Gunjan - 18 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग १८

भाग १८.

काल रात्रभर गुंजन मंगळसूत्र ओवत बसली होती. त्या नादातच ती मध्यरात्री कधीतरी झोपून गेली. सूर्याची कोवळी किरणे तिच्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून तिची रूम प्रकाशमय करतात. तसं त्या प्रकाशाने तिला जाग येते. गुंजन डोळे किलकिले करत आळस देते आणि भानावर येत आपल्या हातातील मंगळसूत्र पाहून भलतीच आनंदी होते. कारण ते मंगळलसूत्र तिने पूर्णपणे ओवून पुन्हा आधीसारखे केले होते. जणू काहीतरी मोठं अस तिने केले? अस तिला वाटत होतं. ती पटकन त्या मंगळसूत्रावर स्वतःचे ओठ टेकवते आणि तसच ते स्वतःच्या गळ्यात घालते.


"माझं मंगळसूत्र बनल. बर झाल!! मी काल रात्री किती घाबरली होती त्यात वेद पण कॉल उचलत नव्हते. कदाचित बिझी असतील. म्हणून नाही उचलला असणार.",गुंजन स्वतःशीच बडबडते. ती बडबडत असते की, त्यावेळात तिचा मोबाईल वाजतो. तशी ती पटकन आनंदात मोबाईल हातात घेते. कारण त्यावर वेदच नाव आलं होतं. ते नाव पाहूनच ती आनंदी झाली होती.


"अहो, काल रात्री मी कॉल केले तुम्हाला आणि तुम्ही का नाही उचले बर?",गुंजन तक्रारीच्या सुरात म्हणाली.


"गुंजन, मिस मी?",वेद त्याच्या नेहमीच्या टोन मध्ये हसून विचारतो.


"तुम्हाला माहीत आहे ते. मग का विचारतात बर तुम्ही मला? असा एक पण दिवस जात नाही माझा तुमची आठवण न आल्याशिवाय!! नवरा बायको या नात्याने नाही. आपल्या हृदयाशी जुळलेल्या नात्याने आपण एकमेकांशी जोडले गेले आहोत. त्यामुळे वेगळं फिल होत वेद तुमच्या बद्दल. तुमचा आवाज ऐकून मला बर वाटल. नाहीतर कालपासून मन अस्वस्थ झाले होते. काहीतरी विचित्र घडलं अस वाटत होतं.",गुंजन हळू आवाजात म्हणाली. पण तिचं अस बोलणं ऐकून वेद काहीवेळ शांत राहतो!! कारण ज्या गुंजनला तो आधी आवडत नव्हता. त्या गुंजनसोबत त्याच आता अस नात झालं होतं की, त्याला जरा जरी काही झालं की ती मनातून चलबिचल होत होती. अजूनही तिला ते कळत नसल्याने, तो सुटकेचा श्वास घेतो.


"गुंजन, कधीकधी तू जास्त विचार करतेस ना? त्यामुळे होत हे सगळं. म्हणून तू विचार कमी कर बघू!!सध्या फोकस स्पर्धेकडे ठेव. माझ्याकडे नंतर बघितले तरीही चालेल. कारण मी तुझाच आहे.",वेद भानावर येत म्हणाला.



"हम्मम. असच असेल बहुतेक. बाकी तुम्ही माझे शो पाहतात ना?मला ना आधी भीती वाटत असायची अस स्टेज वर जाऊन नाचायला. पण आता नाही वाटत.",गुंजन आनंदातच स्वतःच कौतुक करत म्हणाली. तिचं अस बोलणं ऐकून तो गालात हसतो. आधी तर त्याच्यासोबत एका शब्दाने बोलायला तयार नसायची. पण आता दिवस रात्र त्याच्यासोबत बोलत राहावं, असेच तिला वाटत असायचे. वेद अगदी शांतपणे, हसुन गुंजनसोबत काहीवेळ बोलत राहतो. बोलणं होताच तो एक मोठा श्वास घेऊन सोडतो आणि स्वतःला शांत करतो.


आज पहिल्यांदा लग्न झाल्यावर त्याला गुंजनसोबत खोटं बोलावे लागले. याचे गिल्ट वाटत होतं. पण सध्या तो मजबूर होता. कारण गुंजनला जर सत्य कळलं तर ती ही स्पर्धा आणि दिल्ली सोडून पुन्हा त्याच्याकडे येईल. पुन्हा आयुष्यात ती कुठेच स्वतःला प्रूफ करायला, अशी बाहेर जाणार नाही!! या सगळ्याचा सारासार विचार करूनच तो जाणून बुजून तिच्याशी खोटं बोलतो. त्याला गुंजनचा स्वाभिमान, ओळख सगळं काही महत्त्वाचे होते. तिच्यासाठी तो काहीही तयार करायला तयार असायचा!! हे तर काहीच नव्हतं.


इकडे वेदला चांगलं पाहून गुंजन आपल्या विश्वात रमून जाते. रोज तिथे असलेल्या स्पर्धकासोबत ती डान्स करत असायची आणि त्यांच्याकडून देखील स्वतःच्या कलेत थोडेफार सजेशन घेऊन बदल करत असायची. पण यात पार्थ मात्र नसायचा. तो तर प्रत्येक स्पर्धकाला कसे या स्पर्धेतून बाहेर काढायचे? याचे विचार करत असायचा.



"अब सिर्फ इस गुंजन का पता कट कर दिया की मैं ही बन जाऊंगा यहाँ का फायनेलिस्ट। ये लोग भि ना अपने सुन्दर चेहरे से जजेस को इम्प्रेस कर लेते हैं। अब इसको दिखाता हूं। ये पार्थ क्या चीज हैं।",पार्थ समोर स्टेजवर डान्स प्रॅक्टिस करणाऱ्या गुंजनकडे पाहत मनातच गुढपणे हसत म्हणाला. सध्या स्पर्धेत गुंजन आपल्यात असलेल्या कलांनी जजेसवर च नाही तर भारतातील बऱ्याच लोकांवर इम्प्रेशन पाडत असायची. ती स्टेजवर आली रे आली की, बऱ्याच घरातील लोक जिथे कुठे पण असतील घरात तिथून काम सोडून टिव्हीसमोर येऊन बसत असायचे. फक्त तिची झलक आणि नृत्य पाहण्यासाठी!!एवढी ती फेमस झाली होती. महाराष्ट्राची मराठी कन्या आहे म्हणून प्रत्येक घरातील मराठी माणूस आवर्जून तिला पाहत असायचा. काही तिला अस केलं असत? तस केलं असत? अस टीव्हीसमोर बसून म्हणत असायचे. नंतर मग स्वतःच तिला वोटिंग करायला लागत असायचे. एवढी तिची क्रेझ वाढली होती. वेद देखील तिचं अस यश पाहून आनंदी राहत होता. त्याच्यात देखील हळूहळू सुधारणा होत होती.



"अब दिल थाम के बैठीये दोस्तों। लाखो दिलो की धडकन , महाराष्ट्र की कन्या जिसका इंतजार सब लोग करते हैं ऐसी गुंजन वेद जाधव कुछ देर में ही आपके सामने आने वाली हैं। आज इस काँटेस्ट के सेमी फायनेलिस्ट चुने जाने वाले हैं। तो आपकी हफ्ते की वोटिंग और जजेस के मार्क्स से हमारे दस फायनेलिस्ट सेमी फिनाले में जाने वाले हैं।",एक अँकर महिला आपल्या अदानी लोकांवर भुरळ पाडत गोड आवाजातच बोलते. तिचं अस बोलणं ऐकून स्टेज खाली बसलेले लोक शिट्या आणि टाळ्या वाजवतात. कारण त्यांची आवडती गुंजन जी त्यांच्या समोर येणार होती. म्हणून ते आनंदी होऊन अस करत असतात.



"आज मी वेदसाठी इथं आली होती. मी एकेकाळी पाहिलेल स्वप्न अस पूर्ण होईल मला वाटलं नव्हतं. पण त्यांनी स्वतःच्या स्वभावाने हे सगळं माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. त्यामुळे तुम्हालाच सगळं श्रेय जात वेद. आता सेमी फिनाले आणि ग्रँड फिनाले बाकी आहे. मग आपण पुन्हा एकत्र राहू!!तुमची मेहनत मी नाही अशी वेस्ट घालवणार",गुंजन आरश्यासमोर चेअरवर बसून तयार होत स्वतःला पाहत मनातच म्हणाली. एक वेगळाच कॉन्फिडन्स तिच्या चेहऱ्यावर आता आला होता. कुठेतरी लोकांना घाबरणारी गुंजन मागे पडली होती. आता ती शांत होती. पण कॉन्फिडन्स वाली झाली होती. या काही महिन्यांत तिने स्वतः मध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. सगळ्या प्रकारच्या मुलांमुलींसोबत ती बिनधास्त बोलत असायची. राहणीमान देखील थोडफार तिचं बदलले होते. पण स्वभाव मात्र तसाच होता!!



"मॅडम, आपको बुला रहे हैं। चलो जल्दी।",एक कानात हेडफोन घालून आलेली मुलगी गुंजनच्या रूममध्ये येत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून गुंजन मागे वळते.



"येस आ रही हुं मैं। ",गुंजन आपल्या गोड अश्या आवाजात हसूनच म्हणाली. तशी ती मुलगी तिला पाहून गालात हसते. तशी गुंजन स्वतःला सावरत उठून उभी राहते आणि त्या मुलीसोबत जायला लागते. काहीवेळातच गुंजन स्टेजकडे पोहचते. तसे, तिथे असलेले सगळेजण तिला बेस्ट ऑफ लक करतात. गुंजन सगळयांना धन्यवाद बोलून स्टेजवर उभी राहते. त्यावेळेस स्टेजचा पडदा पाडला जातो. म्हणून गुंजन आलेली लोकांना दिसत नाही. स्टेजवरच्या सर्व लाईट्स बंद करतात फक्त एक फोकस लाईट तिथं चालू असतो. तशी गुंजन आपली पोझ घेऊन उभी राहते.


काहीवेळातच अँकर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करते तिची. तसे स्टेजखाली असलेल्या लोकांचा आवाज कमी होतो आणि त्यांच्या नजरा आपोआप स्टेजवर जातात. काही क्षणातच पडदा वर जातो आणि गाणं चालू होतं मागे. तशी गुंजन आपला ताल धरून सुरवात करत असते की, अचानक गाणं बदलत. तसे सर्वजण गोंधळतात.



"ये कौनसा गाना लगा हैं? मॅडम का तो ये नहीं था?",एक व्यक्ती साँग्स,लाईट कॉम्प्युटर हँडल करणाऱ्या डिपार्टमेंट टीमकडे येत म्हणाला.



"शर्मा सर, हमे भि कुछ पता नहीं चल रहा हैं। ऐसे कैसे हो रहा हैं। ओ रे पिया साँग मिल ही नहीं रहा। ",एक टीम मेम्बर स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसतच चेक करत म्हणाला. पण इकडे स्टेज खालचे लोक मात्र गोंधळ घालायला लागतात. हे, पाहून सगळे तिथं असलेले लोक घाबरतात. पण त्याचं क्षणी गुंजन मात्र चालू असणाऱ्या गाण्यावर ठेका घेऊन नृत्य करायला लागते. ती आपले बांधलेले केस मोकळे सोडते. तिच्या बाजूला डान्स करणारे मुली देखील तसच करतात. इकडे वेद देखील आपल्या रूममध्ये बसून गुंजनला पाहायला लागतो.

गुंजन आपली पोझ बदलून त्या गाण्याला मॅच होण्यासाठी ऑन द स्पॉट स्टेप बदलते आणि त्या गाण्याला मॅच करायला लागते.

या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता
या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता

आज से अब से
आन मेरी मैं तुमको ना छूने दूँगी
जान को चाहे छलनी कर दो
मान को ना छूने दूंगी

गुंजन या गाण्यातील कडव्याला आपले ओठ हलवत डोळ्यात राग ठेवतच आपल्या गळ्यातील ओढणीला उडवतच आपले हात छातीकडे धरत रागातच पाहून म्हणते. तिने अस गाण्याला मॅच केल्याने इकडे मागे पांढऱ्या पडद्यावर थीम टाकणारी टीम देखील वेगवेगळ्या अवतारात रेप वर आधारित असलेल्या बातम्यांचे फोटो मागे झळकवत असतात.

आज से अब से
आन मेरी मैं तुमको ना छूने दूँगी
जान को चाहे छलनी कर दो
मान को ना छूने दूंगी

छु के देखो दिल मेरा
तुम्हें दिल में अपने भर लुंगी
पर छेड़ के देखो तुम मुझको
मैं तुमको नहीं छोड़ूंगी
मैं तुमको नहीं छोड़ूंगी
या येह मैं तुमको नहीं छोड़ूंगी


गुंजन डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक्सप्रेशन ठेवतच मध्येच देवीचे रूप घेऊन बोलत असते. यावेळी स्क्रीनवर एक लहान मुलगी किती रूप घरात बाहेर निभावत असते. ते सगळं काही फोटो द्वारे दाखवले जाते. गुंजन आपलं कथकदेखील या गाण्यात मिक्स करून एकदम भारी भारी अश्या कठीण स्टेप्स देऊन सगळयांवर इम्प्रेशन पाडायला लागते.

या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता
या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता
तुमको नहीं छोड़ूंगी.. ए..

स्कर्टें सारी रात दोपहरी
डर डर के नहीं चलूंगी
कैंडल जला के सेंडल दिखा के
मर-मर के नहीं चलूंगी

यावेळी तिच्या हातात कँडल एक माणूस आणून देतो. तशी ती कँडल हातात धरून तिच्या समोर असलेल्या तीन ते चार माणसांवर टाकते. तशी कॉम्प्युटर द्वारे तिथे आग निर्माण होते. जणू ती लोक जळत आहे ? अस लोकांना वाटत एकक्षण!! पुन्हा ती आपल्या जागी फिरून येऊन पुन्हा पोझ घेते.

जिस दुनिया में माँ बहने
रिश्ते नहीं हैं गाली हैं
उस दुनिया से मर्यादा के
रिश्ते सारे तोड़ूँगी
कदम मिलाके देखो तो
मैं साथ में तेरे चल दूंगी
पर छेड़ के देखो तुम मुझको
मैं तुमको नहीं छोड़ूंगी
हे मैं तुमको नहीं छोड़ूंगी

गुंजन सगळ्या स्टेजवर असलेल्या मुलींकडे पाहतच त्यांचा हात हातात घेत म्हणते आणि तशीच पुढे जाऊन एक गोल फिरून समोर उभी राहते. ती जीभ बाहेर काढून हातात त्रिशुळ धरल्याची ऍक्टिंग करते. तिच्या मागे त्या सर्व मुली उभ्या राहतात हवेत दोन्ही हात वर करून. यावेळी स्टेजच्या खाली बसलेले लोक उभे राहतात आणि समोरचा नजारा पाहून आपले हात जोडतात. वेद देखील टीव्हीसमोर उभा राहून आपले हात नकळतपणे जोडतो. कारण गुंजन सर्वांना एखाद्या दुर्गेसारखी नरसंहार करणारी अशी वाटत होती. मागे स्क्रीनवर तसाच नजारा चालू होतो.



या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता
या देवी सर्वभूतेषू शांति रूपेण संस्थिता
तुमको नहीं छोड़ूंगी..

हे कडवे संपताच दोन ते तीन मोठे ब्लास्ट अचानक स्टेजवर फुटतात आणि त्यातून पडणारे छोटे छोटे रिबन, चमकी, गुलाल गुंजन आणि इतरांच्या अंगावर पडतो. पूर्ण स्टेज त्या सगळ्याने माखून जात. खालून पब्लिक देखील "वन्स मोर, वन्स मोर" अस करत असते. ते पाहून जजेस देखील आनंदातच उठून उभे राहून गुंजनला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन टाकतात. पण इकडे एक व्यक्ती मात्र ते सगळं पाहून तिथून रागातच धुसफुसत निघून जाते.




क्रमशः
--------------------------