Gunjan - 35 - last part books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग ३५ (अंतिम)

भाग ३५. (अंतिम)

मायराला चार दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. आता तिचे बाळ आणि ती सुखरूप आहे कळल्याने वेदला, गुंजनला आनंद होतो. ते बाळाचा बारसा भारतातच करायचा अशी गोड गोड धमकी देतात. एवढ सगळं मायराने करून देखील गुंजन आणि वेद तिच्याशी फोनवर अस बोलत होते की, जणू तिने काही केलच नाही!! तिला तर त्यांचा हा चांगुलपणा पाहून खूप वाईट वाटायचं. पण जेव्हा जेव्हा ती दुःखी व्हायची तेव्हा अनय आणि तिची आई तिला समजावत असायची. मग ती पुन्हा स्वतः ला सावरत असायची. त्या छोट्याश्या बाळाला दहाव्या दिवशी मायरा आणि अनय आईसोबत भारतात घेऊन जायला लागतात. डॉक्टरांना विचारून ते प्रवास करायला लागतात. जेव्हा ही बातमी गुंजनला कळते? तेव्हा ती खूप आनंदी होते.




"कस असेल बाळ ते? माझ्याकडे येईल ना? वेद आपण मस्त तयार करू घर. बाळाचे स्वागत एकदम चांगल्या पद्धतीने करू हा. आपल पिल्लू येत आहे घरात", गुंजन आनंदी होऊन म्हणाली. तिला मनात तर खूप काहाई तयारी बाळासाठी करायची होती. पण सध्या ती प्रेग्नेंट असल्याने, तिला काही ते जमत नव्हते. नाहीतर एवढ्यात पूर्ण घराचा कायापालटच तिने करून टाकला असता.


"गुंजन, तू अशी फिरून काही होणार आहे का? गप्प बस एका जागी!! बघ तिकडे ती लोक छान प्रकारे तयारी करत आहे. काही खाल्ले की नाही तू? का आणू खायला?",वेद तिला एका जागी बसवत म्हणाला.



"मला सध्या काही नको खायला. तुम्ही बाळासाठी खेळणी आणि पाळणा घेऊन या. सोबतच कपडे पण आणा!!ते आता इथेच राहतील ना?", गुंजन एकामागून एक आठवत म्हणाली. सध्या प्रेग्नेंट असल्याने काही काम करायला तिला भेटत नव्हते. त्यामुळे बडबडून त्याचं डोकं खाणे चालू होते.


"नाही. अनय स्वाभिमानी मुलगा आहे. त्याने मायरा सोबत जेव्हा लग्न केले, त्याच्या काही दिवसाने एक छोटासा बंगला विरारला घेतला. जबाबदारी समजून त्याने अस केलं. आधी त्याच्याकडे फ्लॅट होता. त्यावेळी तो एकटा होता. पण आता मायरा आणि पिल्लू असल्याने त्याने त्यांच्या फ्युचरची तयारी केली. ते तिथं राहतील. त्याला तर तिथं आपल्या बाळाचे स्वागत करायचे आहे. तर आपण...", वेद काही बोलणार त्या आधीच गुंजन बोलते.




"तर आपण त्या ठिकाणी स्वागत करू त्यांचे!! मायरा आणि पिल्लूला सरप्राइज पण मिळेल. चला आपण तिकडे जाऊ. अनय भैय्याला तिकडेच आणायला सांगा सगळ्यांना.", गुंजन अस बोलून स्वतः ला सांभाळत रुमच्या दिशेला निघून जाते. तसा वेद स्वतःशी हसतो. काहीवेळातच आपली साईड पर्स एका बाजूला लावून ओढणी सरळ करून वेद समोर उभी राहते.


"हात द्या आणि सांभाळून घेऊन चला!!", गुंजन अस बोलून त्याचा हात हातात धरते. तो हसूनच तिचा हात घट्ट पकडतो आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला जवळ घेतो.



"चला मॅडम.", वेद अस बोलून तिला सावकाश घेऊन जायला लागतो. तो तिथे काम करणाऱ्या लोकांना देखील दुसऱ्या गाडीने अनयच्या बंगल्याकडे पोहचायला लावतो. वेद गुंजनला गाडीत हळू बसवून स्वतः दुसऱ्या बाजूला येऊन बसतो. तो गाडी स्टार्ट करून तिला तिथून घेऊन जातो. अगदी सावकाश स्पीडचे भान ठेवून वेद गाडी चालवत असतो. गुंजन प्रेग्नेंट होती आणि तिला त्रास होऊ नये. या काळजीने तो तस करतो.



शेवटी, काही तासाने ते अनयच्या बंगल्याकडे पोहचतात. तिथं आल्यावर वेद त्याच्या जवळ असलेल्या चावीने बंगल्याचा दरवाजा उघडतो आणि गुंजनला आतमध्ये घेऊन जातो. ते पोहचल्यावर तिथे त्यांचे घरातील सर्वेंट लोकदेखील येतात. ती लोक बंगल्याची चांगली साफसफाई करून तो बंगला सजवायला घेतात. वेदच्या बंगल्यापेक्षा छोटा होता. पण छान असा सुंदर होता.



"आपण इथे का आलो आहोत?", मायरा बंगल्याकडे पाहून बाहेर उतरत म्हणाली. आताच ते प्रवास करून बाळाला घेऊन त्यांच्या बंगल्याजवळ आले होते. ते पोहचल्या पोहचल्या ती त्याला बाहेर येऊन प्रश्न विचारते. तसा अनय पिल्लूला घेऊन बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग आई देखील बाहेर येते.



"मायरा आपला बंगला आहे हा", अनय हसूनच म्हणाला. त्याच्या तोंडून ते ऐकून ती त्याला आणि बंगल्याला पाहायला लागते.


"व्हॉट? आपला बंगला? घेतला कधी तुम्ही?म्हणजे तुमच्याजवळ तर फ्लॅट होता ना? हे मला माहिती होते म्हणून विचारलं?", मायरा हळू आवाजात म्हणाली. सध्या त्याची परिस्थिती तिच्या भावासारखी नव्हती. तो फक्त त्याच्यासोबत काम करायचा. हे तिला माहीत होत. त्यामुळे तिने कधीच त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवली नव्हती. उलट एवढ सगळ तिच्यासोबत घडून त्याने तिला स्वीकार केले? यातच ती समाधान मानत असायची. त्यामुळे त्याला वाईट वाटू नये. यासाठी ती हळू आवाजात विचारते.




"मायरा तू आणि पिल्लू आयुष्यात आले तेव्हा जबाबदारी कळली. त्यानंतर हे घर घेतलं. आता हे मी माझ्या स्व: कमाईने घेतले आहे. त्यामुळे मला काही बोलू नको. आता चल बघू आपल्या पिल्लूला हातात घेऊन बंगल्याच्या दिशेने", अनय अस बोलून तिच्या हातात बाळ देतो. तशी ती बाळाला व्यवस्थित हातात घेऊन अनयच्या साथीने बंगल्याच्या दिशेला चालायला लागते. आई फक्त आनंदात त्यांना पाहत असतात. कारण आज त्यांची मुलगी जास्त अपेक्षा एकेकाळी ठेवणारी आज मात्र अपेक्षा मारून आयुष्य सुखात काढण्याचा प्रयत्न करत होती. अनय मात्र ती न मागता तिच्या अपेक्षा पूर्ण करत होता. हे सगळ काही पाहून त्या भारावून जातात. अनय मायराला पकडुन हळू हळू चालायला लागतो. तसे त्यांच्या वरतून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला लागतो. ते वर पाहतात तर एक ड्रोन ते करत असत. तशी मायरा आपल्या साडीच्या पदराने आपल्या पिल्लूला कवर करते.
थोड पुढे बंगल्यात येताच त्यांना झेंडूच्या पाकळ्या जमिनीवर टाकलेल्या दिसतात. त्यांचा एक रस्ताच तयार केलेला असतो. ते सगळ पाहून मायरा आणि अनय आनंदी होतात. पुढे भिंतीवर वेलकम बेबी बॉय अस लिहलेले असते. त्याच्या बाजूला भरपूर सारे बलून लावलेले असतात. ते सगळ पाहून मायरा आनंदी होते. समोरच एका ठिकाणी तिला गुंजन आणि वेद उभे असेलेले दिसतात. तशी मायरा आपल्या पिल्लूला अनय कडे देऊन पळतच जाऊन वेदला मिठी मारते. वेद देखील आनंदाने तिला मिठीत घेतो.



"भाई, आय एम सॉरी. तू मला हव तर मार. ओरड पण एवढं चांगल वागून मला अस कमजोर पडू देऊ नको. तुमच्या सगळ्यांचा चांगुलपणा पाहून मलाच कसतरी होत असते.", मायरा रडतच म्हणाली.



"चांगुलपणा वाईटाचा नाश करतो. तू त्या वाईट विचाराने खराब झाली होती. यात तुझी चुकी नाही. आपण जिथे वाढतो, तेथील वातावरण आणि माणसांवर सगळे अवलंबून असते. पण जर आपण त्याही परिस्थिती आपल्या मनाला सांभाळले तर वाईट आपल्या हातून घडत नाही मायरा. आज तू सुधारली आणि तुला त्या चुकीच पश्चाताप होत आहे यातच सगळ आले. आता सगळ विसरून अनयला जपून तुझ्या बाळाला घडव. संसार सुखाने कर. मग मी आनंदी होईल.", वेद तिला जवळ घेत तिचे डोळे पुसत म्हणाला. लहानपणापासूनच तो तिला समजावत असायचा. पण तिचे मन चंचल असल्याने, ती त्याकडे दुर्लक्ष करत असायची. आज मात्र, दुर्लक्ष न करता चांगल्याप्रकारे ऐकून घेते.


"वहिनी, तुम्हाला पण सॉरी.", मायरा गुंजनकडे पाहून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून गुंजन हसून तिला एका हाताने जवळ घेते.


"मला सॉरी म्हणायची गरज नाही. पुन्हा असल काही वागायचे नाही. आतापासून आपल बाळ आणि अनय भैय्या कडे लक्ष द्यायचे!!खूप छान दिसतात तुम्ही दोघे एकमेकांसोबत.", गुंजन तिला जवळ घेत समजावत म्हणाली.


"थँक्यू, वहिनी",ती आनंदी होऊन म्हणाली. आता ती फॅमिलीत आल्याने पुन्हा एकदा तिच्या मस्ती मध्ये आली होती. लहान असल्याने सगळे जण तिला हॅप्पी ठेवत असायचे. ती अशीही जरीही असली तरीही काही गोष्टी मध्ये ती खूप विचारी बनली होती.



असेच आनंदी दिवस त्या सर्वांचे जातात. दीड महिन्याने मुहूर्त काढून मायराच्या बाळाचा बारसा पार पडतो. बाळाचे नाव 'मयंक' असे ठेवण्यात येते. गुंजनच ते नाव ठेवते.



काही महिन्यानंतर:



आज वाणी डान्स अकादमीची ग्रँड ओपनिंग सेरेमनी होती. बरेच रिपोर्टर आणि मोठे मोठे लोक त्या सोहळ्याला हजर राहिले होते. वाणी हे नाव कोणाचे होते? हे जाणून घेण्यासाठी रिपोर्टर लोक तिथे आले होते. एकेकाळी असणारे आमदार विखे-पाटील देखील आपल्या कुटुंबियांसमवेत या सोहळ्याला हजर राहतात. सगळे जण ही अकादमी पाहून भलतेच सरप्राइज होतात. कारण खूप मोठा असा हॉल आणि बऱ्याच सेवा उपलब्ध करून देणारा वर्ग इथे कामाला होता. डान्ससाठी काही लोकांना योग्य ती माहिती नसते. त्यामुळे एक स्टाफच इथ या कामासाठी हायर केला होता. स्टाफ आलेल्या लोकांमधील मुलांचे नाव नोंदणीचे काम करत होता. अर्धा स्टाफ या अकादमीच्या चेअरमनची वाट पाहत बाहेर गेटवर थांबला होता.



काही मिनिटांत त्या अकादमीच्या मुख्य दरवाजावर पाच महागड्या ब्ल्यू कार येतात. दोन गाड्यातून बॉडीगार्ड खाली उतरून समोरच्या गाड्यांचे दरवाजे उघडतात. तशी एक बाई रेड रंगाची जॉर्जेटची साडी घालून एका छोट्या बाळाला घेऊन बाहेर पडते. दुसऱ्या बाजूने एक माणूस बाहेर पडतो. त्या दोघांना पाहून विखे-पाटील परिवार गोंधळतो.



"ही अवदसा इथे?",विखे-पाटील रागातच म्हणाले. पण त्यांच बोलणे तिला ऐकू गेले नाही तरीही ती त्या दिशेला पाहते.


"मिसेस गुंजन वेद जाधव वाणी डान्स अकादमीची चेअरमन. वाणी म्हणजे माझी आणि मिस्टर वेद जाधव यांची मुलगी.",ती महिला कॉन्फिडन्सने विखे-पाटील परिवारावर कटाक्ष टाकत म्हणाली. तसे आता ते नजर फिरवतात. ती मात्र हसून त्यांना पाहते. रिपोर्टर तिचे आणि तिच्या परिवाराचे बाईट्स घेतात. वेदची आई, मायरा, मयंक आणि अनय देखील इथे हजर असतात. अकादमीच्या गेटवर एक डोनेट बॉक्स ठेवलेला असतो. त्यावर "डोनेट फॉर ५० रू. हार्ट पेशंट चाईल्ड" अस लिहलेले असत. तसे येणारे जाणारे लोक त्यात स्व खुशीने पैसे टाकत असतात. गुंजन पुढे जाऊन अकादमीच्या एका ठिकाणी बांधलेली रेड रिबन वेदच्या आणि वाणीच्या हाताने कापते. तसे, आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवायला लागतात. या सोहळ्याला तिचे डान्सचे सहकारी आणि दिल्लीतील स्पर्धेतील जजेस लोक देखील येतात. ते तर गुंजनची अकादमी आणि तिचे डोनेशन वाले विचार पाहून तिचं कौतुक करायला लागतात.विखे-पाटील कुटुंब मनात तिथं नसताना देखील थांबून तिला पाहायला लागतात.


आज तिने शेवटी, वेदच्या थोड्याशा मदतीने तिचे डान्स अकादमीचे स्वप्न पूर्ण केले. हेच त्यांना खुपत होते. पण बाकीच्या लोकांना कौतुक वाटत होते. एक मुलगी असून एवढ सगळ तिने केलं होत. डान्ससाठी योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे काहीजणांना त्या इच्छा माराव्या लागत असायच्या. पण आता मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर ते पुढे जातील. गुंजन वाणीला वेदच्या हातात देते आणि तशीच स्टेजकडे जायला लागते. तिथं जाईपर्यंत देखील कितीतरी लोक तिचा ऑटोग्राफ आणि फोटो घेत असतात. ती आताही सगळ्यांना ते हसून देत असते. स्टेजवर पोहचताच ती सरळ कॉन्फिडन्सने उभी राहते. वेद तिला अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक करत असतो. मायरा देखील हसून तिला तसच विश करते. आई डोळ्यांनी तिला बोलायला लावते. तशी गुंजन एक श्वास घेऊन सोडते.


"सर्व प्रथम या सोहळ्याला वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार! वाणी डान्स अकदामी नेमकी कोणाची आहे? हा प्रश्न सतत विचारला जात होता. तर त्याचे उत्तर वाणी डान्स अकादमी गुंजन वेद जाधव यांची आहे. माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील ज्यांना डान्स करायचा आहे. पण पैसे नसून त्यांना त्यांचे स्वप्न मारावे लागत असेल? किंवा फॅमिली प्रेशर. अश्या विविध गोष्टी लक्षात ठेवून ही अकादमी तयार केली आहे. वाणी डान्स अकादमी मध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमचा स्टाफ देईल. ते सुद्धा मोफत!! इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारातील डान्स शिकवले जाईल. ते सुद्धा फ्री!! माझे चोवीस डान्स सहकारी इथे कार्यरत आहेत. ते तुमच्याकडून फी घेणार नाही! पण तुम्हाला डान्सच्या वेळी येताना ५० रुपये आणावे लागतील. ते का? तर ते रुपये डोनेशन बॉक्स जो तिथे गेटवर आणि इकडे आतमध्ये दिसत आहे ना त्या कोणत्याही एकात टाकायचे आहे. कारण या पैशातून हार्ट पेशंट चाईल्डला मदत केली जाईल. या अकादमीचे ध्येय एकच आहे. नवीन डान्सर बनवणे, महिलांना सक्षम करणे. आज मी जशी तुमच्यापुढे उभी आहे ना तसे माझ्या वाणी अकादमीचे मुलं मुली इथे उभे राहून मी डान्सर आहे!!अस म्हणतील तेव्हाच मी माझं सक्सेस मानेन. ही जी माझी मुलगी उद्या कोणीतरी बनून इथ उभी राहिली आणि ते सुद्धा कॉन्फिडन्स मध्ये ना? यात माझं सक्सेस आहे अस मी म्हणेन. डान्स सोबत कॉन्फिडन्स देखील उपयोगाचा आहे. मला वाटत माझी मुलं करतील सगळ ते!!",गुंजन समोर अकादमी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मुलांकडे पाहून म्हणाली. तिचे असे बोलणे ऐकून सगळे टाळ्या वाजवतात आणि तिचे कौतुक करतात.


गुंजन सगळ्यांचे आभार मानून खाली येते आणि आपल्या अकादमी मधील लोकांशी बोलायला लागते. आता मात्र विखे-पाटील परिवार नाक मुरडून तिथून निघून जातो. गुंजनला मात्र त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही. आता तिला एवढा चांगला परिवार मिळाला होता त्यामुळे ती त्यांच्यासोबत हसून बोलायला लागते. तिच्या आई बाबांना ती कळली नव्हती. मात्र, वेदने तिचे अस्तित्व तिला शोधून दिले होते. त्यामुळेच आज ती मोठी डान्सर बनली होती. एवढी मोठी की आज सगळेच तिचं कौतुक करत होते. प्रचंड प्रमाणात कॉन्फिडन्स तिच्यात आला होता!!



थोड्यावेळाने लहान मुलांचे डान्स तिथे पार पडतात. तसे सर्वजण अकादमीचे कौतुक करून जेवण वगैरे करून आपल्या आपल्या घरी जायला निघतात. वेद आणि ती देखील गाडीत बसून घरी जायला निघतात. गुंजन तिच्या मुलीकडे पाहते.



"वाणी, माझं आयुष्य बदलले तू. वेद सगळ्यासाठी थँक्यू. अशीच साथ मला तुमची हवी आहे. आता जबाबदारी वाढली आहे. घेशाल ना मला सांभाळून?",गुंजन तिच्या छोट्या मुलीकडे आणि वेदकडे पाहून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून ती तीन महिन्याची वाणी तिचा हात आपल्या बोटात धरते. वेद देखील हसून गुंजनचा हात धरतो.



"आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. त्यामुळे घाबरु नको. आता मी पण मदत करेन. लव्ह यू गुंजन अँड वाणी",वेद तिचा हात घट्ट धरत म्हणाला.



"लव्ह यू टू बोथ",गुंजन समाधानाने हसून म्हणाली.



आयुष्याचा प्रवास तिच्या संपला नव्हता. आता नवीन जबाबदारी तिच्या अंगावर आली होती. पण आता तिचा कॉन्फिडन्स पाहून वेदला तिच्यावर विश्वास होता. ती हे सगळ पेलावू शकेल याचा. गुंजनने वेदच्या आणि परिवाराच्या साथीने आपले स्वप्न साकार केले होते. अशक्य काहीच नसत या जगात. थोडस मार्गदर्शन योग्य मिळाले की आपली स्वप्न साकार होतात. मग ती लोकांना अशक्य वाटली तरीही!! स्वतः वर जर विश्वास असेल तर ती स्वप्न तुमची सत्यात उतरतात. तशीच गुंजन होती.

_______________समाप्त__________________

या कथेला प्रेम देण्यासाठी सर्व वाचकांचे आभार. आणखीन एक कथा माझी पूर्ण झाली याचा आनंद मला होत आहे. थोडीशी वेगळी होती इतर माझ्या कथेपेक्षा. तरीही तुम्ही प्रेम दिले. यासाठी धन्यवाद!!!
थोडी खुशी थोडी गम. अशी स्थिती आहे माझी.