"मी कोण आहे!!??? माझ्यात काय आहे??"काही क्षण ती त्या शब्दांकडेच बघत बसली. तिची तंद्री आईच्या ओरड्याने मोडली गेली..
"ए बाई!! गॅस वर ठेवलेल्या दुधाकडे लक्ष दे जरा!"ती डचकली.
"ह-हा हा देते "स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ती म्हणाली.
दिवस सरत गेले.एके दिवशी पुन्हा शिवचा मेसेज आला.
"वैदेही "पण ती ऑफलाईन होती. शिवच्या मनात विचारांचा काहूर माजला.
"यार ऑनलाईन ये ना पटकन. खूप महत्तवाचं सांगायचं आहे... अरे!मी का विसरतो मी कोण आहे. मी तिला ऑनलाईन आणू शकतो कि!"त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलं. त्याने त्याच्या बाजूलाच असलेल्या त्या माणसाला अदृश्य शक्तिकडे बघितलं.
"बॉस, प्लीज 😄🙏!"मंद हसत त्या शक्तीने मान डोलावली. "मी नाही म्हणलो तरी तू काय ऐकणार आहेस का माझं हं?जा कर तूझ्या शक्तीचा उपयोग "
"Thankyou🥰🥰🥰"
इथे शिव त्याची शक्ती वापरण्यात व्यस्त होता. ती शक्ती गंभीर झाली. "शिव... मला माहिती आहे तू भलतीच अपेक्षा करून बसला आहेस. पण तुझा अपेक्षा भंग होणार आहे लवकरच. वैदेही तुला सत्य दाखवेल. आता तुझी खरी परीक्षा, कि तू ते मान्य करतोस कि नाही... नाही केलंस तरी तुला ते करावं लागेल. कारण वैदेहीने एकदा ते सांगितलं कि ते खरंच असतं. ही तिची एक शक्ती आहे. तुला लवकर उमगलं तर ठीके... नाही कळलं तरी तुला हळू हळू कळेलच."
शिवने त्याची शक्ती वापरली.
"चला माझं काम तर झालं. आता येईलच ही काही मिनटात ऑनलाईन🙂↕️"
वैदेही इथे कॉलेज मध्ये समृद्धी सोबत होती. दोघीही शेवटच्या lecture साठी वाट बघत होत्या. वैदेही या कारणामुळे ऑफलाईन होती. Lecture ला 15 मिनिट बाकी होते.तेवढ्यात एक जन म्हणाला कि lecture सरांनी कॅन्सल केलंय. ते तपासण्यासाठी समृद्धीने मेसेज पाहिला. खरंच lecture कॅन्सल झालंय हे कळतच., दोघी काही सेकंड च्या आत classrom च्या बाहेर पडल्या.
"भाई बरं झालं. मला तर खूप कंटाळा आला होता "सुस्कारा सोडत समृद्धी म्हणाली.
"हो ना गं... काळ जे सर म्हणले होते कि ते lecture चुकवणार नाहीत, आज तेच सुट्टी घेऊन घरी चाललेत वाटतं."
"Hm, त्यांला माहित आहे ना आपला वर्ग किती आतुर असतो त्यांच्या lecture साठी "दोघी खुदकन्न हसल्या.
ट्रेन आली आणि त्या चढल्या. वैदेही दादरला उतरली आणि समृद्धी पुढे प्रभादेवी ला गेली..
वैदेहीने धाव घेत आपली दादर -कल्याण फास्ट पकडली.
"हुश्श!!बाबा बरं झालं लवकर आले. नाहीतर काय बेकार गर्दी असते या गाडीला. सगळ्या सीट्स occupy होऊन जातात "श्वास घेतला. आणि तिने लगेच मोबाईल उघडला. समोर शिवचा मेसेज दिसला.
तिने "बोल ना "असा रिप्लाय त्याला केला. तिच्या मेसेज ची तो वाटच पाहत होता.तिचा मेसेज येताच त्याने चटकन रिप्लाय केला.
"मला एक गोष्ट सांगायची होती "
"हो बोल "
"यार माझ्यासोबतच असं का होतं गं.. जेव्हा केव्हा चांगल्या आपल्या फीलिंग्स फुलत असतात तेव्हाच नेमका काहीतरी घडायचं असतं😩"
"का? काय झालं?"
"वैदेही... अगं वेदिका ही सोसायटी सोडून बाजूच्या सोसायटी मध्ये चाललीये "तिचे डोळे थोडेफार मोठे झाले. तिच्या प्रेमी मनाला थोडंफार आनंद झाला पण तरी एक मैत्रीण म्हणून वाईट वाटलं.
"तुला कसं कळलं?"
"अगं माझे आणि तिचे दोघांचे बाबा आहेत पोलीस तर ते भेटले होते.. तेव्हा कळलं कि ते लोकं सोसायटी सोडून बाजूच्या सोसायटी मध्ये चालले आहेत "
"Oh!"
"पण हे वेगळं होणं काय मला तिच्यावर प्रेम करण्यापासून थांबवू नाही शकत..मला एक माहित आहे कि ती इथे नेहमी येणार कारण तिचे मित्र मैत्रीण इथे आहेत सगळे. मला पण दिसेलच 😉😏आणि मी तर येतोच कि खाली खेळायला. एक दिवशी मी तिला प्रोपोस करेल.. शेवटी हमारे प्यार को कोई नी रोक सकता, hehehehe"मिश्किल पणे तो हसला. पण त्याच्या बाजूला असलेली शक्ती त्याच्या गैरसमजावर हसली.
ती मनातच बोलली
"बोल वैदेही, खोल दे अपने शक्ती का पिटारा. मार उसके तोंड पे फेकके "
"Excuse me brother, don't mistake your liking to love, you are still in your initial stage.. आणि जी फुशारकी मारून तू बोलतोय ना कि मी खाली येतो.. एक काम कर, मेंदू मध्ये स्तिथ असलेल्या दोन अवयव 'cerebral cortex and hippocampus ' या दोन अवयवांवर ताण दे, त्यांला म्हण बाबांनो जरा आठवा मी केव्हा आलो होतो खाली शेवटचा... जमलं तर मला आतूनच कानफाड मारा कारण मीच कधी खाली गेलो नाही तर मग ते तुम्हाला आठवेलच कसं.
बाळा तू 9 वि नंतर एकदा पण धड नीट खाली आला नाहीस.. आणि म्हणे मी तिला प्रोपोस करेल.. Blah blah blah"
"Uh--"
"आणि राहिला प्रश्न कि तुला जी अपेक्षा दिसतेय.. कि आमचं होईल.. लाथ मारून ती अपेक्षा काढून टाक. काही फायदा नाही त्याचा "शिवच्या बाजूची शक्ती निमूटपणे हसत होती."ती भलेही जवळच कुठेतरी गेली असेल राहायला.. तुला भले अपेक्षा असेल कि काय नाय भेटेल मला ती.. हे शारीरिक दुरावा काय आम्हाला थांबवू शकत नाही.. बाळ जागा हो.. Mark my words right now... तुम्ही कधीच एकत्र येणार नाही!"
"ये शाब्बास....... Wohoooooooooo,,,सिक्सर 🎊🎊🥳🥳🥳🥳शाब्बास माझी पठी..."ती शक्ती ओरडली.. शिवने मागे वळून बघितले.. त्याच्या कपाळावर आठ्या स्पष्ट दिसत होत्या... त्याने नजरेतच सवाल केला..."काय?"
"कळेल "असं उत्तर त्या शक्तिकडून आलं.
पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✌️✨