gift from stars 27 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - २७

''निधी तू येणार नाही म्हणालीस ना? मग अचानक कशी काय?'' भूमी

''अग इकडेच एक काम होतं. तर म्हंटल आले आहे तर तुझं ऑफिस बघून जावं. केवढं मोठं आहे ना ग.'' ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे बघत म्हणाली. उगाचच काहीतरी बोलून निधीने वेळ मारून नेली होई.

''होय, मग जा ना बघून ये.'' भूमी

''तू नाही येत का?'' निधी

''नाही, मला कंटाळा आला आहे. घरी जाते.'' भूमी हातातल्या फाइल्स लपवत म्हणाली.

''मी दाखवतो ऑफिस. चालेल?'' म्हणत क्षितीज तिथे आला.

''अरे वाह, प्लिज.'' निधी

''मी निघते, कॅब येईलच एवढ्यात.'' भूमी

''कॅब का ग... कॅन्सल कर आधी. आपण सोबत जाऊ. थोडावेळ थांब ना.'' निधी

''मॅडम तुम्हाला यायचं नसेल तर थोडावेळ माझ्या गाडीत बसा. निधी आलीच आहे तर दोघी सोबत जा.'' गाडीची चावी तिला देत क्षितीज म्हणाला.

आता भूमीचा नाइलाज झाला, निधीची गाडी रोडच्या त्या बाजूला उभी होती. एवढ्या फाइल्स सांभाळत इथे सार्वजनिक ठिकाणी उभं राहणं बरोबर नाही. गाडीत बसने केव्हाही सेफ. असा विचार करून ती बाजूलाच उभ्या असणाऱ्या क्षितिजच्या गाडीत जाऊन बसली. क्षितिज आणि निधी वरती जाऊन कॅफेट एरियात बोलत बसले होते.

''तुझं ऑफिस मस्त आहे ह, आय मिन कंपनी...'' निधी

''थँक्स.'' क्षितीज

''बर, काय बोलायचं होतं?'' निधी

''तू आणि निल बद्दल.'' क्षितीज

''निल आणि मी... सॉरी काही समजले नाही.'' काही न समजल्याच्या अविर्भावात निधी म्हणाली.

''नीलच्या रिसिप्शन पार्टीच्या वेळी तुम्हाला दोघांना पार्किगमध्ये उभे असताना पहिलं मी... आणि भूमीने सुद्धा.'' क्षितिज

''काय? तिला माहित आहे हे सगळं?'' निधी जवळजवळ ओरडलीच.

''होय, तू तिची बेस्ट असून तिला काही कळू दिले नाहीस, याच तिला वाईट वाटलं. सो ती आपणहून तुझ्याशी याबद्दल विषय काढणार नाही. तूच तिला सगळं खरखर सांग.'' क्षितिज

''ओह, काही दिवस मी बघते तिच्या वागण्यात फरक पडलाय. आधीपेक्षा माझी जास्त काळजी करते. पण खूप कमी बोलते.'' निधी विचार करत बोलत होती.

''काजळी करणारच, तुला ती खूप हुशार आणि समजुद्दार समजते. त्यादिवशी निल बरोबर पाहिल्यावर तिला आश्चर्य वाटलं. आणि मलाही.'' क्षितीज

''त्यात काय आश्यर्य? सगळेच प्रेम करता. हा आता सगळ्यांनाच तुझ्यासारखा समंजस क्षितीज नाही मिळत. किंवा कोणी परफेक्शनिस्ट भूमी नाही मिळत. म्हणून काय त्यांचं प्रेम हे प्रेम नसतं?'' निधी

''पण निल? का म्हणून?'दुसरं कोणीही असतं तर ठीक होतं.'' क्षितिज

''प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं थोडी सेम असतं. '' निधी हसत म्हणाली.

''आणि पुढे काय? काही फ्युचर आहे?'' क्षितीज

''आहे. माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. ते पूर्ण होणार.'' निधी ठामपणे बोलत होती.

''एम्पॉसिबल. त्याच लग्न झालाय निधी. आर यु ओके.'' क्षितीज कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता.

''त्याच लग्न झालं म्हणून माझं प्रेम कमी होणार का? प्रेमाला कसलही बंधन नाही. ना जात, ना धर्म, ना पंथ, ना लग्न. जोडीदाराचं लग्न झालं म्हणजे प्रेम संपत वेगैरे एवढे तोकडे विचार ठेवून प्रेम नाही करता येत. आणि एक तर आयुष्य आहे, कल किसने देखा? याच आयुष्यात मला निल माझा जोडीदार म्हणून पाहिजे. बास्स। मग काहीही होवो.'' निधी

''एवढा विश्वास?'' क्षितीज

''बघशील तू, तो माझ्याकडे परत येतो कि नाही ते.'' निधी

''आणि संजना? तीच काय?'' क्षितीज

''आमच्या दोघंच्या रिलेशनबद्दल तिला आधीच माहित होतं. तरीही ती लग्नाला तयार झाली. एकतर्फी प्रेम असेल. तिच्या बाबांचा पैसे बघून नीलच्या घरच्यांनी त्याला लग्नासाठी फोर्स केला. पुढे काय होणार आणि कसं? माहित नाही. कोण किती सफर करणार हेही सांगता येत नाही. पण निल माझ्याकडे परत येणार एवढं मात्र नक्की.'' बोलताना निधी खोल विचारात बुडाली होती.

''निलचे आधीचे अफेअर्स तुला माहीतच असतील ना? तरीही.'' क्षितिज

''अफेसर आणि लव्ह, यात खूप फरक असतो... शुद्ध मराठी सांगायचं तर, लफड कोणाशीही असू शकत... पण प्रेमाच तसं नाही, ते युनिक असतं. नीलची कितीही अफेअर्स असोत, प्रेम मात्र मी एकटीच होते, आजही आहे आणि कायम असणार.'' निधी

''ग्रेट, यु आर इम्पॉसिबल. ऑल द बेस्ट आणि माझी काही हेल्प लागली तर सांग.'' म्हणत क्षितीज उठला. निधीही निघाली. खरतर समजावण्यासाठी आणि नीलला विसरण्यासाठी कन्व्हेन्स करायला क्षितीजने निधीला इथे बोलालवले होते. पण ती बरोबर ट्रकवरती आहे याची आता त्याला खात्री पटली. तिचे विचार वेगळे होते. प्रेमाची व्याख्या आणि संकल्पना वेगळी होती. पण चुकीची मात्र नव्हती. तिच्यामते ते प्रेम होतं. आणि दोघेही एकमेकांवरती प्रेम करत असतील, तर ते कस काय चुकीचं असेल. म्हणूनच तर म्हणतात ना... 'Everything is fair in love and war.'

*****

निधीच्या बरोबर भूमी घरी परतली. घरी आल्यावर बोलता बोलता पार्टीचा विषय निघाला आणि निधीने भूमीला विश्वासात घेऊन ती आणि निल बद्दल सारे काही सांगितले. भूमीचा तिच्यावरचा राग आता कमी झाला होता. निधीला समजावून देखील काही फायदा नव्हता. ती तिच्या विचारांवर ठाम होती. निधीचे विचार तिच्यादृष्टीने योग्य असले तरीही ती किती दिवस वाट पाहणार? आणि निल तिच्याकडे परतून आलाच नाही तर? या विचाराने भूमीच डोकं दुखायला लागलं होतं. फ्रेश झाल्यावर तिच्या लक्षात आलं कि तिने सोबत घेतलेली पिशवी क्षितिजच्या गाडीमध्येच राहिली होती. ती क्षितिजच्या गाडीतून उतरली तेव्हा तिच्यासोबत फक्त तिची पर्स होती. त्या फाइल्स कुठे हरवत काम नयेत म्हणून तिने लगोलग त्याला फोन लावला. फोनची रिंग वाजत होती पण कोणीही उचलत नव्हते. कदाचित तो फ्रेश वगैरे होत असेल असा विचार करून तिने थोड्यावेळाने पुन्हा फोन डाइल केला. नेहमी दुसऱ्या रिंगला रिप्लाय करणारा आज फोन का उचलत नाही? याचे तिला नवल वाटले.

भूमीवर वॉच ठेवण्यासाठी मुखर्जींनी काही माणसे नेमली होती. तिच्या हातातील त्या महत्वाच्या फाइल्स गायब करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. फाइल्सची ती बॅग क्षितिजच्या गाडीत विसरून निधी बरीबर ती तिच्या गाडीतून घरी निघून गेली हे त्या माणसांनी पहिले होते. त्यामुळे चलाखी करून त्यांनी क्षितिजच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. त्याला हि गोष्ट माहीतही नव्हती. एका सुमसान रोडवर येताच क्षितिजच्या गाडीला मागून भरधाव वेगाने धक्का देण्यात आला. आणि ते लोक तिथून भरधाव वेगाने पुढे निघून गेले.

क्रमश
https://siddhic.blogspot.com/