Narakpishach - 9 books and stories free download online pdf in Marathi

नरकपिशाच - भाग 9

द-अमानविय सीजन 1
आग्यावेताळ....भाग 9..वेताळ..मंदिर...

रात्रीच्या किरर्र कालोखात , रातकिड्यांच्या मृत्युगीतात एकावर एक ढोलवर प्रहार करत विशिष्ट प्रकारचा ढोल बदडवण्याचा ( धम, धम, धडाड, धम) आवाज होत होता.
मनावर मलभ पसरवणारा, उदासीनतेची पकड बसवणारा..शहनाईचा मलभी धुन अ-स्वर प्रेतयात्रेत वाजणारा आवाज हॉट-होता.
हा आवाज कानात शिरताच , कानाच्या पोकळीतुन डोक्यातल्या मेंदूत मग तिथून खाली मनात जात भीतीच्या पेटा-यात मग पोटात जात एक भीतीजनक गोळा निर्माण करत होता.
वेताळाची फौज पिशाच्च-वळ वेग-वेगळ्या प्रजातीच भुत नाचत, उड्यामारत , मेंटल हॉस्पिटल मधल्या वेड्यासारखी तोंडात बोट घालून खिदी-खिदी कसतरीच हसत एक-एक पाऊल वाढवत, उड्या मारत, हवेत उडत, सरपटत, झाडांवरुन माकडासारखी झेप घेत वेताळाच्या मंदिराच्या दिशेने येत होती.
वेताळाची पाळखी चार प्रेतांनी खांद्यावर धरुन ठेवलेली. त्या चारही जनांची शरीर यष्टी एका जेलमध्ये कैद्याला फाशी देणा-या जल्लाद सारखी होती .जाड-जुड हात पाय ! सुटलेत पोट ..काळा रंग, वटारलेले लाल-नसा दिसणारे डोळे, खाली एक काळी लुंगी, डोक्यावर टक्कल, एक मोठी मिशी असा त्यांचा पेहराव होता. त्या चारही जनांना पाहताच मनात भीती वाटत होती. परंतु हे तर काहीच नव्हत. पालखीच्या मागे-पुढे शेकडोने चित्र-विचित्र प्रजातीची भुत उपस्थीत होती. रडत, विव्हळत, सरपटत, हेलकाढत,हवेत उडत चाललेली . कोणाच डोक फुटलेल..हात तुटलेल पाय तुटलेल..कोणाच डोक नव्हत..डोळे होते, तोंड नव्हत.
..कान होते सशासारखे लांब होते.कोणी हसत होत..कोणि लहान मुलासारख अंगठा चुकत , मांस चघलत खात होत.
कोणाचा चेहरा पांढ़रा फट्ट होता. तर कोणाचा काळा, सुजलेला होता!
जर कोणि सामान्य मनुष्य हे दृष्य पाहील तर एकवेळ त्यास holloween साठी हे सर्व विचित्र अवतार धारण केलेले माणस आहेत अस नक्कीच वाटून जाईल! परंतु त्यांना पाहणारा पुढच्या अमावस्याला त्यांच्यातच सामील होत असे! कीती विचित्र आहे नाही.!
." वेताळाच मंदिर जवळ आहे! अमावास्याची मध्यरात्र झाली आहे .! ढोल बदडवण्याचा , मोठ-मोठ्याने ओरडण्याचा , हसण्या खिदळण्याचा , विव्हळण्याचा आवाज गारठा, क्षणात वाढ़ण्यात येत आहे ! हे सर्व संकेत म्हंणजेच वेताळाची सेना येत आहे! तो जागा होत आहे ..आपल्या वर्षानु-वर्षं गाढ निद्रेतुन जागा होत आहे! "
हे असले भयानक, भीतियुक्त विचार मनात येताच फुग्याच्या अंगावर सर्र्कन काटा आला ! इतक्या सर्व वेदना होऊन ही फुग्याला भीती सुद्धा वाटू लागली! भीती ह्या शब्दात एक भयंकर अघोरी शक्ति लपलीये..जिच वापर ती योग्यवेळीच करते! मनात एक-एक अकल्पित, अकल्पिनीय विचारांना वळण फुटत..मग त्या कोड्यांच्या वळणात माणुस भरकटला , हरवला जातो आणि तो असा काही भरकटला, हरवला जातो की त्यास बाहेर पडण्याकरीता दोन मार्ग शिल्लक राहतात. प्रथम सोप्प पर्याय मृत्यु पत्कारण आणि दूसर कठीण पर्याय त्यासमवेत दोन हात करण..हिम्मत, एकटवुन लढा देण!
ह्या दोन पर्यायातुन फुग्या कोणत पर्याय निवडणार होता? दोन हात करणार होता? की आपला आत्मा, देह त्या हिडिस पिशाच्च, भुकेल्या आकृत्यांना दान करणार होता ?
जंगलातल्या एका झाडाचा आधार घेत फुग्या कस-बस उभा राहीला!
अंगात त्राण शिल्लक नव्हते. रक्तावाटे शक्ति निघुन गेली होती. हात-पाय हलके झालेले डोळ्यांभोवती अंधारी येत होती. ज्याने पुढच दृश्य अंधूक-अंधुक दिसुन येत होत. त्याच अंधुक-अंधूकश्या नजरेत फुग्याला समोरुन खुप सा-या तांबड्या रंगाचा गोल हलणारा प्रकाश पुढे-पुढे येताना दिसला.फुग्याने सुखलेल्या- वाळलेल्या गळ्यातुन कसतरी एक आवंढा गिळून एक-दोन वेळेस डोळे उघड-झाप केले .तसे त्यास समोरच द्र्ष्य पहिल्या पेक्षा चांगल दिसू लागल .एकंदरीत डोळ्यांची दृष्टीच परत आली .डोळ्यांना दृष्य जरी स्वच्छ दिसू लागल असेल .परंतु पुढील दृष्य पाहण्याजोग्य नव्हत! भीतीने हदयाचा थरकाप उडावा, रक्त गोठल जाव, डोळे मोठे होत विस्फारले जावे , शरीरावरचा एक-नी -एक केस ताठरपणात तब्दील व्हावा.तोंडाचा आ वासावा अस काही ते दृष्य होत.
जे पाहुन फुग्या झुडुपांत लपुन बसला व पुढील दृष्य पाहु लागला.
दूर जंगलातून शेकडो मशाली पुढे-पुढे सरकत येत होत्या. त्या तांबड्या प्रकाशात विविध-प्रजातीची पिशाच्चवळ सामील होती. चेटक्या, मुंजा,
पाहाडी हडळ, रक्तपिशाच्च, सोंगाट्या, कैकृलाक-मंदाकीणी , कंडार,
झोंबाट्या, जखीण, भुत, पिशाच्च, याक्षीणी, मोहिनी, कालोख्या, मसनवाट्या, नाना त-हेच्या भुतांनी गर्दी केलेली . कोणि मोठ-मोठ्यान हेल काढत होत..कोणि कमरेवर खाजवत हसत होत..कोणी नाचत होत.
कोणि रड़त तर लागलीच हसत होत. काय-काय येड्यावाणि चाले-चालले होते. कोणी-कोणाच्या डोक्यावर टपली मारुन, त्याच धड-डोक घेऊन , उपटून पळत होत. पोट-धरुन हसत खिदळत होत.
कोणाचा पांढराफट्ट चेहरा तर काहींचा काळा होता. तर काहींच नुस्त धड होत कान नाक , डोळे, ओठ ही अवयव त्यांना होतीच नाही.फुग्या एकटक हे सर्व अमानविय , अकल्पिनिय द्रुष्य आपल्या मेंदूच्या फुटेज, रिकोर्ड मध्ये साठवत होता. जळलेल , होरपळलेल ,भाजलेल , हात -पाय-तोंड काय ते बिभत्स रुप पाहून फुग्याच्या पोटात मळ-मळू लागलेल.एकक्षण त्याच्या मनात विचार सुद्धा आला वांती होईल की काय !
" मालक!............!"
एक घोगरा आवाज त्या वातावरणात घुमला जो की फुग्याने ऐकताच त्याच्या कानातल्या पडद्यांच्यावर आदळला जात एक स्फोट झाला! काहीक्षण तो आवाज थांबला व पुन्हा ऐकू आला
.. "... उठा... ! मालक....पालखी आलीया.!....
..हिहिहिहिहिही खिखिखिखिखी..!"
घशातच हसण्याचा आवाज..!
" मालक ! तुमची सेना आलीय....मालक! पाळखी घेऊन
..आलोये.. दर्शन द्या मालक दर्शन द्या..!"
ते पिशाच्च अस म्हणाल . त्यासरशी त्याच्या ह्या वाक्यावर तिथे जमलेल्या भुतांनी तोंडावर हाताची पाचही बोट आपटत एक विशिष्ट प्रकारचा आवाज बाहेर काढु लागली ( उं, आ..बा..अब्बा......ब्बा बा)
प्रेत यात्रा निघतावेळेस निघणारा हा आवाज भयंकर होता .त्या आवाजाने छातीत असलेला हदय धड-धड धड करत होता जणु बाहेरच येईल! विस्फारलेल्या नजरेने फुग्या सर्वकाही पाहत होता.अकल्पनीय, अकल्पित, निसर्गास न प्राप्त झालेले नियम अनुभवत होता .
" थांबा ..माझ्या भक्तांनो..?" एक आज्ञाधारक गरजण्याचा घोगरा भरडा मिश्रित आवाज त्या कालोख्या रात्री घुमला की तिथे जमलेली भुतावळ नी त्यांचे येडचाळे हसण खिदळन , हसण्याच्या ओरडण्याचे आवाज क्षणात बंद झाले .काहीक्षण तो आवाज हे वाक्य उच्चारुन थांबला जात पुन्हा ऐकू आला.
. " प्रथम शस्त्र ! येउद्या..? माझी तलवार येऊद्या..! रक्ताने
माखलेली..मांस कापलेल..! माझ शस्त्र येउद्या..!मग मिळेल दर्शन ? ...हा, हा हाहाहाहाहा...!"
एक गड-गडाटी हास्य घुमल. त्याचबरोबर ढग चिरकले जात विज कडाडली..! आभाळ फाटल ..थेंब-थेंब पावसाळा सुरुवात झाली.
□□□□□□□□□□□□□□□□
हाड, मांस गोठवणा-या त्या नदीच्या थंड पाण्यात भग्या ग्ंग्याचा आपल्या मित्राचा शोध घेत होता. परंतु गुफेसारख्या दिसणा-या त्या होलमधुनन निघणा-या हिरव्या रंगाच्या प्रकाशाकडे पाहताच भग्या तिक्डे जाऊ लागलेला. विशिष्ट प्रकारे हात:-पाय हळवत तोंडावाटे बुड-बुडे सोडत भग्या त्या होलपाशी पोहचला. भलमोठ काल्या रंगाच एक दगड होत.
त्या दगडाला गुहेसारखा होल होता. त्या होलमधुन आत-पाहताक्षणीच काळा-कुट्ट जबडा वासलेला अंधार दिसुन येत होता. मगाशी दिसलेला तो हिरवा प्रकाश न जाणे आता कोठे गायब झाला कोणास ठावुक! टॉर्चचा उजेड सुद्धा कमी पडत होता की काय इतका तो घन-घोर सापाच्या कालपट चामडीसारखा अंधार पसरलेला. हातातील टॉर्च-चा गोल पिवळा उजेड-प्रकाश जेम-तेम 15-20 मीटर इतक दुर जात होता बाकी सर्व अंधार होत. भग्याने आजु-बाजुला पाहायला सुरुवात केली. त्या मोठ्या गुफेसारख्या होल-मधुन येणार हिरव प्रकाश आता दिसुन येत नव्हत.भग्याला सुद्धा नवल वाटल! मग तो प्रकाश होता कसला? हा प्रश्ण सुद्धा त्याच्या मनात आला तसेही साहजिकच होत ते ..प्रश्न निर्माण होण.
भल्यामोठ अजस्त्र राक्षसाच्या जबडा वासलेल्या मुखाप्रमाणे ते होल भासत होत. त्या अंधारात न जाणे काय असेल..? काय दबा धरुन बसला असेल ? जिवंत आहे ! ..की..मृत आहे? आपण आत जाऊ परंतु
बाहेर येऊ शकू का? नाना त-हेचे प्रश्न भेडसावत होते, डोक्यात वादळ निर्माण करत होते. भग्या पाण्यामध्ये असल्या कारणाने त्याच्या कानांत एक विशिष्ट प्रकारचा आवाज गुंजत होता.स्पेस मध्ये ज्या प्रकारे एक विशिष्ट आवाज निघाला जात असतो त्याच प्रकारे पाण्यात सुद्धा एक विशिष्ट आवाज ऐकू येत असतो. त्या दगाडापाशी हात-पाय हालवत फुग्याने आजुबाजूला पाहायला सुरुवात केली.त्यासरशी त्या गोल पिवळ्या रंगाच्या टॉर्चच्या फिरणा-या प्रकाशात भग्याला गुहेच्या
मुखापाशी हिरव्या शेवाळीत एक मनुष्याची चप्पल अडकलेली दिसुन आली. ती चप्पल भग्याने ह्या अगोदर सुद्धा कोठे-तरी पाहीलो होती. पन कुठे ? पुढच्या एका-क्षणात भग्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
" अरे हा...! ही चप्पल तर गंग्याची हाय..!"
भग्या मनातच म्हणाला व थेट त्या भल्यामोठ्या राक्षसाच्या जबडा वासलेल्या गुहेतल्या कालमुखात शिरला. तसे त्याची पुढे-पुढे जाणारी आकृती पुढे-पुढे जात त्या अंधारात कायमची पुसली गेली.
□□□□□□□□□□□□□□□□□□
पाषाणवाडीत लाल रंगाचे ढग जमा झालेलें. महादेवाच रौद्र अवतारातल
तांडव अद्याप सुद्धा जारी होत.विजांच कडाडण- थय-थयाट बरसण सर्व काही सुरु होत. फट, फट आवाज करत त्या काळ्या रंगाच्या सावळ्या बरसणा-या विजांसरशी फटाक्यासारख्या फुटत होत्या.त्यातून काल्या रंगाची राख पसरुन घाणेरडा वास सुटलेला. मांस, चामडी, होरपळून भाजल्याच्या, केस जळाल्याचा वास सुटलेला.
विघ्नेशच्या सुद्धा शरीराची राख-रांगोळी झाली होती .पन ती राख काळ्या रंगाची नसुन सफेद रंगाची होती. त्या सैतानांच्या मनात , देहात वावरणा-या कलिच्या वाईट हेतू विचारांच्या गर्तेत जाऊन त्या वाईट शक्तिंची काली राख झालेली कारण त्यांच्या जगण्यात वावरण्यात एक असत्यता होती . परंतु विघ्नेशच वागण , बोलण, स्व्भाव , भक्ति हे सर्व काही सत्य होत. त्याच्या वागण्यात कसलाही क्प्टी नीचपणा नव्हता.
बोलण्यात अपशब्द नव्हते. स्वभाव भोळेनाथ सारखा भोळा होता.
वाईट हेतुंच्या समर्थाचा कलिचा भक्त नसुन साक्षात देवांचा देव महादेवाचा भक्त होता. एकुन त्याच्या अंगी वाईट प्रवृत्ती नव्हती शरीरात देहात रक्तनी रक्तातात देवाची भक्ति होती . तिचा अंश होता म्हणुनच त्याच्या शरीरावर झालेल्या प्रहाराने त्याच्या देहाची राख सफेद रंगाची झाली होती.
" विघ्नेश! ...बाळ...विघ्नेश..! "
महांक्राल बाबा जमिनीवर पसरलेल्या विघ्नेशच्या सफेद रंगाच्या राखे समोर येऊन बसले . आपल्या थर-थरणा-या हातांनी ! डोळ्यांतील
चिंब भिजलेल्या आसवांनी ती राख दोन हातांच्या गच्च मुठीत भरुन घेतली. व पुढच्याचक्षणाला हूंदके देत विघ्नेशच्या आठवणीने ती गच्च आवळलेली मुठ सैल सोडली गेली.तसे ती राख पुन्हा एकदा हळूच त्या ढिगावर पडू लागली.
वातावरणात शोक पसरलेला. महादेवाच रौद्र अवतार आता थांबल होत. आकाशातली महादेवाची मूर्ती सद्रष्य आकृती आता नाहीसी झाली होती. पाषाणवाडीत आतंकवाद्यांसारखे घुसलेल्या सर्व पिशाच्च , काळ्या आकृत्यांचा अंत झालेला. परंतु लाखो, करोडोने असलेल्या विरोधी सैन्यातले हजार सैने मारले म्हंणजे लढा जिंकलो का? नाही ना ? मग जो पर्यंत पुर्णत विरोधी सैन्य ठार होत नाही तो पर्यंत लढा द्यावा लागतो .रक्ताचा पाठ वाहू किंवा वाहावा लागतो. त्या शिवाय जिंकण असंभव असत !त्या इंचभर सेनेचा अंत झालेला , परंतु त्या सर्वांचा मुख्यअजुन येणार होता.तो बाकी होता आपला सुड उगवण्यासाठी तो येणार होता.आग्यावेताळ येणार होता.
" महाकाल...! ह.......ह...ह..!" डोळ्यांतुन अश्रु निघाल्या जात, मुखातुन निघणा-या हूंदक्यांसरशी महांक्राल वर आकाशात पाहत म्हणाले.
थोड वेळ ते आपल वाक्य उच्चारुन थांबले होते तसे ते पुन्हा उच्चारले .
" महाकाल..! माझ्या विघ्नेशची काय चुक होती रे..? का त्या निष्पाप
जिवाच अस भयंकर अंत झाल..? काय केल होत त्याने..? काय चुकी
होती त्याची..? " महांक्राल बाबा आपल्या जागेवरुन उठले व पाणावलेले डोळे पुसून पुन्हा वर आकाशात पाहत म्हणाले .
" महाकाल....! मी ज्याप्रकारे तुझी नेकमनाने भक्ती केली त्याच प्रमाणे माझ्या विघ्नेशने ही केली!" महांक्राल बाबांचा एक नी एक शब्द पुर्णत पाषाणवाडीत गरजत होता..घुमत होता.
" लहानपणा पासुन तुझ्या नामाच जप मी विघ्नेशला शिकवल ! त्यास शिवभक्त बनवल ! चांगल वागण...सत्याच्या वाटेवर चालवन शिकवल!
देवांचा देव महादेव पुत्र गणेश नावाप्रमाणे विघ्नेश हे नाव दिल! परंतु आज आताह्याक्षणी तुच तुझ्या पुत्राचा भक्ताचा अंत केलास! हेच का तुझ रौद्र-अवतार रुप ज्यात आपल्या भक्ताचा प्रेम सुद्धा दिसुन येत नाही." महांक्राल बाबांच्या ह्या वाक्यावर आकाशात एकावर एक ढग घासले . नी अशी काही आकाशात वेडेवाकडे रुप धारण केलेली विज चमकली की एक मोठा कानठल्या बसवनारा आवाज झाला. समुद्र खवळल गेल . मोठ-मोठे डोंगर कोसळले गेले .धरती फाटली गेली. ढगांमधून पावसाचा मारा होऊ लागला पुर आल गेल.
□□□□□□□□□□□□□□□□□
मनुष्य वस्तीपासुन कित्येक तरी दुर हिमालयात!
ज्या दिशेला पाहाव तिथे सफेद रंगाच बर्फ नजरेस पडत होत.विलक्षण अशी मनधुंद करणारी ही शांतता एक वेगलाच परमसुख मनाला देउन जात होती. थंड हेवेच्या गारव्यान अंग शहारून जात होत.मोठ मोठे बर्फाचे शिखर व त्या आडून डोकावणारा तो रात्री चा चंद्र अदभुत , मनमोहक अस डोळ्यांसमोरून वाहनार हे दृश्य कोण्या स्वर्गसुखा पेक्षा कमी नव्हत मित्रांनो ! त्याच हिमालयाच्या एका पर्वतावर एक गुप्त गुहेच्या आतमध्ये महादेवाची खुपच उंच व मोठी व्याघ्रांबर वर विराजमान असलेली मूर्ती होती .त्या मूर्तीच रुप एका शिल्पकाराने आपल्या पुर्णत भक्तिभावाने घडवल असाव अस दिसुन येत होत. कारण ती महादेवाची मूर्ती एका दगडाने कोरलेली होती. नागराज , व्याघ्रांबर, गळ्यातळ्या रुद्राक्ष माळा , जटा, चंद्र, त्रिशूल ,सर्व अगदी खरे असल्यासारखे भासुन येत होते. पुढे एक चमत्कारीक दृश्य होत मित्रांनो ...त्या गुहेच्या वर एक मोठा गोल होल पडला होता . त्या होल मधुन चंद्राची किरणे महादेवाच्या मूर्तीवर पडत होती. त्या किरणांनी ती मूर्ती पूर्णपणे उजळून निघाली होती त्याच गुहेत थोड आडबाजुला एक योग पुरुष ध्यानस्थ बसले होते .सफेद रंगाचे मोठे केस , व त्याच रंगाची मोठी दाढी आणि अंगात सफेद रंगाचे वस्त्र होते.व गळ्यात काहीबाही रुद्राक्ष माळा होत्या....त्यांच्या चेह-यावर थोडे त्रासिक भाव दिसुन येत होते.अचानक त्यांनी आपले डोळे उघडले व त्या मोठ्या महादेवाच्या मूर्तीकडे पाहिल व म्हणाले .
" ठिक आहे महादेव ! महांक्राल ला सुचित कराव लागेल! अन्यथा आपल्या पुत्र-प्रेमापोटी त्याच्या हातुन काही अपरिहार्य व्हायला नको..!" त्या तेज पुरषांच्या मुखातुन हे शब्द-बाहेर पडले त्यासरशी त्यांच्या शरीराभोवती हवेत निळ्या रंगाचा एक वलय निर्माण होउ लागला आणि पुढच्याच क्षणी ते आपल्या जागेवरुण गायब (टेलिपोर्ट) झाले .
□□□□□□□□□□□□□□□□□
त्या गोल गुहेत शिरल्या नंतर काहीक्षणातच भग्याच्या अवतीभवतीच पाणि कमी-कमी होत जात तो एका वेगळ्याच मितीत एका वेगळ्याच ठिकाणी पोहचला होता.गुहे आत सुखलेली जमीन होती.खाली थोडफार पेंढ पसरलेल
आजुबाजुच हे द्रुष्य टीपणारी भग्याची नजर समोर गेली . त्यासरशी त्याच्या नजरेस एका बोगद्यासारख दृष्य दिसल. डाव्या-उजव्या बाजुला दोन दगडीच्या भिंती होत्या. त्या भिंतीवर एक-एक करत खुप सा-या मशाली अडकवलेल्या.त्या मशालींचा तांबडा प्रकाश काय तो खाली पसरला जात होता.हा बोगदा जेमतेम 80-90 मीटर अंतरा पर्यंत पसरला होता. कारण मशालींची रांग , तांबडा प्रकाश सुद्धा दूर-दुर पर्यंत पसरला जात अंदाज बांधता येत होत.
त्या तांबड्या रंगाचा प्रकाश पाहुन अस भासत होत ...की न जाणे कित्येक प्रेत रुपी स्मशानशांततेत चिता जळत आहेत.कारण त्या गुहेत सुद्धा तितकीच प्रखर शांतता पसरलेली.काडीचाही आवाज येत नव्हता.
भग्याने एकवेळ मागे पाहील, तसे त्याच्या नजरेस 15-20 मीटर अंतरावर काळ्या रंगाच नदीच पाणि दिसल .त्याने मागे वळून ह्या अर्थी पाहीलेल की निघुन जाव ह्या जागेतुन हे काहीतरी वेगळे आहे.मानवाच्या आकळन क्षमतेच्या पलिकडच आहे .नाहीतर ह्या पाण्याखाली भल कोण राहत असेल? ह्या इतक्या सर्व मशाली कोणी भिंतीवर लावल्या असतील? कोण राहत असेल ह्या गुहेत? भग्याच्या मानवी-मनात प्रश्णांच्या लाटा उसलु लागल्या. एकवेळ तर त्याला आपल्या आज्जीने लहानपणी सांगितलेली सर्प-पिशाच्चाची गोष्ट सुद्धा आठवली . की सर्प-पिशाच्च समुद्रात खोलवर नदीच्या पाण्यात गुहेत रहातात. शिकार करुन आपल्या शिकारास ते त्या गुहेत नेऊन हाल-हाल करुन त्याच्या शरीरा समवेत खेळ-खेळून मारुन-खावून टाकतात.त्यांच्या गुहेत मानवाची , प्राण्यांची ढीगनी-ढीग हाड पडून असतात. त्यांची काया मानवाच्या शरीरापेक्षा कित्येक तरी फुट मोठी असते. सर्पपिशाच्चाच रुप सामान्य सर्पा पेक्षा कित्येकतरीपटीने आगल-वेगळ क्रूर असत. त्यांच्या कडे मायावी शक्ति असते.ज्याने ते काहीही अमानविय रुप धारण करु शकतात. काही-बाही न समजण्यापलिकडचे चमत्कार करु
शकतात.
" अर बापरे ! ही त्या सैतानी सापाची गुहा तर नाय ना?"
भग्याने आपल्या स्व्त:लाच प्रश्न केला.व आजूबाजूच निरीक्षण करत पुन्हा म्हणाला.
" नाय, नाय ,नाय ,नाय...! तसल काय बी नसल ! जग कुठ पोहचलय ..आण म्या काय इचार करतू..! हिहिहिही...."
भग्याने आपल्या मुखातुन एक हास्य सोडत हे वाक्य उद्दारत आपल्या घाबरलेल्या -भेदरलेल्या मनास वाईट विचार येणा-या मेंदूस बळ देण्याच ठरवल. मग एक -एक पाऊल वाढवत तो हळूच आजुबाजुचा कानोसा घेऊन मशालींच्या तांबड्या प्रकाशात पुढे-पुढे सरकू लागला.त्याच्या प्रत्येक पुढे-पुढे सरकणा-या पावलांचा आवाज त्या दोन भिंतींवर आपटला जात चारही दिशेना गुंजत होता.नाका-तोंडावाटे आत-बाहेर जाणा-या श्वासांचा आवाज कानी पडला जात होता.कानसुळ्या न जाणे का परंतु गरम झाल्या जात कान टवकारले गेले होते. जणु भग्या कोणतही धोक पत्कारु शकत नव्हता कारण तो सावध झालेला हेच ते चिन्ह होते .परंतू धोका कसला होता? धोका होता तरी काय ? की इतकी सावधगिरी आपण उराशी बाळगत आहोत ? भग्याच्या सुद्धा मनात विचार येऊन गेला परंतु त्या प्रश्नांच अर्थ-निर्विकरण होत नव्हत !
कधीही न वाटलेली अनुभवलेली भीती आज इतकी वर उफाळून आली गेलेली की हात पाय अक्षरक्ष थर-थर काफत होते.तांबड्या रंगाच्या दुर-दूर पर्यंत पसरलेल्या त्या मशालींची रांग पाहून एक वेगळीच भीती मनात निर्माण होत-होती. ती भीती भग्या अनुभवत होता.
" भग्याह्या....ह्या .............!"
घशातुन हलुवारपणे आवाज काढाव तसे कोणीतरी भग्याच्या नावे हाक मारली. आणि त्या दोन भिंतींमधुन तो आवाज मशालींच्या तांबड्या उजेडात सरळ रेषेत भग्याच्या दिशेने येत त्याच्या सावधगीरी बाळगुन असलेल्या पवित्र्यने तो आवाज बरोबर हेरला .परंतु त्या आवाजतला प्रकार मात्र त्यास ओळखू आला नाही.
साद , हाक घातलेला आवाज वेगळा होता .. काहीतरी विळक्षण होत.
" कोण हाय र.? "
भग्याने हे वाक्य उच्चारत आजुबाजुला पाहत एक कटाक्ष थेट पुढे शेवटची मशाल जिथे जळत होती तिथे टाकल. त्यासरशी त्याच्या नजरेस एक आकृती दिसुन आली. भग्याने त्या आकृतीकडे पाहत आपले दोन्ही डोळे छोठे केले व दुस-याक्षणाला त्याचे डोळे पुन्हा एकदा प्रथम दर्शनी होऊन जात तोंडातुन एक वाक्य निघाल .
" ग्ंग्या...!" ..काहीक्षण तो हे वाक्य उच्चारुन पुतळ्या सारख उभ राहत नुसतच गंग्याच्या आकृतीकडे पाहत राहीला.मशालींच्या तांबड्या प्रकाशात ग्ंग्याची आकृती डोळ्यांनी निट दिसुन येत नव्हती.कारण ग्ंग्या आणि भग्याच अंतर जेम-तेम 70-80 मीटर दूर होत. परंतु एक मात्र नक्की होत. गंग्याचे हात खांद्यांपासुन ते कमरेपर्यंत सैल सोडले गेलेले.डोळ्यांत शुन्याचे भाव होते. चेहरा चुना लावल्यासारखा, फासल्या सारखा पांढ़रा फट्ट झाला गेलेला .डोळे खोल गेले जात त्यांत शुन्याचे भाव पसरलेले . जणु गंग्या जिवंत नसुन त्याच मढ-प्रेत उभ राहीलेल .
मेलेल्या ग्ंग्याच अमानवीय प्रेत-म्हड उभ राहीलेल.भग्याच वाक्यज्यासरशी त्याच्या मुखातुन निघाल गेल त्यासरशी ग्ंग्याच्या पांढराफट्टया चेह-यावर एक भयंकर असुरी-हास्य पसरल. जे मशालीच्या तांबड्या रंगाच्या प्रकाशात ग्ंग्याच्या थंडावलेल्या चेह-यावर भयंकर दिसुन आल. कालजात चर्ररे करुन गेल .गंग्याने यंत्रवत एका रोबोट प्रमाणे आपल्या शरीराची हालचाल केली .हात -पाय शरीर हालवुन तो डाव्या बाजुला वळाला ! भग्याने त्याच्या ह्या कृतीकडे पाहताच त्याला पुन्हा एक हाक दिली .
" ए ..! गंग्या...?" भग्याने दिलेल्या हाकेसरशी सुद्धा गंग्याकडून कसलाही प्रतिसाद आला नाही. उलट तो डाव्या बाजुला जात एक- रस्ता रुपी फट तिथून पुढे जात होती .त्या फटीत जात गायब झाला .
" अर ये बेवड्या..थांब?" ग्ंग्याला अस जाताना पाहुनच भग्याने एक मोठी हाक देत ग्ंग्याच्या दिशेने धाव घेतली.
काहीवेळातच भग्या तिथे पोहचला सुद्धा. गंग्या ज्या दिशेला निघुन गेला त्या दिशेला भग्याने एक कटाक्ष टाकला. त्यासरशी त्याच्या नजरेस
डाव्या बाजूस एक फट दिसुन आली. जी की अंधारमय भासून येत होती. भग्याने भिंतीवरची एक मशाल काढून आपल्या हाती घेतली व त्या फटीसमोर धरत तांबड्या प्रकाशात आपले दोन्ही पाऊल वाढवले .
आत प्रवेश करताच भग्याच्या डोळ्यांना काहीक्षण काहीही दिसुन आल नाही. मशाली तांबडा प्रकाश सुद्धा त्या कालोखा समोर फिका वाटत होता. इतका अंधार होता आजुबाजूला.
10-12 पावल चालून झाली असतील की अचानक भग्याच पाऊल कशावर तरी पडल गेल.पाऊल पडताक्षणीच विशिष्ट प्रकारचा हाड तुटाव तसे (कट,कट..) आवाज झाला. तो आवाज त्या अंधारात घुमला, गुंजला जात भग्याच्या कानांवर पडताक्षणीच त्याने हातातील मशाल हळूच खाली पायाच्या दिशेने घ्यायला सुरुवात केली. आणी पुढच्याच क्षणाला त्याच्या डोळ्यांसमोर एक थरारक दृश्य दिसल.शरीरास थंडीचा स्पर्श जाणवु लागला.डोळे खोबनीतुन बाहेर यावे इतके मोठे झाले .कपाळावरुन घामाचा ओघळता द्रव बिंदू खाली येत शेवटी त्या मानवाच्या भुगा झालेल्या कवटीवर जाऊन पडला. होय मित्रांनो भग्याच्या पायाखाली आलेल ते हाड म्हंणजेच ती मनूष्याच्या डोक्याची कवटी होती.भग्याची नजर हळूच त्या कवटीपासुन थोड पुढे गेली तसे त्याच्या नजरेस बाजुलाच त्याच प्रकारे मनुष्याच्या शरीराची न जाणे कित्येक ढीगनी- ढीगभर कंकाळ स्वरुपी पिवळ्या-सफेद मिश्रित रंगाची हाड पडलेली दिसुन आली.
" आई शप्पथ.! " भग्याच्या मुखातुन एक आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला. आणि त्या वाक्यासरशी एक अंगावर सर्रकन काटा आणणारा आवाज त्या कालोखात घुमला..
." स्स्स्स्स्स.. फ्फ्फ्फ्फस्स्स्स्स्स्स..!स्स्स्स्स्स्स!"
ज्यासरशी हा आवाज आला गेला त्यासरशी भग्याच्या पुढ्यात असलेल्या त्या कंकाळांच्यात हालचाल जाणवली आणि अचानक दोन पिवळ्या रंगाचे पिवळ्याजर्द डोळ्यांची जोडी त्या कालोखात चमकली.
दोन पिवळ्या रंगाचे ते डोळे कधी लाल तर कधी हिरव्या रंगात रुपांतरीत होत-होते. भग्या एकटक त्या डोळ्यांकडेच पाहु लागला आणी पाहता-पाहता ते पिवळ्या रंगाचे डोळे वर-वर जाऊ लागले.जणु ते जे काही पुढ्यात अवतरल होत ते उठुन उभ रहात होत किंवा आपली काया वाढवत होत
" स्स्स्स्स! स्स्स्स्स्स! फ्स्स्स्स....!" हा आवाज आता वाढु लागलेला भग्याच ह्दय जोरात धड-धडू लागलेल....डोळे विस्फारले जात शरीर कुडकुडत्या थंडीने धराव तस थर-थरु लागलेल.त्याच थर-थरणा-या हातांनी भग्याने हातात असलेली मशाल पुढ्यात जे काही होत त्यास पाहण्यासाठी हलूच-पुढे पुढे आणायला सुरुवात केली. जसे-जसे तांबड्या रंगाचा प्रकाश त्या आकृतीवर पडू लागल तसे-तसे भग्याच्या तोंडाचा आ वासू लागला .
मशालीच्या तांबड्या रंगाच्या प्रकाशात भग्याला एक भली मोठी सापासारखी वळ-वळणारी शेपूट दिसुन आली.त्या शेपटीवर असणा-या खवल्यांवर तांबड्या रंगाचा प्रकाश पडला जात ती शेपूट लकाकत होती .काळ्या रंगाच्या खवल्या चमकत होत्या काटे एकमेकाना घासले जात विशिष्ट आवाज होत-होता.भग्याच्या हातातील स्मशाल आता थर-थरु लागली . कारण त्याच्या डोळ्यांना ते दृष्य दिसल. ते त्याचा काळीज चिरुन घेत रक्त गोठवुन गेल. तांबड्या रंगाच्या प्रकाशात भग्याला अंधूक का असेना परंतु ते दृष्य दिसल गेल.भलमोठ फणावासलेल सापासारख डोक, टोस्कुले दात , विस्तवासारखे चमकणारे डोळे , फिस्स्स आवाजासरशी बाहेर येणारी दोन भागांत विभागलेली काळ्या रंगाची जिभ , पोटापासुन थोडवर असलेले धार-धार विषाणे भरलेले हाताचे पंजे. भग्यापासुन ठिक दहा-बारा फुट
उंच सर्पपिशाच्च आपल्या शेपटी मार्फत उभ राहून भग्याकडे छद्मी हास्य करत पाहत होता.सावजाला , शिकाराला, आपल्या नैवेद्याला पाहुन त्याच्या त्या मोठ्या तोंडातुन काळ्या रंगाची विष सदृश्य लाल गळत होती. पुढील हे असल अविस्मरणीय दृष्य पाहुन भग्या गार झाला होता. पायांच्यातली हाड़ जागेवरच गोठली होती. मेंदू शुन्यहीन झाला होता. त्या मेंदूत आता अकलेचा लवलेशही उरला नव्हता. बचावाचा पवित्रा आता हे असल अघोरी-बुद्धीला न पटणार दृष्य पाहुन भीतीने कोठच्या -कोठे पळालेल. भग्याच्या थर थरणा-या हातातीप मशाल आता फड-फडू लागलेली. सर्पपिशाच्चा च्या मुखातुन आत-बाहेर घेणा-या श्वासांनी ती मशाल फड-फडू लागलेली.सर्प-पिशाच्चाने हळूच भग्याच्या डोळ्यांत पाहिल आणि चेह-यावर एक छद्मी -कृर हास्य आणत आपला फणा स्वरुप डोक हळूच मागे-मागे घ्यायला सुरुवात केली. सर्पपिशाच्च काहीतरी डोक्यात चाल रचत होता ...काहीतरी वार करण्याच उद्देश्य होत त्याच.. मागे-मागे जाणारा फणा आता थांबला गेला आणी ज्याप्रकारे खटका ओढताच बंदूकीतुन आतिवेगाने गोळी निघावी त्याच प्रकारे सर्प-पिशाच्चा च्या मुखातुन जोरात हिरव्या रंगाच कालोखात चमकनार विष बाहेर निघाल जात थेट भग्याच्या डोळ्यांत घुसल. गरम तव्यावर पाण्याचे शिंतोडे उडावे आणि फ्स्स आवाज व्हावा . तसे भग्याच्या डोळ्यांत विष पडताच फ्स्स्स्स आवाज झाला डोळ्यांतुन वाफा निघाल्या जाऊ लागल्या . भग्याने दोन्ही हात डोळ्यांना लावले व गुरासारखा वेदनेने तळमळू विव्हळू, ओरडू लागला.डोळ्यांच्या खाली असलेल्या गालांवर दोन्ही हातांनी नख ओरबडू लागला. विष इतक जबरदस्त तीव्र शक्तिशाली होत की भग्याच्या डोळ्यांतुन लाल रंगाच रक्त निघाल जात बुभळ फाटली , फुटली गेली. सर्पपिशाच्चाने पुन्हा एकदा भग्याच्या शरीरावर विष फेकल. ह्यावेळेस विष डोक्यावर फेकल गेलेल. ज्याने डोक्यावरचे केस अलगद गलले जाऊ लागले..टक्कल पडली जात..वरची कातडी फाटुन आतला भलामोठा मेंदू व बाकीच्या काळ्या-निळ्या-हिरव्या नसा दिसू लागल्या.काहिवेळाने डोक्यातुन लाल रक्त सुद्धा बाहेर पडू लागल.वेदनेने विव्हलणारा भग्या आता जमिनीवर तडफडू रेंगाळू लागला.भग्याच्या ह्या अशा अवस्थेवर सर्पपिशाच्च
" हिस्स्स्स्स! हिस्स्स...हिस्स्स्सस्स...हिस्स्स्सस्सस्स्स!" आवाज करत हसु लागला. त्याच ते हसण त्या कालोखात भयंकर वाटत होत.एका राक्षसाला सैतानालाही लाजवेल अस हसु होत ते.
पाणि न मिळालेल्या माशा सारख्या तडफडणा-या भग्याच्या देहाकडे पाहत सर्पपिशाच्चाने आपल्या जाड भारदस्त शेपटीचा विलखा त्याच्या शरीराभोवती घालायला सुरुवात केली. जाड शेपटीचा विलखा जस-जस भग्याच्या शरीरास गुंडाळला जाऊ लागल तसे शेपटीला असलेले ते काटे त्याच्या त्वचेत चामडीत घुसत मग मांसात जाऊन हाडांना होल पाडू लागले.क्लेषमय न लिहीता मांड़ता येणा-या वेदना भग्याच्या देहात उतरु लागल्या. एका-पाठोपाठ एक आर्त-किंकाळी भग्याच्या मुखातुन निघाली जात पाण्यासारख रक्त बाहेर पडु लागल. डोक्याला ज्या ज्या ठिकाणी विषाने होल पाड़ले होते त्यातून मेंदू -नसा हलू-हलू बाहेर येऊ लागले .पाहता-पाहता सर्पपिशाच्चा ची पकड आता घट्ट-घट्ट होऊ लागली आणि पुढच्याचक्षणाला सर्व प्रथम भग्याच कलिंगडासारख धड फुटल गेल.धड़ फुटताच त्यातुन रक्त मेंदू आतील नसा सर्व काही मिश्रित स्वरुपात बाहेर आल गेल.व उरलेल बाकीच भग्याच बिनधडाच निर्जीव प्राण नसलेल देह सर्पपिशाच्चाने आपला भलामोठा जबडावासत त्यास हळू-हळू आपल्या जबड्यात ढकलत भग्याच घास घेतल.
□□□□□□□□□□□□□□□□

" काय ग शिवन्या ..? .."
परश्या आपल्या पुढे पाठमो-या चालणा-या शिवन्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर शिवन्या चालायच बिल्कुल थांबली नाही .ती आपली दोन्ही पावले उचलत पुढे चालतच राहीली.तसे परश्या पुन्हा म्हणाला.
"अंग अर्धातास झालया! पर तुह्या वाडीचा काय पत्ता नाय? किती
....... दुर हाय अजुन..?" ...
भग्याने पुढे शिवन्याकडे पाहील .तसे त्याच्या ह्या वाक्यावर शिवन्या चालायची थांबली व पुढे पाहतच म्हणाली.
" बस्स्स ..आलीच बघा..!" शिवन्याच्या चेह-यावर हे वाक्य उद्दारताक्षणी एक विकृत हास्य पसरल डोळे पिवळ्या रंगाने चमकुन निघाले. व ती पुन्हा चालू लागली .परश्याने सुद्धा मग आपले दोन्ही पाऊल उचलले व चालू लागला.त्याची 7-8 पावल चालून झाली असतील की त्याचा पाय कशात तरी अडकला जात तो खाली पडला.
हाताच्या कोप-याला थोडीफार दुखापत झाली गेली . खरचटल जात त्यातुन लाल रंगाच रक्त बाहेर पडू लागल.हात-पाय ,कपडे साफ करत परश्या जागेवर उभ राहीला व त्याने लागलीच एक कटाक्ष समोर टाकला.समोर पाहताक्षणीच त्याला एक मोठा धक्का बसला. डोळे मोठे झाले तोंडाचा आ वासला गेला ...कपालावरुन घामाचे ओघळ येऊ लागले. कारण परश्याच्या पुढ्यात आता ह्याक्षणी........कोणीच उपस्थीत नव्हत .होती ती फक्त रातकिडयांची किर-किर्र..व पांढर धुक.
" ही शिवन्या कुठ गेली..? "
परश्या त्या जंगलात आजुबाजुला दुर-दुर पर्यंत शिवन्या कोठे दिसते का ते पाहु लागला.परंतु त्याच्या नजरेस फक्त नी फक्त मोठ-मोठाली झाडे
व पांढर धुक दिसुन येत होत.
" ए शिवन्या...?......." परश्या मोठ्याने ओरडला व ..त्याचा आवाज पुर्णत जंगलात घुमला ..सफेद रंगाच्या धुक्यात घुमला...
मग झाडांमधुन हवेसहित दुर-दूर पर्यंत जात थेट कमल्याच्या कानांवर पोहचला....परश्याचा आवाज ऐकताच कमल्याने परश्या जिथे उभ होता
त्या दिशेला पाहील आणि त्याचक्षणी परश्याला आपल्या पुढ्यात परश्या दिसला... ! हो परश्या दिसला..सेम हुबे-हुब नक्कल केलेला परश्याचा सांगाडा, फसव रुप घेऊन आलेला सर्प-पिशाच्च दिसला..!
" काय र..! तुला कसला आवाज आला का..? "
. कमल्या पुढे परश्या कडे पाहत म्हणाला.
" मला ..! नाय ..!"
एक भयंकर घोगरा आवाज मानवाची नक्कल करणारा आवाज ...!
" काय र..! पश्या ..! आवाजाला कय झाल? घसा बसलाय का..?"
कमल्या परश्या कडे पाहत म्हणाला. तसे ह्यावेळेस परश्याच्या रुपात आलेल्या सर्पपिशाच्चाने फक्त दात दाखवत खिखिखी करत घशावरुन हात फिरवत हो -हो असा इशारा करत मान डोलावली.एकवेळ कमल्यास परश्याच्या ह्या वागण्यावर संशय सुद्धा आला की हा असा का वागत आहे .परंतु पुढच्याच क्षणाला त्याने न जाणे का परंतू तो विचार मनातुन झटकून टाकला..व पुढे खाली पाण्यत पाहू लागला.
" शिवन्या..?..." परश्या आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवत मोठ्यानेच ओरडला. काहीक्षण तो अस्ंच शांत उभ राहिला मग पुन्हा म्हणाला .
"....अर कूट गेली ही..!" परश्या एका झाडा खाली येऊन उभ राहीला व त्या झाडाला एक हात टेकवत तर दुसरा कमरेवर ठेवुन आजुबाजुच निरिक्षण करु लागला.
रात्रीचा कालोख ...त्यात सफेद रंगाच धुक व शरीराला झोंबणारी थंडी...! सुई-सुई आवाज करत थंड हवेचा झुळुक ...तर रात्रीची स्मशान शांतता पसरली होती.
...... " प...र......श्ह्या .......!" गळ्यातुन निघणा-या हवेसहित एक छोठा आवाज जस बाहेर पडाव तसा आवाज परश्याच्या कानांवर पडला आवाज कानांवर पड़ताच परश्या जागच्या जागी निट उभ राहीला व आजुबाजूला कोणी आहे का ते पाहु लागला..तसे त्याच्या नजरेस थोड दुर एका स्त्रीची पाठमोरी आकृती दिसली. त्या स्त्रीच्या शरीरावर काळ्या रंगाची साडी होती . केस मोकले सोडलेले व रात्रीच्या अंधारात तिच पुर्णत शरीर चमकत होत.
" शिवन्या ! " परश्याने आपल्या दोन्ही जीभल्या चाटल्या व त्या स्त्रीकडे जाऊ लागला.
" काय ग... शिवन्या ..! साडी मस्त दिसतीया..! "
परश्याने ह्या वाक्यावर कसतरीच हसत त्या पाठमो-या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला. त्यासरशी त्या स्त्रीने हवेच्या वेगाने एक गिरकी घेत परश्याकडे वळून पाहिल.आणि त्याचवेळेस परश्याला त्या स्त्रीचा चेहरा दिसला....पांढरा फट्ट चेहरा ..काळ्या रंगाचे ओठ त्यातुन त्याच रंगाची निघणारी लाळ, पिवळेजर्द चमकणारे पिवळ्या रंगाचे डोळे त्यात एक गोल काळा ठिपका .परश्याच्या मुखातुन त्या स्त्रीला पाहताच एक किंकाळी बाहेर पडली.आणी त्या उघडलेल्या मुखात त्या मंदाकीणीने आपला धार-धार नख असलेला पांढराफट्ट हात जोरात थेट तोंडावाटे घशात घुसवला आणि घशातुन कंठातील पोकळी उपटून बाहेर काढली .परश्याच्या मुखातुन रक्ताची चिलकांडी उडाली गेली. आणि मंदाकीणीने कंठातील पोकली एका अधाश्या सारख्या भुकेल्या येड्या सारखी ती चावून-चावून खायला सुरुवात केली कट-कट हाड तोडुन खालल्याचा आवाज होऊ लागला. हे असल किळसवाण रुप पाहुनच गळ्याला हात लावतच परश्या दोन-तीन पावले मागे-मागे जात कशासतरी धडकला गेला. तसे त्याने गळ्याला हात लावतच समोर पाहील . पुढील दृष्य पाहून पुन्हा एकदा त्यास भीतीने स्पर्श केला.
परश्याच्या पुढ्यात एक 8-9 फुट दैत्यरुपी कै:-कृलाक अवतरला होता. कै-कृलाक चेह-यावर एक सोन्याचा मुखवटा होता. जो त्याने आपल्या हातानेच बाजुला केला . तस त्याच भयानक रुप दिसून आल .पुर्णत काळ्या रंगाची त्याची त्वचा होती. डोक गोल असुन धार-धार कान होते , लाल रंगाच्या दोन डोळ्यांसहीत कपाळावर सुद्धा एक उघडा लाल रंगाचा डोळा होता.गळ्यात एका विशिष्ट प्रकारचा मोठा सोन्याचा हार घातलेला . हाताचे पंजे काळेच असून त्यावर धार -धार नख होती .हा असा पाताळातला पिशाच्चदेव कै-कृलाक आपल्या , पत्नी मंदाकीणी सहित अवतरला होता.
कै:-कृलाक ला पाहातच परश्याची पाचावर धारण बसली डोळे जणु खोबण्यांच्यातुन बाहेर यावे तसे फुगले -वटारले गेले.
" माझ्या धर्म पत्नीला हात लावतोस..!"
कै:-कृलाक आपल्या घोग-या भरड्या आवाजात म्हणाला आणि ह्या वाक्यासरशी त्याने आपल्या दोन्ही धार-धार नख असलेल्या काळ्या हातांना परश्याच्या डोळ्यांभोवती ठेवल. परश्याच्या डोळ्यांना ज्यासरशी कै:-कृलाक च्या हातांचा स्पर्श झाला त्याचवेळेस परश्याच्या डोळ्यांची चामडी फाटली जाऊ लागली व धुर निघाल जाऊ लागल.
वेदना निर्माण होत जाणवत होत्या परंतु घश्यातुन किंकाळी निघण्या ऐवजी लाल रंगाच रक्त बाहेर पडत होत. खालची जमीन लाल रंगाच चिखल तैयार करत होती.
एक विशिष्ट प्रकारचा ( चिबुक) आवाज झाला आणि परश्याचे दोन्ही पातळ बुभळ फाटली गेली त्यातुन सुद्धा लाल-लाल रक्त बाहेर पडु लागल .परश्याकडे पाहत कै:-कृलाकने आपल्या एका हातावाटे त्याच्या गळ्याला पकडून वर उचलत आपला जबडा वासला ..त्यासरशी परश्याच्या तोंडातुन सोनेरी रंगाचा प्रकाश बाहेर येत तो प्रकाश कै:-कृलाक च्या मुखात घुसू लागला. त्यासरशी परश्याचे हात-पाय -चेह-यावरची त्वच्या सुखून जाऊ लागली...! काळ्या रंगाचे केस पांढरट झाले. एका नव्वद-शंभर वय असलेल्या म्हाता-या सारखी त्याची अवस्था झाली. शरीरातली हाड मांसाला चिकटली.
कै:-कृलाक ने परश्याची सर्व उर्जा-शक्ति आपल्या शरीरात सामावुन घेतली आणि परश्याच म्हातार शरीर ज्यात आता काडीचही प्राण शिल्लक नव्हत ..ते हाडकूल शरीर एका झाडापाशी भिरकावुन दिल .
तसे ते शरीर एका झाडाखाली जाऊन आदळल .एक दोन हाड तर अलगद कट-कट आवाज करत तूटली सुद्धा गेली. आपल काम संपताच कै:-कृलाक मंदाकीणी दोघांच्याही शरीराभोवती सफेद रंगाची अमानविय जाड धुक्याची वलय निर्माण झाली जात ती दोघ गायब झाली गेली.परश्याची अवस्था आता केविलवाणी झालेली पाहता न येण्यासारखी झालेली बिचा-याच पुर्णत आयुष्य एका क्षणातच संपल गेलेल. शेवटी न राहून-राहून त्याच्या डोळ्यांतुन अश्रु निघाले जात कानांत फुग्याचे बोल ऐकू येऊ लागले.
"तो सैतान कोपल ....! जीव घेईल..जीव..."
वेळ निघुन गेली होती आता फक्त उरल होत ते पश्चात्ताप आण मृत्युची
वाट पाहण .परश्याची शरीराची हालचाल होत नव्हती नजरेनेच काय ते आजुबजुच निरिक्षण सुरु होत . स्मशान शांतता पसरली होती. आजुबाजूहून रातकिड्यांची कीरकिर ऐकू न येता..एक विशीष्ट प्रकारचा फुत्कारण्याचा आवाज ऐकू येत होता..सापाच्या फुत्कारण्यासारखा .
.... " फिस्स्स ...स्स्स....स्स्स्स "
परश्याच्या शरीराची हालचाल होत नसली तरीही डोळे आजुबाजूच वेध घेत होते..कान आजुबाजुचे आवाज ऐकुन घेत होते...परश्या एकटक झाडाला टेकून होता...की अचानक वरुन एक झाडाच हिरव पान स्लोमोशनने तुटुन खाली पडल..पान खाली पडल गेल त्यासरशी परश्याने मोठ्या कष्टाने आपली मान वर केली .....! आणी त्याच्या सुरकुतलेल्या चेह-यावर एक आनंदमय हसू पसरल ...!
परश्याच्या वर झाडाच्या एका जाड-जुड फांदीला एक सर्पपिशाच्चीनीने आपल्या जाड-जुड शेपटीने विलखा घातलेला ..तिच्या शरीराची कातडी सोनेरी रंगाची असुन त्यावर सफेद रंगाचे गोल आकार होते.जबडा वासला असुन त्यातुन तीक्ष्ण धार-धार सू-या सारखे दात बाहेर डोकावत होते. क्षणा-क्षणाला तिच्या मुखातुन दोन भागात विभागलेली गुलाबी रंगाची विषारी जीभ बाहेर येत होती. दर वेळेस बाहेर येणा-या त्या जीभेसरशी तिच्या त्या हिडिस खवले असलेल्या चेह-यावर क्रोध वाढत चालला होता. जे की डोळ्यांमार्फत स्पष्ट दिसुन येत होत.कारण मोठ-मोठाले ते दोन डोळे अक्षरक्ष अग्नीतल्या ज्वाला प्रमाणे भडकत होते ...वणव्या सारखे क्रोध आधिक-नी-आधिक मनात बुद्धीत पसरवत होते.
" हीस्स्स्स्स्स! स्स्स्स्स्स्स ! बायकांच्यावर वाईट नजर ठेवतोसस्स्स्स्स..! नालायक...माणसासस्सस्स्स....!
एक स्त्रीयुक्त घोगरा -भरडा मिश्रित आवाज शिवन्यरुपी सर्पपिशाच्चीनीच्या मुखातुन निघाला...आणि तिच्या ह्या वाक्यासरशी
परश्याच्या चेह-यावर जे हसू पसरलेल ते क्षणात मावळल गेल .
झाडाला विलखा घातलेल्या त्या सर्पपिशाच्चीनीने क्षणार्धात हवेच्या वेगाने परश्याच्या देहाच्या दिशेने चाल केली....! जबडा वासला जात धार-धार तीक्ष्ण सू-या सारख्या दातांनी परश्याच्या थेट कपाळावर आघात केला..दातांना धार इतकी होती की ते थेट कपाळातुन आत जात हाडां- मांसांत रुतले गेले...! हाड तूटण्याच्या कट-कट करणा-या आवाजांसरशी परश्याच देह शिवन्यारुपी सर्पपिशाच्चीन मुखावाटे गिळू लागली तसे तिचा जबडा आकार वाढवत वासला गेला आणि परश्याच पुर्णत देह सर्पपिशाच्चीनीने फस्त करुन टाकल..!"

क्रमश :

पुढिल 10 व्या भागांत ...ह्या अध्यायाचा अंत होईल...! आणि 11 व्या भागांत जय-अनु पेरानॉर्मल्स..यांच ..द-अमानविय चिऊ ची डॉल सुरु होईल...! .....चिऊ चो डॉल ही कथा समजण्यासाठी...चेटक्याच जंगल पर्व 1-2 ... ही कथा वाचा...


Share

NEW REALESED