आध्या बाहेर येऊन डायनिंग टेबलवर आई च्या बाजूला जाऊन बसते....
कल्पना " आध्या मगाशी जे आजीला बोललीस ते चुकीचं होत बाळा त्या मोठ्या आहेत तुझ्यापेक्षा , त्या कितीही काहीही बोलू दे आपण जास्त लक्ष नाही द्यायचं..."
आध्या " आई प्लीज मला यावर काही बोलायचं नाही आहे , त्या तुझ्याबद्दल काय काय बोलत होत्या मी अस गप्प बसू का... बाबांना तरी माहीत आहे का याबद्दल , आजींनी तर बाबांना प्रेमाने बोलून बोलून आपल्यात तिरस्कार निर्माण केले आहेत... बाबांसमोर तर ती लाडीगोडी लावत असते आणि पाठीमागून तर हे अस , आजी वागते ते किती चुकीचं आहे हे नाही समजत का आजीला..."
कल्पना " बाळा अस समजावून काही होणार आहे का , मी पण तर किती समजावत असते त्या ऐकतात का मग.... त्या जेव्हा एकटे पडतील ना तेव्हा सगळ समजेल बघ त्यांना तेही योग्य वेळी समजल..."
आध्या हसत " हो आई समजल थँक्यू , आई मी मगाशी तुला जे काही बोलले त्यासाठी खूप सॉरी... "
कल्पना " सॉरी मला नको आजीला जाऊन बोल...."
आध्या " हो..."
कल्पना तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत " शहाणं माझं बाळ ते , चल आता जेऊन घे...."
कल्पना तिला जेवण वाढून देते...
जेवता जेवता ती कल्पना ला हॉस्पिटल मधल्या आजीबद्दल सांगते त्यांनी काय काय बोललं तेही सगळ सांगते....
त्या दोघी जेवून आपल्या रूम मध्ये जायला निघतात...
निघत असताना आध्या मध्येच कल्पना ला थांबवत...
आध्या " आई..."
कल्पना " हा बोल बाळा..."
आध्या " मला फोन देशील का त्या आजींना फोन करायचा आहे..."
कल्पना " अभ्यास तुझा..."
आध्या " झाला ग पूर्ण अभ्यास..."
कल्पना " ठीक आहे ( तिला फोन देत ) घे , पण जास्त वेळ नको बोलूस हा..."
आध्या " हो समजल मला..."
फोन घेऊन ती आपल्या रूम मध्ये जाते आणि कल्पना आपल्या रूम मध्ये...
आध्या रूम मध्ये आल्या आल्या त्या आजींना फोन करते , दोन तीन रिंग ने फोन उचलला जातो....
पलीकडची व्यक्ती " हॅलो , कोण ?...."
आध्या " आजी मी आध्या ओळखलं का मला..."
आजी " आध्या बाळा तू ओळखलं ओळखलं माझ्या नातीला कस विसरू मी...."
आध्या " हो ते तर आहे... आजी काका कसे आहेत आता शुद्धीवर आलेत का ते..."
आजी " काका बरे आहे , थोड्यावेळापूर्वीच आले शुद्धीवर..."
आध्या " हो... आजी मला खूप आठवण येत होती तुमची म्हणून फोन केला तुम्हाला..."
आजी " आपण आताच आजच भेटलो ना मग..."
आध्या " हो... आज माहिती काय झाल मी आणि आई घरी आल्यावर.... ( आध्या आणि कल्पना घरी आल्यावर काय काय झालं होत ते सगळ त्या आजीला सांगते...)... मला माहिती आहे मी उद्धटपणे बोलून चुकीचं वागले , पण आजी काय काय बोलत होती आईला नको ते मग सहन नाही झाल रागात काहीही बोलत गेले..."
आजी " बाळा आपण रागात काहीही बोलतो समोरच्याला ,आपल्यालाच समजत नाही... शांत होतो तेव्हा समजत की आपण काय काय बोलून गेलं ते , म्हणून रागावर संयम ठेवून परिस्थितीशी सामना करावा... अश्या माणसांना अस रागात बोलून , त्यांना समजावून ते नाही समजणार राग काढला तरी त्यांना काही वाटणार नाही म्हणून ते एकटे पडतील ना तेव्हा त्यांना सगळ समजेल फक्त योग्य वेळ आल्यावरच समजल..."
आध्या " आई पण असच बोलली मला आणि माफी मागायला सांगितली...."
आजी " हो... आपण चूक केली आहे ना मग माफी तर मागावी च लागेल नाही तर असच आयुष्यभर त्रास होईल..."
आध्या " हो आजी मी माफी मागते त्यांची..."
आजी " हो , पण वेळ नको लावू...."
आध्या " हो आजी...."
आजी " मग जेवली का माझी नात ?...."
आध्या " हो आजी जेवले मी... तुम्ही जेवलात का आणि काक ?...."
आजी " हो , जेवून झालेलं आमचं आता झोपला आहे तो , मग तुझा फोन आला...."
आध्या " हो... आजी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं ?...."
आजी " नाही बाळा तुला माझी आठवण आली की कधीही फोन करू शकते...."
दोघी बोलत असताना कल्पना आवाज देते " आध्या बाळा झाल का तुझ बोलून...."
आध्या " हो... आजी चला मी ठेवते फोन आई बोलवत आहे मला...."
आजी " हो चल आणि काळजी घे..."
आध्या " हो आजी आणि तुम्ही पण काळजी घ्या , काकाची पण...एक मिनिट तुमचं नाव काय ? ते मला नंबर सेव करायचा आहे...."
आजी " हो...माझं नाव सुशीला वाघमारे आहे..."
बोलून झाल्यावर आध्या फोन ठेवते.... आणि त्यांचं नाव सेव करते....
आध्या दार उघडत कल्पना ला फोन देत " थँक्यू आई , आजी सोबत बोलून छान वाटत आहे आता..."
कल्पना " हो , आता गप्प झोप उद्या लवकर उठायचं आहे ना , मी हॉस्पिटल ला जात आहे बाबांकडे तिथे पाहिजे ना कोणी तरी..."
आध्या " हो... आणि कल्पेश कुठे आहे..."
कल्पना " कल्पेश तो आत्या सोबत घरी आला आहे , आत्या गेलेली बाबांना भेटायला मग कल्पेश ला पण घेऊन आल्या त्या सोबत..."
आध्या " अच्छा आजी सोबत त्यांचं शेपूट पण आल आहे का..."
कल्पना तिला डोळे मोठे करून " आध्या..."
आध्या " सॉरी सॉरी झोपते मी शुभ रात्री..."
कल्पना " हो... शुभ रात्री..."
बोलून त्या दोघी झोपायला निघून जातात....
पण आध्या ला माहीत नव्हत कोणी तरी आजीसोबत तिचं बोलणं ऐकलं होतं आणि फोटो पण काढला होता हसून बोलण्याचा....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....