तू अशीच जवळ रहावी... - 9 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 9

तू अशीच जवळ रहावी... - 9

"अहो कळलं मला...बस्स झालं तुमचं...😣"ती घाबरून बोलते...तसा तो हसून तिथून चालू लागतो...ती पण त्याच्या मागे गपचुप चालत असते...तिच्या पायातील पैंजनाच्या आवाजाने त्याला कळत होते की ती त्याच्यासोबत आहे...खूप पुढे चालून आल्यावर त्याला तिच्या पैंजनाचा आवाज येत नाही...तसा तो मागे वळतो आणि मागच दृश्य पाहून तो शॉक होतो...

"ऐ हे बघा तुम्हाला काय हवे ते सांगा मी देतो...पण प्लीज तिला काही करू नका..."जय थोडस घाबरून बोलतो...कारण काही लोकांनी भावनाचे तोंड बांधले होते आणि त्यात मोठे असे धारदार शस्त्र त्यांनी तिच्या गळ्यावर धरले होते हे पाहून जय घाबरतो...

"प्लीज सोडा तिला...तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत..."मृत्युंजय भावनाकडे पाहून बघतो...तो हतबल झाला होता भावनाला पाहून म्हणून तो काहीही करायला तयार होता...ती माणसं दिसायला थोडीशी विचित्र दिसत होती...अंगाला कसल्या तरी झाडाचे कपडे तयार करून त्यांनी घातले होते...सगळे जण एकदम काळे असे होते आणि हातात धारदार शस्त्र घेऊन ते उभे होते...ते जयला पाहून मागूनच भावनाच्या डोक्यात एक दांडा घालतात...तशी ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडते...

"प्रिन्सेस$$$$$$..."जय मोठयानेच ओरडतो आणि तो तसाच धावत तिच्याजवळ जात असतो तेवढ्यात त्यातील एक माणूस मागूनच जयच्या डोक्यातही दांडा घालतो...जय पण डोकं धरून बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो...

"सरकार काय करायचे या दोघांचे?"एक व्यक्ती एका त्यांच्या टोळीतील बलाढ्य धष्टपुष्ट माणसाला विचारतो...

"घेऊन जाऊ की रामन्ना...या दोघांना ताफ्यावर मग ठरवू काय ते तिथे..."सरकार बोलतात...तस काही लोक भावनांजयला उचलतात आणि तिथून घेऊन जातात...दोघ शुद्धीत नसल्याने त्यांना काही कळत नव्हते...

खूपवेळा नंतर जयला सगळ्यात आधी शुद्ध येते तो कसतरी डोळे उघडतो आणि आजूबाजूला पाहतो तर भावना एका बाजूला पडलेली असते...बहुतेक तिला आणखीन शुद्ध आली नसावी म्हणून ती तशी पडली होती...जय तिच्याकडे जातो आणि तिच्या गालावर टॅप करतो...

"प्रिन्सेस उठ यार...आपल्याला इथून जावं लागेल बाळा..."जय तिला टॅप करत बोलतो...त्याच्या टॅप करण्याने ती कशी बशी डोळे उघडते...

"जय..."ती पुसटस बोलण्याचा प्रयत्न करते...

"शु$$$ मीच आहे...चल उठ लवकर..."जय कसबस तिला उठवण्याचा प्रयत्न करत बोलतो...त्याच्या बोलण्याने ती उठण्याचा प्रयत्न करते...पण ते तिला काही जमत नाही...जय पुढे होऊन तिला मदत करतो...तो उठवून तिला व्यवस्थित बसवतो...ती बसते आणि अचानक रडू लागते...

"मला मम्मीकडे जायचे...😭मला भूक पण लागली आहे...मम्मी असती तर चांगलं उपिट, पोहे सकाळ सकाळी खाऊ दिलं असते...माझी मॉर्निंग तर त्यानेच होते नेहमी...मला घरी जायचे नाहीतर माझा भाऊ मला काहीच ठेवणार नाही खायला...😭सगळं खाऊन टाकणार तो भुक्कड कुठचा..."भावना रडता रडता बोलत असते...जयला आधी वाटते तिला दुखत आहे म्हणून ती रडते...पण पुढचे तिचे बोलणे ऐकून तो स्वतःच्या कपाळावर हात मारतो...🤦परिस्थिती काय आणि या बाईला सुचत काय हे पाहून तो वैतागतो...

"ऐ बाई चूप ग...😣घरी गेल्यावर मी बनवून देईन...पण प्लीज आता रडू नको..."जय वैतागत तिला बोलतो... त्याच्या तोंडून ते ऐकून तिला आनंद होतो...ती तशीच आनंदात त्याला मिठी मारते आणि त्याच्या गालावर किस करते...मृत्युंजय तर तिच्या वागण्याने शॉक होतो... कारण ती अस काही करेल हे त्याला स्वप्नात पण वाटले नव्हते...😂तिच्या जेव्हा लक्षात येते तस ती बाजूला होते आणि ओशाळून खाली मान घालून गप्प बसते...

"Wow उपिट आणि पोहे साठी हे सर्व मला मिळतं असेल तर मी रोजच बनून देईन भावना तुला..."जय मनातच बोलतो...तो थोडस हसून बाजूला होतो...

"मला वाटते या जंगलात माझी इज्जत तर नक्कीच जाणार आहे...मी बहुतेक जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही..."जय स्वतःच्या तोंडावर हात ठेवून नाटकी स्वरात बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती चिडते...

"What do you mean😤?मी अशी तशी मुलगी नाही आहे हे डोक्यात घालून ठेवा तुम्ही...आले मला बोलणारे...तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात मी नाही...आज जर तुम्ही नसला असता तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती...हे सर्व तुमच्यामुळे घडत आहे...एक नंबरचे जाहिल माणूस आहात तुम्ही...काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे तुम्हाला माझ्याकडून म्हणून तुम्ही अस करत आहात...सर्व बिझनेसमन सारखेच असतात...😤"भावना रागातच बोलते आणि ती तशीच उठून जात असते...तेवढ्यात जय तिचे दोन्ही खांदे पकडून तिला जमिनीवर बसवतो...तिचे बोलणे ऐकून तो पण चिडतो...

"जाहिल असलो असतो ना एवढ्यात तुझी इज्जत पण लुटली असती...😡काय फायदा करायचा आहे ग मला तुझ्याकडून?तू कोण आहे अशी मोठी जिच्यामुळे मला फायदा होईल?बिझनेसमन आहे का कोणत्या श्रीमंत घरातील मुलगी आहे?सगळं ऐकून घेतो म्हणून नुसती बडबड करत असते...😡तुला ना एखादा मारहानी करणारे नवरे पाहिजे मग थोडीशी अक्कल येईल तुला...हे माझ्या मुळे नाही तुझ्यामुळे घडत आहे...तू पळून आली जंगलात मी नाही...मला जर तुझ्याबद्दल काहीच वाटले नसते ना तर तुला इथेच जंगलात सोडून गेलो असतो...मी तर बिझनेसमन आहे ग...तुला काही झाले असते तरीही माझ्यावर नाव आले नसते कारण माझं प्रोफेशन...पण तुझ्या काळजीने सगळं सोडून मला यावे लागले...तरीही तुझे हेच बोलणे असते...तू माझ्याजवळ आली मी नाही काही...😡अक्कल शून्य मुलगी कुठची...आतापासून तुला जिकडे जायचे जंगलात तिकडे जा...मी माझ्या रस्त्याने जाणार तू तुझ्या रस्त्याने...मला पडायचंच नाही आता तुझ्या प्रकरणात...😠"जय भयंकर चिडत तिला बोलतो...तो तसाच रागात उठतो आणि रूमचा दरवाजा खोलून बाहेर जातो...हिला आता त्याचे ते बोलणे ऐकून भयंकर राग आला होता...

"मला एवढं बोलले यांना सोडणारच नाही ही भावना... जाऊ दे गेले ना ते बरच आहे...आता भावनाच्या आयुष्यात सुखच सुख येणार आहे...😙"ती स्वतःशीच बोलून हसतच तिथून बाहेर पडते आणि समोरच दृश्य पाहून तर शॉकच होते...कारण काही जे तिला घेऊन आलेले लोक तिथे उभे असतात...आता तिथे काही बायका पण असतात...भावनाला ते सर्व अजीब नजरेने पाहतात...ते असे पाहतात म्हणून ती स्वतःला पाहते...

"मी परग्रही नाही हा...मी भारतीय आहे...😅भारतातील महाराष्ट्र मध्ये जन्मलेली...तुमच्यासारखीच एक माणूस आहे..."भावना कसनुस पणे हसून बोलते...ती आसपास पाहते तर जयला त्यातील काही लोकांनी पकडलेले असते...ते पाहून ही भलतीच खुश होते...

"या माणसाला अजिबात सोडू नका...खूप मारा अस मारा की पुन्हा याने मला त्रास च दिला नाही पाहिजे..."भावना जयला पाहून बोलते...तिचे बोलणे ऐकून जय चिडतो आणि ती लोकपण अजीब नजरेने तिला पाहून हसतात...

"सरकार ही दोघ खूप मस्त दिसत आहे...टेस्ट करण्यासाठी एकदम भारी आहेत...या मुलीचा मेंदू आपण नुसता भाजूनं खाऊ...खूप छान लागेल...😋"त्यातील एक माणूस भावनाकडे पाहून बोलतो...

"ईईईई...🤢तुम्ही लोक माझा मेंदू भाजून खाणार... शी किती घाण आहात तुम्ही चॉईस च नाही तुम्हाला तर...मस्त मसाला वगैरे लावून खावा खूप भारी लागेल"तिला त्यांचे बोलणे न कळल्याने ती तोंड वाकड करत बोलते...पण तिचे ते बोलणे ऐकून जय मात्र चिडतो...

"ऐ पागल तुझ्या भेझा बद्दल बोलत आहेत ते...तू काय त्यांना सजेशन देत आहे?😡"जय चिडतच बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती घाबरते आणि जय कडे जाते...

"ऐ नाही नाही माझ्या भेझा ला मला हात लावायचा नाही... त्यापेक्षा तुम्ही या माणसाच भेझा खा...याच्यावर तुमचा एकदिवस भागेल...😞मी काय एवढीशी काकडी थोडं पण भेटणार नाही तुम्हाला काही खायला...त्यांच्या शरीरात भरपूर काही भरलेले आहे..."भावना जय कडे हात दाखवून बोलते...आता तिचे ते बोलणे ऐकून तो भयंकर चिडतो...तो रागातच त्या माणसांना ढकलतो...

"व्हॉट भावना सिरिअस ली कहर आहे तू...😡अक्कल खरच नाही आहे तुला...कुठे काय बोलावे ते पण कळत नाही...एवढं कोण बालिश असत...तुझ्यापेक्षा ना ऑफिसच्या बाकी मुली बऱ्या मॉर्डन आहे आणि तू या कलचर मध्ये राहून हे असले पंजाबी ड्रेस घालून स्वतःची बुद्धी नष्ट केली आहे...त्यांना तरी अक्कल आहे पण तुला थोडी पण नाही आहे...😡तुझ्यासोबत लग्न करणारा खरच जीव देईल...कुठुन ही बाई मला भेटली याचा विचार तो करेन..."तो रागातच तोंडाला येईल ते बोलत होता...पण आताचे त्याचे बोलणे तिला भरपूर लागले होते...कारण आज त्याने तिची बुद्धी,ड्रेसवरून तिला जज केलं होतं...अस पहिल्यांदा कोणीतरी तिला बोललं होते म्हणून तिला वाईट वाटत होतं...खर तर तिची जेवढी बुद्धी काम करत असायची त्याच्या एक परसेंट पण बुद्धी जयच्या ऑफिस मधील मुलींची किंवा जयची नव्हती...जर तिला बुद्धी नसली असती तर तिने लँन्सी ला बनवलेच नसते...ह्याचा जयने विचार न करता डायरेक्ट तिला धारेवर घेतले...ती गपचूप खाली मान घालून त्याच ऐकत होती...आतून तिला भरपूर दुःख होत होते...पण तिच्या स्वभावात अस रडून दाखवणे नव्हते म्हणून ती आतल्या आत स्वतःला स्ट्रॉंग बनवत होती...एक अश्रू पण ती बाहेर काढायला बघत नव्हती...

"जय प्रत्येक माणूस बाहेर जसा दिसतो तसा आतून तो नसतो...हे जग ना सगळं काही परिस्थितीनुसार माणसाला बदलायला शिकवतो...मला नाही वाटत तुमच्या सारख मोठं बनून रहावं...मला अस माझ्यातील बालमन जपायचे आहे...पण its ओके तुम्ही सांगितले मला ना ठीक आहे...मी नाही आहे तुमच्या लायकीची...या जंगलातून बाहेर गेल्यावर मी तुमचं ऑफिस सोडत आहे...इथून गेल्यावर तुमचा माझा काहीच संबंध येणार नाही...एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो...काहींजण बोलून दाखवतात...तर काही जणांना express होता येत नाही..."भावना त्याला अडवत मध्येच स्वतःला स्ट्रॉंग करून बोलते...तिचे ते बोलणे ऐकून जयला वाईट वाटले...तिच्या बोलण्यात एक वेगळाच प्रकारचा ओलावा जाणवत होता...जस काही खूप मोठं दुःखाची जाणीव तिला झाली होती...पण क्षणात अशी बोलणारी भावना लगेच चेहऱ्यावर हसू आणून त्याच्यासोबत बोलू लागते...

"मला इथून जंगलातून बाहेर काढा आधी...😣मग काय माझी अक्कल काढायची ती काढा..."ती थोडीशी वैतागत जयला बोलते...जयला तीचे वागणे कळत नसते...

"नवराबायको?"एक व्यक्ती त्या दोघांजवळ येऊन विचारतो...

"हो..." जय नकळतपणे बोलून जातो...पण त्याचे ते बोलणे ऐकून ती शॉक होते...

"अरे मग बर झालं आज चांगला दिवस आहे आमचा...आज पुन्हा तुमचे आम्ही लग्न लावून देणार आहोत...आधीच एक लग्न होत आहे त्यात तुमचे पण लावून देऊ..."सरकार बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती घाबरते आणि तशीच पटकन एका झाडावर चढून जाऊन बसते...खाली पडणार नाही याची काळजी घेऊन ती झाडाला मिठी मारते...काही लोक तिला तस करताना पाहून ओरडतात...जय आजूबाजूला पाहतो तर ती गायब असते...तो मागे वळतो आणि समोरच दृश्य पाहून घाबरतोच की...😂एवढया फास्टली कोण अस वागत हा विचार त्याच्या मनात येतो...पण ती लग्न ही गोष्ट ऐकून घाबरली आणि त्यातच तिला जे सुचलं ते तिने केले...🤣

"ऐ पोरी उतर खाली...😡परिणाम वाईट होतील याचे..."एक माणूस खालूनच रागात तिला बोलतो...जय पण तिला पाहून थोडं पळतच तिथे येतो...उगा पडली बिडली तर हाड मोडून घेईल म्हणून काळजीने येतो...

"मैं नहीं आऊंगी नीचे...😤तुम्ही माझं लग्न लावतात ना म्हणून मी नाही येणार खाली..."ती झाडावर बसून मिठी मारूनच बोलते...

"ऐ उतर खाली नवराबायको आहात ना मग काय प्रॉब्लेम आहे लग्न करायला..."तो व्यक्ती पुन्हा तिला बोलतो...भावना खर बोलेल या भीतीने जय घाबरतो...कारण जंगलातील लोकांबद्दल त्याला थोडंफार माहिती होते...त्यांना खोट बोललेल चालत नसायचे म्हणून तो खाली येऊन तिला पाहतो...

"प्रिन्सेस ये खाली पडशील तिथून...😕"जय request करत डोळयांनीच खुणावत असतो...

"मी नाही उतरणार इथून...😤तुम्ही सगळे मिळून माझं लग्न लावणार ना म्हणून नाही उतरणार..."तीला त्याची खाणाखुणा न समजल्याने ती रागातच त्याला बोलते...आता जयकडे काहीच पर्याय नव्हता...जर ती खर बोलली तर दोघेही वाचणार नाही...हे त्याला माहित होते...

"अरे हडळ तू इथे का आली..."तो तिच्या मागे पाहून नाटकी स्वरात बोलतो...हडळ ऐकून भावना घाबरते...

"व्हॉट हडळ....मम्मा😭"ती घाबरुन उठत बोलते आणि पटकन खाली उतरायला पाहत असते पण त्या तिच्या घाईत तिचा पाय निसटून ती खाली पडत असते हे पाहून  जय पटकन खाली दोन्ही हातांमध्ये तिला पकडतो...तो अलर्ट असल्याने त्याने तिला कॅच पकडले नाहीतर आज हाड बीड सगळं मोडून घेतले असते तिने...😂इकडे ती पडणार या भीतीने जयचे पण हार्ट बीट तेवढेच फास्ट झाले होते...हिने पण पडणार या भीतीने डोळे बंद करून जयला पकडले होते...आपण अजून पडलो नाही कसे पाहून ती डोळे खोलते आणि त्याला पाहते.. एकदा
बाजूला तोंड खाली करून पाहते तर तिला मोठा दगड दिसतो...ते पाहून घाबरते...

"अययो भगवान ने बचा लिया रे बाबा मुझे...वरना इतना बडा पत्थर सर फोड देता ना मेरा...आपको पता था क्या मैं गिरने वाली हुं...🤔आप कौन हो भाई...🤣"भावना जयला पाहून घाबरून बोलते...कारण जय रागवेल या भीतीने...तिचे ते बोलणे ऐकून जय तिला थोड तिथून बाजूला करतो आणि एका चांगल्या ठिकाणी पाहून स्वतःचे दोन्ही हात सोडून देतो...तशी ती धपकन खाली पडते...

"हाय राम कितना खडूस इंसान हैं रे ये...😣गिराया ना मुझे...लगता हैं हडीया तुट गयी मेरी...अब मेरा भाई मुझे तुटी फुटी हडी बोलेगा...😣ईव कितना गंदा लगेगा ओ..."भावना हिंदीतून स्वतःला पाहून बडबडत असते...जयला तिचा तो drama पाहून हसायला येत असत...पण तो अजिबात तिला दाखवत नाही...इकडे त्या लोकांना मात्र तिची भाषा कळत नसते...

"आता लग्न करावेच लागेल तुम्हाला नाहीतर बाहेर जाऊ देणार नाही...😡"सरकार त्या दोघांजवळ येऊन बोलतो...

"व्हॉट तू पागल आहे का...🙄मी का बरं लग्न करायचे...मला नाही करायचे..."भावना बोलते...तशी काही माणसं तीच बोलणं ऐकून तिच्याजवळ भाला घेऊन येतात...ते पाहून ती घाबरते...

"अरे अरे मी असच बोलली होती...काय तुम्ही लोक पटकन चिडतात...माझ्या क्यूट जयू सोबत मी कुठेही लग्न करायला तयार आहे..."भावना जयला मिठी मारत बोलते...

"एक नंबरची चालू आहे ही बळीचा बकरा बनवत आहे...😑"जय मनातच बोलतो आणि तिचे हात स्वतःपासून दूर करतो...

"मर्यादेत रहा भावना...हे लग्न फक्त एक drama आहे बाकी काहीच नाही...याबद्दल बाहेर कोणालाच कळता कामा नये..."जय तिला तिच्याच भाषेत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती गप्प होते...

"चला तर मग ताई तिथं एक ढोली आहे...त्या सापाच्या ढोलीत हात घालून अंगठी काढायची आहे तुम्हाला...😊"एक माणूस तिच्याजवळ येऊन आनंदात तिला बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती घाबरते...तिला तसच ती लोक ढोलीपाशी नेतात...

"ओय भावा तू येड की खुळ आहे?मी नाही घालणार हात
....साप चावला तर तू आणणार का जीव माझा वापस😒"ती त्या ढोलीपाशी येऊन त्या माणसाला बोलते...

"त्यात नाही हात घातला ना ते तिकडे सिंह आहे त्यातून काढावी लागेल अंगठी" तो माणूस बोलतो...

"मी तुला गंमत सांगू का तो माणूस माझा कोणीच नाही आहे...😅त्यामुळे लग्नाचा प्रश्नच येत नाही..."ती हसतच बोलते तिचे बोलणे ऐकून जय तिला खाऊ का गिळू नजरेने बोलतो...

"ऐ धरा यांना आज यांना भाजून खाऊ...😡"तो माणूस चिडतच बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती घाबरते...

"नाही नाही मी खोटं बोलत होती...😓ही काय अंगठी काढली मी..."ती घाबरून पटकन ढोलीतून अंगठी काढून घेऊन त्यांना दाखवत बोलते...भीतीत माणूस काहीही करू शकतो...😂

"या मुलीच काहीच होऊ शकत नाही...🤦"जय कपाळावर हात मारून घेत बोलतो...ती अंगठी काढते आणि पटकन जयकडे जाऊन कसनुसपणे हसत सगळयांना पाहून घालते...जयला त्या लोकांनि आधीच एक अंगठी दिलेली असते...ती अंगठी जय हातात घेतो आणि पटकन तिच्या रिंग फिंगर मध्ये घालतो...

नंतर ती लोक जयला एका ठिकाणी घेऊन जातात... समोरच दृश्य पाहून जय शॉक होतो...कारण समोर एक माणूस एका माणसाच्या हातावर टॅटू काढत होता...ते पाहून तो शॉक झाला...

"आमच्यात लग्न करताना होणाऱ्या बायकोचे नाव नवऱ्याच्या हातावर कायमच कोरून ठेवण्याची पध्दत आहे त्यामुळे तुम्हाला हे लिहावे लागेल आणि नवरीने मानेवर लिहायची पध्दत आहे..."एक बाई जयला प्रेमाने समजावत बोलते...

"काहीही रीती असतात तुमच्या...इथे तीच प्रेमच माझ्यावर नाही आहे तर ती कसलं नाव लिहिलं माझ?आता ही drama करेल कुठचा तरी...काय माहित विधात्याने काय लिहल आहे माझ्या आयुष्यात...काकू ही पध्दत खऱ्या प्रेमी साठी आहे आम्ही ते नाही आहोत त्यामुळे प्लीज मला तुम्ही हे काय ते नका करायला सांगू..."जय त्या बाईला पाहून बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती बाई त्याला ते करू देत नाही...त्यातिल पुरुष जयला मस्त तयार करून त्यांच्या वेशभूषा मध्ये घेऊन येतात...भावना ला ते तसच घेऊन येतात...पण आधी जी बडबडणारी भावना होती...ती आता एकदम शांत झाली होती...जयला वाटलं लग्न पाहून ती तशी झाली म्हणून तो पण तिला काही बोलत नाही आणि सगळ्या लग्नाच्या त्यांच्या विधी पार पाडतात दोघेही...ती गपचूप पणे सगळं करत असते...शेवटी दोघे वनदेवतेचा आशीर्वाद घेतात...

वर्तमानकाळ:-

इकडे जयला काहीतरी आठवते...तस तो पटकन स्वतःचे डोळे खोलतो आणि भावनाकडे जातो...तो थोडस तिच्याजवळ झुकतो आणि अलगदपणे हळुच तिला कुठचाही त्रास न होता याची काळजी घेऊन तो तिची मान पाहतो...त्याला ज्याची भीती होती...तेच त्याला दिसलं...तिच्या मानेवर मृत्युंजय नावाचा टॅटू होता...ते पाहून त्याचे डोळे भरले...त्याने तेवढं सिरिअसली घेतलं नव्हतं पण तिने ती गोष्ट केली होती...त्याला ते पाहून कसतरी होत होते...खूप काही बोलायचं होत पण ती होतीच कुठे त्याच ऐकायला...नेहमी तिच्या बोलण्याला वैतागणारा तो आज फक्त तिच्या एका शब्दासाठी तरसत होता...सोबत असायची म्हणून त्याला तेवढं काही वाटायचं नाही पण आताच्या परिस्थितीमुळे तो हतबल झाला होता...एकदम डोकं सुन्न झाले होते त्याचे...स्वतःच मन खाली करायचे होते त्याला...खूप प्रश्न पडले होते त्याला पण विचारणार कोणाला ना तो?ती तर नव्हतीच त्याच उत्तर द्यायला...तो वेगळा जगात होता तर ती या सर्वांना अनुत्तरित करून त्यांच्या समोर प्रश्न ठेवून वेगळ्या जगात गेली होती...तिथे फक्त ती एकटीच होती...इथे तो मात्र सर्वांसोबत असून देखील सर्वांसोबत नसल्या सारखा होता...जिच्यात जीव होता ती नव्हती ना त्याच्यासोबत म्हणून अशी अवस्था होती त्याची...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
             ©®भावना सावंत(भूवि❤️)
*********************************

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Rajendra Raut

Rajendra Raut 4 months ago

Priya Gavali

Priya Gavali 4 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 4 months ago

टिना

टिना 4 months ago