"काय?"
"कळेल "त्यावर शक्तीने उत्तर दिले.शिवने भुवयी आक्रसली.त्याने मेसेज type केला.
"तुला का वाटतंय असं? आणि तुला काय माहित किती खरं ते?"
"शिव... हे बघ तू जेव्हा मला सांगितलं ना, कि तुला वेदिका आवडते.. तेव्हाच मला माझं मन सांगून गेलं. तुम्ही दोघ कधीच एकत्र येऊ शकत नाही. माझ्या मनाने तुम्हाला सोबत चित्रित करायचा प्रयत्न केला होता, पण त्याने स्पष्ट नकार दिला, आणि सरळ सांगितलं 'हे जोडी होणे नाही' "
"वैदेही 😂तुला वाटतं का मी ह्यावर विश्वास ठेवेल. तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून तुला आवडणार नाही कोणासोबत येणं. त्या मुळे तुला तुझं मन भ्रमात ठेवतंय कि काही नाही होणार आमचं."
मागून ती शक्ती हसली "मला वाटलंच होतं हा असा बोलणार.. वैदेही बाळा राहूदे, त्याला काळ समजावेल. पण खरंतर तू एक वाक्य अजून बोलली नाही आहेस गं. तूझ्या मनात ते आहे.. पण तुझा मेंदू ते विसरलाय.. काही हरकत नाही.. पुढच्या मुलीच्या वेळेस हे तू नक्की बोलशील 🙂↕️"
"As you wish shiv. I won't force you to believe me... काळ तुला समजावेल"
"बघू. " असं बोलून तो गायब झाला.
वैदेही विचारत होती.
"पण माझं मन इतकं ठामपणे का सांगेल?? आणि जेव्हा देखील मी त्या दोघांना सोबत बघण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा असं वाटतं कि ती दोघं एका मेकाला strongly repel करत होते.. जणू त्यांने कधीच सोबत ना यावं............... पण...... माझं म्हणणं जर चुकीचं असेल तर..??? खरंच माझ्या स्वार्थापायी मी असं करत असेल तर???"
ती शक्ती तिला बघत होती. "वैदेही,वैदेही... विश्वास ठेव स्वतःवर.... अर्रर्रर्र मीच विसरलो, तू नवीन आहेस या शक्तीसाठी... तुला थोडा वेळ लागेल या वर विश्वास ठेवायला.. पण नो issue... ठेवशील तू विश्वास 😊"मायेने तिच्यावर हात फिरवला.
"मी स्वतःला जरी शिव सोबत imagine केलं ना.. तर माझं मन घाबरतं.. ते म्हणतं कि हे नकोय मला.काय फीलिंग आहे यार ही 😩काहीच कळत नाहीये.. सोड मी जास्त विचार नाही करत "ती आपल्या कामात व्यस्त झाली.
ती शक्ती पुन्हा बोलली
"हो वैदेही बाळा. तुमचं एकत्र येणं हे कधीच घडणार नाहीये... पण ते तुला समजायला वेळ लागतोय. तू उगाच शिवच्या मागे आहेस अजून.पण, पण, पण... हे सगळं शेवटी त्याच्या इच्छेने होतंय, त्याला काहीतरी कारण आहे... जेव्हा आयुष्यात ते खरं प्रेम येईल ना.. तेव्हा तुला कळेल."
******
बरेच दिवस लोटले गेले. दोघंही अभ्यासात व्यस्त असल्यामुळे एका मेकाला एवढे मेसेज करत नव्हते.
पण शिवनेच पुन्हा मेसेज केला.
"वैदेही.. ही बिडवई हे आडनाव मराठी माणसाचं आहे का गं?"
वैदेहीचे डोळे चकाकले.. "हो मराठी आहे.. And ia she by chance आकृती बिडवई?"शिव इथे थक्क.
"तुला कसं माहित...!!!???? तू काय जादू टोणा करतेस का गं?"
ती हलकीच हसली "मला सगळं माहीत असतं.."
"सांग ना कसं माहितीए "
"अरे ती माझी शाळेतली मधली मैत्रीण आहे..म्हणून मला माहितीए.. आणि एकतर तिचं आडनाव इतकं वेगळं आहे.. कि लगेच ओळखलं मी..बरं तिचं काय झालं"
"अगं मी तिला ना आज माझ्या क्लास मध्ये पाहिलं.. तर तिने मला लगेच आकर्षित केलं.. किती तरी सुंदर मुली आहेत माझ्या वर्गात, पण तिने एकटीनेच मला आकर्षित केलं.. अरे माझ्या मागे कितीतरी मुली आहेत.. मी त्यांना भाव देत नाही.. कारण त्यांच्या मनात फक्त timepass एवढंच असतं... कुठे तुझ्यासारखी निखळ भावना मी कधी पाहिली नाही... पण जेव्हा आकृती कडे मी बघितलं ना.. मला जाणवून गेलं.. ती अगदी same तुझ्यासारखी आहे.. Pure soul... आणि ती एक वेगळीच खूप प्रकाशमय ऊर्जा reflect करते... आणि खूप सुंदर दिसते "
"Hmmm.. घोडा इथं अडला वाटतं.. ए तुला काय कामं धंदे नाहीत का.. येता जाता पोरी आवडतात तुला.. एकावर स्थिर राह ना "
"😂😂काय करू मी आता... मन किती किती जणांवर प्रेम करू पाहतय बघ "
"एक चमाट मारिन ना.. गाल पिवळा करिन.. तू भरकटलेलं पाखरू सारखा भिरभीरतोय मिळेल त्या फुलावर..हे बघ तुझं फक्त आकर्षण आहे.. कोणावर तू प्रेम अजून केलं नाहीयेस. प्रेम असं माणसाप्रमाणे बदलणारं नसतं.. एकदा झालं कि सगळे फिक्के दिसायला लागतात त्या व्यक्तीसमोर.. त्या व्यक्तीला तू कायमचं लॉयल होऊन जातोस.. तुझ्यासारखं नाही.. एकीकडून दुसरी कडे.. "
"Hmmm "
"आणि मी म्हणले होते ना.. तू आणि वेदिका कधीच एकत्र येणार नाही.. आणि तेच झालं.."
"Hmmmm, बरोबर बोलली होतीस तू.. पण ह्या वेळेस फायनल आहे आकृती "
"😏ही पण नाही मिळणार तुला.."
"तुझा अंदाज या वेळेस चुकीचा आहे..ह्यावेळेस तू गंडलीस "
"मी कधी गंडत नाही.. जे आहे ते तुला सांगतेय. इनफॅक्ट पहिलेच warn करून ठेवतेय. बाकी जसं तुला हवं तसं कर "
"Ok... कारण या वेळेस काहीतरी वेगळं घडलंय.. आज आमचा पाहिला eye contact झाला... त्यात मला असं जाणवलं कि तिला मी देखील आकर्षित करतो... आणि ती बघत होती माझ्याकडे... जेवढं मी आता पर्यंत observe केलंय ना.. ती कोणत्याही मुलाकडे कधी बघत नाही.ना कधी जास्त बोलते.. पण या वेळेस तिने माझ्याकडे बघितलं.. मला असं जाणवून देखील गेलं कि तिला माझ्याशी बोलायचं आहे..पण ती स्वतःला रोखठोक होती. कदाचित तिच्या मैत्रिणींमुळे कारण ते तिला चिडवू लागतील आणि माझी देखील तिचं हालत आहे.. म्हणून मी गप्प आहे "
"अच्छा.. Since बघ मी तुला सांगते कि हो तू आकर्षक आहेस.. म्हणून तू सगळ्यांना आकर्षित करतोय... ती देखील तुला आकर्षित झाली आहे.. नो doubt.. पण एक लक्षात ठेव.. एका आकर्षनावर पुढचं भविष्य ठरत नसतं.."
"अरे पण बघ ना यार.. या वेळेस तिला देखील मी आवडत असेन "
"आवडत असेन आहे ते.. आवडलास असं नाहीये.. Conclude accordingly. हे बघ तुझी शुभचिंतक म्हणून सांगतेय.. लगेच कोणत्या गोष्टी बद्धल घाई करू नकोस.. सुरवात कधीपण हळू असाव्यात."
"हो गं मला तुझी काळजी कळतेय.शेवटी तूच एक आहेस गं जिच्याकडे मी मोकळा होऊ शकतो. जिच्याकडे बोलले कि मन हलकं वाटतं..नाहीतर कित्येक वर्ष कि एकटेपणात घालवले आहेत माझ्या वेगळेपणा मुळे..
तुला एक सांगू मी बाहेर फक्त म्हणायला म्हणतो कि ही माझी बेस्टफ्रेंड आहे हा माझा बेस्टफ्रेंड आहे..सगळं खोटं असतं हे... खरी बेस्टफ्रेंड तर तू आहेस गं.. जी माझी अजून देखील साथ देतेय हे माहित असून देखील कि मी तूझ्या फीलिंग्स तुला रिटर्न करू शकत नाही तरी, वरतून माझ्यासारख्या अजिब creature ला समजून घेणं तर फार कठीण.. लोकांना मी सांगेल त्यावर कधीच विश्वास बसणार नाही.. किव्हा म्हणतील कि काय फेकतो.
मी एक माझी पॉवर सांगतो.. I can see future and also मी हे देखील सांगू शकतो कि तू आता सध्या ब्लॅक पॅन्ट, ब्लू कलर चा tshirt घालून बेड वर बसली आहेस. पाय असे समोर पसरवलेत, मांडीवर उशी आहे आणि त्यावर वही आहे.त्या वही मध्ये मला काही आकडे आणि काही अक्षरं दिसतायेत.. आणि तू खिडकीच्या बाजूला बसली आहेस "
😶वैदेही थक्क होती.. ह्याला कसं माहित मी काय करतेय, कशी बसलीये,मी काय घातलंय.
"Hello... आहेस ना?"
"हो आहे.. सॉलिड यार तुला कसं माहित मी काय करतेय.. बघत नाहीयेस ना लपून -छपून "
"नाही गं 😂ही माझी पॉवर आहे एक. विश्वास बसतोय?"
"हो बाबा बसतोय मला.. मी कधी तूझ्या पॉवर्स वर संशय नाही घेतला."
"Good girl.. पण मला आता जावं लागेल.. काम आहे.. आणि thankyou for you concern😉don't worry तू जे काही बोलली आहेस ते लक्षात ठेवेल मी "
"Yess🙂↕️"
"आणि हो जाता जाता तुला मी तुझ्यात असलेलं गुपित सांगतो.."
"काय??......"
पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✌️