आभा आणि रोहित..- ११

आभा आणि रोहित..- ११

 

आभा रोहितच्या वागण्यामुळे वैतागली. तिला जरा वेळ रोहित च्या आई बाबांसोबत घालवायचा होता..

 

"काय हे रोहित. मी बोलत होते न.. बोलण पूर्ण करून का नाही दिलस मला? मला ट्रॉफीज बद्दल पण विचारायचं होत... तुझ्याशी नेहमीच बोलत असते ना.. " रागाने आभा बोलली,

 

"ओह माझ्याबरोबर नेहमीच बोलत असते? लग्न माझ्याबरोबर करायचं आहे की...? मला समजून घे..ते महत्वाच..."

 

"बर रोहित.. तू मला आवडतोस हे सांगितलं आहे पण जर लग्न केल तुझ्याशी तर तुझ्या घरी सांभाळून घेऊ शकेन का हे पाहण गरेजच आहे रे.. आम्ही मध्यमवर्गीय आहोत.. आणि तुम्ही एकदम बडे... घरी जुळवून घेण शक्य आहे ना ते पाहायचं होत. सपोज मी नाही करू शकले अॅडजस्ट.. किंवा विचार नाही पटले माझे तुझ्या आई बाबांना.. तर? म्हणून तुमच्या घरी सूट होईन का ते पाहण गरजेच वाटत मला.. मी बराच विचार केलाय अरे.. "

 

"त्याची काही गरज नाही.. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन सो... आणि आई बाबा मुद्दाम त्रास द्यायला कधीही काही वागणार नाहीत ह्याची खात्री आहे मला.. आणि तू पाहिलं असशील घरी आम्ही साधेच असतो. घरात कशाला हवा बढेजाव? घर जपण्याकडे कल असतो आईचा.. त्यामुळे तसच वागायचा प्रयत्न असतो. आणि आई बाबांनी दोघांनी कष्ट केले म्हणून इतकी समृद्धी आलीये. आणि पैसे आले म्हणून वागण बदलू दिल नाही. आणि आत्ता माझ्या बरोबर वेळ घालव की.. आई बाबा गप्पिष्ठ आहेत. सो ते मारत बसतील गप्पा... पण आपल्याला आपला वेळ हवा का नको?"

 

"पण मला बोलायचं होत काकांशी माझ्या स्वप्नांबद्दल.. त्यांची मते जाणून घ्यायची होती. अर्थात, ते महत्वाच होत.. लग्न करण्याआधी काही गोष्टी मला क्लिअर बोलायच्या होत्या रे. स्वप्न ऐकून ते काय प्रतिक्रिया देतील ते मला पाहायचं होत. मला तू आवडतोस.. तुझ्याशी लग्नाचा विचार पक्का होतोय माझा.. सो माझा होकार लवकरच कळवेन पण त्या आधी थोड्या गोष्टी बोलण गरजेच वाटत होत.. मला नाही जमणार आयुष्यभर एका खुर्चीत बसून कॉम्पुटर समोर काम करणे.. थोडे पैसे कमी मिळाले तरी चालेल पण माझी स्वप्न महत्वाची.. जर ते मान्य नसेल तर मी नक्कीच विचार करेन.."

 

"अरे वा.. सो तुझा पण निर्णय पक्का होतोय तर माझ्याशी लग्न करण्याचा.. नाईस! म्हणजे लय भारी... हाहा.. आत्ता माझ्याकडे शब्द नाहीत इतका आनंद झाला आहे मला...यु नो, मी हे ऐकायला किती दिवस वाट पाहतो आहे..तुझ बोलण ऐकून माझा आनंद गगनात मावत नाहीये." रोहित जरा नाटकी बोलला.. आणि स्वतःशीच हसला..पण आभा ने एक नजर त्याच्याकडे पाहिलं...आणि ती बोलायला लागली,

 

"शट अप र रोहित.. थोडा सिरिअस हो.."

 

"बर.. सॉरी! आता तुझ्या स्वप्नांबद्दल बोलू.. मी सांगितलं आहे ना तुला.. काहीही झाल तरी मी तुला स्वप्न पूर्तीसाठी मदत करणार.. खात्री ठेव..तुझी डान्स स्कूल चालू होईल लवकरच आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार नक्की.. आणि अगदी घरून सपोर्ट नाही मिळाला तर मी विचार केलाय.. तुझी स्वप्न पूर्ण होणार.. मी मनापासून सांगतो आहे.. पण अर्थात, मला नाचता येत नाही सो मी नाचेन ही अपेक्षा ठेऊ नकोस ह..." रोहित बोलला आणि हसला..

 

"ए, रोहित काय तू पण.. काहीही बोलतोस.. आणि डोंट वरी.. नीट ऐक... तुला पण नाचवणारे...नाचवणार म्हणजे खर नाचणे.. उगाच गैर अर्थ काढू नकोस... हाहा.." आभा ला सुद्धा हसू आल आणि तिचा मूड एकदम छान झाला... "बाय द वे, थँक्यू... आणि...ए तू खोली मस्त सजवली आहेस.."

 

"नाही ग..मी सरळ साधा मुलगा आहे.. उगाच गैर अर्थ काढत नाही.. आणि काय? काय म्हणलीस..? तू मला नाचवणार? तू नाच बंद करशील इतका वाईट नाचतो मी..गणपती डान्स सोडून मला नाचता येत नाही.. आणि गणपती डान्स सुद्धा कॉलेज मध्ये करायचो..नंतर ते बंद झाल.."

 

"हो का.. हाहा.. बघू आपण.. तू सांग, हे तू काढलेले फोटो आहेत का?"

 

"हो.. मला कधी काळी आवड होती निसर्गाचे फोटो काढायची... पण बिझिनेस च्या व्यापात माझा छंद विसरूनच गेलो.. तुला थँक्यू.. आता मी परत चालू करणारे माझे छंद जोपासायला.."

 

"ओह.. अप्रतिम फोटो काढतोस.. आपल्याला जे आवडते ते अस बंद नाही करायचं रोहित.. जे आवडत ते केल की छान वाटत आपल आपल्याला..मन ताजे तवाने राहते."

 

"हो हो.. आभा..आपल बौद्धिक खूप छान होत. आपले विचार पटले आणि मान्य सुद्धा केलेत....तू भारी आहेस एकदम!!" रोहित जरा वेळ थांबला.. आभा पण फोटो बारकाईने पाहत होती. त्याने थोडा विचार केला आणि परत बोलायला लागला, "बर ऐक.. महत्वाच बोलायचं आहे.." आभा भानावर आली आणि बोलली,

 

"गुड..विचर पटणे महत्वाचे.. आणि बोल की..."

 

"डायरेक्ट बोलतो.. घाई करत नाहीये.. पण आता खूप वाट पहिली. आता नाही थांबणार..म्हणजे अजून थांबणे मला शक्य नाही.. "

 

"बोल बोल.. ऐकती आहे मी..आणि काय इतक सांगयचं आहे?"

 

"खूप थांबलो.. पण आता नाही ठेऊ शकत मनात... सो.. ऐक..." रोहित ने दीर्घ श्वास घेतला.. आणि बोलायला लागला, "फायनल झाल माझ...मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू येशील माझ्या आयुष्यात? मला तुझी साथ आणि तुझा सहवास आयुष्यभर हवा आहे..म्हणजे मला तू पहिल्या दिवशी पासून आवडली होतीस पण अजून थोड समजून घेऊ ह्या विचाराने मी काही बोललो नव्हतो. पण आता माझा निर्णय पक्का झालाय..आता मी अजून थांबणार नाही हे विचारायला.... तू तुझ बोल.." रोहित ने इन्फॉरमल प्रपोज केल आभा ला.. आभासाठी हे अनपेक्षित होत.. पण तिथे थोडा विचार केला आणि ती बोलली,

 

"हो हो रोहित.. पण अचानक हा प्रश्न.. आपल ठरल होत घाई करायची नाही.. एकमेकांना समजून घ्यायचं मग निर्णय घ्यायचे.." आभाच्या हृदयाची धड धड वाढली होती..

 

"अति परिचयात अवज्ञा होईल आभा आता... आणि तू तुझा निर्णय लगेच द्यावास अस मी म्हणत नाही.. मला वाटल सो मी बोललो. तुला अजून वेळ हवा असेल तर काही हरकत नाही.. तुझ्या उत्तरासाठी मी थांबू शकतो..पण मला आज बोलायचं होत सो मी बोललो..म्हणजे मला स्वतःला थांबवता आलं नाही.." आभा ने रोहित चे बोलण ऐकून घेतले.. जरा वेळ शांत बसून राहिली. डोळे मिळते आणि तिच्या समोर पहिल्या भेटीपासून सगळ डोळ्यासमोरून गेल. विचार करता करता एक क्षण आला आणि तिने खाडकन डोळे उघडले.. मग ती हसली आणि बोलायला लागली,

 

"रोहित.. तू मला आवडतोस.."

 

"ते माहिती आहे..पुढे बोल ग बाई.." रोहित आतुरतेने बोलला,

 

"हो हो.. माझ्या उत्तराची वाट पाहायला तयार आहेस मग २ मिनिट थांबता येत नाही का?"

 

"हो की.. पण तू सांग काय वाटतंय ते.."

 

"ओके..आता मी पण फार ताणत नाही. बरोबर आहे तुझ.... अति परिचयात होईल..."

 

"प्रस्तावना बंद कर आणि प्लीज मुद्द्याच बोल ना आभा..." रोहित बोलला. त्यावर आभा हसली.. मग तिने एक पॉज घेतला...आणि बोलायला लागली. तिने सुद्धा दीर्घ श्वास घेतला...

 

"आणि...हो! मला तू आवडतोस.. बराच विचर करून, तुला बऱ्यापैकी समजून घेतल..आणि आता माझा निर्णय झालाय...येस.. मला सुद्धा तुझ्याबरोबर पूर्ण आयुष्य काढायला आवडेल.." आभा एका श्वासात बोलली. मग तिने हुश केल.. "बॉम्ब टाकलास रोहित... मला नव्हत अस काही अपेक्षित. पण आज अचानक का वाटल? की तू ठरवलं होतस आधीच?" रोहित आभाच बोलण ऐकत होता. त्याने तिचा होकार ऐकला आणि त्याला काय कराव सुचेना..

 

"ओह वा...फायनली! तू हो म्हणलीस? नक्की ना?"

 

"हो रे.. नक्की.. विचार पूर्वक निर्णय घेतलाय.. डोंट वरी...आता नाही बदलणार माझा निर्णय.. तू तसा छान आहेसच. तुझे आई बाबा पण..सो.. पण सांग, आज अचानक का वाटल? आणि एकदम बॉम्ब का टाकलास?"

 

"शॉक द्यायला आवडतात मला.. आणि याय..." रोहित जोरात ओरडला, "फायनली तुझा होकार!! मी काही लेखक किंवा कवी नाही सो आनंद ह्याशिवाय अजून कसा व्यक्त करू नाही माहिती.. आणि नाही नाही.. ठरवून नाही.. पण आज माहिती नाही.. अचानक वाटल तुला विचाराव.. आपण तसे बऱ्याच वेळा भेटलो... विचार पक्के होत होते.. आज घरी आलीस आणि मला अचानक अस वाटल, तूच तूच आहेस ती!! हे इन्फॉरमल प्रपोज आहे. तुला शिस्तीत सागरसंगीत प्रपोज करेन.. आणि ते प्लान करून..वेट फॉर माय सरप्राईज.." रोहित बोलला आणि त्याचे डोळे लकाकले. त्याच बोलण ऐकून आभा फक्त हसली..आणि बोलली,

 

"ओह हो... मला पण छान वाटतंय रोहित.. आपण पहिल्यांदी भेटलो काय... आणि आज दोघांचा होकार!! पहिल्यांदी भेटलो तेव्हा माझा लग्नाचा विचार पण नव्हता...पण सगळ जुळत गेल.. आणि आपले निर्णय पक्के झाले.. पण एक संग रोहित, राहशील न नेहमी माझ्या बरोबर? ते खूप महत्वाच असेल माझ्यासाठी..आणि वॉव.. सरप्राईज ची मी वाट पाहते आहे रोहित.. आणि आय लव यु..आय लव यु!! खूप मस्त आहेस तू..."

 

"ओह माय.. काय म्हणालीस तू? आय लव यु?"

 

"हो मग प्रेम तसच व्यक्त करतात ना?"

 

"भारी.. मी सुद्धा आय लव यु म्हणण टाळल होत आणि तू डायरेक्ट बोललीस सुद्धा? वा.. मी पण म्हणतो आता.. आय लव यु टू आभा.. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते सुद्धा पहिल्या भेटीपासून..आणि खात्री ठेव... तुझ्या बरोबर नेहमीच असेन..परिस्थिती कोणतीही असो, हम साथ ना छोडेंगे.."

 

रोहित च बोलण ऐकून आभा खूप खुश झाली. तिचा आनंद ती लपवू शकत नव्हती. आता दोघांचे विचार पक्के झाले होते आणि दोघे एकमेकांशी लग्न करणार होते पण ते लगेच घरी सांगणार नव्हते. दोघे हॉल मध्ये आले ते वेगळ्याच मूड मध्ये. दोघांना एकमेकांसोबत आनंदी पाहून रोहित चे आई बाबा खुश झाले. आभा तर खूप खूप दिसत होती. तिच्याकडे पाहून रोहित चे बाबा बोलले.

 

"बऱ्याच गप्पा झालेल्या दिसतायत. आभा एकदम खुश दिसतीये.."

 

"हो हो बाबा... आभाला घर आवडलं.. तुम्ही आवडलात.. आता आपण जेवायचं का? मग मी आभा ला घरी सोडू येईन.."

 

"हो रोहित.. इतकी काय घाई.. आभाला शांतपणे बसून जेवू दे.. " रोहित ची आई बोलली..

 

"बर आई.. तू वाढ पटकन.. आणि जरा लवकर.."

 

"चालेल..."

 

मग सगळे जेवायला बसले. आभा पूर्ण वेळ तिच्याच विचारात हरवली होती. तिच्या चेहऱ्यावरच हसू कमी होत नव्हत. आभा ला काहीच सुचत नव्हत. पण तिने पटापट जेवण आवरून घेतल. मग मात्र रोहित आणि आभा तिथून निघाले..

 

***

Rate & Review

jyoti pawar 3 weeks ago

prajakta patil 3 weeks ago

Madhu Upadhyay 4 weeks ago

Neha Dhole 4 weeks ago

Shashikant 4 weeks ago