तू अशीच जवळ रहावी... - 17 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 17

तू अशीच जवळ रहावी... - 17

मागील भागात:-मृत्युंजय आणि भावना त्यांच्या भूतकाळात जातात...भूतकाळात भावनाच्या आजी आणि काकीने कश्याप्रकारे तिच्या भावंडाला संपवले याचा खुलासा मृत्युंजय करतो...

आजच्या भागात:-

अहो...या लोकांनी माझ्या मुलांना मारलं...😭😭" भावनाची आई भावनाच्या बाबांना पाहून बोलते...तसे सगळयांची नजर त्यांच्यावर पडते...भावनाच्या बाबांना पाहून दोघी घाबरतात...

"शु$$$ ऐकलं मी सगळं सौ...जय भावनावर कधी प्रयत्न केला यांनी..."भावनाचे बाबा मन घट्ट करून विचारतात...

"तू बाळा आता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही का???"आजी...

"जय तू बोलतो का आता???"भावनाचे बाबा स्वतःच्या आईला इग्नोर करून बोलतात...

"हो...पप्पा तुम्हाला माहीत नसेल पण मला यांच सगळं माहीत आहे...भावनाला पण विष प्रयोग तिच्यावर झालेला हे पण माहीत आहे...पण तिच्यामुळे परिवार तुटू नये म्हणून ती गप्प बसली होती...हे सगळेजण एकदा काहीतरी कार्यक्रमासाठी तुमच्या घरी आले होते...तेव्हा भावनाने डान्सिंग क्लास जॉईन केले होते...त्याच वेळी या काकी आणि आजी भावनासोबत चांगल्या वागू लागल्या होत्या...भावना साधी असल्याने तिला यांचा खेळ कळला नाही...रोज भावनाला या दोघी पैकी एक डब्बा द्यायची... असाच यांनी नेहमीप्रमाणे डब्बा तिला दिला होता...तिने तो डब्बा डान्स कलासच्या ब्रेक मध्ये खाल्ला आणि अचानक तिला ठसका लागला...तिने नॉर्मलं असेल म्हणून लक्ष दिलं नाही...पण तिच्यासोबत असलेल्या प्रतीक्षाला तिच्या तोंडातून रक्त येताना दिसले...भावनाला तिने आणि चैतन्यने लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले...तेव्हा त्या सगळयांना कळलं की रोज तिच्यावर स्लो पॉइझन चा यूज्ड केला जात होता...त्या दोघांनी तेव्हाच मला सांगितले....त्यांनी त्या डब्ब्यातिल जेवणाला फॉरेनसिक लॅब मध्ये पाठवले... त्याचे रिपोर्ट कळल्यावर त्यांना समजलं की हे या दोघी करत होत्या...भावना तर सगळयांनी सुन्न झाली होती...तिला विश्वासच बसत नव्हता...पण तिने स्वतःला सांभाळून त्या दोघांना सांगितले की सगळं झालेलं गेलेलं विसरून जावा...आजी आणि काकी बद्दल कोणाला सांगू नका...घर तुटेल...तीच हे बोलणं मी कॉल वर ऐकले....म्हणून तेव्हापासून मी सगळयांवर लक्ष ठेवून आहे आणि यांचे गुन्हे शोधून काढले...😡आज अति प्रमाणात वाढलं यांचं म्हणून मी मध्ये पडलो बाबा..."जय रागात एवढं बोलून थांबतो... त्याच अस बोलणं ऐकून भावनाचे आई बाबा सुन्न होतात ...

"आजी काकी का अस वागलात तुम्ही..."भावना त्यांच्याजवळ येत बोलते...तिचा आवाज ऐकून जय तिच्याजवळ जातो...

"प्रिन्सेस तू जा झोपायला..."जय तिला समजावत बोलतो...कारण ती हळवी होती हे त्याला माहित होते...म्हणून तो तिला बोलतो...

"नाही....जय...."ती कसतरी बोलते...

"भावना आत जा...असल्या लोकांची सावली मला माझ्या मुलीवर पडू द्यायची नाही...😡जय घेऊन जा तिला..." भावनाचे बाबा उठून रागात बोलतात...बाबांचे असे बोलणे ऐकून ती घाबरते...आज पहिल्यांदा ती त्यांना रागात पाहत होती...जय तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो...तो तिला बेडवर बसवतो...

"प्रिन्सेस चला झोप तू...मी आहे ना सगळं सांभाळायला... त्यामुळे तू नको पडू बाहेर..."जय तिला समजावत बोलतो...

"जय मी वाईट आहे ना??म्हणून अस घडलं...मी नसते जन्माला आले तर अस काही घडलं नसत..."ती रडून त्याला बोलते...तिचे बोलणे ऐकून तो तिच्यासमोर बसतो...

"लँन्सी इकडे ये..."जय बाजूला उभ्या असलेल्या लँन्सीला बोलवत बोलतो...त्याच बोलणं ऐकून लँन्सी त्याच्या जवळ येते...

"भावना ही लँन्सी आहे...किती जणांच स्वप्न असत आपल्याकडे रोबो असावा अस...पण कोणीच ते पूर्ण करू शकत नाही...तू मात्र ते पाहिलं आणि पूर्ण केलं...कारण तुझं ज्ञान...नॉर्मली लोक विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा तू विचार करून सत्यात मांडते...काहीतरी कारणासाठी देव प्रत्येक माणसाला बनवत असतो... तुझ्याबाबतीत पण काहीतरी ठरवलं असेल त्याने...☺️तू कधीच वाईट नाही आहे उलट आवडती असशील...

आता तुझ्या लोकांनी लहान मुलांचा जीव घेतला हे तुला कळलं ना...?अस असताना पण तू त्यांना माफ करणार काय??"जय तिचा हात हातात घेत तिला लहान मुलांसारख समजावून सांगत असतो...ती त्याच बोलणं ऐकून नाही मध्ये मान हलवते...

"नाही करू शकत ना??मग सध्या माझ्यावर आणि बाबांवर विश्वास ठेव...आम्ही काहीच चुकीच करणार नाही...तू आता पूर्ण आराम करायचा कसलाही विचार न करता..."तो तिला बेडवर झोपवत बोलतो...

"पण खरंच काही होणार नाही ना मम्मी पप्पांना??"ती झोपत असताना त्याला विचारते...

"नाही होणार प्रिन्सेस...😊"जय हसून बोलून तिच्या अंगावर पांघरूण टाकतो...लँन्सीला डोळयांनीच तो तिच्याकडे लक्ष द्यायला सांगून बाहेर निघून जातो...

बाहेर येताच पोलिसांची लोक आजीला आणि काकीला घेऊन जाताना दिसतात...भावनाची आई मात्र रडतच रूममध्ये निघून जाते...भावनाचे बाबा मात्र तिथेच सोफ्यावर कपाळावर हात ठेवून बसलेले असतात...जय त्यांच्या जवळ जातो...थोडावेळ पूर्ण शांतता पसरलेली असते...

"जय माझ्यामुळे माझ्या मुलीने आणि बायकोने एवढं सगळं सहन केला ना?मी चांगला बाप आणि नवरा नाही बनू शकलो ना??"भावनाचे बाबा गाहिवरून बोलतात...

"बाबा काहीच तुमच्या मुळे घडलं नाही...तुम्ही भावना साठी आणि आईसाठी नेहमी बेस्ट होतात आणि नेहमी राहशाल..."जय...

"तू तिचा कोणीच नसताना एवढं सगळं पाहिलं...माझी मुलगी लकी आहे तू तिच्याजवळ आहे म्हणून..."भावनाचे बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात आणि तिथून निघून जातात...जय झाल्या प्रकारामुळे थोडासा बिथरला होता...पण योग्य वेळी योग्य प्रकार भावनाच्या परिवाराला कळला...या बद्दल त्याला समाधान वाटत होते...तो मनाशी काहीतरी ठरवून तिथून निघून जातो...

स्वतःचा परिवार असा वागू शकतो या गोष्टीवर भावनाच्या बाबांना विश्वास ठेवणे थोडे जड जात होतं होते...शेवटी पोलीस इन्व्हेस्टीगेशन मध्ये आजी काकीने कारनामे बाहेर आले...जयने सगळ्या प्रकारचे पुरावे देऊन सिद्ध केला... भावनाच्या आजीसोबतच भावनाच्या काकांना आणि त्यांच्या मुलांना सर्वांना योग्य तेज शिक्षा कायद्याने सुनावली...पूर्ण परिवार असा तुटल्याने भावनाला त्या गोष्ठीच दुःख होत होते...पण तिच्या बाबांनी त्यावेळी कडक भूमिका घेतल्याने ती गप्प झाली...त्यांनी वेळीच भावनाला सावरून घेतले...भावना आधीसारखे फ्री एकदम तिच्या भावासोबत वागायला लागली...त्याला तिने राखी देखील बांधली...जयने देखील तिला इंग्लंडला पाठवले नाही...सगळं चांगलं होत पण भावना अजूनही जयचा विचार करायला बघत नव्हती...तो मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा...ती मात्र यापासून दूर होती...काहीतरी कारण सांगून ती त्याच्यापासून दूर दूर जात होती...पण तो मात्र तिला सोडून कधीच जात नव्हता...

वर्तमानकाळ:-

एवढं सगळं आठवता आठवता इकडे भावना पटकन डोळे खोलते आणि जयकडे पाहते...ती पटकन भूतकाळातून बाहेर येते...

"जय म्हणजे तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून होतात काय???" ती उठून त्याला विचारते...तिच्या अश्या बोलण्याने तो गालात हसून एका हाताने तिला डोळे बंद करून जवळ घेतो...

"तुला काय वाटत हुं...???माझ्या प्रिन्सेसला मी एकट सोडू काय...??ते अजिबात शक्य नव्हतं हुं..."जय तिच डोकं स्वतःच्या छातीवर ठेवत...प्रेमाने तिला थोपटवत बोलतो...

"म्हणजे आतापर्यंत जेवढे जण प्रपोज करायचे नंतर त्यांची हालत खराब असायची...??त्यामागे पण तुम्हीच होतात ना??"ती सरळ होऊन त्याच्या डोळ्यात पाहून बोलते...तिच्या अश्या बोलण्याने तो डोळे खाली करतो...

"जय तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना तरीही ते तुम्हाला जमत नाही...कारण तुमचे डोळे मला सगळं सांगतात..."ती त्याच्याकडे पाहून बोलते...

"सॉरी प्रिन्सेस पण मला भीती वाटायची ना म्हणून अस करायचो..."तो तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत धरून बोलतो...

"ओह मिस्टर मृत्युंजय सरदेशमुख ला पण भीती वाटणारी गोष्ट आहे तर या जगात...हा हा...सिरिअसली..."ती हसून त्याला बोलते...

"हो मला वाटते भीती तुला गमावण्याची...तुझ्यापासून दूर होण्याची...तू सोडून जाशील याची..."तो सिरिअस होत रागात बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून ती गप्प बसते...

"सॉरी मला अस नाही म्हणायच होत..."ती कसतरी त्याला बोलते...

"तुला माहीत नसेल पण आज सांगतो मी,खूप प्रेम करतो तुझ्यावर...सगळ्यात जास्त आहे...माझ्या आयुष्यातिल सगळ्यात सुंदर स्वप्न आहे तू...तुला जपण्यासाठी मी सगळं करत होतो आजवर सगळं...तुला माहीत नाही पण तू हॉस्पिटलमध्ये असताना कधी कधी मला माझा श्वास बंद पडत आहे अस व्हायचे...तुला काही झालं असत ना मी देखील नाही..."तो गाहिवरून बोलत असतो की ती घाबरून त्याच्या तोंडावर हात ठेवते...

"नका ना बोलू जय...प्लीज..."ती डोळ्यांत पाणी ठेवून त्याला बोलते...तिच्या डोळ्यांत पाणी पाहून तो पटकन तिला स्वतःच्या मिठीत घेतो आणि कुरवाळत राहतो...

"मी बोललं तर तुला दुःख होते आणि तू तर करून दाखवत होती...हे अंगावर टॅटू काढला तो पण नाही कधी दाखवला...किती त्रास झाला असेल ना त्यावेळी तुला..."तो तिच्या मानेवर हात फिरवून बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून तिला कसतरी वाटत...ती त्याला आज पहिल्यांदा एवढं रेस्टलेस झालेलं पाहत होती...एरव्ही तो तिच्यासमोर व्यक्त होत नसायचा...पण आज सगळं मनातलं तो तिला बोलून दाखवत होता...त्याला अस पाहून तिलाच वाईट वाटलं...

"जय सॉरी ना...मी कधीच तुम्हाला दूर नाही करणार कधी..."ती एवढंच बोलून त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ टेकवते...डोळ्यांत पाणी ठेवून ती त्याच्या चेहऱ्यावर किस करत असते...तिला अस करताना पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी येते...याच गोष्ठी साठी त्यांना किती काय सोसल होत याचा विचार देखील तिने केला नव्हता...आज  तो शांत होऊन तिचा स्पर्श अनुभवत होता...ती हळूहळू त्याच्या मानेकडे जाऊन तिथे स्वतःचे ओठ जरा जास्त प्रेस करते...तिच्या अश्या करण्याने त्याच्या अंगावर गोड शहारा येतो...तो हळूच तिला स्वतःच्या अंगावर घेऊन तिच्या बाजूला हातांचा विळखा घट्ट करतो...

"जय नाही हा...तुम्ही मला त्रास देतात...😣काल पण तेच केलं..."ती त्याला स्वतःच्या ओठांकडे पाहताना पाहून बोलते...तीच बोलणं ऐकून तो गालात हसतो...

"ओ मिसेस मृत्युंजयला आम्ही त्रास देतो...चला आजचा दिवस तुम्ही हा त्रास झेला...कारण तुम्ही पण आम्हाला तेवढाच देतात..."तो अस म्हणून स्वतःचा चेहरा तिच्याजवळ नेतो...ती मानेन नाही म्हणत असते...पण मनात वेगळच चालू होते...ती लाजून त्याला मिठी मारते...

"नको ना जय अस करू...हे जे काही आहे अंगावर ते निघत नाही...बाहेर पण मी तुमच्यामुळे जाऊ शकत नाही..."ती लहानमुलीसारखं त्याला बोलते...जयला तिच्या क्युटपणा वर भरपूर हसू येत...तो हसून तिला बाजूला करतो...

"ओके नाही करत...पण तू आता झोपायच...काल तुला त्रास झाला असेल म्हणून झोप हा..."तो प्रेमाने तिला बोलतो...

"तुम्हाला राग नाही आला ना??"ती...

"हेय मला नाही राग आला...माझी प्रिन्सेस तेवढी प्रिपेर्ड नाही आहे...हे मला कळत शोना...जास्त आपण नाही ना त्रास देऊ शकत..."तो तिला समजावत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून तिचा त्याच्या बद्दलचा आदर कितीतरी पटीने वाढतो...ती हसून त्याच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवते आणि बेडवर जाऊन पडते...जय तिला प्रेमाने थोपटवत असतो...

"जय आपण मस्त लवकरच एका प्रिन्सेसला आणि प्रिन्सला जन्म देऊया...मला ते दोघ तुमच्यासारखे हवे आहेत...😚एकदम स्मार्ट आणि डॅशिंग..."ती खुश होत त्याचा हात पकडून बोलते...पण तिचे असे बोलणे ऐकून तो गप्पच बसतो...

"भावना गपचूप पणे झोपून जा...आणखीन काही वर्षे तर मला मुलाचा प्लॅन नाही जमणार...त्याबद्दल सॉरी..."तो कडक शब्दात बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून तिला जबरदस्त शॉक बसतो...

"जय काय बोलताय तुम्ही??आपलं लग्न झालं आहे ना मग??"ती...

"लग्न झालं म्हणजे लगेच मुलांचा विचार करायचा का आपण आता??पुढची लाईफ आहे आपल्याकडे जगायला...त्यामुळे प्लीज हा विषय पुन्हा नको आहे मला..."तो कसतरीच तिला बोलून मोकळा होतो...

"जय काही प्रॉब्लेम आहे माझ्यात तर तुम्ही मला सांगू शकतात..."ती हळवी होऊन बोलते...

"शु$$$ काही प्रॉब्लेम नाही आहे तुझ्यात...फिजिकली तू या गोष्ठीसाठी तेवढी तयार नाही आहे प्रिन्सेस...तुझ्या काळजीने मी बोललो ना तुला??"तो तिला जवळ घेत बोलतो...

"सॉरी प्रिन्सेस मला माफ कर...आपल्या बाळाचा जन्म व्हायच्या आधी मला सगळ साफ करायचं आहे...माझ्या बाळांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून मला अस करावे लागत आहे..."तो गहिवरून मनात बोलतो...तो कसतरी तिला समजावून झोपी घालतो आणि तसाच काम करत लॅपटॉप घेऊन तिच्या बाजूला बसतो...तो झालेला प्रकाराचा विचार करत असतो...तेवढ्यात अलेक्झांडरचा त्याला कॉल येतो...तो कॉलवर बोलुन कॉल कट करतो...काहीतरी ठरवून तो लॅपटॉप तसाच ठेवून खाली निघून जातो...

"बोल काय झालं ते???"मृत्युंजय खाली येता येता विचारतो...

"बॉस प्रेम सर आले आहेत..."अलेक्झांडर...

"प्रेम तो का आला आहे आता??"मृत्युंजय...

"बॉस त्यांना भेटायच आहे तुम्हाला...पाठवू काय??" अलेक्झांडर थोडस घाबरत बोलतो...

"हम्म...पाठव त्याला..."तो बोलतो...तसा एक उंच असा गोरा पान हॅन्डसम असा माणूस त्याच्यासमोर येऊन उभा राहतो...

"हेय भाई सॉरी...बट तुला एक गोष्ट दाखवायची आहे मला...म्हणून मी इथे आलो..."तो थोडस घाबरून बोलतो...

"कोणती गोष्ट??"मृत्युंजय डोक्यावर आठ्या पाडून बोलतो...

"मोक्षिता..."प्रेम आवाज देत बोलतो...त्याचा आवाज ऐकून एक मॉडेल अशी मुलगी येऊन त्याच्याजवळ उभी राहते...तिला आलेलं पाहून जय शॉक होतो...

"तू...😱तू झोपली होती ना...???"जय विचारतो...

"दादा तू पण शॉक झाला ना हिला पाहून??पण ही तुझी प्रिन्सेस नाही आहे...तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी आहे...माझ्या वहिनीसारखे गुण तर नाही आहे हिच्यात पण ऑफिसर आहे..."प्रेम...

"व्हॉट??? ऑफिसर??अरे ही सेम माझ्या प्रिन्सेस सारखी आहे...फक्त थोडासा चेंज आहे..."मृत्युंजय शॉक होत बोलतो...

"हो दादा म्हणून तर बोललो ना मी...ही मोक्षिता रुहानी...आपल्याला यांची भरपूर मदत होणार आहे...आपल्या कामासाठी..."प्रेम...

"मदतची गरज घेता येईल...पण एक सांगेन भावनाची जागा कधीच घेण्याचा प्रयत्न करू नका...काय आहे ना तुम्ही सेम जरी असलात तरीही भावनाच्या चेहऱ्यावरची एक ना एक गोष्ट मला माहित आहे...ज्या बहुतेक तिला देखील माहीत नसतील..."मृत्युंजय तिच्याकडे पाहून बोलतो..

"हम्म सॉरी सर...पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका...भावना मॅडमना मी काहीच होऊ देणार नाही..."ती...

"ओके विश्वास ठेवत आहे...प्रेम आणखीन काही माहिती मिळाली तर मला कळव...ह्यांना देखील घेऊन जा इथून...मी सांगेल तेव्हा यांना घेऊन ये..."मृत्युंजय अस बोलून तिथून निघून जातो...तो गेल्यावर दोघेही सुटकेचा श्वास घेतात...

"भावना मॅडम कश्या सांभाळतात प्रेम सर यांना???" मोक्षिता जयला गेलेलं पाहून बोलते...

"काय आहे ना ती माझी वहिनी आहे आणि त्याला कस हँडल करायचे ते तिला बरोबर कळत...दोघेही खूप प्रेम करतात एकमेकांवर..."प्रेम बोलतो...

"दिसतं ते पण कोण आहे जे भावना मॅडमच्या मागे लागलं आहे???का त्यांना त्या हव्या आहेत??मॅडम आहेत कोण नक्की की माफिया पासून सगळे गुंड त्यांच्या मागे लागले आहेत??"ती...

"हम्म ती खूप मोठी स्टोरी आहे...आमच्या वहिनीसाहेबांची मेन्टली बुद्धी जरा जास्त असल्याने सगळे त्यांच्या मागे लागले आहे...माफिया वगैरे का लागले याची माहिती तुम्ही काढा..."तो गुढपणे हसून तिला बोलतो...

"सध्या आपण इथून जाऊ या का सर??"ती घर पाहून बोलते...

"हो चला...☺️"प्रेम अस बोलून तिला तिथून घेऊन जातो...

इकडे जय रूममध्ये येऊन कोणाला तरी कॉल करतो...काहीतरी गुढपणे बोलून तो कॉल कट करतो...

"हा खेळ जरीही तुम्ही मांडला असला तरीही या खेळाचा बादशहा मी आहे...हा खेळ खेळण्यात मला मज्जा येईल...जर याचा परिणाम माझ्या बायकोवर झाला ना त्याचा सर्वनाश केला जाईल...मृत्युंजय सरदेशमुख बॅक टू  इंग्लंड..."तो गुढपणे हसून स्वतःशीच बोलतो...तो तसाच जाऊन भावनाच्या बाजूला बसतो...

"मला माफ कर काही गोष्टी मी तुला नाही सांगू शकत ना प्रिन्सेस त्याबद्दल खरंच सॉरी..."तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलतो...थोडस खाली झुकून तो तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...त्याची काम झाल्यावर तो तिला जवळ घेऊन झोपी जातो...तिला जवळ घेताच त्याला चांगली झोप लागते...एकदम शांतपणे ते दोघे एकमेकांच्या कुशीत झोपून जातात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

टिना

टिना 3 months ago

uttam parit

uttam parit 3 months ago

Rajendra Raut

Rajendra Raut 3 months ago