Premgandh -37 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ३७) 

( आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आईचं म्हणणं ऐकून राधिकाला सोडण्याचा विचार करतो... अजय आणि राधिका दोघेही एकमेकांच्या आठवणीत रडत असतात... कुसुम अजयच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती तीच्या निर्णयावर ठाम असते... भालेकर वाड्यावर सर्व गावकरी जमा होतात... गोविंदच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सगळे गावकरी कुसुमला साथ देण्यांस तयार होतात... आता बघूया पुढे...)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


राधिकाने आज सकाळी शाळेत जाण्याची तयारी केली... कुसुमने स्वतःच राधिकाला जेवणाचा टिफीन आणून दिला आणि तीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला....


"राधी, सगळं काही ठिक होईल... तू काही काळजी करू नकोस... मी आहे तुझ्यासोबत..." - कुसुम.


"हो... आतू चल येते मी..." - राधिका.


"हो बाळा काळजी घे..." - कुसुम.


"राधी, झालं गेलं मागचं विसरून जा पोरी... पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिक... कोणी कोणासाठी थांबत नसतं गं... आपण फक्त मागे वळुन न बघता पुढे पूढे चालायचं असतं... हेच आयुष्य असतं पोरी..." - सावित्रीमाय...


"हो माय, बरोबर बोललीस तू... राधी स्वतःला जास्त त्रास करून नको घेत जाऊस..." - राधिकाची आई...


"नका काळजी करू माझी... मी एकदम ठिक आहे... येते मी..." - राधिका...


राधिकाने सगळ्यांचा निरोप घेतला. कुसुमने भीम्याला राधिकाला शाळेत सोडायला सांगितलं...


"खरंच माझ्या पोरीचं नशीब कसं कोण जाणे...? कोणाचं काय वाईट केलं होतं तर हे दिवस बघायला भेटले..." राधिकाची आई....


"सरू, काही वाईट होणार नाही आपल्या राधीचं... सगळं काही ठिक होईल बघ तू..." - राधिकाचे बाबा...


"हो नाम्या, आता ते सगळं चांगलं आपल्यालाच करायचं आहे... आता हिंमत हारून चालणार नाही..." - कूसुम...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


अजयपण शाळेत जाण्याची तयारी करत होता पण अजयची आई मात्र नाराज झाली होती... ती काहीही न बोलता गप्प गप्पच सगळी कामं करत होती... अजयच्या ते लक्षात आलं... अजयने आईचे दोन्ही हात पकडले आणि तिला खुर्चीवर बसवलं...


"आई मला माहिती आहे, आत्ता यावेळी तुझ्या मनात काय चाललंय ते... तूला असं वाटते ना की आम्ही एकाच ठिकाणी काम करतो तर मी राधिकासोबत बोलत जाईन, तीच्या आणखी प्रेमात पडेन असं..." - अजय.


"हो अजय, मला असंच वाटतं आणि ते परत नकोय मला... तू आपल्या गावच्या शाळेतच तूझी ट्रान्सफर करून घे ना... मग पुढे काही प्रॉब्लेमच होणार नाही..." - अजयची आई.


"हो आई, तूझी इच्छा असेल तर तुझ्यासाठी ते पण करून घेईन मी बस्स.... पण आई थोडा विश्वास ठेव माझ्यावर तू... तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन मी... पण राधिकाला एवढ्या सहजासहजी पटकन विसरायला सांगशील तर ते नाही जमणार मला... आई थोडा वेळ दे मला प्लीज... देशील ना आई..?" - अजय.


"हो बाळा, नक्कीच आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर..." - अजयची आई...


"बरं आई, येतो मी चल... काळजी घे आणि जास्त विचार नको करत बसू..." - अजय... आणि अजय शाळेत निघून गेला...


राधिकाची गाडी शाळेच्या गेटजवळ येऊन उभी राहिली... अजय आणि अर्चना पण त्याचवेळी तिथे येऊन पोहोचले... भीम्या आणि राधिका दोघेही गाडीतून उतरले...


"अजयराव, तब्येत कशी आहे तुमची आता...?" - भीम्या.


"मी एकदम टकाटक..." अजय हसतच म्हणाला...


"बरं वाटलं बघा... तुम्हाला असं खूश बघून.. असेच कायम खूश रहा... चला मी निघतो आता... काळजी घ्या... राधीताई, काळजी घ्या बरं... दुपारून येतो मी तुम्हाला घ्यायला..." - भीम्या...


"नाही भीम्या दादा, तू नको येऊस दुपारी... मी येईन बसने घरी..." - राधिका...


"नाही राधी ताई, येतो मी दुपारी... नाही आलो तर कुसूम मावशी ओरडतील मला..." - आणि भीम्या निघून गेला.


तिघेही स्टाफरूममध्ये आले... सगळे शिक्षक अजयच्या तब्येतीची विचारपूस करू लागले... राधिका आणि अजयला दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळ मिळाला नाही... अजय, अर्चना, राधिका तिघेही शाळेच्या बागेत बाकावर बसले होते...


"अजय, आईबाबा कसे आहेत...?" - राधिका...


"हो सगळे बरे आहेत आणि तू कशी आहेस ते सांग मला आधी..." - अजय...


"मला काय झालंय मी एकदम ठीक आहे... तूला आता बरं वाटतेय ना अजय की काही त्रास होतोय अजून... जखम भरली ना तूझी..." - राधिका...


"हो शरिराची जखम तर भरली पण आता आपलीच माणसं माझ्या मनावर घाव घालत आहेत त्याचं काय करू मी...? मनावरचे घाव कसे भरून काढू...? - अजय...


राधिकाने अजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला धीर देत म्हणाली...


"अजय, शांत हो... सांभाळ स्वतःला..." - राधिका.


"राधिका, साॅरी, त्यादिवशी आई जे काही बोलली त्याबद्दल मी माफी मागतो तूझी..." - अजय.


"तू कशाला साॅरी बोलतोस? खरं तर आईंचं काहीच चुकलं नाही... त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटणारच... त्यांच्या जागी ते अगदी बरोबरच आहेत..." - राधिका.


"थँक्स राधिका, आईला समजून घेतल्याबद्दल... पण एक सांगू तूला... राधिका जर तूझी साथ असेल ना मला तर मी दूनियेत कोणाशीही लढायला तयार आहे... गोविंदशी सुद्धा... बोल आहेस का तयार तू...? साथ देशील का मला...?" - अजय...


"खरं तर माझी कायमच साथ असेल तुला पण अजय, माझ्या स्वार्थासाठी मी तुझा जीव परत एकदा धोक्यात घालू शकत नाही... आताच तू एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलास आणि परत तूझ्यावर माझ्यामुळे काहीच संकट यायला नको असं वाटतं मला... अजय आईंचं ऐक तू... मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं..." - राधिका...


"राधिका, तू तूझा निर्णय घेतलास... आईने तिचा निर्णय घेतला... पण यार माझं मत काय आहे, ते तरी जाणून घ्या तुम्ही एकदा... माझ्या पण मनाचा एकदा विचार करा ना यार तुम्ही... मला काय हवंय ह्या गोष्टीचं कोणालाच काहीच पडलेलं नाही... अर्चू... यार तू तरी समजाव हिला... कोणीच समजून घेत नाहीत यार मला... " अजय वैतागून म्हणाला..


"अजय तसं नाहीये... तूझ्या चांगल्यासाठीच बोलतोय आम्ही... तूझी काळजी वाटते खूप..." राधिका...


"राधिका, मला माहीती आहे, तुम्हा सगळ्यांना माझी खूप काळजी आहे... पण माझं चांगलं कशात, वाईट कशात... हे सगळं कळतंय गं मला... फक्त तुम्हीच त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात... आणि आज जी परिस्थिती आहे ती अशीच कायम राहणार आहे का? यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल विश्वास ठेवा माझ्यावर..." - अजय.


" हो अजय, यातून मार्ग नक्कीच निघेल... पण प्लीजऽऽ तू या सर्व गोष्टींपासून लांबच रहावं असं वाटते मला..." राधिका...


"म्हणजे तू मनाशी पक्कं ठरवलंय कि तूला मी तुझ्या आयुष्यात नकोय...? बरं ठिक आहे... नको तर नको... जशी तुझी इच्छा... पण एक सांगतो तूला... जर त्या गोविंदने तूझ्या केसाला जरी धक्का लावला ना तर त्याला मी सोडणार नाही... मग आमच्या दोघांमध्ये कोणीच पडायचं नाही... लक्षात ठेव तू..." अजय रागातच बोलून निघून गेला... राधिका आणि अर्चना त्याला बघतच राहिले... दोघींना पण त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं... दोघींचेही डोळे पाणावले...


"अर्चू, मी काय करू गं? मला तर काहीच कळत नाही... खूप काळजी वाटतेय गं अजयची आणि जर माझ्यामुळे अजयला काही झालं तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही..." - राधिका रडतच म्हणाली. अर्चनाने तिच्या खांद्यावर हात ठेवला...


"राधिका, रडू नकोस प्लीज... खरं तर परिस्थिती अशी आहे ना की आता याक्षणी मी पण तुमच्या दोघांसाठी काहीच करू शकत नाही... साॅरी राधिका..." - अर्चना...


"अगं तू कशाला साॅरी बोलतेस? तूझी अवस्था कळतेय मला... पण अर्चू, तूला एक विचारू का गं...? - राधिका...


"हो विचार ना..." - अर्चना...


"अजयचा स्वभाव नक्की कसा आहे गं ? मला अजूनही कळालेलं नाही... कारण जेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा तो मला नेहमीच हसरा, अवखळ, समजूतदार, शांत असा अजय दिसला... पण या काही दिवसांत मी त्याला पाहीलं, खूप वेगळा वाटला मला अजय... अगदी त्याच्या स्वभावाच्या विरूद्ध वाटला मला तो... कधी कधी वाटतं कि ज्या अजयवर मी प्रेम केलं तो अजय हा नाहीच आहे... खूप बदललाय गं अजय आता..." - राधिका...


"हो खरंय तुझं, अजय बदललाय, पण आता नाही... काही वर्षांपूर्वीच तो बदललाय...." - अर्चना...


"म्हणजे...?" - राधिका...


"राधिका, जो तू आताचा अजय बघते ना, तोच खरा अजय आहे... हा समजूतदार, अवखळ, हसरा आणि शांतपण आहे तो पण जर काही त्याच्यासमोर चुकीचं घडत असेल तर त्याला शांत राहायला जमतच नाही... मग तो समोरचा व्यक्ती कोणीही असू दे... त्यांत कोणत्याही परिणामांची चिंता न करता स्वतःवरच संकटं ओढवून घेत बसतो... आणि त्याचा हाच स्वभाव त्याच्यासाठी आणि घरच्यांसाठी त्रासदायक ठरत आला.. अजून काही विपरीत घडू नये किंवा अजयला काही होऊ नये म्हणून आम्हा सगळ्यांनाच त्याची खूप काळजी वाटत असते... खरं तर मावशीने या सगळ्या गोष्टींच्या भीतीनेच तुमच्या लग्नाला नकार दिला..." - अर्चना...


" अजून काही विपरीत घडू नये म्हणजे मला समजलं नाही... आधी काही घडलं होतं का अजयसोबत...?" - राधिका.


"हो राधिका, खूप काही घडून गेलंय माझ्या आणि अजयच्या आयुष्यात... खरं तर ते सगळं आठवलं तरी आतापण माझ्या अंगावर काटा उभा राहतो... सगळं, सगळं या माझ्या डोळ्यांसमोर घडलंय... बोलायला मला थोडा त्रास होईल पण आज सांगते तूला सगळं..." - अर्चना... राधिका शांतपणे तिचं सगळं ऐकत होती....


"राधिका, सगळ्यांत महत्वाचं म्हणजे माझ्या आणि अजयमध्ये रक्ताचं कोणतंच नातं नाहीये..." - अर्चना.


राधिका तिच्याकडे एकदम आश्चर्यानेच बघू लागली... तिला तर काय बोलावं काही समजतच नव्हतं...


"हे काय बोलत आहेस अर्चू तू...?" - राधिका.


"आश्चर्य वाटलं ना तूला... पण हेच खरं आहे... मी आणि अजय सख्खे बहीण भाऊ नाहीत... पण सख्यापेक्षा पण खूप जवळचं नातं आहे आमचं... मायेचं, प्रेमाचं, आपुलकीचं, माणुसकीचं, मैत्रीचं ही सगळीच नाती आहेत आमच्यांत... पण एवढंच आमचं रक्ताचं नातं नाही..." - अर्चना...


"अर्चू, मला तर काहीच कळत नाही तू काय बोलत आहेस...? तू अजयच्या मावशीची मुलगी म्हणजे बहीणच झालीस ना..." - राधिका...


"नाही राधिका, मी अजयच्या मावशीची मुलगी पण नाही... आमच्यांत कोणतंच असं नातं नाही... पण त्यावेळी परिस्थितीच एवढी वाईट निर्माण झाली होती की अजयच्या घरच्यांनी आम्हाला सावरलं, साथ दिली... आणि आम्हाला त्यांच्या नात्यांत बांधून घेतलं... पण जे काही वाईट घडलं होतं त्या घटनेचा सगळा आरोप एकट्या अजयवर लावला गेला...." - अर्चू डोळे पुसतच म्हणाली...


"अर्चू मला सगळं सांगशील का नक्की काय झालं होतं ते...?" - राधिका....


"हो सगळं सांगते तूला... ऐक..." - अर्चू.


क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात अर्चना राधिकाला काय सांगते... त्यांच्या आयुष्यात नक्की काय घडून गेलंय हे कळेल पुढच्या भागात...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३७


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀