Moksh - 11 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 11

शुभ्र ढ़गांतून सकाळचा सुर्य उगवला होता.

छानशी थंड हवा , आणि हळकस धुक देवपाडा गावावर पडल होत.

हिरवगार गवतांचा मोर सकाळच्या धुक्यातल्या द्रवबिंदूनी न्हाऊन निघाला होता.

गुरे ढ़ोरे सकाळच्या उन्हात माळरानांवर चरत होती.

बायका हिवाळा असल्याने रानातून तोडलेली झाडाची सुखी लाकड डोक्यावर घेऊन येतांना दिसत होती

वातावरण कस नयनसुख देणार होत.

मानव जो पर्यंत एका अज्ञात गोष्टी पासून अजाण असतो- अज्ञाणात असतो , तो पर्य्ंत सर्वकाही सुरळीत सुरु असत.

जस की पुढे पाहुयात!

काळ घडलेल्या अमानविय शक्तिच्या अकल्पित क्रूर खेळाचे पडसाद हळुहळू दिसायला सुरुवात झाली होती.

सरपंच नामदेव आबांच्या बंगल्यावर रोजच ग्रामपंचायतीतली पाच - सहा मांणस जमायचीच.

म्हंणूनच नामदेव आबांच्या वाड्याचा दरवाजा
पहाटे सकाळी साडे सहा ते सात वाजता उघडला जायचा.

पन आज साडे नऊ झाले तरी दरवाजा काही उघडला नव्हता.

शेवटी वाड्याबाहेर जमलेल्या दहा - बारा गावक-यांनी कंपाउंड वरून उड्या घेतल्या, आणि आत प्रवेश केला.

तस एक एक करत रात्री घडलेल्या भयाण
घटनेचे थरार द्रुष्य समोर येऊ लागले..

नामदेव आबा आणि सुर्यकांतराव दोघांच्या खूनाची बातमी देवपाडा गावात वा-यासारखी पसरली.

नामदेव आबा सुर्यकांतराव दोघेही गावातले बडे
नामवंत व्यक्ति महत्व होते.

गरजूला मदत , अन्याय झालेल्यास हक्क मिळवून देणे! गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी ह्या दोघांनी खुपकाही केल होत .

गावातल्यांसाठी ही दोन मांणस म्हंणजे देवमाणुस होते.

पाहता पाहता मोठ मोठ्या वयस्क - पुरुष स्त्रीयांपासून ते नागडी उघडी पोर नामदेव आबांच्या वाड्यात जमली होती.

जत्रा भरावी तशी , लोक वाड्याबाहेर तर काही आत जमलेली.

बायकांनी साडीचा पदर तोंडाला लावला होता.
ज्या - ज्या लोकांसाठी ह्या दोन मदतकरुंनी मदत केली होती असे परिवार डोळयांतून अश्रु गाळत होते.

कोणीतरी पोलिसांना फोन केल होत.
सायरन वाजवत सफेद रंगाची बुलेरो वाड्याच्या दरवाज्यापासून दहा पावलांवर येऊन थांबली..

गाडीच्या पुढचा ड्राईव्हरच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडला, दरवाज्यामधून कडक इस्त्री केलेला खाकी वर्दीतला एक तरून बाहेर पडला..

त्याच्या खांद्यावर इंग्रजीत I.P.S आणि दोन स्टार होते. छातीवर असलेल्या काळ्या पट्टीवर नाव होत -

महेंद्र कोठारे ( हा पात्र आहे , एंजल द डॉल ह्या कथेतला.)
..
आ.ई.पीएस महेंद्र कोठारे वय (28).
महेंद्र गाडीतून बाहेर पडला.. त्याच्या मागोमागच दोन हवालदार सुद्धा आले.

महेंद्रने अवतीभवती पाहिल..

गावातली सर्व मांणस वाड्यात जमली होती..
ह्यावरून खून झालेला माणुस गावात चांगलाच परिचित होता. हे कळून येत होत.

" साहेब !"

एक माणुस गर्दीतून पुढे आला..
अंगात सफेद शर्ट खाली सफेद पेंट , डोक्यावर गांधी सफ़ेद टोपी , आणी पायांत निळी स्लिपर !

महेंद्र जागीच थांबला.

" येस!" गंभीर स्वरात तो इतकेच म्हंणाला.

" साहेब मीच फोन करून माहीती दिली तुम्हाला.!" तो माणुस म्हंणाला.

" अच्छा ! " महेंद्र जरा थांबून बोलू लागला

" बॉडी कुठे आहे ? "

" आत आहे साहेब , चला दाखवतो !"
महेंद्र वाड्याच्या दरवाजातून आत घुसला..

आत वाड्याच्या व्हरांड्यात बायका लहान ,नागडी उघडी पोर
सर्व पोरबाजार जमला होता.

बायका मुसमुसत रडत होत्या, तर काहीजणी मोठ्याने रडत होत्या.

जे पाहून महेंद्रच्या डोक्यात झिंणझीण्या येऊ लागल्या..! त्याच डोक एकदम गरम झाल..

" म्हात्रे !" तो ओरडला...

" जी..जी..साहेब !"

मागून एक पसतीस वय असलेला हवालदार पुढे आला.

" ह्या सगळ्यांना आताच्या आता बाहेर काढ इथून ! मला ह्या वाड्यात आपल्याशिवाय " महेंद्रने एक कटाक्ष त्या मांणसावर टाकला ज्याने फोन केल होत.

" ह्याच्या आणी आप्ल्याशिवाय कोणिही नकोय इथे ! आणी हो , सर्वाँना बाहेर काढुन तू दारात थांब ..! ओके? "

महेंद्रच बोलन ऐकून रडणा-या बायका अजुन जोरात भोकांड पसरून
रडू लागल्या. गावातली लोक महेंद्रकडे वेड पाहिल्यासारख पाहत .

" जी साहेब !" म्हात्रे निघुन गेला.

" ए चला रे बाहेर चला !" म्हात्रेने एका मिनिटात पूर्णत अंगण आणि वाड्यात जमलेली मांणस बाहेर काढली.

" सो काय नाव म्हंणालात तुमच !"

" जी विठ्ठल साहेब ! सगली इठ्ठलच म्हंणत्यात मला. ! साहेब माझ्या तीस गाई आहेत , दुधाचा धंदा आहे साहेब माझा , तुम्हाला अगदी कमी किंमतीत दुध देईल मी , तुम्ही पत्ता सांगा साहेब फ़क्त. !"

विठ्ठलच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तो काही थांबायच नाव घेत नव्हता..तोच महेंद्रने कमरेला पॉकीटात असलेली काळ्या रंगाची मॉडर्न बंदूक बाहेर काढली.

जी पाहून विठ्ठलची हवा लीक झाली.
मौनव्रत असल्यासारखा तो गप्प झाला .

" बॉडी कुठे आहेत मिस्टर विठ्ठल!"

" आत आहेत साहेब, वरच्या मजल्यावर !"
तो इतकच म्हंणाला. जेवढ विचारल तेवढच .

" कोणी हात लावल बॉडीला? !"

" जी नाही साहेब ! खून झालाय म्हंटल्यावर पोलिसांच काम आल , म्हंणून मी कोणाला हात लावून दिल नाय बॉडीला. जसच्या तस हाई ते मढ!"

विठ्ठल एवढ बोलून गप्प बसला.
त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता..

जे महेंद्रने पाहिल..आणि त्याने बंदूक पुन्हा पॉकीटात ठेवली.

" घाबरू नकोस विठ्ठल , ती बंदूक मी अशीच काढली होती. कम !"

महेंद्र त्याच्या मागोमाग विठ्ठल आणि शेवटला एक हवालदार असे ते तिघे वाड्याच्या दरवाज्यात आले.

महेंद्रची चाणाक्ष नजर चौहीदिशेने काही पुरावा मिळ्तो का ते पाहत घुमत होती.

तोच

महेंद्रने दरवाज्याच्या चौकटीत पाहिल..
खाली काहीतरी जळाल होत..त्याची काळी राख पडली होती.

" पाटील!" दूस-या नंबरचा हवालदार चालत आला.

" जी साहेब !"

" ही राख दिसतीये , ती पुरावा म्हंणून सोबत घ्या.!"

" जी साहेब !" पाटीलने खिशातून प्लास्टीक पिशवी काढली..आणी हेंडग्लोव्हज मार्फत ती राख त्यात भरली.

" कुठे आहेत बॉडी ?"

" जी साहेब एक बॉडी मागच्या बाजुला आहे ! म्हंणजे वाड्या मागे , आणी दोन बोड्या....वर दुस-या मजल्यावर एकाच खोलीत आहेत ! "

हे सांगताना विठ्ठलच्या अंगावर सर्रकन काटा आला..होता.

आणि ते महेंद्रच्या संशयी नजरेतून सुटल नाही..

पन ह्यावर तो काही म्हंणाला नाही.

" ओके "

महेंद्रने वाड्याचा दरवाजा ओलांडला आणि आत प्रवेश केला.

तसा घाणेरडा कुजकट वास त्याच्या नाकात शिरला.

खिशातून सफेद रूमाल काढून त्याने तोंडावर धरल. जिन्याच्या पाय-यांवरून नजर टाकत त्या एक

एक करत चढु लागला.

लाकडी जिन्यांवर पाऊल पडताच त्या चरकत होत्या.

जिन्याच्या पाच पाय-या चढुन होताच महेंद्रला एका पायरीवर, एक मंगळसूत्र पडलेल दिसल होत.

महेंद्र खाली बसला , हातातला रूमाल पुन्हा खिशात ठेवून - त्याने हेंन्ड़ग्लोव्हज हातात चढवले.

आणि खिशातून एक प्लास्टिक पिशवी काढून
त्यात तो मंगळसूत्र ठेवला.

पुन्हा रूमाल काढून त्याने तो तोंडावर लावला .आणि
जिन्याच्या पाय-या चढुन वर आला.


" माय गॉड!" महेंद्रने समोर पाहिल.

समोर एका खोलिचा उघडा दरवाजा होता.

दरवाज्याच्या चौकटीबाहेरच सुर्य्ंकांतरावांच प्रेत पाठ भिंतीला टेकून आणि पाय पुढे पसरवून मृत अवस्थेत बसल होत.

सुर्यकांतरावांच्या प्रेताजवळ येत , महेंद्र दोन पाय वाकवत खाली बसला.

नाकावर रूमाल दाबून तो प्रेताच निरिक्षण करत होता.

पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्य्ंत
सर्व त्वचा रक्त शोषळ्यासारखी काळी- पांढरी पडली होती.
मांस , स्नायू.. हवा निघून गेल्यासारखे हाडांना चिकाटले होते.

तोंडाचा ज्बडा वासला होता.. दात असलेली कवटी वाकडी फिरवून डाव्या बाजुला फिरवली होती. डोळयांतल्या खोंबण्या मोबाईलमध्ये असलेल्या कैमेरा लेंस एवढ्या बारीक झाल्या होत्यां .

डोक्यावरचे केस बाजुलाच गळून पडले होते .

अंगातला शर्ट शरीरातल मांस हाडांना चिकटल्याने ढगाळ झाला होता.

मानवी देहाचा अगदी बाहुल्यासारख खूळखूळा
महेंद्र आपल्या नजरेसमोर पाहत होता.

आता त्याला कळून चुकल होत - की प्रेताच वर्णन सांगतांना विठ्ठलच्या अंगावर सर्रकन काटा का उभा राहिला होता.

महेंद्रने त्याच अवस्थेत उजव्या दिशेला मान वळवून दरवाज्यातून खोलीआत पाहिल.

समोर एक चौकोनी पलंग होता - बाजुलाच थोड दूर तीन सळ्यांची एक उघडी चौकोनी खिडकी होती .

खिडकीतून सकाळच्या उन्हाचा प्रकाश आत येत होता .

.त्याच प्रकाशात महेंद्रला बैडखालून एक रक्ताळलेला पाय बाहेर आलेला दिसला.

पायाचा रक्ताने माखलेला तळवा आणि
पाच बोटांमधला- एक बोट गायब होत .

महेंद्र जागेवरून उठला.

खोलीच्या दरवाज्यातून आत त्याने एक नजर खोलीत टाकली.

पलंगाबाजुलाच एक दोन झापांच कपाट होत. त्यापूढे पलंग, मग एक चौकोनी आरसा होता .

आणि आरशा पुढे खिडकी.

महेंद्रच्या चेह-यावर गंभीर भाव पसरले होते.
केसच तशी होती !

महेंद्र पलंगाजवळ पोहचला.
मग पुन्हा खाली वाकला.

पलंगाखाली रक्ताचा सडा पडला होता.
भुई जशी शेणाने सारवावि तसा रक्ताने खाली सारवल होत.. आणी त्यावर नामदेव आबांच प्रेत पाठिवर पडल होत.

पोटाच्या चामड्या आत असलेल्या आतड्या त्या भागावरच सर्व मांस फाडून रक्ताने माखलेला मैगी लाल आतडा ,कोतडा, अन्न पच्चन नलिकेचा पुर्णत सट बाजूला पडला होता.

महेंद्रने तिथून नजर काढली.
त्याला हे सर्व पाहण्याची सवय होतीच . पन ह्या सर्व पुढचा तपास फोरेंसीक टिम करणार होती.


" मिस्टर विठ्ठल !"

" काय साहेब !" विठ्ठल दारातूनच म्हंणाला.

त्याला हे सर्व रक्तपात पाहण जिवावर जात होत.

" तिसरी बॉडी? , खाली आहे ! "

" जी ..जी..जी साहेब !" विठ्ठलचा काफरा स्वर.

" ओके ! मग तुम्ही या आता !"
विठ्ठल पटकन जायला वळला.

" पन " पाठीमागून महेंद्रचा आवाज आला.

" जी जी..साहेब !"

" आम्हाला केस संब्ंधीफ काही विचारायचं असेल तर !"

" नक्की येईल साहेब ! आणि हा गाव सोडून पळून नाय जायचो साहेब मी ! माझ्या तीस म्हशी आहेत साहेब इथ !"

महेंद्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता खिडकीच्या दिशेने निघाला .

मागून विठ्ठल जातांना दिसत होता..आणि हवालदार पाटील खोलीत आला.

" साहेब तो माणुस !"
महेंद्र खिडकीतून बाहेर पाहत होता.

" नो पाटिल, त्याचा ह्या खूनात काहीही हात नाही, मांणसाच्या शारिरीक क्रिया, हावभाव ओळखता येत असतील तर तो माणुस खोट बोलत आहे की खर हे लगेच समजू शकत !"

" हो हो साहेब !" पाटिलने नकळत माती खाल्ल्याने हळकेच जिभ चावली.

" पाटील !" महेंद्रने हाक दिली.

" जी साहेब !" तो पटकन म्हंणाला.

" ह्या सर्व बॉडीज , आणि हा क्राईम लोकेशन कसून चेक व्हायला हव्या . "

" जी साहेब , मी आताच फोन लावून फोरेंसीक टिमला बोलावतो !"

" आणि हो !" काहीतरी लक्षात आल्यासारख महेंद्र बोलू लागला.

" अजुन तीन हवालदार सुद्धा बोलावून घ्या ...! .....गो!"

पाटीलने खिशातून फोन काढला आणि खोलितून बाहेर गेला.

आता महेंद्र एकटाच खोलीत होता ! नक्की एकटाच होता ना? की ते दोन मृतदेह धरून तीन जण होते?

महेंद्रने खिडकीतून बाहेर पाहिल.
ही वाड्याची मागची बाजू होती. जिथे बुजगाण्याने शंकरला मारल होत.

विहिरीपासून पूढेच दोने केळीची झाडे होती.
महेंद्रची नजर एकटक त्या केलीच्या पानांवर स्थिरावली होती.

त्याच्या मनात एक भयप्रद विचार आल..
की आताच ही पाणे बाजूला सरतील आणि काहीतरी
अंगावर काटा यावा अस घृणास्पद दृष्य दिसल..

आणि तसंच झाला..

' व्हू..व्हू..व्हू..' हवेचा झोत आला..

महेंद्रचे वाढलेले केस उडाले..आनीट ती केळीची झाडे त्यांची पाने हळली..आणि त्या हळणा-या पानांमधून एक मोठी गेप तैयार झाली ..आणि महेंद्रच्या नजरेस ..ते काठित अडकलेल .. शंकरच धड दिसल.

महेंद्रच्या तोंडाचा आ - वासला ..

एक हळकासा धक्का त्याला बसला होता.

" साहेब !" अचानक त्या गंभीर दृश्यासहित आजुबाजुला पसरलेल्या शांततेत मागून आवाज आला..

तस महेंद्रची तंद्री भंग पावली..त्याने मागे वळुन पाहिल.

" या..या..येस पाटील!"

" साहेब ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ केलय !

फोरेंसीक टीम ला कॉल केल , आणि तीन हवालदार सुद्धा येतायेत !"

" गूड ,स्मार्ट जॉब !"

' टिंग,टिंग ,ट्यांग, ट्यांग, ट्यां, त्यां!'
(पाश्वर्य संगीत आवाज. )महेंद्रच्या फोनची रिंग वाजली.

महेंद्रने खिशातून स्मार्टफोन काढून एकवेला स्क्रीनवर पाहिल ( स्क्रीनवर नाव होत...बिग बॉस ) त्याने लागलीच रिसिव्हर ऑन केल.

" येस बॉस !"

" हेल्लो बेबी फ़ेस , कोणत्या मिशनवर आहेस सद्या!" फोनमधून एक भारदस्त व्यक्तिमहत्व असलेल्या मांणसाचा आवाज आला.

" देवपाडा विलेज -थ्री सायकॉ किलर टाईप मर्डर्स!" महेंद्र म्हंणाला.

" ओके , मग ती केस तू आताच सोडतोयस ! "
महेंद्र काहीही म्हंणाला नाही, त्याच्या चेह-यावर फ़क्त जरासे आश्चर्यकारक भाव होते .

" येस माय बेबी फ़ेस , तुझ्यासाठी एक बिग मिशन आहे माझ्याकडे- !"

" बिग मिशन , कोणता?"

" मोस्ट वांटेड.. अँड चाइल्ड सायकॉ किलर रंगाच एनकाउंटर करायचं ! बाकी इन्फोर्ममेशन
सविस्तर भेटल्यावर सांगतो ! ओके ? लवकर ये ! वाट पाहतोय मी ," महेंद्र फोन ठेवत होता..

तोच पुन्हा आवाज आला

" आणि हो येताना मुंबईचा फ़ेमस वडापाव आणायच विसरू नकोस !"

" येस येस..बॉस!" महेंद्र जरासा हसलाच.

" काय साहेब पुन्हा केस बदली झाली ,मग तर ह्या महिन्यातली तिसरी केस आहे बघा ही तुमची !"

पाटीलच्या वाक्यावर महेंद्र फ़क्त हसला.

काहीवेळाने

ते दोघेही वाड्यातून बाहेर पड़ले.
वाड्याबाहेर बायका - मांणस अद्याप जमलेलीच होती.
वाड्याच्या दारात म्हात्रे तसाच उभा होता.

त्या सर्वाँना मागे सोडत ..

महेंद्र बुलेरो गाडीत येऊन ड्राइव्हसीटवर बसला.


" लवकरच भेटु साहेब !"

पाटील म्हंणाला.

" हो ! आणि ह्या केसबद्दल मला कळवत रहा !"

" हो साहेब ! "

महेंद्रने की पिलून गाडी चालू केली.
इंजीनचा घर्रघर्र आवाज झाला...

" पाटील!" महेंद्र काहीतरी लक्षात आल्यासारख म्हंणाला.

" जी काय साहेब ! "

" हा एक पुरावा मला जिन्याजवळ मिळाला! " महेंद्रने पिशवीत असलेल मंगळसूत्र पाटीलकडे दिल.


" जय हिंद साहेब !" पाटीलने खाडकन सेल्यूट ठोकला.

तसा त्याच वेळेस महेंद्रने होकारार्थी मान हलवली आणि गियर टाकल...

सायरन वाजवत गाडी निघुन गेली..

पाटील पुढे जाणा-या गाडीला पाहत उभा होता .
एक दोन वेळेस त्याने हात सुद्धा दाखवल..

गाडी दिसेनाशी झाली तस त्याने हातातल्या त्या मंगळसुत्राकडे पाहील..!

काळे आणि सोन्याचे मनी मिळुन तो धाग्यात ओवळा होता आणि मधोमध तुळशीच डीजाईन असलेल तो मंगळसूत्र होता.

पाटीलने मोठ्या नवलाने , मन्हापुर्वक , त्या मंगळसूत्रकडे पाहील..आणि तो वाड्यात जायला निघाला - तोच सायरन वाजवत एक एम्बूलेंस तिथे आली.

तसा पाटील जागीच थांबला.
ती एम्बूलेंस येऊन त्याच्यापासून पाच पावलांवरच थांबली.

मागचे दोन दरवाजे उघडले .

फिकट गुलाबी कपडे घातलेले वॉर्डबॉय उतरले मग एक स्ट्रेचर जमिनीवर ठेवल , ज्यावर पांढरट कापडात एक प्रेत झाकल होत.

वाड्याबाहेर रडणा-या बायका मांणस सगल्यांच्या नजरा , त्या प्रेतावर खीळल्या...होत्या.


ड्राईव्हसीटच दरवाजा उघडून एक तरून नुकतच रुजू झालेला हवालदार बाहेर आला.

पाटील हेड होता..तर तो दुसरा हवालदार नुकताच जॉईन झालेला.

" नमस्कार सर , मी कालपाडा पोलिस स्टेशन मधून आहे. काल कालपाडा घाटात एक ट्रेव्हलर बसच एक्सीडंट झाल त्यात मिस्टर नामदेव यांच्या पत्नी मय्यत पावल्या -सो हीत्यांची बॉडी घेऊन आलो आहे ! "

त्या हवालदाराच बोलन ऐकून बायकांनी एकापाठोपाठ हंबरडा फोडला..

पाटीलच्या चेह-यावर मात्र आश्चर्यकारक,संशयी, विचारवंत भाव पसरले होते.

पाटील त्या नवख्या हवालदारला घेऊन जरा बाजुला आला.

" च्यायला , हे तर जाम इंन्ट्रेस्टींग आहे की ! "
पाटील म्हंणाला.

" काय म्हंणालात सर !"

" अरे बाबा , तू इथ जी बाईची बॉडी घेऊन आलाय ना ? त्या बॉडीच्या नव-याचा पन काल रात्री खून झालाय..! त्याचाच नाही तर त्याच्यासोबत अजुन दोन जन पन मारले गेलेत ! आणी खून पन एवढ बेक्कार झालाय ना ....बाबोव !"

" आई शप्पथ सर ! काय थ्रिल आहे हा , एकदम पिक्चर सारख नाही का ?"

" हो ना !"

" मग सर ह्या रिपोर्ट कार्डवर आता सही कोणाची घेऊ , म्हंणजे आम्ही बॉडी बरोबर पोहचवली अस दाखवता येईल !"

" बघू जरा रिपोर्ट कार्ड!" पाटीलने रिपोर्ट कार्ड हातात घेतल.

सफ़ेद मृत्यु कार्डवर भिमक्काचा पासपॉर्ट साईज फोटो होता.

खाली पुर्ण नाव होत.

भिमक्काच्या फोटोमध्ये तीने डोक्यावर पदर ..
नाकात नथ, गळ्यात सोन आणि पाटीलच्या हातात असलेला मंगळसुत्र घातला होता.

पाटील भिमक्कांच्या फोटोकडे तर कधी
स्वत:च्या हातात असलेल्या पुराव्याच्या पिशवीत असलेल्या मंगळसूत्राकडे पाहत होता.

त्याच्या मनात लाखो विचारांनी थैमान घातला होता.

गावाखेड्यातली ही स्त्री नवरा जिवंत असतांना मंगळसूत्र अस काढुन ठेवून मोकळ्या गळ्याने मिरवन शक्यच नव्हत.

नाहीतर अस होऊ शकत ? की तिने दुसर मंगळसुत्र घातल असाव आणि हा घरात ठेवला असावा? पन तपासात तर सर्व कपाट बंद होती अस आढळून आल आहे !

त्यासहितच खून झाल्यावर चोरी वगेरे अस काहीच झालं नाही आहे आहे?

विचार करून करून पाटीलच डोक फुटायची वेळ आली-

शेवटी मनात एक भाबडा विचार येऊन गेला - काश महेंद्र साहेब इथे असते !

पाटीलने हातातल्या पुराव्या (मंगळसूत्रा)कडे पाहिल.

आणि हळुच पाऊल , स्ट्रेचरवर ठेवलेल्या
प्रेताकडे वाढवली.

पांढ-या कापडात झाकलेल भिमक्कांच प्रेत पाहायला आजुबाजुला तमाम बायका मांणसाची गर्दी जमली होती.

बायकांचा तो रडण्याचा आवाज भीतीदायक वाटत होता.

आकाशातला सुर्य जाऊन अशुभ काळ्या ढगांची मळभ पसरली होती.

चौहीदिशेना - फिकट अंधार माजला होता.

लोकांना बाजुला सारत , पाटील प्रेताजवळ पोहचला.. !

दोन पायांवर मांडीवरून बसून त्याने हळकेच आपला हात त्या पांढ-या कापडाच्या दिशेने वाढवला..
न जाणे का पन आज त्याचा हात थरथरत होता.

त्याला कारण तरी काय होत ?

जर भिमक्काच्या प्रेताच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल तर हे खून तीने केले असतील का ? पन हा विचार मानवाच्या शुद्ध कल्पनेत बसूच शकत नव्हता!

शिकल्या सरवल्या मानवी विचारांत हा विचार नसून एक धोतांड़-अंधश्रद्धामय कल्पना होती.

ह्या विचारतेला अर्थ तरी काय होता.

पन मांणसाच मन हट्टी असत ! किती नाही म्हंट तरी ते करणारच!

पाटील मृतदेहाशेजारी दोन पायांवर खाली बसला.

डाव्या हातात पुराव्याची पिशवी होती- त्यातून
मंगळसूत्र दिसत होत.

उजवा हात पाटीलने त्या पांढ-या कापडाच्या दिशेने नेहायला सुरुवात केली.

पाटीलचा हात थरथरत होता..कपाळावरून घामाचे ओघळ खाली येत होते.

कानसूळे गरम झाले होते श्वास वेगाने बाहेर येत होते.

आजुबाजुला जमलेले बघे मोठ्या उत्सुकतेनं पुढे पाहत होते.

की कधी एकदाच तो कपडा बाजुला होतो आणि प्रेत पाहायला मिळत !

पाटीलचा हात प्रेता च्या कापडाला स्पर्श झाला आणि ह्दय अस जोरान धडधडू लागल जणु बाहेर येइल.

पाटील अवतीभवतीच्या वातावरणाची जणु जाण राहिली नव्हती.

मांणसांच आस्तित्व -नैसगिर्क हवा , आजूबाजूचे आवाज सर्वकाही थांबल होत..

पाटीलच्या मनाने तो आणि ते प्रेतच फ़क्त काय ते तिथे आस्तित्वात होते असा चंग बांधला होता.

" साहेब !" एक हाक वेगाने पाटीलच्या कानांत शिरली..

आणि झटकन ! हो झटकन वळुन त्याने भेदरलेल्या - कपाळावरून घाम येत्या अवस्थेत मागे वळून पाहिल त्याचे विस्फारले डोळे त्या नवख्या हवालदाराला एकटक पाहत होते...

मागे तो नवखा तरूण हवालदार सुद्धा
पाटीलची ही भेदरलेली अवस्था पाहून जरासा कावराबावरा झाला होता.

" क..क..काय!" एक नी एक शब्द उच्चारतांना पाटीलला किती कष्ट घ्यावे लागले..

जणु अंगातल त्राण निघुन गेल असाव.

" साहेब , आजुबाजुला मांणस आहेत. नका काढु ते प्रेतावरच कापड़! आधीच जाम डेंजर अवस्थेत आहे प्रेत ! वाटलस तर फोटो दाखवतो ना तुम्हाला मी , या."

" हो हो !" पाटील आज्ञाधारकपणे त्या तरूणापाशी चालत आला.

जमावापासून जरा दूर येऊन दोघे उभे राहीले..

त्या नवख्या हवालदारने फोन काढला..

एक दोन वेळ टच केल ...

" हे बघा!" तो लगेच म्हंणाला.

एन आतापर्य्ंत पाटील सावरला होता.
त्याने हातात फोन घेतल.. स्क्रीनवर भिमक्काचे शवागार खोलीतल्या बर्फाच्या लादीवर नग्न अवस्थेत झोपलेले फोटो होते.

गुप्त अंगांवर ब्लर इफेक्ट चढवल होत.

पाटीलने प्रथम प्रेताच्या गळयावर पाहील..
गळा रिकामा होता. आणी ते पाटीलने मनात ठरवल सुद्धा होत.. कारण पोस्टमॉर्टम करतांना अंगावर काहीच नसत.

पाटीलने मग प्रेताची झालेली भयान अवस्था पाहिली..

अंगाने चार फुट उंच ,फुगलेल्या भिमक्कांच प्रेत जरा लवकर पांढर पडल होत.

डोक्यावर टाळूमधोमध एक मोठ दगड लागल्याने
कवटी फुटून रक्ताने चेहरा-लाल काळा झाला होता..

त्यासहितच वरचे काळे रक्ताने भिजलेले केस चेहरा झाकत त्यावर चिकटले होते.

पाटीलने उजव्या बाजूला स्क्रॉल केल !
तसा क्षणात त्याच्या अंगावर एक हळकासा काटा आला..सर्व अंग नक्षिखांत शहारल..

दुस-या फोटोत

डोक्यावरचे केस मागे केले होते..
गोल चेह-यावर लाल रक्त काळ होऊन चिकटल होत.

त्यासहितच फुगलेले गाळफाड दोन्ही कडून कानापर्य्ंत फाटले होते.

त्यातून बत्तीस शुभ्र दातांच दर्शन होत होत.

पाटीलने तिस-यांदा स्क्रॉल केल..

तिस-या फोटोत डॉक्टरने

प्रेताचे फाटलेले गालफाड धाग्याने शिवले होये.
त्यासहितच डोळयांतली उघडलेली बुभळ एकटक निर्जीव थंड नजरेने पाटीलकडे पाहत होती.

ती थंड निर्जीव नजर पाटीलच काळीज चिरत आत घुसली. .

भीतीपोटी त्याने तेवढ्यावरच ते फ़ोटो पाहायच सुद्धा थांबवल.

" काय रे !"

" हा सर !"

" ह्या बाईच्या बॉडी सोबत तिच मंगळसूत्र, वगेरे काही भेटल का "

पाटील गंभीर नजरेने त्या हवालदाराकडे पाहत होता.

तोच अजुन एक पोलिसांची गाडी तिथे आली.

तस पाटीलने त्या दिशेला पाहिल...

जीपमधुन एक थ्री- स्टार पोलिस ऑफिसर उतरला. त्याची ढेरी युनिफॉर्मच्या आत सामावत नव्हती..

तोंडात लाल रंगाच पान चघळण सूरू होत.

तो ऑफिसर उतरताच त्याच्या मागून अजुन दोन हवालदार उतरले.

" नमस्कार साहेब ! " पाटील त्या पोलिसर ऑफिसर जवळ आला.

" सर आत तीन खूनsss!" पाटील पुढे काही बोलणार तोच..

त्या पोलिस ऑफीसरने हाताचा पंजा दाखवत त्याला थांबवल..

" थु !" करत तोंडातला पान थुंकला..

" , ए पाटील जेवढ सांगेल तेवढ करायचं , संमद्या बॉड्या इथ अंगणात आणून ठेवा ! आणि ती काय झ्ंजट बोलावले ना फोरेंसीक ची ती रिटर्न घ्याला सांग , "

" काय ? पन साहेब हे खून झालेत - तपास व्हायला नको का ?"

" ए पाटील - मी तुझा हेड आहे ! कोणाशी कस बोलाव समजत नाय का तुला , चल निघ इथून ! मी ह्या केस मधून काढतोय तुला ! चल जा ? ठाण्यात जा ! " त्या ऑफिसरने उद्धट शब्दांचा उच्चार केला.

पाटील हवालदार असल्याने तो तरी काय करणार होता.? गपगुमान त्याने पुराव्याच्या पिशव्या सोपवल्या , आणि हताश होऊन स्टेशनच्या (ठाणे) दिशेने निघाला.

तो जाताच ईकडे त्या पोलिस हवालदाराने आपल फोन काढल..

दोन तीन टच केल आणि कोणालातरी कॉल लावल.

" काम झाल साहेब! "

" गुड- काही प्रोब्लेम !" फोनमधून आवाज आला.

" अरे साहेब , गावातला मेटर आहे. आणि तस पण इथली गावंडल मांणस प्रेताची चिरफाड करून देत नाय ! आणि वरच डिपार्टमेंन्टच म्हंणाल तर ..
तेवढ काय ते त्याच बघा की..! ते भेटल की बाकी मी हेंन्ड़ल करतो !"

# " हो भेटुन जातील -पन ही प्रेत आजच जळायला हवीत. पैश्याच टेंशन नको घेऊस..मसणात जेव्हा प्रेत जळतील.. तेव्हाच चिंचेच्या झाडामागे माझा एक माणुस तुला पैश्याची बैग देऊन जाईल..! "

" ठीके ..साहेब ! मग ठेऊ फोन - नाय ते मी तिरडी बांधायला घेतो..खिखिखिखी..!"

तो ऑफिसर खवचट हसला....


आणी तेव्हाच पलीकडून फोन कट झाल...

क्रमश..




"