gift from stars 28 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - २८

‘क्षितिजची गाडी सरळ पुढे जाऊन एका मोठ्या झाडावर आदळली होती. त्याच्या डोक्यालाही बरीच दुखापत झाली होती. त्यात गाडीमध्ये लिक्विड गळती सुरु झाली होती. कोणत्याही क्षणी स्फोट झाला असता. त्याने हातात असणारा मोबाइल शक्य तितक्या दुर फेकून दिला आणि गाडीचा तुटलेला दरवाजा ढकलून तो कसाबसा बाहेर पडला. गाडीने पेट घेतला होता. स्फोट होणार हे नक्की होते. आणि एवढ्या जवळ गाडी असल्याने क्षितीज त्या स्फोट मध्ये सापडण्याची दाट शक्यता होती. त्याच्यापासून काहीच अंतरावर पुढे पडलेला त्याचा मोबाइल वाजत होता, भूमीचा फोन होता. तो घेण्यासाठी त्याला उठता येत नव्हते. होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून त्याने मागच्या दिशेला झेप घेतली, धाडकन मागच्यामागे जाऊन तो पाठीवर आदळला होता. बाजूचा फोन हातात घेऊन त्याने तो रिसिव्ह केला, त्याच क्षणी समोर असणाऱ्या गाडीचे कितीतरी तुकडे होऊन डोळ्यादेखत जळून ती खाक झाली होती. मोठा स्फोट झाला होता. त्याचा आवाज एवढा मोठा होता कि चालू असणाऱ्या फोनवर तो आवाज पलीकडे भूमीला ऐकू गेला. ती केव्हापासून 'हॅलो...हॅलो...'करत होती. क्षितिज तिथेच बेशुद्ध झाला होता त्यामुळे तिला काहीही रिप्लाय मिळाला नाही. स्फोटचा झालेला आवाज ऐकल्यावर तिला परिस्थितीचा अंदाज आला होता. काहीतरी अघटित झाले होते. अशा परिस्थिती काय करावे तिला सुचेना. तिने आपली पर्स उचलली. हातात फोन तसाच चालू होता. ती निधीला न सांगताच घरातून निघाली. क्षितीज नक्की कुठे असेल ? आपण कुठे जातोय ? याचा काहीही विचार नकरता तिने रिक्षा पकडली.

*****

''साब वो फाइल का काम तमाम हो गया. अभी तक तो गाडी के साथ जलके राख हो गई होंगी.'' फोनवर पलीकडून त्या माणसाचा आवाज होता.

''कौनसी गाडी? वो मॅडम गाडी लेके नहीं आती.'' मुखर्जी

''मॅडम फाइल गाडीमे छोडके गइ थी. वो आपके ऑफिस के साब का लाडका है ना उसकी गाडी.'' पलीकडून पुन्हा आवाज आला.

''अरे, तुम लोगोने क्या कर दिया? उसकी गाडी उड़ादी. अब मेरी नॊकरी गई समझो. कुछ तो मॅनेज करना पडेगा. चल फोन रक.'' म्हणत मुखर्जींनी फोन कट केला. लगोलग वेदांतला फोन करून त्यांनी क्षितिजच्या ऍक्सिडेंटची माहिती दिली. पुरावे तर नष्ट झालेलं होते.... पण क्षितिजला काही झाले तर? नुसत्या विचाराने मुखर्जीना घाम फुटला. वेदांतला देखील हा खूप मोठा धक्का होता.

*****

'भूमी अचानक कुठे गेली म्हणून इकडे निधी तिचा फोन ट्राय करत होती. खूप वेळ प्रयत्न केल्यावर भूमीने मेसेज करून तिला थोडी कल्पना दिली. ती सरळ क्षितिजच्या घराच्या दिशेने निघाली. निधी सुद्धा तिची गाडी घेऊन मागोमाग निघाली होती. भूमीने पुन्हा क्षितिजचा फोन ट्राय केला. पलीकडून कोणीतरी तो उचललं होता. ''हॅलो.''

''हॅलो.. क्षितीज ? कुठे आहे?''

''मी पोलीस कॉन्स्टेबल बोलतोय, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे, गाडीचा पत्ता नाही. त्यांना घेऊन आम्ही साधना हॉस्पिटल मध्ये आलो आहे. आपण?''

''काय ऍक्सिडेंट?'' भूमीला पुढे काही बोलवेना. हातातला फोन तसाच सोडून, तिने रिक्षा सरळ हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. पण दुर्दैव असे कि तिची रिक्षा अर्ध्या रस्त्यामध्येच बंद पडली होती. आता निधीची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

*****

'क्षितिजच्या ऍक्सिडेंटची बातमी समजताच सगळा सावंत परिवार हॉस्पिटलमध्ये जमा झाला. उजव्या पायाला आणि हाताला दुखापत झाली होती. पायाला बऱ्यापैकी मार लागला होता. गाडीच्या दारातून बाहेर पडताना बाजूचा टोकदार पत्रा लागून बरेच रक्त गेले होते. त्यामुळे दोन-तीन टाके बसे होते. 'डॉक्टरांनी काळजी करण्याचे काही कारण नाही असे सांगितले.' तेव्हा मेघाताईंच्या जिवात जीव आला. बरीच रात्र झाली होती, त्यामुळे मेघाताई आणि आज्जो घरी गेल्या. मिस्टर सावंत तिथेच हॉस्पिटलमध्ये थांबले होते. ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये काही फॉर्मॅलिटीस पूर्ण करत तेव्हा निधी आणि भूमी तिथे पोहोचल्या. क्षितीज बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. पायाला टाके मारताना त्याला भूलीचे इजंक्शन देण्यात आले होते, त्यामुळे तो तसाच झोपून राहिला होता. त्याच्या तब्ब्येतीची चौकशी करून निधी भूमीला घेऊन घरी निघाली. तिथे थांबून तसाही काही उपयोग नव्हता. क्षितिजचे आई-बाबा रात्री थांबणार होतेच त्यामुळे भूमी लांबूनच त्याला बघून घरी निघाली. एकही शब्द बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. क्षितिजला अश्या अवस्थेत बघणे हा तिच्यासाठी खूपच मोठा धक्का होता. का ? हे तिचे तिलाच समजले नाही. पण त्याला पाहिल्या नंतर तिच्या डोळ्यात अचानक पाणी जमा झाले होते. शेवटी निधीने तिला विचारले.

''भूमी तुला एवढं का वाईट वाटलं?''

''माहित नाही. पण त्याला काही झालं असत तर मला सहन नसत झालं.'' भूमी

''यालाच तर प्रेम म्हणता. मी तुला आधीच सांगितलं होत. तू सुद्धा त्याच्या प्रेमात पडलेस. त्याशिवाय त्याला बघून तुझ्या डोळ्यात पाणी आलं का?'' निधी

''त्याच्याबद्दल माझ्या मनात नक्की काय आहे, नाही सांगता येत ग. पण माझ्या फाइल्समुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला असणार. त्याच मला वाईट वाटतय. '' भूमी

''ते काहीही असो. पण तो ना तुझ्या नात्याचा, ना आधीपासून, ओळखीचा तरीही त्याच्या ऍक्सिडेंट विषयी समजल्यावर तुझी अशी अवस्था झाली. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी नाक्कच आहे. त्याला सुद्धा तू आवडतेस.'' निधी

''तुला कस माहित?'' भूमी

''तुझ्याविषयी तो बोलतो माझ्याशी. तू विचार कर जरा या गोष्टीचा.'' निधी

''माझा भूतकाळ तुला माहित आहे ना? कस शक्य आहे ग? माझं लग्न झालं होत. आणि त्याच काय... '' भूमी बोलता-बोलता अचानक शांत झाली.

''तू कोणत्या लग्नाबद्दल बोलतेस. जे लग्न मुळातच कायद्याच्या दृष्टीने अमान्य होत. ते झाल काय आणि नाही काय... सारखंच. मुळात तो होताच परदेशी त्यामुळे लग्नाआधी आणि त्या नंतर तुमचा तसा काहीही संबंध नव्हता. ते एक बरं झालं. '' निधी

‘’क्षितिजला या बद्दल काहीच माहित नाही. माहित झालं तर?'' भूमी

''तर काय? त्याला याचा काहीही फरक पडणार नाही. तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे, शांत, साभ्य आणि पाय अजूनही जमिनीवर आहेत. श्रीमंत घराणं असूनही जरासुद्धा घमेंडी नाही. अजून काय पाहिजे असत ग? '' निधी

''त्यालाही सुद्धा भूतकाळ आहे म्हणा. पण माहित नाही, मला त्याच्या बद्दल वाटत ते प्रेम आहे कि आणखी काय, हेच कळत नाही.'' भूमी

''हे बरं असतं तुमचं. एखाद्याची काळजी करायची, भेटायचं, गुपचूप बघायचं, त्याचा विषय निघाल्यावर लाजायचं सुद्धा... पण हे प्रेम आहे कि आणखी काही, हे नाही समजत तुम्हाला. तू आहे तसेच चालू ठेवणार आहेस? कि पुढे काही विचार करणार आहेस? पाहिजे तर मी त्याच्याशी विभास बद्दल बोलते. '' निधी

''नाही... नको. मी बोलेन वेळ आली कि. सध्या तो व्यवस्थित बरा होऊ दे. बाकी काही अपेक्षा नाही.'' भूमी

''तू त्याची काळजी करतेस. तो सुद्धा तुझी काळजी करतो. अजून काय पाहिजे यार. तुम्ही आता काय कॉलेजची मुलं नाही आहात, पाहिलं प्रेम वेगैरे म्हणायला. या वयात प्रत्येकाला भूतकाल असतोच. दोघांचाही पास्ट असेल तर एकमेकांशी बोलून क्लिअर करा.'' निधी

''थोडा वेळ जाऊदे. अजून पुरते ओळखत नाही आम्ही एकमेकांना. प्रत्येक वेळी घाई करून नाही चालत, आणि एकदा मोडलेला डाव पुन्हा मांडायला वेळ लागतो.’’ भूमी

''जशी तुझी मर्जी...'' निधी

निधी आणि भूमी घरी पोहोचल्या होत्या. निम्मी रात्र उलटून गेली होती. 'क्षितिजला जाग आली असले का? आता कसा असेल तो?' या विचारात भूमी जागीच होती.

क्रमश
https://siddhic.blogspot.com/