्या...


"अगं अमृता, तू पण तुझ्या आईसारखं का बोलत आहेस...?" अजयचे बाबा.


"बाबा, आपलं राधिकासोबत किंवा तिच्या घरच्यांसोबत काहीच वैर नाही पण अजय आत्ताच एवढ्या मोठ्या संकटामधून बाहेर आलाय... आणि परत असं काही त्याला झालं तर सगळेच कायमचे रडत बसतील आणि त्यावेळी पश्चात्ताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही... कारण कोणाची काळ वेळ ही सांगून येत नसते... म्हणून मलाही आईचं म्हणणं पटतंय..." अमृता...


"नशिब तूला तरी पटलं माझं बोलणं अमृता... अजय आता तूझ्या निर्णयाची वाट बघत आहे मी..." अजयची आई....



क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३५


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀