gift from stars 29 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - २९

''हॅलो. काय ग भेटली का क्षितिजला? कसा आहे तो?'' निधी फोनवरून भूमीला विचारत होती.

''मी ऑफिसमध्ये आली आहे. क्षितिजला हॉस्पिटल मधून घरी घेऊन गेल्याच समजलं. त्यांच्या घरी जाणं मला योग्य नाही वाटत. आजपण भेट झाली नाही ग. '' भूमी

''ओह, फोन कर ना मग.'' निधी

''करतेय. काही रिप्लाय नाही मिळत ग.'' भूमी

''ओके, मी ट्राय करतेय पण सेम नो रिप्लाय. काही बोलणं झालं तर सांग.'' म्हणत निधीने फोन ठेवला होता.

'भूमीच कामात लक्ष लागत नव्हते. 'क्षितिजला एकदा भेटायला पाहिजे.' असं तिला सारखं वाटत होत. चंदिगढ केसच्या संधर्भात मिळालेले पुरावे नष्ट झाल्याचं तिने मिस्टर सावंत याना कळवलं. त्यामुळे त्यांच्या लक्षत आलं होत कि कोणीतरी क्षितिजचा अपघात घडवून आणला आहे. पुरावे तर नष्ट झाले वर क्षितिजला दुखापती झाली त्यामुळे ते फारच चिडले होते. 'लागेल ती मदत मिळेल, लवकरात लवकर काहीतरी ठोस पुरावे शोधा.' असे त्यांनी भूमीला सांगितले.'

'तस पाहायला गेलं तर जवळळपास सगळेच पुरावे नष्ट करण्यात आले होते. त्या फाइल्स हि शेवटची आशा होती, त्या जाळून खाक झाल्या. भूमी शून्यात नजर लावून बसली होती. काहीतरी शक्कल लढवण्याची गरज होती, जेणेकरून तो फ्रॉडर स्वतःहून सगळ्यांच्या समोर येईल. काही वेळ विचार करून तिने एक तातडीची मिटिंग घेऊन मिस्टर सावंत आणि टीमच्या कानावर काही गोष्टी घातल्या. त्यानुसार ऑफिस मधल्या सगळ्या कामगार आणि अधिकारी वर्गाचे मूळ हस्ताक्षर चेकिंगसाठी पाठवण्यात येणार होते. चंदिगढ प्रोजेक्ट प्रपोसलवर केलेली साइन डमी होती. ती मिस्टर सावंत यांची नव्हतीच मग अशी डमी साइन कोणाची आहे? आणि हे चुकीचे प्रपोसलं कोणी मान्य केले? हे या तपासणीमध्ये उघड होणार होते. तस पाहायला गेलं तर हि खूप वेळखार्चिक प्रोसेस होती. पण हस्ताक्षर तपासणीचे रिपोर्ट मिळाल्यानंतर अपराधी कोण हे डायरेक्ट उघडकीस येणार होते. त्यामुळे मिस्टर सावंत यांची परवानगी घेऊन तिने आपला स्टाफ या कामाला लावला.'

*****

''मेघे ऐक… आज काहीही करून क्षितिजला बाहेर पाठव. नाहीतर काहीही तयारी होणार नाही. आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे.'' आज्जो मेघाताईंना सांगत होत्या.

''आज तर रविवार आहे. ऑफिसपण नाही आणि त्याचा पाय अजून बारा झाला नाही ग. बाहेर कस पाठवू?'' मेघाताई

''मग उद्याची तयारी कशी करणार? सर्प्राइज बड्डे आहे ना.'त्याच काय?'' आज्जो

''बर. पण तो आहे कुठे? सकाळी उठल्यापासून दिसला नाही.'' मेघाताई

''ताई तुम्ही झोपेत होता तेव्हा साहेब सकाळीच बाहेर निघून गेलेत. कोणाला न सांगता.'' बाजूला स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आशाकाकू सांगत होत्या. मेघाताईंनी लगोलग फोन डाइल केला. रिंग वाजत होती. मग त्यांनी व्हाट्सअप मेसेज पहिला. 'बाहेर जातोय, लेट होईल. काळजी करू नकोस.' असा क्षितिजचा मेसेज होता. तेव्हा त्यांना बरं वाटलं. ‘एकाअर्थी बरंच आहे, तेवढ्यात उद्याची तयारी उरकून घेऊ’ म्हणत त्या तयारीला लागल्या.

*****

''हॅलो निधी मी बिल्डिंग खाली उभा आहे. भेटायचं होत.'' क्षितिजने निधीला फोन केला होता. तो त्या राहत असलेल्या बिल्डिंगच्या खाली आला होता.

''मला भेटायचं होत कि भूमीला?'' निधी

''दोघींना पण. केव्हापासून ट्राय करतोय, ती फोन का उचलत नाही?'' क्षितीज

''तिचा फोन बॅगमध्ये असेल, उचलणार तरी कसा. हातात चारपाच बॅग घेऊन मॅडम सकाळी-सकाळी कुंजवणात गेल्यात.'' निधी सांगत होती.

''कुंजवन? ते कुठे ? आणि कशासाठी गेली?'' क्षितीज

''आश्रमात रे. जात असते ती अधून मधून भेट द्यायला.'' निधी

''खूप दिवस झाले, अपघात झाल्यापासून तिला भेटलोच नाही. '' क्षितीज

''आता कस खरं बोललास, तिला भेटायचं आहे ना.'' म्हणत निधी हसली.

''कुंजवनचा पत्ता पाठव ना प्लिज.'' क्षितीज

''सेंड करते, पण तू कसा आहेस? आणि तुझा हात बरा झाला का आता?'' निधी

''मी ठीक आहे. अगदी मस्त. तू?'' क्षितीज

''मी पण मस्त. भूमीला भेटायचं असेल तर निघ पटकन, नाहीतर मॅडम अजून कुठेतरी गायब होतील.'' निधी

''होय, बाय.'' ड्राइव्हरला रिटर्न घरी पाठवून क्षितीज एकटाच गाडी घेऊन निघाला. ड्राइव्हर त्याला एकट्याला सोडायला तयार नव्हता. तरीही क्षितिजच्या हट्टामुळे तो घरी गेला. खरतर क्षितिजला अजून काही दिवस गाडी चालवणे शक्य नव्हते, तरीही डाव्याहाताने ड्राइव्हींग करत तो कमी स्पीडने आश्रमाच्या दिशेने निघाला.

*****

शहरवस्तीपासून दूर गर्द झाडीत असलेला आश्रम, लोकवस्ती तुरळकच होती. कुंपणाच्या आतमध्ये चारही बाजू मस्त फुलांच्या बागांनी सजलेल्या होत्या. त्यांच्या मधोमध आश्रमाच्या तीन लहानशा बैठ्या चाळी. लांबलचक घर जणू. अनाथ मुलं-मुलींना इथे राहणे, खाणे आणि शिक्षणाची सोया केली गेली होते.

भूमी आश्रमात पोहोचली होती. रिक्षाचे पैसे देऊन ती खाली उतरली. कामाच्या गडबडीत खूप दिवसांनी ती त्यांना भेटायला आली होती. नाहीतर वरच्या वर इथे येण व्हायचं. तिला बघून आश्रमाच्या मुलांनी एकच गलका केला. सगळे तिच्या भोवती जमा झाले होते. आश्रमात काम करणारे कामगार आणि काका-काकू या सगळ्यांची तिने भेट घेतली. मुलं-मुलींची चोकशी करून ती मुलांमध्ये खेळण्यात रमली. सोबत घेतलेले खाऊचे पुडे आणि मिठाई तिने सगळ्यांना वाटली. सगळे मस्त घोळका करून बागेतील हिरव्या गवतावर बैठे खेळ करत बसले होते, आणि अचानक आश्रमाच्या मुख्यदाराजवळ फाटकापाशी गाडीचा आवाज आला. तिने त्या दिशेने पहिले, क्षितीज पत्ता शोधात इथे पोहोचला होता. तिला खूप आश्चर्य वाटले. दुरूनच शिपायाला हात करून भूमीने त्याला आतमध्ये सोडायला सांगितले. त्याच्या डोक्याला आणि हाताला जूनही बँडेज पट्टी होती. ती धावतच त्याच्याजवळ पोहोचली.

''हाय. इथे कसे काय?'' भूमी

''खूप दिवस भेटलोच नाही. सो बिल्डींगच्या इथे आलो होतो. निधी ने इथला पत्ता दिला.'' क्षितीज

''ओह, तब्ब्येत कशी आहे?'' भूमी त्याच्या हाताकडे बघत विचारत होती.

''मस्त.'' क्षितीज

''गाडी कोण चालवत होत? ड्राइव्हर आहे कि?'' भूमी

''मी चालवत आलो.'' क्षितीज

''काय? का पण? हाताची जखम अजून बरी झालेली दिसत नाहीय. तरीही?'' भूमी त्याचा हात चेक करत होती.

''काही होत नाही. गाडी चालवताना थोडासा त्रास झाला. पण ओके आहे.'' क्षितीज

''काय गरज होती एवढ्या लांब यायची? इथे आल्याचं घरी सांगितलं का?'' भूमी

''आईला मेसेज केलाय. ओके म्हणाली.'' क्षितिज

बोलत बोलत दोघे आश्रमाजवळ आले. भूमीने लहान मुलांशी त्याची ओळख करून दिली. आश्रमाच्या बाकी लोकांशी ओळख करून दिली. मस्त प्रसन्न वातावरण होत. ती लहानाची मोठी झाली ती इथेच, मोठी होऊन शिक्षण झालं, नोकरी लागली, तरीही या आश्रमाशी असणारी बांधिलकी तिने सोडली नाही. भूमी त्याला माहिती देत होती.

दरवर्षी डोनेशन, मुलांना गरजेच्या वस्तू देणे, तसेच सणासूदाला त्यांना भेटवस्तू देणे तिला खूप आवडायचं, त्यामुळे ती इथे सगळ्यांची लाडकी होती. आश्रमाशी असणारा तिचा जिव्हाळा तिच्या शब्दाशब्दातून जाणवत असल्याचं क्षितिजला जाणवलं. त्या लहान मुलांमध्ये अगदी लहान होऊन खेळात रममाण झालेली भूमी त्याने तिच्याही नकळत मोबाइलमध्ये टिपून घेतली होती. कोणीही प्रेमात पडेल असं गूढ व्यक्तिमत्व. आपण तिला ओळखतो त्यापेक्षाही ती खूप वेगळी आहे, आणि उदरमतवादी हे त्याला समजली.

क्रमश
https://siddhic.blogspot.com/