आभा आणि रोहित.. - ९

आभा आणि रोहित..- ९

 

रोहित ची आई स्वयपाक घरात काम करत होती. तिच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही त्यमुळे रोहितने आई ला परत हाक मारली,

 

"आई...कुठे आहेस? आम्ही आलोय.."

 

ह्यावेळी मात्र त्याच बोलण ऐकून रोहित ची आई तडक बाहेर आली. आभाने रोहित च्या आईकडे पाहिलं आणि ती पाहतच राहिली. अॅप्रन लाऊन रोहित ची आई बाहेर आली होती. अगदी तिची आई स्वयपाक घरातून बाहेर येते तसच. आभाला हे पाहून जरा हलक वाटल. कसलाही बढेजाव तिला दिसला नव्हता. रोहित च्या आईने रोहित च्या आईने अॅप्रन नीट केला.. आणि आभाशी बोलायला लागली,

 

"आभा... आलीस तू! सॉरी ह.. आम्ही जरा खायला करतीये त्यामुळे असा अवतार आहे. मला जरा उशीरच झाला आवरायला.. तू बस.. मी येते आवरून १० मिनिटात.. आणि तोपर्यंत, रोहित च्या बाबांशी बोल.." रोहित ची आई इतक बोलली आणि रोहित चे बाबा सुद्धा स्वयपाक घरातून बाहेर आले..त्यांना स्वयपाक घरातून बाहेर पडतांना पाहून आभा आश्यर्यचकित झाली. आणि रोहित शी हळू आवाजात बोलायला लागली,

 

"रोहित, तुझे बाबा पण स्वयपाक घरात काम करतात?"

 

"हो कधी कधी.. त्यांना पण आवड आहे कुकिंगची.. आज तू येणार म्हणून काहीतरी स्पेशल डिश करत असतील." आभा एक मिनिट शांतच झाली.. मग ती भानावर आली.. हे आभासाठी काहीतरी नवीन होत.. तितक्यात रोहितचे बाबा बोलायला लागले,

 

"अरे वा.. आज आभा आलीये! पहिल्यांदीच आलीस. उभी का बस की...मी आलो २ मिनिटात.."

 

ते ऐकून आभा बसली. तिने आजूबाजूला नजर टाकली.. हॉल एकदम मस्त सजवला होता. हॉल मध्ये असलेला झुंबर चकाकत होता. मग आभा जरा सावरून बसली.. तितक्यात रोहित चे बाबा आले. आभा जरा अस्वस्थ आहे हे रोहितच्या बाबांनी हेरल आणि ते बोलायला लागली,

 

"आपण पहिल्यांदी भेटतो आहोत. तू जरा गोंधळलेली वाटतेस.. की मी स्वयपाक घरातून आलो म्हणून विचारात पडलीस?"

 

"नाही...अ...म्हणजे हो!" आभा बोलली आणि हसत रोहितचे बाबा बोलायला लागले,

 

"मी पण करतो कधी कधी नवीन डिशेस ट्राय.. आणि इतक काही नाही. कामं ठरलेली नसतात. जे आवडेल ते कराव..बायकांनी फक्त घरातली कामे, आणि पुरुषांनी बाहेरची असे काही आमचे विचार नाहीत. आमचे म्हणजे मी आई रोहित ची आई सुद्धा..."

 

आभाने थोडा विचार केला आणि ती बोलायला लागली,

 

"बरोबर आहे..आणि मस्त!" मग मात्र ती शांत बसून राहिली. रोहित सुद्धा सोफ्यावर पहुडला होता आणि मोबाईल पाहत होता. पण त्याने मोबाईल लांब ठेवला आणि बोलण ऐकायला लागला,

 

"शांत झालीस आभा...आणि हो, अजिबात काळजी नको करूस.. निवांत बस.. पण आम्हाला मात्र तुझ्याबद्दलली सगळी माहिती आहे. रोहित सांगत असतो तुझ्याबद्दल...त्याच्या बोलण्यात सारखी तू असतेच..आणि अजिबात ऑकवर्ड होऊ नकोस.." रोहित चे बाबा हसून बोलले..

 

"हॅलो बाबा... मी पण आहे इथे... आभा आली आणि माझ्याकडे तुम्ही सहज दुर्लक्ष करताय..."

 

"रोहित तू रोजच असतोस.. आज आभा पहिल्यांदी आलीये.. साहजिक तिच्याशीच बोलणार आम्ही.." रोहितच्या बाबांनी एक नजर रोहित कडे पाहिलं आणि ते बोलले.

 

"नाही नाही..ऑकवर्ड नाही होत." आभाने थोडा पॉज घेतला आणि बोलली, "काका.." आणि तिने रोहित कडे पाहिलं. रोहित फक्त हसला. आणि आभाने न बोलताच त्याला सॉरी सांगितलं. रोहित ने सुद्धा मानेनेच होकार सांगितला. "तुमची बाग मस्त आहे आणि फुलांचा वास तर अप्रतिम आहे."

 

"ओह थँक्यू आभा. तुला फुलं आवडतात अस दिसत." रोहित चे बाबा बोलत होते. तितक्यात रोहित ची आई त्यांना जॉईन झाली.

 

"थांबा थांबा.. मला ही येऊ दे तुमच्या गप्पात..काय बोलत होतात? आभाला फुलं आवडतात? मग आपण अजून फुलझाडे लाऊ.. आणि काय ठरतंय दोघांच लग्नाबद्दल? रोहित तर आमच्याशी बोलतो तेव्हा त्याच्या बोलण्यात फक्त तू असतेस आभा. म्हणजे आय थिंक, त्याचा होकार आहेच.. पण त्यानी अजून नक्की सांगितलं नाहीये..माझ्या अंदाजाने त्याचा होकार आहे..तुम्ही एकमेकांना पसंत असल की बाकी काही प्रश्न नाही." रोहित च्या आईने रोहित कडे पाहिलं पण त्याक्षणी रोहित दुसरीकडे पाहायला लागला, "आणि आभा.. तू तुझा विचार करून मगच निर्णय घे.. लग्नात मुलीचं मत जास्त महत्वाच असत."

 

"काकू.. आधी सॉरी! मी तुम्हाला काका काकू म्हणून हाक मारतीये.  माझ आणि रोहित च मगाशी बोलण झाल होत. आई बाबा म्हणण मला ऑकवर्ड होईल. अजून लग्न ठरलं नाहीये सो आई बाबा योग्य नाही वाटत. आणि मम्मी पप्पा पेक्षा काका काकू योग्य वाटल आत्ता. रोहित म्हणाला तुम्ही एकदम मोकळे आहात. आम्ही लग्न करू हे अजून नक्की झाल नाहीये त्यामुळे.." आभाने थोडा पॉज घेतला. मग परत बोलायला लागली, "आणि येस..मला फुलं प्रचंड आवडतात. काका, मी लग्न करून इथे आले तर बागेकडे लक्ष द्यायला मला खूप आवडेल. आणि काकू, तुमचे विचार खूप सुंदर आहेत."

 

आभाच बोलण रोहित च्या आई बाबांनी ऐकल आणि एकमेकांकडे पाहिलं. आणि दोघे एकदम बोलले,

 

"तू आम्हाला काही म्हणल तरी काही प्रॉब्लेम नाही आभा. आत्ता पण आणि लग्न करायचा निर्णय घेतल्यावरही. आणि तुम्ही दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तरी इथे कधीही ये आम्हाला भेटायला." रोहित ची आई बोलली आणि त्याला बाबांनी सुद्धा दुजोरा दिला. "पण गप्पांच्या आधी पेटपूजा करून घेऊ. मी आज मिक्स डाळींचे आप्पे केलेत.. आभा टेस्ट करून सांग कसे झालेत. आणते एका मिनिटात.."

 

"एक मिनिट काकू.." आभाने पर्स उघडली, "मी छोटा गणपती आणलाय.."

 

रोहित च्या आई बाबांनी एकमेकांकडे पाहिलं,

 

"आभा ह्याची खरच गरज नव्हती पण तू इतक्या प्रेमाने आणला आहेस.. समोरच ठेवतो. आणि हो, खूप सुंदर मूर्ती आहे...थँक्यू.."

 

"हो हो आभा..खूप सुंदर आहे गणपतीची मूर्ती.."

 

"मी कोणाकडेही जातांना छोटी भेट घेऊन जाते. पण खूप महागडी मात्र नाही.. आधी मला वाटल तुम्हाला आवडेल की नाही पण तुम्हाला मूर्ती आवडली ह्याचा मला आंनद आहे."

 

"आभा, महाग असल की सुंदर अस कोण म्हणल? मनापासून दिलेली वस्तू नेहमीच मोलाची असते. तेव्हा पैश्याच्या प्रश्न येताच नाही..." रोहित च्या आईने परत एकदा मूर्ती न्याहाळली आणि बोलायला लागली, " छान मूर्ती आणि तुझी सवय सुद्धा आभा..." रोहित ची आणि बोलली, "आता पेट पूजा..."

 

"थांबा काकू..मी पण येते तुमच्याबरोबर..." आभा स्वयपाक घरात गेली. आणि बाहेर रोहित चे बाबा आणि रोहित गप्पा मारायला लागले,

 

"बाबा, आता मी पण बागेत काम करायला लागणारे..."

 

"कधीही चालू कर... आपली बाग मोठी आहे. पण इतकी वर्ष आपल्या घरात बाग आहे तेव्हा कुठे नाही वाटल तुला बागेत काम कराव? आता एकदम का उपरती झाली?" रोहित चे बाबा बोलले आणि रोहित ला टप्पल मारली..

 

"का ते तुम्हाला माहिती आहे. यु नो इट ना बाबा..होतात एकदम बदल..."

 

"हो हो.. दिसतंय ते रोहित.. बर काय ठरतंय तुझ? म्हणजे आभा बद्दल काय वाटतंय?"

 

"आभा बद्दल ना..." रोहित बोलायला लागला पण तितक्यात आभा आणि रोहित ची आई बाहेर आले.

 

"घ्या गरम गरम आप्पे.." मग सगळे गप्पा मारायला लागले..

 

"आभा तू चालू कर.."

 

"हो काकू... छान दिसतायत आप्पे.. काय काय घालतंय?"

 

"परवा टिव्ही वर पहिली रेसिपी... मी नाही रोहितच्या बाबांनी.. मग तेच म्हणाले आपण करून बघू..आणि ते पण मदत करतायत माझी.. नाही चुकले.. मी त्यांना मदत करतीये.." रोहित ची आई बोलली आणि हसली.

 

"अरे वा.." आभा आश्यर्याने बघत राहिली.

***

Rate & Review

Archana Harde 1 month ago

Smita hukkeri 1 month ago

Meghana 1 month ago

Madhu Upadhyay 2 months ago

Surekha 2 months ago