Moksh - 12 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 12

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्व यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेनेच पाहावी ! आणि फक्त मनोरंजन होइल ह्या हेतूने कथा वाचावी तीच आनंद घ्याव .

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर त्यावफ कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

.......

..


2 :00 pm दुपारची वेळ .

देवपाडा गाव ...

कथा सुरु

देवपाडा गावात

दिवसाच्या उजेडात.... तपकीरी मातीच्या रस्त्यावरून ती लांबसडक ऐंशी- नव्वद लोकांची उपस्थिती असलेली अंतयात्रा स्मशानात निघाली होती .


एकापाठोपाठ तीन चिंबराच्या झाडांपासून बनलेल्या तिरड्या ....आणी त्यांवर झोपलेले तीन प्रेत, लोकांच्या खांद्यावर बसून
स्मशानाच्या दिशेने निघाले होते.

मध्येच ...
" राम नाम सत्य हे ! राम नाम सत्य हे !"
एकापाठोपाठ एकच घोष ऐकू येत होता.
तर कधी कोणि अंतयात्रेपुढे एक एटम बॉम्ब (फटाका) फोडत होता .

एटम बॉम्ब फुटताच आसुरी आनंदाने कोणि हसाव असा "धाड " निराशात्मक -मळभयमय आवाज होत होता.

दिवाळीत जेव्हा फटाके फुटतात तेव्हा ते आन्ंद देतात! परंतू जेव्हा हेच फटाके इतर दिवशी फुटतात - तेव्हा मनात आनंदाची भावना येते का? नाही मुळीच नाही!

इतर दिवशी फटाक्यांचा आवाज म्हंणजे भीतीमय अशुभ - निराशामय असतो ! ..

जो ऐकून मनात येणारा तो प्रथम प्रश्ण म्हंणजे , कोणी वारल का ? .हाच असतो ! नाही का ?

तिरडी पूढे सुर्यकांतरावांच्या भावाने मुंज करून वरच अंग उघड आणि खाली एक पांढरट धोतर नेसलेल...व हातात एक काळा मडका धुंदेरा धरला होता. प्रेतांना वाट दाखवत ते पुढे चालले होते.

नामदेव आबांना मुल-मुलगी अस कोणी वारस नव्हत. म्हंणूनच त्यांच्या आणी भिमक्कांच्या प्रेताला सुर्यकांतरावांचा भाऊच आग देणार होता.

त्या काळ्या मडक्यात निखा-यांचे चकाकते लालसर विस्तव टाकुन त्यांवर पेंढ़ा टाकला होता.

त्यामुळे त्या गोळ काळ्या धुंदे-यातून पांढर धुर वाकडतिकड करत बाहेर येऊन हवेत मिसळत होत.

" राम नाम सत्य हे ! राम नाम सत्य हे !"
वातावरणात तो आवाज गुंजत होता.

बेभान सुटलेली दुपारची हवा तो..राम नामचा आवाज आपल्या सोबत दूर दर घेऊन जात होती.
गावात पसरलेल्या स्मशान शांततेत तो आवाज गुंजत होता..तर मध्ये तो फटाका फुटल्याचा अशुभ आवाज गुंजत होता..

देवपाड गावातल स्मशान खुपच...
जेमतेम शंभर वर्ष जुन होत.

अशा स्मशानात म्हंणे अलैकीक शक्तिंचा मोठ्या प्रमाणात वावर असतो , स्मशान जुन असल्याने तिथे शेकडोहून प्रेतांची चित्ता जळुन राख झाल्याने तिथे अमानवीय शक्तिशी लवकरात लवकर संपर्क

साधण्यास मदत होते. ..

त्यामुळेच काळ्या जादूच्या - काळ्या- सैतानी देवांना प्रसन्न करण्यासाठी व नविन विद्या आकस्मित करण्यासाठी इथे चेटके- भगत, अघोरी मध्यरात्रीच्या सुमारास विधिवत पुजा करतात.


आणी त्यात त्यांना यश मिळण्याची चान्स कित्येकतरी पटीने आधिक असते.

...असो आपण कथेकडे वळूयात ..!


.....

.... " ए फटाफट रच ना ! किती टाईम लावतो? हं ? "

हा तोच थ्री स्टार इंन्सपेक्टर होता.

त्याच नाव मंजुलाल र्रठोड होत.
आपल्या खाकी वर्दीच वाईट कामासाठी तो उपयोग करत होता.

मोठ मोठे नेते, बिजनेस्मन ह्या सर्वाँची चाटूगिरी करण! श्रीमंत लोकांकडून लाच घेऊन ... त्यांच्या विरूद्ध उभे असलेल्या गरीबांच्या केसेज मध्येच ब्ंद पाडण ,अशी कित्येक तरी कायद्याला काळीमा फासावी अशी गैरकाम तो वर्दीच्या साहयाने करत होता.

ह्या अश्या कायद्याच्या गलिच्छ रक्षकावर जर कोणी त्याच्या विरुद्ध वरच्या डिपार्टमेंट मध्ये तक्रार नोंदवलीच - तर तक्रार डिपार्टमेंट पर्य्ंत पोहचण्या अगोदरच तक्रारकर्ता ती तक्रार मागे घ्यायचा..कारण
त्याचे पाळलेले गुंड त्या तक्रारकर्त्याच्या घरच्यांना धमकावायचे , त्यांना जिवे मारण्याची धमकी द्यायचे..
आणी मग सामान्य माणुस नेहमीसारखाच ,हतबल होऊन जिवभयाने हार पत्करायचा.

लागलीच ती तक्रार मागे घेतली जायची...! ..

मंजुलाल बद्दल इतक पुरे ! नाही का?

या पुढे पाहूयात.

मंजुलालने त्या अनोळखी नंबरवर संवाद साधल होत.

तो व्यक्ति नक्कीच उलट्या ह्दयाचा असावा?

कारण अस कोण व्यक्ति होता ?-ज्याला हे तिन्ही प्रेत लागलीच जळावीत अस वाटत होत. ?
अस कोण पाषाण ह्दयी अ -माणूश होता तो ? ज्याच्या मनात काडिचीही दया ,माया,किव शिल्लक राहिली नव्हती?
की जो मानवाला सुद्धा किड्यामुंगीसारख पाहत होता..? की ज्याला मारल्यावर जराशी सुद्धा अपराधीत्मक भावना न जाणवावी!

" हो साहेब ! म्हढ जळायची एवढी कशापाई घाई हो !" मन्या म्हंणाला. बोलतांना त्याचे ते काळसर -पिवळे दात ,तोंडातून घाणेरडा वास बाहेर येत होता.


सुरकूतलेला चेहरा त्यावर महिन्याभराची सफेद काळी मिश्रित वाढलेली दाढी उगवली होती. डोक्यावर फिकट गुलाबी,मळलेला कपडा गुंडाळलेला.. अंगात असलेला राखाडी सदरा एक दोन ठिकाणी फाटला होता, खाली सफेद रंगाच धोतर मळून गेल होत.

आणि ह्या मांणसाच नाव होत..

मनोहर उर्फ मन्या वय (57)सत्तावन्न ! त्याला परिवार वगेरे काही नव्हत! दिवसाला जे काही मोलमजुरीच काम मिळेल तो ते करत होता.

कामातून मिळालेल्या पैश्यातून एक देशी चप्टी नेहमीच ठरलेली होती.

भलेही जेवण मिळो वा ना मिळो ! पन दारू मात्र हवीच होती. दिवसभर तंबाखू तोंडात असायची , म्हंणून दात पिवळसर काळे झाले होते.

तंबाखूत असलेल्या हानिकारक घटकांनी
दातांमध्ये मोठ मोठ्या फटी निर्माण केल्या होत्या .


कमरेला धोत्रात खोचलेली चप्टी त्याने पुन्हा बाहेर काढली. झाकण खोलून हवरटल्यासारखे तिचे दोन घोट घेतले..

" स्स्स..ह्या.!" वाकडतिकड तोंड करत त्याने बाटली पुन्हा कमरेत धोत्रात खोचली.

आणी सद-याला असलेल्या वरच्या फाटक्या खिशात हात घातला.. आणि त्यातून एक लिंबूचो फोड बाहेर काढली, फोडीला मीठ मसाला चोळला होता..ती फोड त्याने जिभेवर चोळली..

'चट्ट ' आवाज करत हळुच चाटली ...

मंजुलालने ते पाहिल होत...

प्रथम त्याला त्याची शिसारी आली..मग थोड रग आल..

" अरे ए झाकणझुल्या ! तुझ्या तर ....!"

म्हाता-या सारख खेकसत त्याने हातातली चौकलेटी छडी हवेत नेहली, आणी ती मन्याच्या दिशेने फेकून मारणार तोच त्याच्या कानांवर तो आवाज पडला..

" राम नाम सत्य हे ! राम नाम सत्य हे !"
हवेतच त्याचा हात थांबल !

एक कटाक्ष मसणात असलेल्या तुटक्या गेटमधुन पुढे टाकला.



देवपाड गावातल स्मशान म्हंणायला गावा पासुन दूर होत .

स्मशानाला चारही बाजुंनी तारेच कंपाउंड
होत. स्मशानात चारही बाजुंनी मोठ मोठी विविध प्रकारची झाडे होती.. ज्या झाडांनी स्मशान पूर्ण झाकून टाकल होत. स्मशानात प्रवेश करण्यासाठी तारेच्या कंपाउंड मधोमध दोन लोखंडी फाटकांच गेट होत..

त्यातल एक गेट बिजाग-या निघाल्याने , पुष्पाराज स्टाईलने झुकल होत.

आणि त्याच झुकलेल्या गेटपासून वीस पाऊल पुढून - मातीच्या तपकीरी रस्त्यावरून अंतयात्रा येत होती.

सुर्यकांतरावांच्या लहान भाऊच्या हातात असलेला धुंदेरा त्यातून पांढरट फ़ेसाळता विषारी धुर बाहेर येत होता.

मळीन- अशुभ , दु;खी भावना पसरवत होता.

" ए मन्या !"

इंन्स्पेक्टर मंजूलाल धावत मन्या जवळ आला.

" झाल का नाही रे ए , पैशे नको का तुला "

पैश्यांच नाव ऐकतात मन्याने जिभ चाटली..


" जी... जी... झाल ..झाल!"
मन्याने दोन - तीन शेवटची लाकड चित्तेवर टाकली..

' धडामsss ' फटाका फुटल्याचा आवाज झाला..

प्रेतांची वरात मसनात दाखल झाली होती ....
प्रेत आग्नित जळायचं मुहूर्त जवळ आल होत..

घोळक्या घोळक्यांनी मांणस मसनात घुसली...
तिन तिरड्या हळुच मसनातल्या काळ्या मातीवर ठेवली.

" ए मन्या , जा तिकड जाऊन उभ रहा !"
काम झाल तस मंजुलालने मन्याला हाकल्ल..

" सायेब पैश्या द्या की !"
मन्या आपले तोंडातले पिवळसर काळे दात दाखवत हसला.

मंजूलालने जरा वैतागूनच पटकन खिशातून पाचशेची एक नोट बाहेर काढली..व त्याला दिली..

" सायेब कमी आहे अजुन द्या की म.. !" मन्या पूढे बोलणार..
तोच मंजूलालने दात ओठ खात बंदूकीवर हात ठेवला . ..

" ही देऊ का? , देऊ ? तुझ्या आईला ठेवून .. देऊ ..तुझ्या..!"

" नको नको..हिहिह..हिहिहिही!"
मन्या पटकन निर्लज्जासारखा दात दाखवय हसला एक दोन वेळा वाढलेल्या केसांवरून खाजवल्यासारख करत...

मांणसांपासुन जरा बाजुला ...एका झाडाखाली .. जाऊन उभा राहिला.

पाठ दुखू लागली तसा तो झाडाखाली बसला ...
पुन्हा धोत्रात खोचलेली चप्टी काढली..
एक घोट घेतल.. ! लिंबाची फोड जिभेला लावली..

" ससस ह्या !" मन्याने हळुच जिभल्या चाटल्या..

लोकांनी एक एक करत तिन्ही प्रेत तिन्ही
चित्तेवर झोपवली.

सुर्यकांतरावांच्या भावाने मडका खांद्यांवर ठेवून तिन्ही प्रेतांना फ़े-या मारल्या.. !

आणी मग शेवटच्या फेरीला मडका खांद्यावरून खाली सोडला..

काळ्या रंगाचा मडका जमिनिवर तुकडे होत फुटला .

" हिहिहिही!" मन्या एकटाच हसला. त्याचं जनू मानसिक संतूलनच बिघडल होत.

किंवा ते नेहमीचंच असाव .

मंजूलालने एका सुकलेल्या लाकडाला रॉकेलमार्फत पेटवल...आणि तोच हातात घेऊन सुर्यकांतरावांच्या चित्तेपाशी उभे असलेल्या त्यांच्या भावाजवळ आला.

चेह-यावर मळूल उदासीन शोकहीँत भावांच मुखवटा लावलेल्या मंजूलालने तो पेटलेला फाटा सुर्यकांतरावांच्य्सा भावाकडे दिला...

" पेटवा ! टाईम झालाय ना ?"
उदासीन स्वरात मंजूलाल म्हंणाला.

पन त्याच्या मनातून भयंकर आसुरी हास्याचा आवाज बाहेर येत होता .

सुर्यकांतरावांच्या भावाने प्रथम आपल्या भावाही चित्ता पेटवली ..मग आबांची आणि शेवटला..भिमक्काची.

पेटत्या फाट्याच्या आगीचा स्पर्श चिततेला होताच ..आगीने प्रेत खायला सुरुवात केली...

' चट,चट ' आवाज होऊ लागला ...चित्तेतून निघालेल्या आगीचा भडका तीन फुट उंच हवेत जसत होता.

स्मशानातल्या प्रेतासारख्य उभ्या आजुबाजुच्या काळ्या निळ्या पडलेप्या झाडांनी वाकडतिकड हळायला सुरुवात केली होती. पन हवा तर सुटली नव्हती ना ? मग हा प्रकार होता?

"' काव..काव..काव..कयांव.क्यान्व!" नऊ- दहा कावळ्यांचा थवा स्मशाना भोवती वर आकाशात गोल गोल घिरट्या घालू लागला होता.

" ए हाकला ह्या रांxxxच्या ना , हाकला ! ..आत्मा घेऊन जायला आलेत हे सैतान.. !" गर्दीतूनच आवाज आला..

तश्या चार पाच जणांनी खालची मोठ मोठी दगड ऊचलून वर आकाशात भिरकावली ...

परंतू तरी सूद्धा ते काळ्या अभद्र थोबाडाचे राक्षस जायच नाव घेत नव्हती.

' चट चर चर 'आवाज करत तीन प्रेतांच्या चित्ता जळत होत्या .. तिन्ही प्रेतांच्या केस , मांस जळालेल्या अवयवांचा घाणेरडा वास आजुबाजुळसस सुटला होता .

जळणा-या चित्तेमधून लहान लहान धुळीकणांसारखी निखारे वर हवेत उडून चार पाच सेकंद हवेत राहून नाहीशी होत होती.

' फट, फट,फट!"

असा एकाचवेळेस तिन्ही मैतांची कवटी फुटल्याचा आवाज झाला..

आणी इकडे मंजूलाल चेह-यावर आसुरी हास्य पसरल. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फूटू लागल्या होत्या.

" टिंग , टोंग, टं ग..टंग..!"

विशिष्ठ आवाज होत , त्याच्या खिशातला फोन वाजल.

एक हात खिशात घालून तो जरा आडबाजूला आला.

फोन रिसिव्हर करून त्याने कानाला लावल..

" झाल काम ?" घोगरा खर्जातला आवाज.

" जी जी..साहेब, आताच सेकंदाभरापुर्वी तिन्ही म्हढंच्या कवट्या पन फुटल्या बघा ! "

" हंम्म!हिहिहिहिहिही!" फोनमधून तोंडावर हात ठेवून हसू दाबून हसल्यासारखा आवाज आला.

" सायेब , ते पैश्याच..!" मंजूलाल पूढे बोलणार तोच..

" आलेत पैसे !"

" काय ? पन तुमच माणूस इथ कुठ दिसत नाहीये साहेब !"

" ऑफिसर ! मसनात आत चालत गेल्यावर कंपाउंडच्या शेवटला एक जुनाट चिंचाच झाड आहे !
त्या चिंचाच्या झाडामागे माझा एक माणुस उभा असेल..! त्याच्या हातात एक लाल रंगाची बैग असेल..! ज्यात साडे तीन करोड रूपये आहेत .!"

" काय ssss!" एवढी रक्कम नुसत नाव ऐकूनच

मंजूलाल च्या काळजात धस्स झाला.

" पन एक लक्षात ठेव ऑफीसर ?" फोनमधुन येणारा आवाज गुढ - गंभीर झाला.

मंजूलाल ते सर्व गप्प ऐकत होता.. मोबाईल मधुन येणारा आवाज त्याच्या कानांत गुंजत होता..


" तू माझ्या माणसा जवळ जाशील ! तेव्हा तुझ्या अंगावर देवाच एक ही धागा दोरा ठेवू नकोस..
बैग देण्या अगोदर तो कॉड़ विचारेल..तेव्हा अंधारराजक म्हंणायचं... आणी पैशे घेतल्यावर सरळ घरी निघून जायचं... जाताना ..मागे वळून पाहायचं नाही ! आणी शेवटच ऑफिसर ..! हा पैसा देवाधर्माच्या कामासाठी वापरायचं नाही..काय ? "

" जी ..जी.. साहेब !" मंजूलाल म्हंणाला.

दोन्ही कडुन फोन कट झाल..
मंजूलाल च्या मनात पैश्याची हाव सुटली..होती.
धनाच्या लालसेने तो लागलीच जळणा-या चित्तेंना मागे सोडत मसनात घुसला...

इकडे मागे एका झाडाच्या खोडाआड लपून त्याने मंजूलाल सर्व बोलण ऐकल होत..आणि पैश्याच्या लालसेने त्याच्याही मनावर कब्जा केला होता..

" साडे तीन करोड...हिहिहिहिहिही!"

पिवळसर काले रंगाचे दात दाखवत मन्या खवचट हसला..

वाढलेल्या केसांना खांजलत तो ही गपचूप मंजूलालच्या मागे जाऊ लागला...

क्रमश :











Share

NEW REALESED