politics books and stories free download online pdf in Marathi

राजकारण

आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या भारताची लोकसंख्या  143 कोटी झालेली आहे आता जर एवढी मोठी भारताची लोकसंख्या आहे.लोकांना रोजगार मिळणे सुद्धा आवश्यक आहे पण रोजगार कसा मिळेल खूप कठीण झालेले आहे  कारण आपल्याला माहिती आहे राजकारण चाललेली आहे चांगल्या शिकलेल्या माणसाला रोजगार मिळत नाही.  

त्याच्यामध्ये राजकारण काय चाललेले आहे हे आपल्याला पाहणं खूप गरजेचे आहे कारण या राजकारणामुळे सामान्य माणसावर किती परिणाम होत आहे ते सामान्य माणसालाच माहिती राजकारण म्हटलं तर पॉलिटिशन जे म्हणजेच  नेते नगरसेवक, मुख्यमंत्री ,त्यांचे विरोधी नेते ,आणि त्यांचे जवळचे नेते याच्यामध्ये हा प्रश्न येतो की हे किती शिकले आहेत हे आपल्या राज्यासाठी काय करत आहे ? आपल्या राज्यात किती डेव्हलपमेंट झालेली आहे?आपलं राज्य पुढे आहे की नाही ? राज्यात शिक्षण कसे चांगले देता येईल ?आपल्या राज्यात गरिबी कशी मिळवता येईल ?आपल्या राज्यात झोपडपट्ट्यांना कमी करून त्यांना चांगले घरे कशी देता येईल ?हे सर्व विचार न करता नेते महा नेते मुख्यमंत्री प्रधानमंत्री हे राजकारण करतात !

आता तुम्ही बोलतील  की हे सामान्य गोष्ट आहे पण ही सामान्य गोष्ट नाही कारण फरक पडतो... नेते महान मुख्यमंत्री हे सर्व मंत्रिमंडळ जर ह्याच्यासाठी परीक्षा ठेवल्या गेल्या आणि त्यांची इमानदारी ,त्यांची बुद्धी मता, त्यांची भावना  सामान्य नागरिकासमोर कशी आहे हे सर्व काही परीक्षांमध्ये करून मंत्रिमंडळ मध्ये घेतलं तर तुम्हाला असं नाही वाटत का शिकलेला माणूस आपल्याला म्हणजे सामान्य माणसाचा विचार करेल !

पण हे कोण करणार आता मी अशिक्षित व्यक्तीचा  अपमान करत नाही पण माझं म्हणणं हे आहे राजकारण जर थांबवलं आणि मंत्रिमंडळ बनवण्यासाठी राजकारण नव्हे परीक्षा घ्याव्यात ज्याच्याने जे शिक्षित लोकं बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि मुख्यमंत्री ,महानगर सेवक , महापौर ,उद्योग मंत्री, गृहमंत्री ,खाते वाटप मंत्री ,वगैरे हे राजकारण करणार नाही .!

जर तुम्ही सांगा जर तुम्हाला चांगले मार्क्स असून परसेंटेज असून जर तुम्हाला ओबीसीएसटी रिझर्वेशन ई डब्ल्यू एस आशा कास्ट मुळे तुमचा सिलेक्शन नसेल होत कारण कॉम्पिटिशन वाढलेले आहे आणि सीट कमी आहे बघायला गेले तरी जी डॉक्टर साठी परीक्षा होते सीट एवढ्या कमी आहेत आणि वीस लाख विद्यार्थी  परीक्षा देतात तुम्हीच सांगा दोन लाख विद्यार्थी साठी सीट आहे आणि वीस लाख लोक बसले आहेत परीक्षा द्यायला तर त्या 18 लाख विद्यार्थ्यांचा काय होईल? 

राजकारण मुळेच हे सर्व काही होत आहे हे तुम्हाला लिंक सारखं  कळून येईल आपल्या जीवन एकदाच आहे सामान्य असून मिडल क्लास असू नका श्रीमंत असो पण सगळ्यांना जीवन सारखंच असतं पण पैशाने अशी जागा घेतलेली आहे की चांगल्या माणसालाही पैशासाठी झुकावे लागते जर आपलं राजकारण कमी झाले तर मंत्रिमंडळामध्ये परीक्षा झाल्या आणि परीक्षा देऊन नेते मुख्यमंत्री हे सर्व नेते बनले तर जे सामान्य माणसावर अन्याय होत आहे आजच्या काळामध्ये एक किलो टमाटे 120 रुपये किलो आहे .

सामान्य माणसांनी 120 रुपये किलो टमाटे कसे घेणार याचा विचार करत राजकारणी लोक जर राजकारण थांबवले तर सामान्य माणसाला एवढे महा टमाटे घेणे कसे कमी करता येईल भाऊ याच्याकडे लक्ष देता येईल पण असे राजकारण लोकी करणार नाही हे आपल्याला माहिती आहे पण श्रीमंतांसाठी 120 रुपये किलोटमाटर काहीच नाही. त्यांच्यासाठी हा तर मुद्दाच नाही त्यांना राजकारणामध्ये काहीच संबंध नाही त्यांना त्यांचे काम आणि घर एवढेच असते .

आत्ताही आपल्याकडे वेळ आहे आपल्या राज्याला आपल्याला पुढे करायचे आहे त्यासाठी आपल्याला रोजगार मिळणे खूप आवश्यक आहे रोजगाराच्या संध्या कशा उपलब्ध व्हावा आणि ज्या सामान्य माणसाचे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे मिळवता येईल हे फक्त बोलून नावे तर प्रॅक्टिकली मिटवणेआवश्यक आहे !त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावे लागेल त्यासाठी तुम्ही विचार करा.

धन्यवाद!