Premgandh - 30 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ३०)

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंदचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला समजावत असतो आणि तो त्याचं ऐकतो पण.... राधिकाला मात्र तिच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आणि मैत्रीणींची आठवण येत असते... ती एकटीच आठवणीत रमलेली असताना अजय तिला बघतो आणि तीला काळजीने काही प्राॅब्लेम झालाय का? असं विचारतो... तीला अजयला तिच्या नातेवाईकांबद्दल सगळं सांगायचं असते, पण आता नको आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू असं सांगून तो तिला सगळ्यांसोबत एंजॉय करायला घेऊन जातो...
आता बघूया पुढे काय होते पुढच्या भागात....)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


सगळे मुलं नदिच्या काठावर खेळत होते... शिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते... बाजूच्या शेतातला एक माणूस खूप सारे मक्याचे कणीस घेऊन आला आणि त्याने ते जिथे शिक्षक बसले होते त्यांच्या समोर आणून ठेवले... सगळ्यांना वाटलं की त्यांनी ते मके विकायला आणून ठेवले... म्हणून मुलं त्यांच्याकडे ते विकत घेण्यासाठी धावले...


अजय - "काका सगळ्यांना द्या एकेक कणीस, मस्त खरपूस भाजून आणि लिंबू, मीठ लावून..." तो तोंडाने आवाज करतच म्हणाला...


तो माणूस - "नमस्ते मास्तर ..." त्याने सगळ्या शिक्षकांना हात जोडून नमस्कार केला...


अजय - "नमस्कार काका..." अजयने आणि इतर शिक्षकांनी पण त्यांना हात जोडून नमस्कार केला.


"मी नारायण... गावात सगळे मला नर्‍या बोलतात.... त्यासाईडचं शेत आहे ते माझं... सध्या शेतात मका आहे, पोरांना पाहीलं आणि घेऊन आलो त्यांच्यासाठी..." आणि तो हाताने त्याचं शेत दाखवत होता...


अजय - "हो का बरं काका... पण आता कणीस भाजणार कसे तुम्ही...?"


नारायण - "त्याची पण सोय करतो थांबा...." तो आपल्या शेताकडे गेला आणि थोड्या वेळाने लाकडं घेऊन आला. त्याने ती लाकडं साईडला ठेवली आणि तीथे छानशी रचून आग पेटवली... तो काय करतो ते सगळे त्यालाच बघत होते...


नारायण - "अहो मास्तर... या सगळ्यांनी इथं..." त्याने हात करून सगळ्यांना जवळ बोलावलं... अजय, निलेश सर, दिलीप सर सगळे त्याच्या जवळ गेले...


नारायण - "या इथं बसा सगळ्यांनी आणि कणीस भाजा... मस्त लिंबू, मीठ चोळा आणि द्या पोरांना खायला..." तिघेही एकमेकांकडे बघून हसू लागले... आणि कणीस भाजायला लागले आणि भाजून भाजून लिंबू मिठ शिंपडून एक एक मुलांना खायला देऊ लागले...


दिलीप सर - "काका, सगळे कणीस मोजून घ्या आणि किती पैसे झाले, त्याचा हिशोब करून सांगा आम्हाला..."


नारायण - "अहो मास्तर, शेतकरी माणसं आम्ही... या लहान लहान लेकरांकडून काय पैसे घेऊ मी... तुम्ही आले तेव्हाच पाहीलं तुम्हाला मी... बरं शेतात कणिस झालेत... जाऊ पोरांना घेऊन... माझ्यासारख्या गरीब शेतकर्‍याकडे तुम्हाला देण्यासाठी दुसरं हाय तरी काय? बरं हे खाऊन पोरं खुश होतील म्हणून घेऊन आलो... पैशासाठी नाय आणले मी हे इथे..." त्याच्या बोलण्यावर तिघेही एकमेकांकडे बघू लागले...


अजय - "काका, तुम्ही गरीब नाहीत हो, तूम्ही मनाने खूप श्रीमंत आहात बघा... काका, आम्ही शाळेत शेतीबद्दल आमच्या मुलांना शिकवताना त्यांना नेहमीच एक गोष्ट शिकवत असतो की आपला शेतकरी जरी गरीब असला तरी तो मनाने खूप श्रीमंत आहे, मनाचा राजा आहे... कारण आपल्या शेतकर्‍यांच्या घरी आपण रिकाम्या हाताने जाऊ पण येताना मात्र भरलेल्या झोळीनेच परत येऊ.... कारण आपला शेतकरी आपल्या घरून कोणालाच रिकाम्या हाताने आणि उपाशी पोटी पाठवत नाही... तो नेहमीच समाधानी आणि मोठ्या मनाचा असतो आणि काका आज ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय... खूप आनंद वाटला बघा आज तुम्हाला भेटून..." अजयने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्यांचे आभार मानले... निलेश सर आणि दिलीप सरांनी पण त्यांचे आभार मानले...


नारायण - "अहो मास्तर राहू द्या की... आभार कसले मानताय...! या लहान लहान लेकरांच्या चेहर्‍यावरचा आनंदच मनाला खूप समाधान देऊन जातो बघा आम्हाला..."


अजय - "काका, खरंच खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही..." त्यांचं बोलणं चालू होतं आणि अचानकच त्यांना चार पाच माणसांचा जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला... सगळे त्यांच्या दिशेनेच बघू लागले. ती माणसं अजय वैगेरे बसले होते त्याच दिशेने चालत येत होते... त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या... हलतडूलतच येत होते... नारायण काकांना माहीत होतं आता पुढे काय होणार ते म्हणून त्यांनी अजयला सांगितलं....


नारायण - "मास्तर, सगळ्यांनी उठा तुम्ही इथून आणि मंदीराकडं जा सगळ्या पोरांना घेऊन... हि सैतानं इथे आता धिंगाणा घालतील... उठा पटकन आणि जावा तुम्ही..."


अजय - "अहो काका त्यांना कशाला घाबरायचं आणि कोण आहेत हे लोकं? असे दारू पिऊन इकडे का फिरत आहेत..?"


नारायण - "अहो मास्तर, हे तमाशे आजचे नाहीत... कित्येक वर्षांपासून हेच चालू आहे या गावात या लोकांचं... दारू पिऊन धिंगाणे करायचे, तमाशे करायचे, भांडण, दादागिरी हेच करतात हे लोकं..."


निलेश सर - "मग तुम्ही यांची पोलिस कंम्पलेंट नाही करत का काका?" त्यांवर काका हसले...


नारायण - "कित्येकदा कंम्पलेंटी करून झाल्या, पण काही उपयोग नाही बघा... फक्त एक दिवस ठेवतात त्यांना आणि दुसऱ्या दिवशी देतात सोडुन... मग आले की त्यांहून जास्त त्रास देतात... मग लोकांनी कंम्पलेंट करणं पण सोडून दिलं... सगळे पैशाचे खेळ आहेत मास्तर, बाकी काही नाही..." ते माणसं जवळ येत होते... नारायण काका उठले...


नारायण - "मास्तर, उठा तुम्ही आणि जा इथून... एक दिवसासाठी आलेत तुम्ही इथे... उगाच या भानगडीत पडू नका तुम्ही..."


दिलीप सर - "अजय चल निघूया इथून..." तिघेही उठले आणि जायला निघाले... तेवढ्यात ती माणसं पण जवळ येऊन उभी राहिली...


एक जण - "ऐ थेरड्या, तोंड काय बघतोस? चल पटकन मकं भाज... दारूसोबत मस्त चटपटीत चाखणा बनवून दे आम्हांला...." अजयने तर त्याचं असं बोलणं ऐकून हाताच्या मुठीच वाळल्या... नारायणचे मके भाजताना आगीच्या चटक्याने हात थोडे थरथरत होते... ते पाहून त्यांतला एकजण म्हणाला....


"ऐ थेरड्या, तूला पण दारू देव का रे? थेरड्याचे हात थरथरतात बघ रे..." असं बोलून त्याला सगळे हसत होते.


त्यातल्या एका माणसाने नारायणला कमरेत लाथच मारली....


"चल रे थेरड्या साईडला हो. असे कधी भाजून होतील ते...? तू भाजशील तोपर्यंत आम्ही म्हातारे होऊ तुझ्यासारखे आणि तू जाशील म्हसणात..." तो हसतच म्हणाला... नारायण काका ओरडले साईडलाच जाऊन पडले... त्यांच्या कपाळाला दगडाचं लागलं... त्यातून रक्त येऊ लागलं... अजय त्यांच्याकडे धावतच गेला आणि त्यांने काकांना उठवलं... खिशातून रूमाल काढून त्यांच्या कपाळाला बांधला...


अजय - "ए तूला काही अक्कल आहे की नाही रे... तुझ्या बाबांच्या वयाचे आहेत ते, एवढं तरी भान ठेव जरा... काही माणूसकी आहे की नाही तुझ्यांत..." अजय ओरडूनच म्हणाला...


नारायण - "मास्तर, तुम्ही नका बोलू काही उगाच... जाऊ द्या, त्यांच्या तोंडाला नका लागू तुम्ही..."


"अरे बापरे, मास्तर.... हा मास्तर आपल्याला शिकवतोय बघ..." एकजण त्याच्या सोबत असलेल्या माणसाकडे बघून बोलला आणि हसू लागला... ते पण हसू लागले...


"ए मास्तर, शाळेत जाऊन तुझ्या चिल्या पील्यांना शिकवायचं... इथे आमच्यासमोर तुझे पाढे नाय वाचायचे... चालतं बनायचं इथून..." एकजण अजयला धमकीच्या सुरातच म्हणाला.


सगळी मुलं घाबरून गेली होती. अंजली बाई, सरीता बाईंनी मुलांना एका साईडला घेतलं. राधिका खूप घाबरून गेली होती... ती अजयजवळ गेली आणि त्याला समजावू लागली.


राधिका - "अजय, चल इथून, या लोकांच्या नादाला नको लागूस तू, प्लीज, मुलं पण सगळे घाबरून गेलेत, आपण निघूया इथून चल..."


नारायण - "पोरी मास्तरांना घेऊन जा इथून... उगाच काही विपरीत घडाय नको..." निलेश सर आणि दिलीप सर पण त्याला समजावत होते... अजयने नारायण काकांना उठवलं...


अजय - "काका चला, तुम्हाला तुमच्या घरी सोडतो... आणि लगेच डाॅक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या..." सगळे जायला निघाले...


"हे कोणत्या गावचं पाखरू आलंय रे इथे, मास्तरीन हाय वाटतं... मास्तरांची लय काळजी वाटतेय... आयटम हाय वाटते या फट्टू मास्तरची..." आणि ते सगळे जोरजोरात हसू लागले आणि शिट्ट्या मारू लागले... हे ऐकून अजयच्या तळपायाची आग मस्तकातच गेली...


अजय - "काका, थांबा तुम्ही इथे, मी आलोच..." आणि अजय त्यांच्याकडे जायला वळला... राधिकाने त्याचा हात पकडला आणि त्याला ती थांबवू लागली...


राधिका - "अजय प्लीज, तू चल इथून, सोड त्यांना..."


नारायण - "मास्तर, जाऊ द्या, नका त्या सैतानांच्या नादाला लागू तुम्ही..." त्याला सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला... पण थांबेल तो अजय कसला...! अजयने बाजूचंच एक जाड मजबूत असं दांडकं उचललं आणि तो त्यांच्याजवळ गेला... ते माणसं त्याला बघून हसत होते.


"तू आम्हाला मारायची हिम्मत करणार का रे आता मास्तूरड्या?" एकजण असं बोलतच अजयच्या अंगावर हात उचलतच पुढे आला... अजयने त्याचा पटकन हातच पकडला आणि त्याला दांडकाने जोराचे पायावरच मारले तसा तो खाली विव्हळतच पडला... तसे बाकीचे माणसं पण त्याच्या अंगावर धावून आले... सगळेच खूप घाबरून गेले... पण अजयने मात्र समोरून धावत येणाऱ्या एका माणसाला जोराची पोटातच लाथ मारली. तो पण एका साईडला जाऊन पडला... बाकीचे तीनजण एकदमच त्याच्या अंगावर धावून आले... पण तेवढ्यात निलेश सर आणि दिलीप सर पण अजयच्या मदतीला धावून आले...आणि तिघांनी पण दांडक्याने त्यांना चांगलंच धुवून काढलं... पडलेले दोघेजण आधीच उठून पळू लागले होते.... सगळी मुलं उड्या मारून, टाळ्या वाजवून खूप हसत होते.... तिघेपण खाली विव्हळतच पडले होते...


"काय मग आजच्या पुरता एवढे पाढे बस झाले ना? कि अजून उजळणी घेऊ तुमची? आमचं कामच आहे ते पाढे शिकवणं..." अजय म्हणाला...


"नाही मास्तर बस झाली उजळणी... अजून नको पाढ्यांची उजळणी..." ते हात जोडूनच रडक्या आवाजात बोलू लागले....


"काय बोललास परत बोल, ऐकू नाही आलं मला... काय बोललास मास्तूरड्या?" आणि अजयने परत त्यांच्यावर मारायला दांडूक उचलला...


"नाही नाही, मास्तर, मास्तर बोललो मी..." त्याने अजयचे पायच पकडले....


"आणि समोर त्या आहेत त्या कोण आहेत?" अजयने राधिकाकडे बघून विचारलं....


"मास्तरीन बाई आहेत त्या, मास्तरीन बाई माफ करा आम्हांला, चुकलं आमचं..." त्यांनी राधिकाकडे बघून हात जोडले...


"आणि त्या काकांना लाथ कोणत्या पायाने मारलीस तू? दाखव बरं तो पाय तुझा... चांगलीच मालीश करतो तुझ्या पायांची...." अजय म्हणाला...


"नाही नाही मास्तर माफ करा आम्हाला, काका माफ करा मला... चुकलं माझं माफ करा..." तो रडकुंडीला येतच म्हणाला आणि नारायणला हात जोडू लागला...


"चला निघा आता इथून, मागे वळुन परत बघायचं नाही इथे... चला निघा..." अजय ओरडूनच म्हणाला... तसे तिघेपण पटापट उठले आणि कमरेला हात पकडूनच लंगडत लंगडतच पळू लागले... सगळी मूलं त्यांना खूप हसू लागले... राधिका मात्र शांतच होती...


नारायण - "मास्तर, तुम्ही आता एक क्षण पण थांबू नका इथे... लगबगीनं इथून निघून जा तुम्ही... तुमची लय काळजी वाटाय लागलीय आता... इथून निघा पटकन तुम्ही..."


राधिका - "हो अजय चल इथून... इथे जास्त वेळ नको थांबूया आपण..." सगळे शिक्षक त्याला बोलू लागले...


अजय - "काका, नका काळजी करू तुम्ही... आधी तुम्ही घरी जाऊन डाॅक्टरकडे जावा... आणि काळजी घ्या स्वतःची... आम्ही निघतो थोड्या वेळाने इथून..."


नारायण - "पोरा, बघ आता तूला बापाच्या नात्याने सांगतो मी... ती माणसं चांगली नाय... काही विपरीत घडण्याच्या आतच तुम्ही इथून निघा... लोकांची बारकी पोरं आहेत तुमच्यासोबत... त्यांची फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर... माझं ऐका आणि लगेचच निघा इथून..." त्यांचं असं बोलणं ऐकून अजय पण पुढे काहीच बोलला नाही...


अजय - "बरं काका ऐकतो मी तुमचं... निघतो आता आम्ही... मी पण पोराच्या नात्याने तुम्हाला सांगतो, डाॅक्टरकडे नक्की जाऊन यायचं तुम्ही... आणि काळजी घ्यायची स्वतःची... भेटू आपण परत..." अजयने त्यांना पायांना हात लावून नमस्कार केला आणि त्यांना आलिंगन दिलं...


अजय - "आठवणीत ठेवा या तुमच्या पोराला... येतो आम्ही..." नारायणचे डोळे भरून आले....


नारायण - "कायम माझ्या आठवणीत राहशील तू पोरा..."


सगळे मुलं आणि शिक्षक जीथे बसेस थांबल्या होत्या त्याठिकाणी जाऊ लागले... अजय सगळ्यांत मागे चालत होता...

क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३०


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀