तू अशीच जवळ रहावी... - भाग 3 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - भाग 3

तू अशीच जवळ रहावी... - भाग 3

आज भावनाला दवाखान्यात ऍडमिट करून सतरा दिवस झाले होते...तरीही तिच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता...मृत्युंजय पण तिच्या बाजूलाच बसून होता... कारण त्याला फक्त एकदाच तिचे बोलणे ऐकायचे होते म्हणून तो रात्रंदिवस तिच्याच शेजारी बसून राहत होता...भावना जरी प्रेम करत नसली तरीही त्याच स्वतःपेक्षा जास्त प्रेम तिच्यावर होते...वेडा होता तो तिच्यासाठी म्हणून तो तिची वाट पाहत होता...

"बोल ना ग फक्त एकदाच उठून बोल...हवं तर भांड माझ्यासोबत पण प्लीज असा त्रास देऊ नको ग...😢खूप दिवसापासून तुझा आवाज ऐकला नाही मी...म्हणून मला कसतरी होत आहे ग...पण तुला काय ना फरक पडणार ना...आधीही तू मला त्रास द्यायची आणि आता पण तेच करत आहे...तुला हेच करायचे आहे ना तू कर हेच...एवढी वर्ष वाट पाहिली ना तुझी आता अजून काही वर्षे वाट पाहायला तयार आहे मी तुझी...जेव्हा पण तू उठशील ना तेव्हा देखील तुला तुझ्या निर्णायचे स्वातंत्र्य दिले जाईल... तू नाही बोलली ना मला  i swear मी खरंच निघून जाईल...पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही...तू तुला हव्या त्या मुलाशी लग्न कर आणि सेटल हो...तू सुखी ,खुश असली की मला समाधान मिळेल...मला जबरदस्ती करून प्रेम नाही मिळवायचे तुझे...तुझी मर्जी असली तरच हे नाते पुढे जाईल...नाहीतर हे इथेच थांबेल...😢बोल ना ग एकदाच प्रिन्सेस...प्लीज...." मृत्युंजय तिच्याकडे पाहत दुःखी होऊन बोलतो....तरीही तिच्यामध्ये काहीच फरक जाणवत नाही...

"तुला आठवत आपली रेस्टॉरंट मधील भेट...किती काय काय करत होती लग्न न करण्यासाठी...ते सर्व आठवून ना मला खरच तुझ्यावर हसू येते..."मृत्युंजय डोळे पुसून भावनाकडे पाहत बोलतो...तो तसाच भूतकाळातील आठवणीत जातो...

भूतकाळ (फ्लॅशबॅक):-

भावना आणि भावनाची आई खरेदीसाठी बाहेर मार्केटला फिरायला आले होते...सगळी खरेदी करता करता त्यांना दुपार झाली...सकाळी जास्त काही खाऊन न आल्यामुळे दोघीजणी हॉटेल ला जेवायचे ठरवतात...त्या दोघी चांगल्या अश्या हॉटेलला जातात...दोघी जणी एक टेबल पाहून तिथे जाऊन बसतात...

"भावना खूप महाग असेल का ग इकडच जेवण?" भावनाची आई काळजीने बोलते...कारण हॉटेल पाहून ते खूप महागडे आहे असे आईला कळत होते म्हणून त्या बोलतात...

"मम्मी काहीही काय बोलते ग...तुला काय हवं ते सांग आणि अजिबात पैशाचे पाहू नको...😊तुझी मुलगी चांगल्या कंपनीत कामाला आहे ग त्यामुळे आहेत माझ्याकडे पैसे...तू गपचूप खा..."भावना थोडीशी हसत मम्मी ला बोलते...भावनाचे बोलणे ऐकून तिच्या आईला तिच्याबद्दल गर्व वाटतो...

"आजपर्यंत कधीच माझ्या मुलीने कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नाही...जे आम्ही देत जात होतो तेच तिने घेतले...कधीही स्वतःच्या चॉईसने स्वतःसाठी कपडे घेतले नाही...मम्मी पप्पा तुम्हाला आवडेल ते घेऊन या असच तिचे असायचे आणि आज माझी मुलगी एवढी मोठी झाली की मला या मोठया हॉटेलमध्ये खाऊ घालत आहे... आता मृत्युंजय सोबत लग्न झाले की ती कायमची आम्हांला सोडून दूर जाणार...खरंच ही कधी मोठी झाली मला कळलंच नाही...अजूनही विश्वास वाटत नाही की एवढी मोठी झाली यावर...खूप कष्ट करून तू सगळं मिळवलं आहे भावना पण आता तुला स्वतःचा विचार करायला हवा...आम्ही कायमचे तर नाही ना राहू शकत तुझ्यासोबत...आम्हाला मृत्युंजयने वचन दिले तो तुला भरभरून प्रेम देईल आणि सांभाळून घेईल...त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसले...खरा हिरा आहे तो म्हणून आम्ही तुझं लग्न मृत्युंजयसोबत लावत आहोत...आज तुला नाही कळेल त्याच्याबद्दल पण एकदिवस तू त्याच्यावर प्रेम करायला लागशील...आई भवानी माझ्या मुलीचे आयुष्य तुझ्या कृपेने चांगले कर ग..."भावनाची मम्मी मेनूकार्ड वाचणाऱ्या भावनाकडे पाहत मनातच बोलत असते...

"मम्मी काय हवं तुला खायला बोल...का मी फुल जेवणाचे ताट मागवू?"भावना कार्ड वाचत विचारते...

"तुला हवं तसं कर की..."मम्मी हसून बोलते...

"ओके आपण व्हेज दोन थाळी मागवत आहोत...😊"भावना अस बोलत एका वेटरला बोलवते आणि त्याला ऑर्डर देते...ऑर्डर येईपर्यंत भावना आणि भावनाची मम्मा बोलत बसतात...तेवढ्यात भावनाची नजर एका टेबल वर खिळते...ती पाहते तर एक चांगला हॅन्डसम माणूस एका चेअर वर style मध्ये बसलेला असतो...त्याच्यासमोर एक सुंदर अशी मुलगी बसलेली असते आणि तो माणूस हसून त्या मुलीसोबत बोलत असतो...भावनाला तो ओळ्खची वाटतो...म्हणून ती गुढपणे असते आणि तिच्या मम्मीकडे पाहते...

"ऐ मम्मी तुझा जावई बघ दुसऱ्या मुलीसोबत बसला आहे...😒चल reject कर त्याला लवकर..."भावना एका टेबलकडे पाहत बोलते...भावनाचे बोलणे ऐकून भावनाची मम्मी आजूबाजूला पाहते...तर तिला मृत्युंजय एका खुर्चीवर बसलेला दिसतो...त्याला पाहून तिच्या मम्मीला आनंद होतो...

"मृत्युंजय...😊"भावनाची मम्मी मृत्युंजयला पाहत आवाज देते...त्यांच्या आवाजाने मृत्युंजय त्यांच्याकडे पाहतो...त्याला सुद्धा त्यांना पाहून बर वाटते...म्हणून तो डायरेक्ट त्या तिथून उठतो आणि भावनाच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसतो...ते पाहून भावना चिडते...त्याच्यासोबत असलेली मुलगी भावनाच्या मम्मीच्या चेअरच्या बाजूला असलेल्या चेअरवर जाऊन बसते...इकडे जय बाजूला बसल्याने भावना उठून दुसऱ्या चेअरवर जायला पाहत असते...ते पाहून मृत्युंजय तिचा तो नाजूक हात पकडतो...

"अरे माझी प्रिन्सेस बस की इथे...😊मी काही खाणार नाही तुला कारण मी व्हेजिटेरियन आहे तुझ्यासारखा म्हणून बस इथे..."मृत्युंजय तिचा हात पकडत बोलतो...ते पाहून ती आणखीन चिडते आणि त्याच्या हातातुन हात सोडवण्याचा प्रयत्न करते...पण ते तिला काही जमत नाही कारण तिच्या हातापेक्षा त्याचा हात मोठा होता...म्हणून ती कंटाळत तिथेच बसते...

"आता तरी सोडा ना...😣"भावना वैतागत बोलते...तसा तो तिचा हात सोडतो...भावनाची मम्मी सगळं पाहून सुद्धा न पाहिल्यासारख करते आणि आपलं आलेलं जेवण करत असते...

"भावना तू इथे ही आलीच आहेस तर माझ्या चुलत बहिणीला सुरभीला भेट की...आताच पुण्यावरून आली आहे...😊"तो त्याच्या सोबत असलेल्या मुलीची ओळख करत देत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून मम्मी तर जेवण करता करता भावनाकडे रागाचा कटाक्ष टाकते...

"ओ हाय सुरभी ..."भावना कसनुसपणे हसत बोलते...

"हाय भावना...ओ आता आमच्या वहीनिसाहेब आहात ना तुम्ही...😅मग मी तर वहिनीच म्हणणे आजपासून..." सुरभी थोडीशी हसत बोलते...तिचे बोलणे ऐकून भावना मृत्युंजय कडे रागाने पाहते...तिची ती रिअकॅशन पाहून तो हसतो आणि आपलं आपलं खाऊ लागतो...

"सत्यानाश केला आहे या माणसाने माझ्या life चा लहानपणी चा बदला असा घेईल वाटलं नव्हतं मला...😞ऐ जा रे बाबा तू...😖मी किती हॅपी होते ना माझ्या आयुष्यात...पण नाही आवडत कोणाला...😏किती मुली आहेत या जगात आणि हा माझ्या मागे का आहे?एक चान्स सोडत नाही...मी पण भावना आहे...😎ब्रम्हांड च दाखवते थांब तुला आता...नाही जर तुला त्रास दिला ना तर नाव नाही लावणार भावना..."भावना मनातच जयकडे पाहत बोलते...सगळे जण आपलं आपलं खात असतात...

इकडे भावनाच्या डोक्यात तर जेवता जेवता वेगळंच काही शिजत होते...ते काय होते?ते तिलाच माहिती...इकडे सगळयांचे होते तरीही भावना आपल्याच विचारत गुंतलेली असते...ते पाहून मृत्युंजयला मज्जा सुचते...तो सुरभी ला भावनाच्या मम्माला घेऊन जाण्याचा इशारा करतो...तशी सुरभी त्याच ऐकून भावनाच्या मम्मीला घेऊन जाते...

"भावना किती हळू खाते तू?मी भरवू का?"मृत्युंजय तिला आवाज देत बोलतो...त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि आसपास पाहते...तर तो सोडून कोणीच तिथे नव्हते...

"मम्मा कुठे गेली माझी आणि सुरभी ती पण गायब झाली...🤔थांबा मी पाहून येते..."भावना अस बोलत जात असते...तसा मृत्युंजय तिचा हात धरतो आणि तिला चेअरवर बसवतो...तो आता तिच्यासमोरच्या चेअरवर बसतो...तो सुद्धा style मध्ये...ते पाहून ती थोडी घाबरते...कारण काहीही झालं तरी तो आता तिचा फ्रेंड् नव्हता...एक मोठा श्रीमंत माणूस होता...त्यात तिचा होणारा नवरा...तो एवढा हॅन्डसम दिसत होता की हॉटेलमधील सगळ्या मुली त्यालाच पाहत होत्या...त्या सुध्दा त्याच्या एका नजरेसाठी...कारण त्याचे ब्राउन कलरचे डोळे एकदम भारी,किल्लर असे वाटत होते...पण हा माणूस कोणालाच पाहत नव्हता...तो फक्त त्याच्यापुढे बसलेल्या भावनाला पाहत होता...त्याच्या डोळ्यात प्रेम होते...ते फक्त तिच्यासाठीच होते...पण ती अजिबात त्याला पाहत नव्हती...खाली मान घालून हाताच्या बोटांसोबत ती चाळा करत बसली होती...तिच्या मनात वेगवेगळ्या विचारांचा काहूर चालू होता...

"प्रिन्सेस नको ग एवढे टेन्शन घेऊ...रिलॅक्स हो आणि फ्रेंड्स सारख समजून बोलायला लाग..."मृत्युंजय थोडस हसत बोलत...त्याचे बोलणे ऐकून भावना उठते आणि तिने घातलेल्या फुल टॉप ड्रेसच्या हातांच्या बाह्या वर करते आणि attitude मध्ये त्याच्यासमोर उभी राहते...

"ओय भिडू तू यहा से उठने का और सिध्दा पतली गल्लीसे  निकलने का...भावना को पटाना इतना आसान नहीं हैं...😎इसलीए तू निकल जा यहा से...वरना इतना बुरा हाल करुंगी तेरा ना तू सोच भी नहीं सकेगा...समज मे आया तेरो को तो जा अब यहा से...भावना को भी काम हैं इसलीए भावना जा रही हैं अपने घर...😚"भावना टपोरी भाषेत बोलून तिथून निघून जाते...पण तिचे ते बोलणे ऐकून मृत्युंजय मात्र शॉक होतो...😂तो तसाच गेलेल्या भावनाकडे पाहत राहतो...कारण त्याने पहिल्यांदा तिचे असले रूप पाहिले होते...यात त्याचीच चूक होती...कारण त्याने तिला फ्रेंड्स समजून बोलायला सांगितले होते... म्हणून त्याला भावनाचा हा अवतार पाहिला मिळाला...

त्याला कोणाचा तरी कॉल येतो...तसा तो भानावर येतो...तो कॉल उचलून त्या व्यक्ती सोबत बोलतो आणि तसाच बोलून फोन ठेवतो...त्याच्यासमोर असलेलं पाण्याचे ग्लास तो तोंडाला लावतो आणि एका घोटातच ते पाणी संपवून ग्लास समोर ठेवतो...

"ही आता गेली ती नक्की भावनाच होती ना?का तिची जुळी बहीण वगैरे होती...भावनाची अशी पण भाषा आहे?एकदम टपोरी टाईप बोलत होती ती...काय बोलली मला पतली गल्ली से निकल जा...🙄भावनाला पटवणे एवढं सोप्प नाही का?आता तर तुला मिसेस मृत्युंजय बनवल्याशिवाय मी शांत बसणार नाही...😎मेरी जान तुलाच घेऊन जायला मी आलो आहे मग अस थोडीच सोडून जाणार ना तुला...हम भी मृत्युंजय हैं ऐसें ही थोडी छोडेंगे तुमहें..."मृत्युंजय attitude मध्ये स्वतःशीच बोलतो आणि तो तसाच गॉगल डोळ्यावर लावून त्या हॉटेल मधून बाहेर पडतो...तो बाहेर येऊन पाहतो तर भावना एका मुलासोबत मस्त अशी बोलत बसली होती...ते पाहून त्याला थोडासा राग आला पण तो तसाच राग शांत ठेवत तिच्याजवळ गेला...

"ओ माय डार्लिंग किती छळते ग मला तू...ह्या कोणत्या माणसासोबत तू बोलत बसली आहेस..."मृत्युंजय भावनाच्या कंबरेत हात घालून तिला जवळ घेत बोलतो...त्याच्या अश्या करण्याने ती थोडीशी कावरीबावरी होते...क्षणभर काय झालं तेच तिला कळलं नव्हते...पण लगेच भानावर येत ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असते...मृत्युंजयची पकड एवढी घट्ट होती की ते तिला जमल नाही...पण पुढे असलेला माणूस मात्र मृत्युंजयला तिच्याजवळ पाहून राग राग करत होता...

"मृत्युंजय प्लीज सोडा ना मला...😣"भावना चिडतच हळू आवाजात बोलते...त्याचे बोलणे समोरच्या माणसाला समजते...

"अहो मिस्टर अस कोणत्याही मुलीला पकडणं चुकीचे आहे...सोडा तिला नाहीतर पोलिसांना बोलविन...😡"तो माणूस रागातच बोलतो...त्याच्या तोंडातून पोलीस ऐकून भावना थोडीशी घाबरते...

"अहो अर्णव सर नको नको पोलीस हे तर माझे...."भावना घाबरून बोलत असते...पण तेवढ्यात ती पुढच काही बोलायला जाणार तशी ती थांबते...

"मिस भावना तुम्ही घाबरू नका...मी आहे तुमच्यासोबत अश्या लोकांना धडा कसा शिकवायचा ना ते मला माहिती आहे...😤"अर्णव रागातच बोलतो...कारण मृत्युंजयने तिला धरलेल आवडले नव्हते...

"अहो सर मी सांगितले ना नाही बोलवायचे म्हणजे नाही बोलवायचे मला...😣"भावना थोडीशी चिडत बोलते...इकडे मृत्युंजय मात्र तिची चिडचिड एन्जॉय करत होता...पण तो काही तिला सोडत नव्हता...

"का नाही बोलवायचे तुम्हाला...???"अर्णव विचारतो... आता त्याचे बोलणे ऐकून मृत्युंजयला पण थोडासा राग येतो...पण तो तस न दाखवता...भावनाला त्याच्यासमोरच बाहुलीसारखं स्वतःच्या मजबूत बाहुत उचलतो...त्या हेने ती आणखीन चिडते...

"का नाही बोलवायचे भावनाला कारण मी भावनाचा होणारा मिस्टर आहे...😚त्यामुळे भावना मला पोलिसात देणार नाही...तुला कळत नाही का?जेव्हा कपल आपापसात भेटतात तेव्हा त्यांना privacy दिली जाते...चल निघ इथून नाहीतर मृत्युंजय सरदेशमुख तुला सोडणार नाही ...हा वेळ भावनाचा फक्त माझ्यासाठी आहे...त्यामुळे नो डिस्टर्ब..."मृत्युंजय अस बोलत भावनाला घेऊन जातो...त्याचे बोलणे ऐकून अर्णवला राग येतो...तो तसाच मृत्युंजय आणि भावनाला पाहून निघून जातो...इकडे भावना मात्र मृत्युंजयला हातांनी मारत असते...पण त्याला काहीच फरक पडत नव्हता...तो तसाच तिला गाडीत बसवतो आणि तिला सीट बेल्ट लावून गाडी लॉक करतो...

"सोडा मला अजिबात असली जबरदस्ती करायची नाही हा मला...😣मला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची?कोण तुम्ही मला हात लावणारे?मी नाही आहे तुमची कोणी...मला जाऊ द्या नाहीतर मी ओरडणार हा..."भावना वैतागत बोलत असते...तिचे बोलणे ऐकून मृत्युंजय गाडीमधील ड्रॉवर खोलतो आणि त्यातून चिकट पट्टी काढून तिच्या तोंडाला लावतो...तस तीच तोंड बोलायचे गप्प होते...ती हाताने चिकटपट्टी काढायला जाणार हे दिसताच तो तिचा हात धरतो आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यात स्वतःचे डोळे घालुन तिच्याशी बोलतो...

"प्रिन्सेस त्या मुलाची नजर चांगली नाही होती...म्हणून मला असे वागावे लागले तुझ्यासोबत...त्याबद्दल सॉरी...या पुढे तुझ्या मर्जीशिवाय तुला हात नाही लावणार मी..."मृत्युंजय विश्वासाने तिला समजावत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून काही क्षण ती त्याच्या ब्राउन डोळ्यात हरवून जाते...कारण त्यात कोणत्याही प्रकारची वासना,खोटं वागणं काहीच नव्हते...होती ती फक्त काळजी आणि प्रेम...पण ते भावनाला कळलेच नव्हते...म्हणून ती लगेच भानावर येते आणि त्याच्या हातातुन स्वतःचा हात सोडवून घेते...तो देखील हळूच तिची चिकटपट्टी काढून टाकतो...तशी ती शांत होऊन गप्प  गाडीत बसून राहते...मृत्युंजय गाडी स्टार्ट करतो आणि तिथून तिला घेऊन जातो...

मृत्युंजयला अर्णवची नजर थोडी विचित्र वाटत होती... कारण तो सारखा काहींना काही कारण काढून भावनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता...हे कुठेतरी त्याला खटकले...म्हणून मृत्युंजय तिच्याजवळ गेला आणि मुद्दामच त्याला भावनाची आणि त्याची नवीन प्रकारे ओळख करून दिली...ज्या मुळे तो पुन्हा तिच्याशी अस काही वागणार नाही...

मृत्युंजयला आणि भावनाला घरी पोहचायला वेळ लागतो...तो भावनाच्या घराखाली गाडी थांबवतो...एक नजर तिच्याकडे पाहतो...तर ती AC मुळे झोपली होती...त्यात रात्रीचे आठ नऊ वाजले होते...म्हणून तो तिला उठवतो...

"प्रिन्सेस उठ की बाई...घर आले तुझे चल उतर..." मृत्युंजय प्रेमाने तिला बोलतो...पण ती काही त्याला प्रतिसाद देत नाही...ते पाहून तो गाडीच्या खाली उतरतो आणि तिच्या बाजूला जाऊन तिचा दरवाजा ओपन करून तिला अलगदपणे स्वतःच्या दोन्ही हातात उचलतो...तरीही ती काही हलत नाही ते पाहून तो हसतो...

"आताच घेऊन गेलो असतो तुला...😅पण तुझ्या मर्जीशिवाय अजिबात घेऊन जाणार नाही...कारण मला जबरदस्ती करून नात नाही लादायचे आहे...तू एवढी क्युट आहेस ना म्हणून अस वागावे लागते मला...😣झोपाळू कुठची...काही खरं नाही मृत्युंजय तुझं...कधी रावडी तर कधी शांत...कशी आहेस तू ना माहिती नाही मला...पण माहिती तर करून घेणार मी...😊"मृत्युंजय हसतच झोपलेल्या भावनाच्या चेहऱ्याकडे पाहत बोलतो...तो तसाच तिला उचलून घेऊन घरात नेतो...दरवाजात येताच तो बेल वाजवतो...तशी भावनाची मम्मी दरवाजा ओपन करते...

"काय झालं हिला?अस का आणले आहे?"भावनाची मम्मी काळजीने विचारते...

"काही नाही झालं मम्मा...झोपली आहे ती...मी ठेवतो तिला रूममध्ये..."मृत्युंजय अस म्हणत तिला तिच्या रूममध्ये आणतो आणि व्यवस्थितपणे तो तिला तिच्या बेडवर झोपवून पांघरूण घालून बाहेर येतो...

"काही गैर करणार नाही बाबा तुमच्या मुलीसोबत...तिला मान्य असेल तरच पुढे जाईल मी नाहीतर कायमचा निघून जाईल...पण त्या आधी प्रयत्न करणार आहे...तुमच्या मुलीला मनावायचे...😔तिला जर नात बनवायचे असेल नसेल...पण जो पर्यंत ती माझ्यासोबत आहे तो पर्यंत तिची फुलासारखी मी काळजी घेणार...त्या नंतरही घेतली जाणार तो पर्यंत तुम्ही देखील तुमच्या भावनाला सांभाळा...कोण कस आहे याची जाणीव अजून तिला नाही आहे...त्यामुळे काळजी वाटते...पंडितजिने तिच्या जीवाला धोका आहे असे सांगितले आम्हाला म्हणून मी लवकर इथे आलो...मला तिच्यापेक्षा या जगात काहीच मोठे नाही आहे...त्यामुळे प्लीज तिला जपा..."मृत्युंजय जड मनाने बोलतो आणि तो तसाच बाहेर निघून जातो...तो स्वतःच्या गाडीकडे येतो आणि त्यात बसून तो निघून जातो...

"खरच खूप नशीबवान आहे आपली मुलगी...एवढा मोठा बिझनेसमन असून सगळं काम असच सोडून हा तिच्यासाठी भारतात आला...फक्त आपल्या लेकीसाठी... खरच हिरा आहे हा...आपली मुलगी याच्यासोबत लग्न करून सुखी होईल...पण त्या आधी येणाऱ्या संकटाचीच मला भीती वाटत आहे..."भावनाचे बाबा भावनाच्या आईला म्हणतात...

"मला पण त्याचीच भीती आहे...भावनाला काही झाले नाही पाहिजे नाहीतर मृत्युंजय नाही राहू शकत तिच्याशिवाय...😢जीवाला घोर लावून ठेवला आहे पंडीतजिनी...मला काळजी वाटत आहे दोन्ही पोरांची... आई भवानीलाच माहिती काय लिहिले आहे त्या दोघांच्या आयुष्यात...??"भावनाची आई थोडीशी दुःखी होऊन बोलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते...

वर्तमानकाळ:-

मृत्युंजय एक एक आठवणीत भावनाच्या आठवत होता...त्या चांगल्या आठवणी आठवून त्याच्या डोळयांतुन पाणी येत होते...कारण तिच्या मनात जरी प्रेम नव्हते त्याच्याबद्दल तरीही त्याचे तिच्यावर भरपूर प्रेम होते...तिची तशी अवस्था पाहून त्याचे मन अस्वस्थ होत होते...त्याच्यासाठी ती काय होती...हे तो कोणालाच सांगू शकत नव्हता...सगळे आपले आपले मन एकमेकांना बोलवून सांगून खाली करत होते...पण तो मात्र आतमध्येच घुसमटतच होता...एका क्षणासाठी सुद्धा त्याला तिला सोडून जावेसे वाटत नव्हते...तो कितीतरी वेळ तिच्यासोबत बोलत बसायचा आणि तिथेच झोपायचा...याला अस करताना पाहून स्क्रीन वरून पाहणाऱ्या मुलीला मात्र खूप राग यायचा भावनाचा... कारण ती एक निपचित पडलेली होती...ते सुद्धा खूप दिवसापासून तरीही हा माणूस तिच्याजवळ बसून राहत होता...त्यांना एकमेकांजवळ पाहून तिचा राग राग होत होता...

"खूप झालं तुला जगू देणे भावना...😡15 दिवसाच्या वर झाले तरीही हा जय तिच्याजवळच बसून आहे...हा जर असाच बसून राहिला तर माझं काहीच चालणार नाही म्हणून आता तुला मरावे लागेल भावना...इथे तर तुला जय ला मिळू देणार नाही मी...तू वरती भेट हा त्याला आणि तिथेच काय ते प्रपोज कर..."स्क्रीन कडे पाहत बसलेली मुलगी असुरी हास्य करत बोलते...ती तशीच कोणाला तरी कॉल करते....काहीतरी बोलून ती कॉल ठेवते आणि स्क्रीन कडे गुढपणे पाहत असते...

"सर तुम्हाला डॉक्टर ने बोलावले आहे...😊" एक नर्स भावनाच्या रूमच्या आतमध्ये येत मृत्युंजयला बोलते...तिचे बोलणे ऐकून मृत्युंजय भानावर येतो आणि डोळे पुसतो...

"हम्म येतो मी...my pricess आता येतो हा..."मृत्युंजय थोडस हसत भावनाला बोलतो आणि तो तसाच रुमच्या बाहेर निघून जातो...तो गेलेला पाहून ती नर्स भावना जवळ येते आणि गुढपणे हसतच भावनाला लावलेल्या सलाईन च्या बॉटलला एक तिने लपून आणलेलं इंजेक्शन टोचते...ते इंजेक्शन दाबून ती पूर्ण ते सलाईनमध्ये खाली करते...तीने इंजेक्शन सोडल्याने सलाईनमध्ये निळा रंग पसरतो...ते पाहून ती नर्स हासुरी हास्य करून तिथुन निघून जाते...

"दया येते ग मला तुझी...पण काय करू ना तुला जिवंत सोडले ना जय माझा कधीच होणार नाही कारण त्याला कळेल ना मी मारले म्हणून तुला...त्यामुळे मला तुझ्यासोबत असे वागावे लागते...कारण मला तुझ्यापेक्षा जय महत्त्वाचा आहे...मैत्रिणी काय पैसा फेकून मी मिळवू शकते...पण जयला नाही ना मिळवू शकत...म्हणून अस केलं...सॉरी माय बेस्टी आणि बाय बाय बाय...😔राम नाम सत्य हैं...देव तुझ्या आत्म्याला शांती देवो..."ती मुलगी स्क्रीन कडे पाहत हसुरी हास्य करत बोलते...ती तशीच विचित्र नजरेने तिच्या सलाईनमधून एक थेंब तिच्या हातापर्यंत पोहचण्याची वाट पाहत असते...काही सेंकदातच तो थेंब भावनाकडे पोहचणार असतो हे पाहून ती विचित्रपणे हसते...पण तेवढ्यात भावनाच्या रूमची लाईट जाते आणि पूर्ण रूम अंधारमय होते...तर इकडे तिची स्क्रीन देखील बंद होते...ती तशीच प्रयत्न करून बटन दाबून ऑन करत असते पण स्क्रीन काही केल्या ऑन होत नाही ते पाहून ती चवताळते आणि रागातच सगळं उचलून फोडून टाकते...

"मला तिला मरताना...तडपताना पाहायचे होते पण नाही मिळाले...😤जाऊ दे उद्या पेपरला नक्कीच कळेल मला ते..."ती मुलगी अस बोलून कुठेतरी निघून जाते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
              ©®भावना सावंत(भूवि❤️)
***********************


Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Pranali Godhankar

Pranali Godhankar 7 months ago

Next part Mam

Jak

Jak 8 months ago

Ankita

Ankita 8 months ago

Next part kadhi

Sakshi Kulkarni

Sakshi Kulkarni 9 months ago