SAMANDH - RASTYAVARIL BHUT books and stories free download online pdf in Marathi

समंध (रस्त्यावरील भूत )

प्रस्तावना  :

भुताखेतांच्या गोष्टी या लहानपणापासून आपल्या सवयीच्या भाग झाल्या आहेत. भुते ही असतात अथवा नसतात या प्रश्नापलिकडे अनेक रसांपैकी एक जो मनुष्याच्या गरजेचा भयरस आहे त्याचा अनुभव घेण्यास भुतांच्या गोष्टी वाचणे अथवा ऐकणे हा अनेकांच्या आवडीचा विषय झाला आहे.

यामुळेच तर आजही सर्व भाषांमध्ये भुतांवरील चित्रपट, मालिका व पुस्तके प्रकाशित होत आहेत व चालतही

आहेत. लो ककथांमधून भुतांच्या विवीध प्रकारांबद्द्ल आपण ऐकत असतो असेच काही प्रकार आपण या लेखात

जाणुन घेऊ.

1. भूत किंवा पिशाच्च:- साधारण स्थितीताल लोक जसे असतात, त्याप्रमाणे या वर्गातील सर्व साधारण

समाजाला भूत किंवा पिशाच हे नां व आहे. ती शक्तीनें, अधिकाराने व कर्तबगारीने कमी असतात.

ती स्वतंत्र नसतात. त्यांचे पाय उफराटे असतात. ती काही तरी शुष्क पदार्थाची इच्छा पूर्ण करून

घेण्यासाठी माणसां ना पछाडतात, आजारी करतात, व यांना तिखट, शिळी भाकरी, अंडी, इत्यादि पदार्थ

दिले म्हणजे सोडून जातात.

2. समंधः - हे भुतांतील अधिक शक्तिमान वर्गातील असतात. त्यांची स्वरूपें दांडगी, भयंकर व काळी

असतात. ते बहुशः दांडग्या झाडावर, मोठया वाड्यांतील ओसाड भागांत वगैरे असतात, व त्यांची इच्छा

फार मोठी असते. ते पुरलेल्या पैशावर अथवा धनावर सुद्धा राहतात.

3. ब्रह्मसमंधः - हे रात्री दिवसा केव्हां वाटेल तेव्हां अगदी मनुष्यासारखे रूप धरून मोठ्या विस्तीर्ण वाड्यांतील

एखाद्या बाजूच्या भागांत, किंवा पुष्कळ दिवस ओस पडलेल्या वाड्यात, किंवा जुनाट पिंपळाचे पारावर,

अथवा विस्तीर्ण वडावर बसून स्नानसंध्या करतात, व ह्मणणे झणतात. ते फारसे कोणाच्या वाटेस जात

नाहीत.

4. मुंजाः - हा ब्रह्मचारी मुलाच्या स्वरूपाचा लंगोटी धालणारा व सदा पिंपळावर राहणारा भूतवर्गातील आहे.

5. पितरः - ही भुताची लहान व ठेंगणी जात असून ते सदोदित जमावाने फिरत असतात. ते बहुतांशः

आपल्यांतील कोणाच्या तरी हितासाठी थोडासा त्रास देतात, तरी कल्याण ही करतात

6. ईर किंवा वीरः - हीं भुते फार शूर असतात. ती शिपायाच्या वेषानें ढाल तलवार इत्यादी घेऊन फिरतात.

7. धीरः - ही फार शक्तीची भुतें असून या भूतवर्गातील सत्ताधारी अधिकाऱ्यांचे  ते सेवक असतात.

8. बेताळः - हा विरांचा अधिकारी व भुतांवरील सेनापती आहे असे मानतात. याला सर्वांनी रोज हजेरी द्यावी

लागते.

9. हडळः - हा भुतांमधील खतरनाक प्रकार आहे. ही फार दुष्ट असते. ही माणसांना चांगली चांगली रूपे

दाखवून फसविते, व मुलांना पछाडते.

10. येड मकडताई:- हा भूतांतील पुष्कळ मुले असणारा प्रकार आहे. ही बहुशः खेड्यापाड्यांत व लोकांच्या

परड्यांत आपली मुलेबाळे घेऊन असते, आणि आपल्या चिल्यापिल्यांस भाकरी तुकडा मिळावा म्हणून त्या

घरच्या किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांस पछाडून आजारी करून आपल्या मुलाबाळांच्या इच्छा तृप्त

करून घेते.

11. डाकिणीः - या भयंकर निर्दय असतात.

12. शाकिणीः - याही भूतांतीलच जरा श्रेष्ठ वर्गातील आहेत.

13. जखीण किंवा जाखीणः - ही बहुशः वृद्ध स्त्रीच्या रूपाने फिरते. हिचे केस शुभ्र रुपेरी व विसकटलेले

असतात. हिची गांठ पडली, तर ही भल्या माणसाला  कल्याण कारक साधन देते.

14. आसराः - ही पाण्यात राहणारी, पाण्यातून खाली पाताळांत जाणारी भूत वर्गातील स्त्रीजात आहे. या नेहमी

सुस्वरूप स्त्रियांच्या रूपाने असतात.

 

या १४ वर्गाखरीज आणखीही काही वर्गाची पिशाच्चे आहेत. ही सर्व रात्रीची फिरतात. ही निर्मनुष्यस्थळी भर

दोन प्रहरी , तिन्हीसांजा, मध्यरात्री, अंधारांत, नाना त-हेच्या रूपाने दिसतात. ही पशुपक्ष्यांचीही रूपें धरतात.

एकट्या दुकट्या माणसास पकडतात, भय दाखवितात, नाना तऱ्हेच्या चेष्टांनी भेडसावतात, ओरडतात, जाळ,

दिवट्या दाखवितात, व अमावास्या पौर्णिमांना ती फार फिरतात. माणसांना पछाडून त्यांच्या शरीरांत

शिरतात, रात्री उरावर येऊन बसतात, आणि अंगांत येऊन छळतात. त्यांची सांवली पडत नाही. ती वायुरूप

असतात. सर्व भुते किंवा पिशाचे मेलेल्या माणसांचीच झालेली असतात.

 

( प्रस्तुत कथा मालिका आणि कथा  मालिकेतील    सर्व पात्रे ,त्यांची नावे, स्थळे,गावाचे आणि शहराची नावे ,घडलेल्या घटना सर्व  काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी किंवा व्यक्ती समूहाशी काहीही संबंध नाही. जर असेल तर तो एक योग्य च असावा. संपूर्ण कथामालिका काल्पनिक आहे. )

 

************************************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग  पहिला)

१५ मार्च ला   वार्षिक परीक्षा संपल्या होत्या . ६ जूनला शाळा उघडणार  होत्या .म्हणजे मार्च चे १५ दिवस ,एप्रिल चे ३० आणि मे चे ३१ दिवस एकूण ७६ दिवस उन्हाळ्याच्या सुट्या. मुलांनी लगेच आई वडिलांना विळखा घातला .आई , "आम्हाला मामाच्या गावाला जायचं।  " अहो बाबा, आम्हाला आजोळी घेऊन जा ."

मोठा मुलगा अभय ९वीत शिकत होता . मुलगी दीपा  ७वीत आणि धाकटा मुलगा विनय  ५वीत  शिकत होता . अशे संपत राव महाडिक आणि सुलोचनाबाई महाडिक ह्यांचे तीन संताने.   म्हणजे तीन भावंडं    शहरात खाजगी शाळेत तिघे शिकत होते. संपत राव मूळ  कोसंबी गावचे राहणारे. गावात त्यांचे वडील श्री भगवानराव महाडिक शेती करायचे . मुलांच्या शिक्षणाची सोय कोसंबी गावात नव्हती . फक्त सातवी इयत्ते  पर्यंत ची जिल्हा परिषदेची मराठी शाळा होती. पुढील शिक्षणासाठी मुलांना शहरात जावे लागत होते. 

कोसंबी गावाला सर्वात जवळचे शहर " वारणा " होतं. वारणा कोसंबी गावाहून जवळ  जवळ १५० कि मी लांब . सरकारी एसटीने जावं लागत होत. संपत मुलांच्या शिक्षण साठी च  शहरात राहात होते.  शहरात दोन बेडरूम, हॉल आणि किचन फ्लॅट मध्ये सातव्या मजल्यावर राहत होते . संपतने वारण्यात एक लहानशी किराण्याची दुकान लावली होती . दुकानात सोबती म्हणून एक माणूस पण ठेवला होता. दुकान फार चांगले चालायचे . आजूबाजूला अनेक वसाहती होत्या .टोलेजंग इमारती होत्या . व्यापार आणि उद्योगाने गजबजलेले शहर म्हणजे "वारणा ". वैद्यकीय ,अभियांत्रिकी, कायदा आणि इतर महत्त्वाच्या अभ्यास क्रमाची सोइ असलेले शहर म्हणजे "वारणा " रात्रीचे १ ते दीड वाजे पर्यंत वाहनांची दरवळ . शहरात अनेक बाग बगीचे होते , प्रेक्षणीय स्थळे होती, शहरापासून दूर रिसॉर्ट पण होत. लहान मुलांच्या करमणूकी साठी अनेक सोइ  होत्या . संपतची सासुरवाडी म्हणजे सुलोचनाबाई ह्यांचे माहेर कोसंबी गावाजवळ च जांभळी गाव . जांभळी गाव पण कोसंबी गावा सारखेच.   शिक्षणाची फारसी सोया नव्हती . मुख्य व्यवसाय शेती च होता . सुलोचना बाई संस्कारी होत्या . लहानपणापासून च मुलांना चांगले संस्कार देऊ केले आणि अजूनही देत  होत्या .   तिघंही मुलांना भक्ती मार्गा कडे वळवले होते . 

मुलांना मामाच्या गावाला जायची ओढ लागली होती. वार्षिक परीक्षा सुरु होण्या आधी च  त्यांनी आई बाबांना मामाच्या गावी जाण्या साठी विळखा घातला होता. मागच्या दोन वर्षा पासून ते गेले नव्हते . ह्या वर्षी संपतने  कबुल केले होते मामाच्या गावाला घेऊन जायचं. जांभळी  गावा जवळ तालुक्याचे लहानशे शहर " बासमती "  बासमती ते जांभळी  ५ किमी चे अंतर. बासमती हे  मुख्य रस्त्यावर वसलेले लहानशे शहर .  मुख्य रस्त्यावर जांभळी  फाट्यावर बस थांबायची . तेथून पायवाटेने अथवा बैलगाडीने जावं लागत असे .

पुढच्या आठवड्यात जांभळी गावी जाण्याचं ठरलं . तिघे मुलं उत्साहात आली होती त्यात सुलोचनाबाई पण खऱ्याच . कारण मुलांसोबत माहेर जाणार होत्या ते पण तब्बल एक महिना  मुलांच्या कारणाने त्यांना १ महिना आई बाबांजवळ राहावे  लागणार होते . साहजिकच त्यांचा आनंद पण ओसंडून वहात होता.  संपत फक्त दोन दिवस च राहणार होता.

उजाडला तो रविवारचा दिवस ...

 सकाळी ९ वाजेची बस होती . घरा पासून बस स्थानक अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर . सकाळी सव्वा आठला संपत रिक्षेने पलटण  घेऊन निघाले मोर्च्यावर .  पावणे नऊला बस स्टॅण्डवर पोहोचले . "वारणा सावली वाया कोसंबी- जांभळी " बस  फलाटावर लागलेली च होती . बरोबर ९ वाजेला कंडक्टरने घंटी वाजवली . चालकाने बस चालू केली. बस हळू हळू जाऊ लागली .शहर बाहेर येता च चालकाने बसचा वेग वाढविला. बस भरधाव वेगाने धावू लागली सावली कडे  .

सव्वा आकरा वाजेला बस जांभळी फाट्यावर  येऊन पोहोचली . फाट्यावर सुलोचना बाईंच्या वडिलांनी मुली ,जावईबुवा आणि नातवंडांना घेण्यासाठी बैल गाडी पाठवली  होती . गाडीवान पण ओळखीचा गडी होता . तो सुलोचना बाईंना बघून "या ताई  द्या तुमचा सामान “ असं लगबगीनं येऊन म्हणाला आणि त्यांच्या हातातून सामान घेऊन गाडीत ठेवू लागला .

गाडीत मुलं पुढे बसले आणि मागं संपत आणि सुलोचना बाई बसल्या. गाडी जुंपली गेली . गाडीवान पण गाडीत बसला आणि बैलांना आदेश देत गाडी हाकू लागला .

मोठा मुलगा अभय  मुलगा संपतला  म्हणाला , बाबा  मला एक कविता आठवली जी आम्हाला चौथ्या  इयत्ता मध्ये होती ."

हो का. कोणती कविता होती ? संपतने  प्रश्न  केला

मी म्हणून दाखवतो.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लाऱ्या  बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

नाही बिकट  घाट ,

सारी सपाट वाट ,

मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो

पाजी बैलांना ओहोळ पाणी हो

गळा खुळखुळ घुंगुर माळा हो

गाई किलबिल विहंग  मेळा हो

बाजरीचया शेतात,

करी सळसळ वात ,

कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरून  धरन पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

लेक एकु लती,

नातू एकु लता,

किती  कौतुक कौतुक होई हो

 

क्रमशः भाग २ वर

 
 

समंधः  (रस्त्यावरील भूत ) (भाग  दुसरा)

 

भगवानदादा महाडिक आणि लीलाताई महाडिक ह्यांना फोन करून संपतने  येत्या रविवारी जांभळी गावी येऊन  तेथे दोन दिवस राहून कोसंबीला येणार आणि सुनबाई आणि नातवंड एक महिन्यांनी येणार असल्याचे कळविले .

 

. बातमी ऐकून भगवान दादा ह्यांनी लगेच पत्नी लीलाताईंना हाक मारत बोलले

"अहो ऐकलंत का ?' नातवंडं येणार आहे असा संपत चा फोन आला होता." 

 

"हो का खरच कि येणार ! " लीलाताई आनंदित होत म्हणाल्या 

 

आणि लीलाताई फारच खुश झाल्या. मुलगा,सुनबाई आणि नातवंड येणार म्हणून फारच आनंदात आल्या होत्या.  बऱ्याच दिवसांनी नातवंड येणार म्हणून शेजार पाजाऱ्यांना पण सांगून टाकले .

लीलाताई मुलगा संपत,सुनबाई आणि नातवंड ह्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या सर्व वस्तू बनवू लागल्या

भगवान दादांनी मनात  ठरवून टाकले होते कि मुलगा संपत आली कि ३-४ दिवस राहायला सांगायचं आणि त्या दिवसात शेतात जाऊन पीक काढायचे सोबत नातवंडांना पण शेतात घेऊन जायचं पण नातवंड एक महिन्यानंतर येणार हे ऐकून दोघे जण फारच निराश झाले .

 

रात्री नातवंडांनी आजोबा भगवान दादांना फोन केला ,"अहो आजोबा मी अभय बोलतोय .काल आम्ही मामाच्या गावी आलोय .एक महिना राहणार आहोत. नंतर आम्ही कोसंबीला येणार. आजी काय करतात ?त्यांना फोन द्या कि "

 

लीलाताई नातवंडांचा  आवाज ऐकून  गहिवरल्या. घोगऱ्या आवाजात म्हणाले ," लेकरांनो कशाला रे इतकं तडपवता आजीला ? लवकर या कि . मी डोळ्यात  तेल घालून तुमची वाट बघतेय. बरेच दिवस झाले तुम्ही लेकरे कोसंबीला नाही आलेत. विसरले कि आजा आजींना. तुमच्या  वाचून भेकाड वाटतंय "

मी तुमच्या  आजाला देते फोन" डोळे पुसत लीलाताई म्हणाल्या

 

"अरे पोरांनो लवकर या कि . म्हणजे इकडे तुम्ही दोन चार दिवस च राहणार ? आंब्यांचा झाडाला कैऱ्या लागल्या आहेत, चिकूच्या झाडाला चिकू पण लागले आहेत,बोरं पण लागले आहेत तम्ही तोडायला या रे पोरांनो " आजा भगवान दादा पण बोलता बोलता अडकले. त्यांचा गळा भरून आला. लेकरांनो लवकर लवकर या रे बाबांनो .फोन ठेवतो मी ." खांद्यावर असलेल्या पंचाने डोळे पुसत  भगवान दादा बोलले.

आजोबा आजींचे  नातवंडावरचे प्रेम,आपुलकी,माया  समजण्या  इतपत नातवंडे मोठे झाले नव्हते. 

 

एक एक दिवस..एक एक तास आणि एक एक मिनिटं..एक एक सेकंड दोघ म्हातारा आणि म्हातारी नातवंडांची  आतुरतेने वाट बघायचे. सकाळ उगली म्हणजे वाटे कडे डोळे असायचे  आणि संध्याकाळ झाली म्हणजे निराशेने डोळे दुसरीकडे फिरवून घरात स्वतःला कोंबून घ्यायचे .

 

लिलाताईंनी मनात  विचारलं कि एवढ्या लवकर आवडीच्या वस्तू बनवून काय करणार ? जेवढ्या वस्तू बनवल्या गेल्या ते डब्यात पडून राहतील.

 

नातवंड तर एक महिन्यांनी येणार शेजार पाजारच्या  म्हाताऱ्या लीलाताईंना टोमणे देऊ लागले.."विसरा आता नातवंडांना ते काही येणार नाही.उगीचच तुम्ही वाट बघताय “.

 

आजकालच्या सुनांचं आणि मुलांचं काही नक्की नाही हो. नवऱ्याला आणि मुलांना स्वतःकडे केव्हा वाळून घेतील आणि गावात असणाऱ्या म्हाताऱ्या सासू  सासऱ्यांपासून अंतर करून घेतील काही खरं नाही

.शहरातली चमक दमक ,राहणीमान बघून तिथले शिष्टाचार अंगीकृत करतात. गावातले रीत रिवाज ,गावातली माणसं ह्यांना विसरणं ,रात्री उशिरापर्यंत घरी येणं, मुलांना एकट्यांना कोठेही पाठविणे, घरात एकटे सोडून पार्ट्यांना जाणं आणि उशिरा पर्यंत घरी येणं .त्यांचा रोजचा कार्यक्रम .आणि जर म्हातारे सासू सासरे शहरात गेले तर तिरस्काराची भावना येणं , त्यांना घरात वेगळं ठेवणं ,काय सांगू बाई...या आजच्या तरुण बायकांचं काही खार नाही हो. बघाना ह्या लिलाताईंची सुनबाई माहेरी गेली पण अजून सासू सासऱ्यांशी बोलणं केलं नाही "

 

ह्या विषयाला घेऊन लिलाताईंची दोन म्हाताऱ्या आजींशी भांडण पण झाली . त्यांची मनस्थिती समजणार कुणीच नव्हतं . आजोबा भगवान दादा सांत्वन देत म्हणाले ," अगं बोलू दे बायांना .रिकामटेकड्या आहेत.काही काम नाही. जाणून बुजून तुला चिडवतात .मनावर नको घेऊ .येतील लेकरं .विश्वास ठेव. इतकी गंभीर कशाला होतेस? वाटल्यास आपण जाऊन येऊ पोरांच्या मामाच्या गावी जांभळीला .

आणि दुसरं म्हणजे लहान मुलांना मामाचा लळा जास्त च असतो. मामा -मामी लाड करतात . आजा आजी कौतुक करतात . लहान मुलांची मामाच्या गावी मजाच मजा असते .शेतात जाणे , इकडे  तिकडे हिंडणे,दुसऱ्या मुलांबरोबर  खेळणे वगैरे वगैरे . जस जसे मोठे होतात तस तसे तो लळा कमी होऊ लागतो .वाईट वाटून घ्याय च काहीच कारण नाही”

 

"नाही हो.मी काही तसं नाही म्हणत .पण  जीवाला वाईट वाटतंय ना म्हणून थोडी गंभीर झाली . दिलासा देणारं कुणीच नाही . मन खट्टू झालं होत

 

दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामात लागले. भगवान दादा पण शेतात जाऊ लागले. लीलाताई घर कामात व्यस्त झाल्या . मन खट्टू झालेल्या पत्नी लीलाताईंना खुश करण्यासाठी आणि त्यांना बरं वाटावं म्हणून भगवान दादा पत्नी सोबत च राहायचे . शेतात  सालदाराला पाठवून काम करून घ्यायचे .आणि जर काही गेलात तर त्वरित काम आटोपून घरी येऊन जायचे . गावात विठोबाचे मंदिर होते त्या मंदिरात रोज सकाळी ,संध्याकाळी भजन कीर्तनास घेऊन जायचे जेणे करून तिचे मन रमेल .कामात मन लागेल.

 

क्रमशः भाग ३ वर

 
 

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग तिसरा)

 

" का हो जावई बुवा  उद्या जाऊ या शेतात .तुम्ही आलात तर बरं होईल. भुईमुगाच्या शेंगा निघताय उद्या. मी विचारल  कि तुमच्या शुभ हस्ते कापणी करू या. तुम्ही येणार म्हणून मी तीन  चार  दिवस कापणीच लांबणीवर टाकलंय"  असं संपतचे सासरेबुवा शामराव तात्या  बागुल म्हणाले

 

मनात काहीतरी विचारत संपत बोलला," आलो असतो मी पण घरी  कोसंबीला बाबा बोलवताय गव्हाची कापणी होणार आहे म्हणून बोलत होते.ते पण माझी वाट बघत आहे.  दोघीकडे जण कसं शक्य होईल ?आणि विशेष म्हणजे मी फक्त तीन दिवसांसाठी च आलोय. मी माझी दुकान माणसावर सोडून आलोय. दुसरं कोणी बघणार नाही आहे."

 

बोलता बोलता थांबले. परत त्यांच्या मनात काहीतरी विचार चालले होते.काय करावं आणि काय नाही. दोघांचा मान राखावा लागेल. सासरेबुवांनी मोठ्या आशेने सांगितले,वडिलांनी पण मदतीच्या दृष्टीने बोलावले आहे. म्हणजे कमीत कमी अजून तीन दिवस थांबावे लागे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

 

पतीला  चिंतेत बघून "अहो एवढं काय विचारताय.नसेल जमत तर नाही सांगून द्या बाबांना .इकडे बाबांच्या मदतीला आहेत सुरेश दादा .तुम्ही गावी कोसंबीला  बाबांच्या मदतीला जा अगोदर. त्यांना तुमच्या मदतीची फार आवशक्यता आहे.?  "  जवळ येत पत्नी  सुलोचनाबाई समजदारी दाखवत म्हणाल्या .

 

अगं तसं नाही पण पहिल्यांदाच  तुझ्या बाबांनी मोठ्या आशेने मला विनंती केली त्या विनंतीला मान द्याचा माझे कर्तव्य आहे .  एक काम करतो मी हो सांगतोय तुझ्या बाबांना आणि माझ्या बाबांना पण. काहीतरी आयोजन करतोय मी. तू चिंता नको करू.

 

सुलोचना बाईंच्या आई   पातळी काकू  लगेच हाक मारून बोलावले ,"अगं सुली काय करतेस? जरा इकडे ये कि ? "

सुलोचना बाईंच्या आईला सगळे गाव पातळी काकू म्हणून च बोलवायचे .

"हो..आली आई"

काय म्हणतेस बोल,

"मग काय विचारलंय जावई बुवांनी ? थांबणार असेल तर उद्या नाही तर आज च पाहुणचार करते  मी त्यांच्या साठी " 

तेवढ्यात त्यांचा मोठा भाऊ सुरेश दादा आला आणि म्हणाला कि "राव थांबणार आहेत असं वाटतंय .कारण मी बघितलंय कि ते बाबांशी ह्या बाबतीत काहीतरी बोलत होते.

 

मग आई काय पाहुणचार करावयाचा आहे ? " पातळी काकूंची सुनबाई ज्योती ताई म्हणाल्या

 

"तुझ्या नणंदेला विचार ना "पातळी काकू म्हणाल्या

"काय हो  वणस,  सांगा ना काय काय आवडते पाहुण्यांना ? ज्योती  ताई  म्हणाल्या

लाजत सुलोचना ताई म्हणाल्या ,"इश्श्य काय तुम्ही पण वहिणी.  सगळंच आवडत .तुम्ही बनवा तुमचा इच्छेने .

 

बस मग काय ..." पुरणपोळ्या,रशी, कुर्डाया,पापड्या ,  कांद्याची भजी, वरण,भात ,मसाला भात, सलाड,वांगी बटाट्याची  मसालेदार भाजी" चालेल का ?

 

 .अहाहाहाहा काय मस्त बेत आखलाय हो वहिणी .तोंडात पाणी आलं.

 

" कुणाच्या तुमच्या कि ........." नणंदेची  फिरकी घेत ज्योती ताई म्हणाल्या

"आज काय झालाय तुम्हाला हो वहिणी ?

"अहो वहिणी पण माझ्या मुलांना विचारले कि नाही ? विचारून बघा .त्यांना नसेल आवडत तर त्यांच्या साठी दुसरं बनवावं लागेल हं  तुम्ही  लक्षात ठेवा .माझी मुलं काही त्यांच्या बाबांसारखे नाहीत हो .जे असेल ते खाऊन घेतील  "

"हो..हो फारच भोळे तुमचे ते हो ना ..." हसत हसत ज्योती ताई म्हणाल्या

 

बऱ्याच दिवसांनी नणंद आली,मुले आली होती आणि खास तर पाहुणे आले होते आणि ते पण ४-५ दिवस थांबणार होते त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पसरले होते.  रात्री तर पातळी काकू, सुलोचना ताई,ज्योती ताई ,आणि शेजारच्या वहिणी सिंधुताई पण आल्या होत्या आणि चौपट खेळत बसले होते.आणि सुरेश दादा , संपत साला आणि पाहुणा गावात फेर फटका मारायला निघाले होते. पान टपरी वरून पानाचा विडा तोंडात कोंबला होता. नंतर सुरेश दादाचे गावकरी मित्र होते त्यांच्या कडे गप्पा मारायला गेले होते.

 

त्यांच्या गप्पामध्ये खेळ,राजकारण, पिक्चर , गाणी ,शिक्षण , धंधे , व्यापार इत्यादी बाबतीत चर्चा आणि गप्पा मारल्या जात होत्या .एकमेकांची फिरकी घेतली जात होती त्यात संपत म्हणजे सुरेश दादाचा  मेहुणा  त्या नात्याने त्यांचे मित्र संपतची फिरकी घेऊ लागले . संपत कमालीचा शांत स्वभावाचा . कुणावर चिडला  नाही कि रागावला  नाही.हसत हसत गप्पा मारू लागले,.

 

आजूबाजूच्या दोन तीन गावात भुताच्या ,चेटकिणीच्या,मुंजाच्या घटना घडल्या होत्या त्या वरही गप्पा झाल्यात.

 

एक मित्र म्हणाल कि तीन चार दिवस पूर्वी शेजारच्या लोणारी गावात चेटकीण दिसली होती. तर दुसरा एक मित्र लगेच म्हणाला ," डोंगराच्या पलीकडे   कोळदे नावाचे गाव  आहे  तिकडे तर म्हणे एक मागासवर्गीय शेत मजुराच्या अंगात चेटकीण घुसली.आता कशी काय घुसली ते बरोबर कळलं नाही. गावात चित्र विचित्र हरकत करू लागला.

 

तर ..

 

दुसऱ्या एक गावात समंध जातीचं भूत दिसलं होत.

"भुतांमध्ये पण  जाती असतात?: संपतने  कुतुहुलाने प्रश्न केला

 

"हो मग...माझ्या वाचण्यात आले होते कि जवळ जवळ १४-१५ प्रकारचे भुतं असतात.चेटकीण,मुंजा, समंध ,बायंगी ..अजून आठवत बोलला, लावसट,खुन्या वगैरे वगैरे. त्यात समंध जातीचं भुतं फार भयंकर असते हो .असं म्हणतात कि ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा  तीठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला(निर्वंशी) ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते..इतका भयंकर आणि खतरनाक भूत आहे  .असे हि म्हणतात कि हे भूत शरीरात एकदा घुसले कि शरीरातून जात च  नाही. तुम्ही किती हि धागे दोरे ,तांत्रिक विधी करा,बळी द्या ,नैवेद्य घाला,पूजापाठ करा ,हवन करा काहीही फरक पडत नाही.फार जिद्दी भूत आहे .

 

अहो ह्या भुतामुळे तर एकाच जीव पण गेला .पण देवाच्या कृपेने  आपल्या गावात म्हणजे जांभळी गावात भूत पिशाच्च वगैरेंच्या घटना नाही घडल्यात." एक मित्र बोलला

 

"आमच्या कोसंबी गावात हि अश्या विचित्र घटना,भुताच्या घटना घडल्या नाहीत.ह्या बाबतीती आमचे गाव फार सुरक्षित आहे " संपत म्हणाला.

सुरेश दादाने घड्याळात बघितले आणि डोळे चवडे करत बोलले ," हो हो..बारा वाजत आले हो संपत राव.आता आपल्याला घरी गेले पाहिजे.चला उठा घरी जाऊ या

 

"हो चला कि खरंच बारा वाजले." संपत म्हणाला.

आणि सर्व मित्र मंडळींचा निरोप घेऊन साला पाहुणा घरी जाण्यास निघाले

 

क्रमशः भाग ४ वर

 

************************************************************************************************

 

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग – चौथा)

 

सकाळी आठ वाजता  प्रातःविधी ,स्नानादी आणि चहा  नाश्ता आटोपून शामराव तात्या,मुलगा सुरेश दादा आणि जावई बुवा संपत राव महाडिक सकाळी दहा वाजता  बैल गाड़ीने त्यांच्या शेतात जाण्यास निघाले होते. दिवसभर शेतात राहणार होते म्हणून जेवणाचा डबा किंवा शिदोऱ्या वगैरे काहीच घेऊन गेले नव्हते.

फक्त दहा माणसांचा दोन वेळेचा नास्ता घेऊन गेले होते. दुपारचे जेवण तिकडेच शेतात बनवणार होते. शेतात शेत मजुरांच्या बायकाही येत होत्या .त्या बायांकडून सगळ्यांचा स्वयंपाक बनवला जाणार होता. तसं शामराव तात्यांनी  अगोदरच सर्व शेत मजुरांना सांगून ठेवले होते कि उद्या कोणीही शिदोऱ्या आणायच्या नाहीत शेतात च  स्वयंपाक करूया .

शामराव तात्या, मुलगा सुरेश दादा आणि जावई संपत राव गाडीत गप्पा मारीत होते आणि गाडीवान  गाडी हाकत होता.

 

रस्त्याच्या एका बाजूला एक अनोळखी  माणूस  उभा असलेला दिसला . हातातील फाटकी पिशवी   एका बाजूला ठेवून तो  बैल गाडीत बसलेल्या चौघांकडे एक सारखा बघत होता. त्याचा चेहरा अतिशय केविलवाणा होता. त्याचे कपडे फाटके आणि धुळीने बरबटलेले होते. ऊन मी म्हणत होते. रस्त्यावर पडलेल्या घाणेरड्या वस्तू उचलून पिशवीत टाकत होता. शामरावांना त्याची दया आली ,.त्यांनी गाडीतून खाली न उतरता गाडीतच  बसल्या बसल्या त्याला पाण्याची बाटली दिली, रस्त्यात खाण्यासाठी नाश्ता घेतला होता तो पण दिला .जेव्हा  तो ह्या सर्व वस्तू घेत होता तेव्हा त्याच्या हातावर सुरेश दादाची नजर गेली. हातातले बोटे एक सारखे होते . कुठल्याही  माणसांचे बोट एक सारखे नसतात च. हाथ पण जाड आणि बारीक असे होते. त्याच्या हाताच्या बोटांचे नख थोडे वाढलेले होते. डोक्यावरचे केस पण फारच वाढलेले  होते . डोळे चित्र विचित्र आकाराचे आणि ते पण लाल  होते  डोळ्यांच्या वरती भुवया नव्हत्या .पायांची बोटं लहान मुलाच्या पायासारखी होती. दमा असलेला रोगी माणूस जसा खर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र आवाज करतो, तसा आवाज त्यांच्या तोंडातून निघत होता. म्हणजे साधारण माणसा पेक्षा  काहीतरी विचित्र अवतार होता त्या अनोळखी माणसाचा . ती अनोळखी व्यक्ती काहीच बोलली नाही . थोडक्यात म्हणजे साधारण माणसा सारखा तो नव्हता च

 

दुपारी जवळ जवळ साडे  बारा वाजता गाडी शेतात पोहोचली.शेतात ह्यांच्या पाहोचण्या च्या अगोदर च शेत मजूर आणि  त्यांच्या बायका केव्हाच येऊन बसल्या होत्या . सुरेश दादाने रस्त्यात भेटलेल्या त्या अनोळखी माणसाची गोष्ट केली.

 

एक शेत मजूर म्हणाला कि अहो दादा ती व्यक्ती म्हणजे अनोळखी व्यक्ती नव्हती . कुणाचा तरी आत्मा भटकत भटकत भिखाऱ्याच्या वेशात येऊन उभा राहिला असायला पाहिजे.बरं झालं कि तुम्ही कोणीच गाडीतून उतरले नाही नाहीतर कुणास ठाऊक काय घडलं असतं.

 

गेल्या बरोबर शामरावांनी जावई संपत रावांच्या हस्ते भुईमुगाची कापणीला सुरवात केली.नंतर सगळे शेत मजूर कामास लागले. जवळ जवळ बायका आणि माणसं  मिळून दहा शेत मजूर होते. सुरेश दादा पण शेत मजुरांबरोबर कापणी करू लागला.शामराव तात्या उभे राहून कामाचे निरीक्षण करीत होते. जावई संपत राव एका  झाडाखाली बसून हे सर्व बघत होते. दुपारचा  एक वाजला होता .शेत मजुरांच्या बायका चुलीवर स्वयंपाक करिते होते. दोन बायका भाकरी बनवत होत्या तर दोन बायका चुलीवर बटाट्याची भाजी शिजवत होते आणि एक मुलगी कांदे कापत होती. एका तासात स्वयंपाक तयार झाला .

 

अचानक संपतला  रावांना दूर असलेल्या झाडाखाली एक काळ्या कुट्ट रंगाची शेळी दिसली . थोड्या वेळाने एक  अगदी लाल रंगाची म्हणजे रक्ताच्या रंगाची शेळी दिसली आणि लगेच गायब पण झाली.संपत राव विचारात पडले कि काळ्या रंगाची शेळी बघितली आहे पण एकदम लाल रंगाची शेळी ??? त्यांना काही समजेना.असेल असं म्हणून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी दृष्टी वळवली. खरतर हे सगळ जरा जास्तच विचित्र वाटतय... दुरवरून गावठी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज पण ऐकायला येत होता.

संपत राव विचारात  पडला कि अश्या गोष्टी तर रात्री घडतात ते पण अमावस्याच्या दिवशी .आज तर अमावश्या नाही .आणि शिवाय दुपारचे दोन वाजले होते. ह्या गोष्टी त्याच्या लक्षात येत नव्हत्या .

 

आदल्या दिवशी च संपत , शालक सुरेश दादा आणि त्यांच्या मित्रांसोबत भुताच्या गोष्टी केल्या होत्या .पण त्या सर्व घटना तर रात्री घडल्या होत्या . स्वयंपाक करणाऱ्या बायांना त्यांनी विचारले तर ते म्हणाले ,"पाहुणे, आमचं लक्ष नव्हतं त्या कडे आम्ही आमच्या कामात मग्न होतो . आम्ही किती वर्षांपासून इकडे काम करतोय पण आज पर्यंत आम्हाला अश्या गोष्टी दिसल्या नाहीत.

 

संपतने  विचारले कि सुरेश दादाला विचारून बघू कि अश्या विचित्र घटना ह्या पूर्वी घडल्या का?

संध्याकाळचे सात वाजले तरी पण काम चालूच होते. संपत राव बसल्या बसल्या कंटाळला होता. जागेवरून उठून इकडे तिकडे फिरू लागले . त्याने  विचारले कि चल मी  पण भुईमुगाच्या  शेतात जाऊन कापणी करू . तो शेतात कापणीसाठी जायला निघाला त्याला  येतांना   बघता सुरेश दादांनी त्यांना रोखले कि तुम्ही कशाला येता कामासाठी .तेव्हा संपत म्हणाला कि," बसल्या बसल्या मी केव्हाच कंटाळलो .थोडा विरंगुळा म्हणून मी आलोय त्यावर दादा म्हंटले , “ बरं या पण काम नका करू फक्त बघत जा ,निरीक्षण करत जा . विळा हातात नका घेऊ.तुम्ही तर आमचे पाहुणे आणि आम्ही पाहुण्यांना काहीच काम करू देत नाही.फक्त बघत जा .

 

क्रमशः भाग ५ वर

*******************************************************************************************

 

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग पाचवा)

 

संध्याकाळी वारण्याहून संपतच्या दुकानातला माणसाचा फोन आला कि  तुम्ही गावाहून परत कधी येणार ? घाऊक व्यापारी पैश्यांची मागणी करताहेत . आणि काही माल संपत आलाय . घाऊक व्यापारी नवीन ऑर्डर्स घ्यायचे नाही म्हणतात . अगोदर बाकी ची रकम पूर्ण करा.मागचं देणं पूर्ण करा नंतर च नवीन ऑर्डरी घेऊ.

 

संपत बुचकळ्यात पडला. काय करावं आणि काय नाही? समजत नव्हते . रात्रीचे आठ वाजले होत.शेतात अजून काम चालू च होते. तात्त्पुरत्या प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे शेत मजुरांना रात्री पण दिसत होते.

 

"मी काही व्यवस्था करतो : असं सांगून संपतने  फोन कट केला.

त्यांनी शालक सुरेश दादाला जवळ बोलाविले आणि एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि  सांगितले," वारण्याहून दुकानातल्या माणसाचा फोन आला होता. दुकानात काही माल संपत आलाय . अजून  मागची बाकी दिली गेली नाही म्हणून घाऊक व्यापारी नवा माल देत नाही. नसून ऑर्डर्स  घेत नाही. कसेही करून मला जावं लागेल उद्या.

 

"अहो राव ,तुम्ही कशाला इतकी चिंता करता? मी आहे ना तुमच्या मदतीला .घाबरू नका.मला सांगा किती बाकी आहे व्यापारांच ?"

 

"चार व्यापाऱ्यांचे मिळून जवळ जवळ ५० हजार आहेत. " संपत म्हणाला  .

एक काम करतो. वारण्याला माझा एक चुलत भाऊ आहे आणि त्याचा शालक  गजेंद्र भाऊ फार चांगला माणूस आहे मला प्रत्यक्ष तो ओळखतो आणि एकदा तो  जांभळी ला पण येऊन गेला आहे, मी त्याला फोन करतो तो तुमची मदत करेन.आत्ताच  तुमच्या समोर  मी फोन करतोय गजा भाऊला ."

 

"अहो गजा भाऊ मी सुरेश दादा जांभळीहून बोलतोय."

'हो.हो बोला  ना  दादा .एकदम काय काम पडलं रात्री?" उत्तर देत गजा भाऊ बोलले

"अहो माझे  मेहुणे संपत राव वारण्याला किराणा भुसाराचे दुकान चालवतात.पण तीन  दिवसापासून ते जांभळीला परिवार सोबत आलेले आहे आणि त्या नंतर ते त्यांच्या गावी कोसंबीला जाणार .कारण अजून त्यांचं शेतीच काम पण आहे .

 

आज संध्याकाळी त्यांच्या दुकानातल्या माणसाचा फोन आला होता कि दुकानातला माल संपत आलाय आणि घाऊक व्यापारी नवा माल देत नाही आहे म्हणतात कि मागची बाकी पूर्ण करा नंतर माल देऊ. "

 

" अरे दादा मला सांगा ना  किती बाकी आहे मी रकम पोचती करतो " अजून दादा पुढचं बोलत होते मध्येच गजा भाऊ बोलले .

 

"जवळ जवळ ५० हजार आहेत  असं संपत राव म्हणतात " दादांनी उत्तर दिले

"ओके मी सकाळी ५० हजार संपत रावांच्या दुकानातला माणसाला पाठवितो . ज्यांचे ज्यांचे बाकी आहेत त्यांना चुकते करून द्या ."

 

"खूप खूप आभार गजाभाऊ . संपत राव वारण्याला येतील तेव्हा तुमची भेट घेणार च पण अधून नधून त्यांना तुमची मदत हवी असेल तेव्हा त्यांना मदत करत जा बस एवढी विनंती आहे तुम्हाला " सुरेश दादा  आभार व्यक्त करत बोलले.

 

"अहो त्यात काय आभार? चालतंय धंद्यात . व्यापारात चढती उतरती होत च राहते. एवढी चिंता करायची आवश्यकता नाही .त्यांना सांगा जेव्हा वारण्याला येणार तेव्हा मला भेटा."  गजा भाऊ माणुसकी दाखवत बोलले

 

अवघ्या अर्ध्या तासात च संपत राव चिंतामुक्त झाले. लगेच त्यांनी दुकानातल्या माणसाला फोन केला कि आमचे गजेंद्र भाऊ उर्फ गजाभाऊ नावाचे एक नातेवाईक उद्या सकाळी ५० हजार देऊन जातील .ज्या ज्या व्यापाऱ्यांची बाकी आहे ते तुम्ही उद्याच्या उद्या चुकते करून या आणि  नवीन मालाची ऑर्डर्स पण देऊन टाका.मी अजून तीन दिवस इकडे च म्हणजे माझ्या गावी कोसंबीला राहणार आहे  "

 

आता रात्रीचे नवं वाजले होते .काम आटोपले होते.गावाला जाण्याची तयारी करू लागले. शेत मजुरांच्या बायका संध्याकाळीस च निघून गेले होते फक्त चार शेत मजूर ,शामराव बागुल,सुरेश दादा,संपत राव आणि गाडीवान मिळून आठ जण होते .बैल गाड़ी दहा जण बसू शकतील एवढी मोठी होती.

 

सगळे गोळा झाले.गाडीवानाने गाडी जुंपली .सगळे जण गाडीत बसले आणि गाडी हळू हळू चालू लागली .गाडीत गप्पा मारल्या जात होत्या.

 

जवळजवळ साडे  नऊ वाजता सगळे निघाले. गाडी अर्ध्या रस्त्यावर पोहोचली आणि  बैलं अचानक उभे राहिले.गाडीवानाने पुष्कळ प्रयत्न केला पण गाडी पुढे जायची च नाही. चाक जाम झाल्या सारखं वाटलं. खड्डा नाही कि चिखल नाही. सपाट रस्ता होता तरी  पण गाडी का उभी राहिली ? कोणाला च कळत नव्हतं . गाडीवानाने गाडी खाली न उतरता बसल्या बसल्या च दोघ बाजूला बघितलं. मागे  पुढे पण बघितलं. कुठे काहीच दिसलं नाही. सगळे विचारात पडले. नेमकं झालं तरी काय?

 

संपत थोडा घाबरल्या सारखा  दिसत होता. कारण काल च  भुताच्या गोष्टी झाल्या होत्या आणि आज दुपारी पण त्यांना विचित्र शेळ्या दिसल्या होत्या ज्या अचानक गायब पण झाल्या .हळू हळू त्यांची शंका वाढू लागली कि काहीही असो भूत पिशाच्च च काम आहे. हि शंका वाढू लागली पण ते गप्प बसले

 

क्रमशः भाग ६ वर

 

**********************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग सहावा)

घरात सगळे काळजी करू लागले. रात्रीचे जवळ जवळ अकरा वाजले होते. पातळी काकू घरात ये जारा करू लागले. सुलोचना ताई आणि ज्योती ताई  वेगवेगळ्या खिडकीत बसून वाट बघत बसले होते? आज पर्यंत इतका वेळ कधीच लागत नाही आणि आज नेमकं जावई बुवा आले त्याच दिवशी एवढा वेळ का? काय झालं असेल?

काही अघटित ....नाही नाही..असं कधीच होणार नाहीआई जगदंबेची कृपा आहे आमच्यावर असं अघटित कदापि घडणार नाही .कदाचित जास्त काम असणार ..पण एवढ्या अंधाऱ्यात काय काम करीत असणार ? कोणाचा फोन पण नाही आला? कदाचित मोबाईल टॉवर च नसणार शेतात तर कसे काय करतील फोन? एवढ्या रात्री कोणाला पाठवू तपस करायला ?  पोरं पण झोपली होती . जस जसा घड्याळाचा काटा पुढं जाऊ लागला तास तास तिघांची  चिंतेचा काटा दुपट्टीने पुढं पळू लागला. तिघे जणी रडकुंडीला आली होती . पातळी काकू देवापुढे हाथ  बसून राहिल्या. जांभळी गावात एकदम शांतता पसरली होती.रातकिडे टिक टिक करू लागले. बाहेर काळाकुट्ट अंधार पसरलेलं .

शेतात गेल्यापासून रात्रीचे दहा वाजे पर्यंत संपत रावांच्या बाबांचे सहा वेळा फोन आला होता. सुलोचनाबाईंनी   च  फोन उचलला होता. आणि शेतात भुईमुगाच्या कापणीला सोबतीला गेले आहेत असं सांगितले आणि संध्याकाळ पर्यंत येऊन जातील असं हि सांगितलं .

नेमके काय घडलं  असावे ? घरात तिघे बायकाच होत्या. कोणी च पुरुष नव्हता . अशावेळी जर कोणी अनोळखी माणूस किंवा चोर ,लुटारू जर आले तर काय दशा होईल ह्या सगळ्यांची कल्पना करणे  अवघड होतं. 

गाडी पुढं अचानक ४ भूत येऊन थांबले.जोरजोरात हसायला लागले. चारही  भूत वेगवेगळ्या प्रकारचे. एक भुताने पांढरे शुभ्र कपडे घातले होते पण दिसायला कंकाळ ठिक्कर होता. फक्त दात च दिसायचे. दूर भूत   ठींगना होता. फक्त आखूड चड्डी घातली होती.हातात रामपुरी चाकू होता आणि गाडी पुढं नाचायला लागला. एक भूत अर्धनग्न होता. त्याच्या शरीर यष्टी वरून माहीत पडत होते कि ते भूत स्त्रीचे असावे .एक भूत थोड्या लांब अंतरावर उभा होता

चौघे भूत वेगवेगळ्या आवाजात किंचाळू लागले.जवळ बोलवत होते. हातात चाबूक होता तर स्त्री भाताच्या हातात पेटलेली  मेणबत्ती होती . गळ्यात मेलेल्या माणसाची  तोंडाची माळा लटकवलेली होती.

खबरदार जर पुढे गेलात तर. मारून टाकू तुम्हा सगळ्यांना . पुरुष भूत ज्याने पांढरे वस्त्र घातले होते जोरजोरात चाबूक जमिनीवर आदळत होता. साड्या सारखी जीभ  वारंवार तोंडा  बाहेर काढत होता. एक भूत नाचता नाचता रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर चढला आणि उलट लटकायला लागला. त्याचे तोंड खाली होते पण सुलटे होते . हाथ तर  खाली होते मग कशावर लटकला असेन ? झाडाची फांदी कूच कूच आवाज करू लागली . रात्री झोपी गेलेले पक्षी कावळा,कबुतर ,पोपट,आणि घुबड उडू लागली .

बैल गाडीच्या अवती भोवती ३-४ कुत्रे फिरू लागली .साधारणतः कुत्रे बैलांच्या जवळ आल्यावर बैल शिंगांनी त्या भुकणाऱ्या कुत्र्यांना हाकून लावतात पण बैल खाली जमिनीकडे डोकं करून स्तब्ध उभे होते. कुत्री भुंकत पण नव्हते .

एक भूत जे अर्ध नग्न अवस्थेत होते ते एक सारखे संपत रावांकडे बघत होते. संपत रावांनी एक दोन वेळा त्या भूताकडे बघितले आणि लगेच डोळे दुसरी कडे फिरवून घेतले.

शामराव बागुल बोलले ," चला जोर जोरात हनुमान चाळीस बोलयू या " 

"जय हनुमान  ज्ञान  गुण  सागर जय कपीस तिघू लोक उजागर

राम अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सूत नामा .....

असं म्हणतात कि जर माणसाच्या हातात कोणतीही लोखंडी वस्तू मग ती तलवार असो,चाकू असो,कात्री असो,विळा असो, लोखंडी पाईप असो भुताला हे सगळं देवा शंकराच्या त्रिशूल सारखे दिसत. आपल्याला हैराण करतील ,जवळ येण्याचा प्रयत्न करतील पण आपल्या अंगाला स्पर्श नाही करणार. गाडीवानाच्या  हातात बैलांना हाकण्यासाठी लाकडी काठी होती आणि त्या काठीच्या  पुढं घासलेला अणुकुचीदार खिळा होता त्यामुळे भूत त्याला स्पर्श करू शकला नाही.

अजून एक विशेष म्हणजे तुम्ही जर कोणत्याही वाहनावर बसून चालले असाल किंवा उभे असणार तर भूत काहीच करू शकत नाही हा..जर तुम्ही त्या वाहनावरून खाली उतरले कि झालं तुमचा खेळ खलास

आपापल्या पतींची वाट बघून बघून पातळी काकू ,ज्यीती बाई आणि सुलोचना ताई ह्यांचे डोळे लाल झाले होते आणि थोडेफार सुजलेले पण होते तरीपण वाट बघणं चालूज होत.

अंधाऱ्यात  भुतांची सावली पण दिसू लागली. जे भूत ठींगन होतं  त्याची सावली सर्वात लांब आणि उंच आणि जे भूत उंच होते त्याची सावली ठींगण्या माणसाची उंची एवढी. एका भुताची सावली हलत होती तर  एक भुताची सावली अचानक गोल गोल फिरायला लागली .  सुरेश दादांनी घड्याळात बघितले रात्रीचे दोन वाजले होते.  सर्व जण चुपचाप हा तमाशा बघत होते. कोणाच्याही तोंडाला वाचा फुटत नव्हती .

रात्री बारा ते तीन वाजे पर्यंत भुतांचा सहवास असतो,वास असतो . तीन वाजेनंतर  भूत हळूहळू निघून जातात पण जर जाता जाता कोणीच बळी मिळाला नाही मिळाला तर ते फार संतप्त होतात आणि दुसऱ्या दिवशी कोणी बळी  मिळाला  तर इतक्या क्रूरतेने त्याला मारतील कि कल्पना करणे अवघड आहे .मारल्या नंतर त्याचे रक्त पिणे, मांसाचे लचके तोडणे आणि खाणे त्यांचं चालू च असते. हे सगळं चित्र विचित्र बघून संपत रावांनी तर चक्क डोळे च मिटून घेतले आणि देवाचं नाव घ्यायला  लागले . घरात असलेल्या बायांची आणि मुलांची पण आठवण  येऊ लागली,काळजी वाटू लागली पण करणार काय ?

रात्रीचे अडीच वाजले होते .अजून  अर्धा तास घालवायचा होता. अडीच ते तीन तास चुपचाप बसून राहिले पण हा अर्धा तास घालविणे अवघड होऊन बसले होते

तीन वाजले होते. हळूहळू भूत जाण्याच्या तयारीत असावे असे त्यांच्या हालचाली वरून वाटत होत.नाचणं , उद्या मारणं ,अवती भवती फिरणं बंद झालं होत. साडे  तीन वाजता एक भूत जे ठींगण होत ते झाडावर चढला आणि गायब झाला.ह्याचा अर्थ असा कि ह्या भुताचा वास ह्या झाड वरच असावा. जे रात्री बे रात्री कोणी ह्या झाडाखाली उभे  राहिले तर ..खलास

एक भूत दूर पळाले आणि पळता पळता च  अदृश्य पण झाले , तिसरे भूत शेतात गेले आणि त्याची उंची कमी कमी होत गेली आणि शेवटी लहानश्या ससा एवढा झाला आणि जमिनीत घुसला .ह्याचा अर्थ असा कि हे भूत जे स्त्री च्या शरीरा सारखे होते ते शेतात बिळयात घुसले

एक भूत अजून   रस्त्यावर  च उभे होते .त्याचे डोळे एकदम चमकायला लागले. आता हे केव्हा जाईल त्याची आतुरतेने वाट बघत बसले . पंधरा मिनिटांनी ते भूत अचानक पक्ष्या सारखे  उडायला लागले आणि हवेत गायब झाले .ह्या भुताचा वास कुठे असावा ?

चार वाजून पंधरा मिनिटे झाली. आता सर्वांचा जिवंत जीव आला.आता निघायला हरकत नाही असं विचारून सगळे स्वस्थ झाले.पण गाडी हालत नव्हती आणि बैलाची मान खाली जमिनीकडे च  झुकलेली होती.ह्याचा अर्थ असा होतो कि भूत अजून अदृश्य रूपात इकडे तिकडे फिरत असावा.

साडे चार वाजता गाडी हलायला लागली. बैलांनी मान वर केली आणि माणूस जशा आळस काढतो तसे बैलांनी आळस  काढत मान इकडे तिकडे फिरवली आणि आपोआप चालायला लागले. सव्वा पाचला सगळे घरी पाहोचले .घरी सगळे जागत बसले होते. घरी आल्यावर शामराव तात्या  ,सुरेश दादा ह्यांनी सगळी गोष्ट संगितली.  सगळे जण घाबरले पण देवाचा आणि आई जगदंबेचा आभार मानीत देवघरात सगळे गेले आणि आई जगदंबे पुढे हाथ जोडून उभे राहिले.

क्रमशः भाग ७ वर

*************************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग सातवा)

"उठा उठा हो सकळीक…. वाचे स्मरावे गजमुख"… हे नेहमी सकाळ प्रसन्न करणारं गाणं कोण म्हणतंय हे बघायला  लीलाताई घर बाहेर आल्या.त्यांना भास झाला  कि संपत आला .पण बघितलं तर शेजारच्या  आजोबांच्याच घरातून सुमधुर आवाज येत होता.

 आजोबांचा आवाज इतका चांगला असेल वाटलं नव्हतं. दारात प्राजक्त सदैव फुललेला.. अंगणात दररोज नवनवीन रांगोळी.. कुठेही साधी रेघ इकडे नाही कि तिकडे नाही.. एकदा आजींना भेटायलाच हवं आणि हिची तर भेट घालून द्यायलाच हवी असा विचार करत असतानाच आतून आवाज आला…

" बाहेरगावी  जाण्यास  उशीर होत नाहीये का???? पाणी दोनदा उकळून थंड झालंय..आज पोरांसंग जायचंय वाटतं" लवकर लवकर आंघोळ करून घ्या.आता पोर उठतील तर तुमचा नंबर नाही लागणार."

अरे बाप रे भलताच उशीर झालाय… आज परत बॉसच्या म्हणजे घरच्या बॉस च्या शिव्या.लगबगीनं उठत लवकर लवकर आंघोळ आटोपून बाहेरगावी  जाण्यास रघु आबा तयार झाला.

हो ते आजोबा च  सुमधुर आवाजात भजन गात होते.  त्यांचे  भजन ऐकून लीलाताई थोडा वेळ का होईना पण भान हरपून बसल्या होत्या

त्यांना आठवले कि "आजच्या बरोबर १ वर्ष १० महिने आणि १५ दिवस आधी अश्याच एका संध्याकाळी देवळातून परत येताना शेजारच्या सावित्री काकूंचा  अपघात झाला. त्याच क्षणी तिचा देहांत झाला. आजोबा सुंदरराव  घरात नेहमीप्रमाणे तिच्यासाठीचा गजरा आरश्याला लटकावून तिची वाट बघत होतो. आणि बातमी आली कि ती गेली. माहित नाही सुंदररावांना काय झालं पण त्या वेळेपासून एकही टिपूस त्यांच्या  डोळ्यातून नाही आला. ते इतरांसाठी गेली होती त्यांच्या साठी  नाही.… त्या दोघात  एकदा विषय झाला होता असाच मरणाच्या संदर्भात, तेंव्हा ती म्हणाली होती कि नवऱ्या आधी तिचाच नंबर लागावा. तिला पती च  कुंकू घेऊन स्वर्गात जायचं होतं. ती कुंकू घेऊन गेली…. पण…. सुंदररावांसाठी  गजरा ठेवला."

"काय हो लीला आजी ," शेजारच्या सावित्री काकूंच्या सुनेचा आवाज लीलाताईंच्या कानावर पडला आणि त्या एकदम भानात आल्या.

अगं ...सिंधू ..बोल ना काय म्हणतेस "

कुठे हरपले होते? " सिंधू म्हणाली

सिंधू हि शेजारच्या सावित्री  काकूंची सून .तिचा नवरा म्हणजे सावित्री काकूंचा मुलगा रघु आबा तीन चार दिवसांसाठी कुठे बाहेरगावी जाणार  होता .

काय हो काकू," संपत भावजी, वहिणी  आणि मुले केव्हा येणार ?

"तुझी वहिणी आणि मुले तर एक महिन्यांनी येणार पण संपत आज येईल दुपार पर्यंत.काल फोन केला होता पण लागला नाही.आता आठ वाजता करतील फोन तुझे काका  तेव्हा माहीत पडेल.

अहो संपत येणार  होता ना काल ? अजून आला नाही. काल तुम्ही फोन पण केला होता ना त्याच्या सासऱ्याला? परत एकदा करून बघा काय झालं ? " लीलाताई काळजीच्या स्वरात पती भगवान रावांना सांगत होत्या

हो करतो .अजून सात च  वाजले आहेत .आठेक वाजता करतो फोन. तो पर्यंत गाई गुरांचे काम करून घेतो. असं म्हणत भगवान दादा आपल्या कामासाठी निघून गेले .

गाई गुरांचे काम आटोपून भगवान दादा घरात आले आणि आल्या बरोबर त्यांनी संपत च्या  सासरी फोन जोडला.

" मी भगवान राव बोलतोय. संपत  आहे का?"  हो..हो.. नमस्कार हो व्याही .

" नमस्कार राव .काल मी बऱ्याच वेळा फोन केला होता पण लागला नाही. म्हणून आता केला.काल संपत येणार होता म्हणून काळजी वाटायला लागली ."

"हो येणार च होते पण...इकडे फार अघटित घटना घडलीय. आम्ही देवीच्या कृपेने कसे बसे वाचलो नाहीतर.....असं म्हणत शामरावांना  घडलेली घटना सविस्तर पाने सांगितली

"अरे बाप रे असं होय...खर्च हो देवाची कृपा ."तुम्ही सगळे कसे आहेत?"

आम्ही सगळे बरे आहोत पण संपत राव  थोडे घाबरल्या सारखे वाटतात . थोडे आजारी सारखे वाटतात .पण तुम्ही काळजी नका करू .बरं वाटल्याशिवाय आम्ही त्यांना कोसंबीला नाही पाठवणार

"ओके ..आणि सुनबाई आणि मुले ?

"मजेत आहेत .तुमची आठवण काढतात मुले"

" हो का..लवकर यायला सांगा पोरांना "

"हो नक्कीच सांगणार "

संपत राव आले. फोन देतो मी त्यांना

संपतने   बाबांशी फोन वर बऱ्याच वेळ पर्यंत बोलणं केलं. "आता बरं वाटतंय बाबा मला मी प्रयत्न करतोय दुपारी अथवा संध्याकाळ पर्यंत यायचा

"बरं ये.तुझी आई एक सारखी वाट बघतेय तुझी आणि सुनेची आणि मुलांची तुमची ओढ लागली तिला "

हो निघतो मी आज "

बरं .मी ठेवतो फोन "

"अहो ऐकलंत का ..दुपार अथवा संध्याकाळ पर्यंत येणार आहे आपला संपत." भगवान दादा आपल्या पत्नीला सांगत होते. काल घडलेल्या घटने बाबतीत त्यांनी काहीच सांगितलं नाही. नाहक डोक्याला ताप करून घेईन असं त्याणी मनात विचारले.

क्रमशः भाग ८ वर

******************************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग –आठवा)

दुपारचा पाहुणचार घेऊन संपत राव तीन वाजता कोसंबी गावी येऊन पोहचला . पण तो थोडा अस्वस्थ जाणवत होता. डोळे लाल थोडे सुजलेले  होते. चेहरा निस्तेज दिसत होता. त्याला अशक्तपणा जाणवत होता. तरी पण त्याच्या आई बाबांच्या लक्षात आले नव्हते. काल रात्री घडलेल्या भयावह अनुभवाविषयी पण तो बोलला नाही. घरी आल्यावर तो झोपून च राहिला . दुसऱ्यादिवशी शेतात जायचे  होते. पण कसे जाणार? शेतात नाव काढल्यावर तो मनातून घाबरला मनातल्या मनात न होवो पण परत तसं घडलं तर? 

रात्री अचानक त्याला ताप आला, थंडी वाजून आली. डोकं आणि हाथ पाय पण दुखायला लागले. रात्री आईने काढा बनवून दिला .रात्री त्याला घाम फुटला .ताव उतरला होता पण अशक्तपपणा जाणवत होता. गावात एकच डॉक्टर होता.डॉ. साळवे .सकाळी त्या  डॉक्टरला दाखविले.  एक च दिवसाचे औषध दिली. बरं नाही वाटलं तर मग शहरात मोठ्या डॉक्टरला दाखवायचं सांगितलं .

एक दिवसाचं औषध दिले पण बरं वाटत नव्हतं . जीव घाबरत होता. आज त्याने आई बाबांना जांभळी गावात रात्री घडलेल्या भूत विषयी सगळी माहिती सविस्तर सांगितली . ते एकूण त्याची आई लीलाताई रडायला लागली.देवाचे उपकार मानून तिने देवापाशी दिवा आणि  अगरबत्ती केली. गावात एक तांत्रिक होता त्याला बोलाविण्यात आले . त्याला सगळी हकीकत सांगितली.

तांत्रिकाने डोळे  बंद करून मनात काहीतरी मंत्रोच्चार करत होता. नंतर त्याने एक पातेले घेतले त्यात पाणी घेतले आणि डोक्यावरून मोठा रुमाल घेऊन खाली वाकून पातेल्यातल्या पाण्यात बघू लागला. त्यात काहीतरी पावडर सारखा पदार्थ टाकला .मोठ्याने मंत्र म्हणू लागला . दहा मिनिटांनी डोकं वर करून बोलला," वाचला हो वाचला तुमचा मुलगा. देवाने वाचविले सगळ्यांना . तसं बघितलं तर सगळेच वाचले पण भुताचा डोळा तुमच्या मुलावर च होता.

 तुमच्या मुलाने जे वर्णन केले त्यावरून असे दिसते कि समंध  प्रकारचं भूत  असायला पाहिजे. . हे भूत प्रामुख्याने कोकणात जास्त आढळतात : ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा रस्त्यावर म्हणजे गावाच्या कच्च्या रस्तावर आजूबाजूला जेथे मानव वस्ती असते   अशा ठिकाणी आढळून येतो.

हे एक संतान नसलेला (निःसंतान) ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. हे रात्री बेरात्री जंगलात किंवा  पायवाटेने अथवा कोणत्याही वाहन वर बसून जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही. पण जर काही वाहन वरून उतरला तर त्याच्या अंगात शिरते आणि त्याच्या मना  सारखे कार्य करवून घेतो आणि रात्रीचे १२ वाजल्या पासून ते साधारणतः तीन वाजेपर्यंत अशे भूत माणसांना  त्रास देतात. 

काही घाबरायचं कारण नाही. मी तुम्हाला काळ्या रंगाचा धागा ( कंदोरा) आणि एक त्रिशुलच्या आकाराचे तावीज देतो ते तुम्ही कमरेला अथवा उजव्या हाताच्या बाहू वर बांधून घ्या. आणि दर अमावस्येला हा  धागा सोडून नवा धागा घ्यायचा आणि त्याला देव्हाऱ्यात ठेवून अगरबत्तीचा धूप दाखवायचा आणि नंतर पुन्हा बांधून घ्यायचा .जर काही विसरलात तर घाबरायचं नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी पण करू शकता . पण जास्त विलंब करता  कामा  नये नाहीतर परत  पहिल्यापासून सर्व विधी पूजा करावी लागणार .

तुम्ही उद्या तुमच्या शेतात जाऊ शकता  एवढेच नव्हे तर रात्र झाली तरी पण घाबरण्याचे कारण नाही. सुरक्षा कवच दिलेलं आहे.कोणतेही भूत काहीच करू शकणार नाही .मी दिलेला उपाय सर्वात शक्तिशाली आहे. तुम्ही आता बिनधास्त व्हा.

हा धागा बांधल्यावर संपतला फार बरं वाटायला लागलं.. पहिल्या सारखा च ताजा माजा झाला होता. उद्या सकाळी बाबांबरोबर शेतात जायची तयारी पण दर्शविली .त्या प्रमाणे संपत ,त्याचे बाबा भगवान दादा आणि, चार शेत मजुरांना घेऊन शेतात गेले .गव्हाची कापणी केली, टमाटे, चवळीच्या शेंगा , वालाच्या शेंगा वगैरे भाजी पाला पण तोडला

संध्याकाळ पर्यंत सगळे काम आटोपले होते. शेतात चहा बनविला, सकाळी शेतात जातांना घरून दोन वेळा चालेल एवढा नाश्ता घेऊन गेले होते. तो नाश्ता पण केला .सात वाजेल गाडी जुंपली आणि निघाले कोसंबी गावी . कोसंबी गावापासून दक्षिणेस जवळ जवळ दहा कि.मी शेत होते.  रस्त्यात एक  लहानशी   नदी पण लागते.त्या नदीवर सहा सात फूट उंचीचा पूल पण होता. नदीत गुडघ्या इतपत  पाणी पण  होतं. जातांना  बैलांना पाणी पण पाजले.  येतांना पण पाणी पाजण्यास गाडी नदीच्या पात्रात च उभी ठेवली आणि बैलांना पाणी पाजले. उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळचे सात वाजले होते तरी पण उजेड होता. सूर्य मावळीवर होता. पाणी पीत असतांना च दोघे बैलं अचानक उधळले आणि पाणी प्यायचं सोडून इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करू लागले. गाडीवानाने गाडी दुसऱ्या  ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण गाडी हालत च नव्हती . पंधरा मिनिट गाडी नदीच्या प्रवाहात च उभी राहिली .गाडीतून कुणीच खाली उतरले नव्हते . नंतर गाडी हलली , बैलं पाणी पिऊ लागले.तेवढ्या वेळात सूर्य पूर्णतः मावळला होता .

संपतला दोन दिवस पूर्वीचा जो अनुभव झाला होता त्यामुळे तो घाबरला नव्हता .तो समजून गेला कि भटकत्या आत्माचे च हे काम आहे

तो निश्चिन्त होता आणि सगळ्यांना दिलासा देत होत कि ,"घाबरू नका कोणी गाडीतून खाली नका उतरा.गाडीत च बसून रहा .

संध्याकाळी बरोबर सव्वा सातला घरी सही सलामत सगळे पोहोचले . घरी आल्यावर संपतने आईला सगळी हकीकत सविस्तर सांगितली . त्याच्या आईने परत एकदा देवाचे आभार मानले

दुसऱ्या दिवशी सकाळी संपत वारणा कडे जाण्यास रवाना झाला. तीन दिवसासाठी गेला होता त्याच्या ऐवजी एक हप्ता झाला होता. त्याला धंद्यांची काळजी वाटायला लागली होती

क्रमशः भाग ९ वर

************************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत )  (भाग – नववा)

  वारण्याला आकरा वाजता पोहोचला आणि तो घरी न जाता दुकानावरच गेला. दुकानातल्या माणसाला सर्व हकीकत सविस्तर सांगितली.

" भाऊ..आराम करायचा होता ना .अजून तुमची तबियत पाहिजे तशी बरी दिसत नाही . तुम्ही घरी जा आणि आराम करा.तुम्ही फार थकलेले दिसतात तुम्हाला आरामाची खूप आवश्यकता आहे" आपुलकीने दुकानातला माणूस म्हणाला .

"आणि हो..वहिणी आणि मुले कशे आहेत ?"

"मजेत आहेत.अजून ती मुलांसोबत माहेरी जांभळीला च आहे.  कोसंबीला १५-२० दिवसानंतर येईल. तिथे आई जवळ १०-१५ दिवस राहतील नंतर येईल. " संपत म्हणाला

दुकानातून च त्याने आई बाबांना फोन करून वारण्याला सुखरूप पोहोचल्याचे सांगितले आणि प्रकृती पण चांगली असल्याचे सांगितले. "तुम्ही काळजी नका करू आई "

नंतर त्याने जांभळीला फोन केला आणि सासऱ्याशी  बोलला. जांभळीला जो अनुभव  झाला तो च अनुभव पण इकडे कोसंबीला पण झाल्याचे सांगितले पण इथली घटना भयावह नव्हती जितकी जांभळीला होती.इकडे आल्यावर आजारी पडल्याचे सांगितले आणि बाबांनी तांत्रिकाला बोलवून धागा दोरा  केल्याचे सांगितले.

"थांबा मी अगोदर सुलीला देतो फोन नंतर आपण बोलू या." त्यांनी मुलगी सुलोचनेला हाक मारली

"हो आले बाबा "  सुलोचनाने उत्तर दिले .

"काय झाले हो तिकडे ? फोन देण्या आधी मला थोडक्यात सांगितले बाबांनी "

"अगं काळजी नको करो पण देवाने वाचविले आम्हा सगळ्यांना .आई जगदंबा ,मारुतीरायाने च मला दोघे वेळी वाचविले आणि त्या तंत्रिकांचे आभार ज्याने मला सुरक्षे साठी तावीज दिलाय .कायम उजव्या  हाताच्या बाहुला बांधलेले असावे आणि दर अमावस्येला सकाळी धूप दिवा दाखवून नवा धागा आणून परत बांधून घ्यायचा म्हणजे संकट टळेल. इकडे आल्यावर मी आजारी पडलो होतो. औषध घेतली होती पण फरक पडत नव्हता .बाबांना वेगळीच शंका गेली आणि त्यांनी ताबडतोब तांत्रिकाला बोलाविले .जवळ जवळ तीन तास त्याने विधी केला आणि सांगितले कि ते समंध प्रकारचे भूत पिशाच होते . "

आता कसं काय वाटतंय ? वाटल्यास घरी जा आणि आराम करा." चिंतेने सुलोचना ताई बोलल्या

"हो दुकानातला माणूस पण तेच बोलला.बघतो मी तसं  वाटल्यास घरी लवकर चालला जाईन."

?"अहो इकडे पण दादाला तुमच्या सारखं झालं होत. तो तर काही तरी बडबड करायचा. कोणी स्त्री भूत होती ना तीच्या बाबतीत बोलत होते.रात्री ती भूत दादाला बोलवत होती "ये ना इकडे येना  रे जरा .मला बाहू पाशात घेणा रे..असं काय करतोस.." अधून मधून दादाला दरवाजा उघडण्याचा कुर्र्रर्र्र कुर्र्रर्र्र आवाज ऐकायला यायचा.सोबत ज्योती वहिणी पण झोपल्या होत्या पण त्यांना तर असा कुठलाही आवाज ऐकायला मिळाला नाही .

दादा  चालत टेकडीच्या पायथ्याशी आला. बॅगेतून  त्याने छोटीशी  टोर्च काढली . त्याच्या अंधुक प्रकाशात तो टेकडी चढू लागला. आजूबाजूला काळामिट्ट अंधार पसरला होता. रातकिड्याचे किर्र गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते. इतर वेळी दादा  झपझप टेकडी चढून उतरला हि असता पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते. माहितीतील रस्ता असूनही मनात एक अनामिक भीती दादाच्या  मनात उठत होती. काही वेळात दादा  टेकडी चढून वर आला. समोर निळसर पण गडद अंधार होता. गार वारा सुसाट वाहत होता. उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता तेथे शेत जमीन होती. तेथे त्याचा मित्र अवधूत आव्हाडचा  मळा होता. क्षणभर दादाला  वाटले, मळ्यावर जावे आणि अवध्याला  घेऊन जावे सोबत. पण अवधूत मळ्यावर नसला तर."?  कापणीचा हंगामहि सरून गेला होता. मळ्यावर कदाचित कोणी नसेलही. असा काहीसा विचार करत दादा  उभा होता.

मळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून दादा  पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास त्याला  झाला. दाट झाडी आणि झूडूपांमुळे  अंदाज लागत नव्हता पण कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते. दादाने  टोर्च त्या दिशेने फिरवला पण चार पाच पावलापुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता.

इतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर या विचाराने दादाच्या  छातीत धडकी भरली. पुढे जावे कि मागे पळावे, त्याला काही सुचेना. गार वाऱ्यातही  त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तो हळू हळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकवून झाडामागून बघत होता. समोरून येणारी व्यक्ती हळू हळू जवळ येत होती. अंधुक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती दडलं  दिसू लागली. साधारण सहा फुट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती. डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता. तो माणूस चालत चालत दादाच्या  बराच जवळ आला. जवळ आल्यावर दादाला माहित झाले कि ती स्त्री भूत होती. पांढरी शुभ्र साडी आणि अर्ध्या बाहीच पोलकं घातलं होत.घारे डोळे, रंग एकदम गोरी. स्वरूप सुंदरी  बाई होती, केसं विस्कटलेले होते,थोड्या थोड्या वेळाने घोगऱ्या आवाजात दादाला जवळ बोलावत होती. "येना माझ्या लाडक्या मला मिठीत घेणा रे. मी तुझी चंदा आहे ." चंदा च नाव काढल्या बरोबर वहिणी सावध झाल्या.त्यांच्या मनात उत्सुकता जागली कि हि कोण चंदा आहे . चंदा जसा दादाचा हात दादाचा हात ओढला आणि त्याला पाण्यात थेट तळापर्यंत  ओढून जाऊ लागली . दादांना बिलगली होती. दादा फार प्रयत्न करायचा तिच्या तावडीतून सुटण्याचा पण तिने दादाला घट्ट मिठी मारली होती. दादा जुमानत नव्हता म्हणून रागाच्या  भरात  तिने दादाला बोचकले .त्याचे केस ओढून गोल गोल पाण्यात च फिरवू लागली . दादाच्या तोंडाला तोंड लावत होती. तिची सरड्या सारखी लांब जीभ दादाच्या गालावर आणि छातीवर फिरत होती . दादाला पाण्याबाहेर आणलं .दादा घाबरून गेला होता. पार्ट तुला पाण्यात घेऊन गेली आणि तेच हरकत करायला लागली .परत पाण्याबाहेर आणलं आणि दादाला दोघे हातांनी वर  उचलून जोरात खडकावर फेकलं .दादा जोरात ओरडला  हे...आई ग.ग.ग आणि एकदम झोपेतून जागला .

दादाने  ताबडतोब एका  झटक्यात हात मागे घेतला आणि तो हात  पलंगाच्या खाली गेला कि दादा पण धडाम पलंगाच्या खाली पडला . दादाला घाम फुटला होता.डोळे बटबटीत झाले होती.केसं उडत होते.दादाचा असा अवतार बघून वहिणी घाबरल्या आणि बाबांना हाक मारली .

मग काय दादा ताडकन  उठून बसला बोलला  कि, अरेच्या , मला तर स्वप्न  पडलं होतं . आमच्या जीवात जीव आला तरीपण आई रागावली कि अश्या मस्ती मजाक नाही करायच्या कधीही .आमची काय हालत होते ते तुम्हाला नाही कळणार .दुसऱ्यांदा असे नको व्हायला

" आईला काहीतरी शंका गेली शंकेचे समाधान करून घेऊ या उद्देशाने तिने बाबांना सांगितले के कोणी बुवाला बोलवा. दादा काहीतरी बडबड करतोय.  दादाच स्वप्न  होतं तरी पण ज्योती वहिणी पण रडायला लागली होती.

बाबांनी शेजारच्या गावातला एका बुवाला बोलावले .तो यायला तयार नव्हता .म्हणाला कि त्यांना च इकडे घेऊन या .मग आई ,बाबा, दादा ,वहिणी चौघे  जण गेले होते. मी आणि सगळी पोरं घर सांभाळायला  घरी च होतो .सकाळचे गेलेले  ते संध्याकाळी सहाला परतले.

बुवाने सुरेश दादाच्या मनात घर करून बसलेला शंकाखोर भुताला मंत्राच्या जोरावर बाहेर पळवून लावले आणि सांगितले कि अश्या प्रकारची भुतांचे वास्तव्य पाण्यात असते तिला आसरा नावाचं भूत म्हटलं जात असं ते बुवा म्हणत होते. हि भुते जलपरी सारखी दिसतात . तोंड स्वप्न सुंदरी सारखं आणि शरीर माश्या सारखं .  ह्या प्रकारची भुते फार जिद्दी असतात. जो  कोणी पुरुष जर तिला पसंद पडला तर त्याच्या मागे एकसारखे पाठीशी लागून च राहतात .

नंतर ते म्हणाले ," रात्री आणि दुपारी झोपतांना रोज खिळा, विळा,चाकू , पकड,कात्री वगैरे लोखंडी वस्तू  उश्याखाली न विसरता ठेवत जा. 

दादाने जरी सांगितले कि त्याला  स्वप्न पडले होते पण त्याच्या अवतार बघून असे वाटणे नक्कीच होत कि तो खोटं बोलत होता

क्रमशः भाग १० आणि शेवटच्या भाग वर

******************************************************************************************

समंधः  (रस्त्यावरील भूत ) (भाग – दहावा आणि शेवटचा  भाग)

१५ दिवसानंतर सुलोचना ताई मुलांना घेऊन सासरी आल्या. सासूने तिचे स्वागत केले.घरची लक्ष्मी दारी आली म्हणून सासू लीलाताईंच्या पाणी उतरवले  आणि उजवा पाऊल पुढे ठेवून घरात आंत येण्यास सांगितले.

मुलं आल्या बरोबर आजींना बिलगले . आजींनी प्रेमाने तिन्ही मुलांचा मुका घेतला आणि छातीशी लावले."वाचला रे बाबांनो तुमचा बाप आणि माझा मुलगा काय झालं असत कल्पना करणे अवघड आहे.

नंतर आजोब भगवान दादा आले त्यांनी पण मुलांना मिठी मारली .सगळ्यात लहान नातवाला  मांडीवर बसविले .मुलांना झालेल्या घटने बद्दल काहीच माहित नव्हते .फक्त तुमचे  बाबा म्हणजे माझा मुलगा संपत आणि  मामा सुरेश दादा आजारी पडले होती एवढेच माहीत .

लिलाताईंनी नातवंडांसाठी जे काही खाद्य पदार्थ बनवून ठेवले होते ते सगळे डब्बे काढले आणि नातवंडासमोर ठेवत बोलल्या,"खा रे बाबांनो मी तुमच्या साठीच बनवून ठेवले होते.आणि तुम्ही आलेले आहेत तर अजून बनवते .

"काय मजा केली मामांकडे ? आजोबा बोलले

"फार मजा आली आजोबा .सकाळी उशिरा उठायचं.मामी मस्त नाश्ता द्यायच्या मग मामांच्या मुला सोबत आणि त्याच्या मित्रांसोबत खेळायला जायचो . बोराच्या झाडा वर चढलो होतो किती बोर तोडली . नंतर आंब्याच्या झाडावर चढलो ,कच्च्या कैऱ्या तोडल्या ,चिंचा तोडल्या . मामाचा मुलगा शरदच्या मित्रांकडे पत्ते खेळायचो, नंतर गोट्या गोट्या,लंगडी लंगडी , विटी दांडू खेळायचो आणि संध्याकाळी हात पाय धुवून उजळणी बोलायचो.देवाचं नाव घ्यायचो . शरदच्या मित्राची आई आणि आजी फार चांगल्या होत्या हो आजोबा . आम्हाला खाऊ द्यायची .आम्हाला तर अजून राहायचं सांगत होत्या पण आई नाही म्हणाली ."

"अरे बाबांनो इकडे पण तुमच्या सारखी मुले आहेत शेजारी सिंधू ताई आहेत त्यांची मुले आहेत मी ओळख करून देते तुमची.मग तुमची आणि त्यांची मैत्री पक्की : आजी लीलाताई म्हणाल्या

रात्री संपतचा  फोन आला होता त्याने सुलोचनेशी बोलणं केलं. मग आई बाबा आणि मुलांशी पण बोलला .आता संपतला फारच बरे वाटत होते.थकवा पण उतरला होता. पत्नीशी बोलला,"अगं आता मी इकडे स्वस्थ आहे माझी काळजी नको करू. तेथे मनसोक्त  रहा .मुलांच्या शाळा सुरु व्हायला अजून बरेच दिवस आहे ."

पंधरा दिवस कुठे निघून गेले ते कळलं च नाही . सुलोचनाबाईंना आता वारण्याला जायची हूर हूर लागली होती. बाहेरच खाऊन नवऱ्याची तबियत अजून बिघडेल ह्या विचाराने ती आता जाण्यास उत्सुक झाली होती. कसे बसे १८ दिवस काढले. कारण ती पण आता कंटाळली होती. मुलांची शाळा सुरु होण्यास एकच आठवडा बाकी होता. मुलांची शाळेची तयारी करायची  होती.गणवेश, बूट ,मोजे, पुस्तके ,वह्या,कंपास पेटी वगैरे घ्यायची होती.पुस्तके आणि वह्यांना पुष्टे चढवायची .घर साफ करायचे .बरेच काम होती.

विसाव्या दिवशी जड अंतःकरणाने तिने सासू सासरे आणि शेजार पाजाऱ्यांचा निरोप घेऊन वारण्याला जाण्यास निघाली होती. सासूने सुनेला स्वतःच्या मुली सारखे वागवले होते. सासू आणि सुनेचे डोळे भरून आले होते. तिने सासू सासऱ्याचे  पाय पडत म्हणाली आई.. बाबा  निघते मी .तुम्ही तबियातला सांभाळा .अधून मधून मी यायचा  प्रयत्न करेन."

"अहो मावशी, शेजारच्या आजी  सिंधुताई आणि सावित्री काकूंना  भेटत म्हणाली कि लक्ष ठेवा आमच्या आई बाबांकडे .

"रघु भाऊजी लक्ष ठेवा हो माझ्या आई बाबांकडे . "

"अहो वहिणी ते तुमचे एकट्याचे नव्हे तर आमचे पण आई बाबांपेक्षा खास  आहे .तुम्ही आणि संपत बिलकुल काळजी करू नका.निश्चित व्हा आणि जा."

रघु सुलोचनाबाईंना आणि मुलांना थेट बस स्टॅन्ड पर्यंत सोडायला आला होता. त्यांना  बसमध्ये व्यवस्थित बसविले आणि बस सुटे तो पर्यंत थांबला होता. दहा मिनिटांनी बस सुटली आणि जायला लागली वारण्या कडे.

तीन वाजता वारण्याला बस पोहोचली .बस स्टॅन्ड वर संपत घ्यायला आलेला होता. रिक्षेने सगळे साडे  तीन वाजता घरी पोहोचले

तीन चार दिवस मुलांना करमेना .सुलोचना बाई तर घर कामात व्यस्त झाल्या होत्या पण मुलं ? कंटाळली होती कारण त्यांचे मित्र अजून गावाहून आले नव्हते . रात्री सुलोचनाबाईंनी कोसंबीला सासू सासऱ्यांना वारण्याला सुखरूप पोहोचल्याचा फोन केलं नंतर जांभळीला पण आई ,बाबा, दादा आणि वहिनींना फोन केला .

"आता तुम्ही सगळे वारण्याला या. इकडे शहरात बरेच बघण्यासारखी ठिकाणे आहेत आपण सगळे जाऊ या ."

आपुलकीने सुलोचनाबाई बोलल्या .बऱ्याच वेळ पर्यंत बोलणं  चालू होतं.

सुलोचना बाईंनी घड्याळात बघितले.."अरे बाप रे .वहिणी ठेवते मी फोन तब्बल ४० मिनिट मी तुमच्याशी बोलले .बोलण्या बोलण्यात वेळे कडे. लक्ष गेले नाही

"हो ना ताई..चला ठेवते मी पण "

***********************************************************************************

पंधरा दिवसांनी सुरेश दादाने मेहुणा संपतला फोन केला," काय राव बरी मजा आहे कि नाही ?  धंधा वगैरे कसा आहे?

"अरे दादा एकदम झकास .काहीच अडचण नाही .एकदम व्यवस्थित चाललीय  गाडी" संपत म्हणाला

"अरे हो गाडी वरून मला आठवलं पुढच्या महिन्यात शेतात कापूस आणि तीळ निघणार आहे आणि तुम्हाला यावे लागणार आहे.बैल गाडीने आपण जाऊ कि शेतात आणि त्या दिवसासारखे रात्री येऊ परत."

"अरे ...नाही बाबा ...वाचलो आपण सगळे " नकारात्मक उत्तर देत संपत बोलला

"अहो राव घाबरता काय एवढे आपण सोबत डॉक्टर आणि तांत्रिक ला घेऊन जाऊ ना.."

"नाही रे बाबा माफ करा " संपत  म्हणाला

"अरे पाहुणा , मी तर तुमची मजाक करतोय. आता कसले कापूस आणि कसली तीळ. काही नाही .आम्ही कापूस आणि तीळ पेरलं च नाही ..हा हा हा .." सुरेश जोरजोरात हसायला लागला.

******************************************************************************************समाप्त