पल्लवी च घर...
पल्लवी च नुकतच अभ्यास झाला होता , ती आपल्या रूम मध्ये बसून आध्या ने लिहिलेलं पत्र वाचत होती...
प्रिय पल्लवी उर्फ माझी पल्ली ,
आता पल्ली म्हणले तर रागावू नको , तुझ खूप प्रेम आहे ना माझ्यावर मग ज्याच्यावर प्रेम असत त्यांच्यावर रागवायच नाही ( अस लिहिलेले बघून पल्लवी च्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं ती स्वतःशी " नौटंकी बट स्वीट ") बाकी हे बुक पत्र लिहण्याची आयडिया छान आहे , मग आमच्या पल्ली राणीची प्रगती झाली म्हणायची आमच्या सोबत राहून राहून ( पल्लवी " वेडी...") तर मी एवढच लिहेन की मला फक्त बाबांना गैरसमजातून काढायचं आहे... त्यांना आजी आणि आत्या चा स्वभाव कसा आहे ते दाखवायचं आहे त्याच बरोबर आजी , आत्याला च्या हे वाईट विचारांना दूर करायचं आहे ... मला माहिती आहे की हे इतकं सोपं नाही , त्यांना सुधरवन जमेल की नाही ते पण नाही नाही माहिती पण प्रयत्न करून बघू एकदा तरी काही फरक पडत नसेल तर आई आणि सुशीला म्हणतात वेळेवर सोडून देऊ कारण खरी वेळ आल्यावर त्यांना त्यांची चूक समजते , तसचं करू मग.... आणि थँक्यू माझ्या मनातल ओळखल्याबद्दल आई नंतर तूच आहेस जी मला एक मैत्रिणीच्या रूपात एक काळजी करणारी बहीण भेटली मला , राग आला असेल पल्ली ला मी थँक्यू बोलले ते हो ना अस रागावू नये माहिती ना प्रेम करणाऱ्या वर रागवू नये ( पल्लवी रडता रडता च हसली...)...
लव्ह यू पल्ली आणि खूप खूप मिस यू....
तुझीच जान
आध्या
आध्या च पत्र वाचून तिला खूप रडू येत...
पल्लवी स्वतःशीच बोलत " आध्या माझी जान कशी सहन करतेस ग एवढ मोठ संकट आता तर पाचवीत आहेस तुझ्या मनमोकळ्या बालपण जगण्याच्या वयात एवढ मोठ दुःख समोर आले... खरच तू माझी बहिण पाहिजे होतीस माझ्यासारखी तू पण खूप खुश असती , इतका स्वार्थीपणा नको जे आहे त्यातच खुश राहायचं असे बाबा , आई बोलतात... तू माझी सख्खी बहीण नसली तर काय झालं एका मैत्रिणीच्या रूपात बहीण च आहेस... तू काहीही कर मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे , कधीच दूर नाही करणार जिथे तू जाशील तिथे मी येणार भलेही काहीही होऊ दे... मला तुझ्यासारखी बहीण नाही गमवायची...."
पल्लवी स्वतःशी बोलत असताना तिच्या रूम मध्ये कोणी तरी येत " आणि आम्ही पण आहोत..."
त्यांच्या आवाजाने पल्लवी भानावर आली आणि लगेच डोळे पुसत " बाबा , आई तुम्ही..."
पल्लवी ची आई " हो आम्ही , का नाही येऊ शकत का इथे..."
पल्लवी " अस नाही आई तुम्ही कधीही येऊ शकता..."
बाबा तिच्या बाजूला बसत " हम , मग काय म्हणते आपली आध्या..."
पल्लवी त्यांना सगळ सांगते बुक पत्र बद्दल पण....
( पल्लवी श्रीमंत असली तरी तिला श्रीमंतीचा कोणताच गर्व नव्हता.... पल्लवी ची आई सुलोचना मोरे गृहिणी , बाबा आनंद मोरे ते एक सच्चे ऑफिसर होते... त्यांना अन्याय सहन नाही व्हायचा आरोपीला योग्य ती शिक्षा द्यायचे... त्यांनी कधीही पल्लवी ला बंधन लादली न नव्हती मुक्तपणे जगू देत होते , कारण त्यांना विश्वास होता की पल्लवी अस चुकीची काम करणार नाही.... पल्लवी ची जेव्हा आध्या शी ओळख झाली तेव्हा पासून ती तिच्याबद्दल भरभरून बोलत असायची , नकळत आध्या ने न भेटताच त्यांच्या मनात एक घर केलं होत... त्यांना तिच्यावर इतका विश्वास बसला होता की आध्या ला भेटण्याची ओढ लागली होती त्यांनी तिला आपल्या पल्लवी सारखच एक आपली मुलगी म्हणून मानल होत , पण प्रत्येक वेळी काहीना काही काम असल्यामुळे त्यांना भेटता येत नव्हत.... पल्लवी ने आपल्या आई बाबांना तिची परिस्थिती सांगितली होती , लहानपणीच मोठ संकट तिच्यावर आल होत त्यामुळे त्यांना खूपच वाईट वाटत होत... तस पल्लवी तिच्या बरोबर काय काय झालं ते सगळ आई बाबांना शेअर करायची काहीच लपवायची नाही तिचे आई बाबा तिच्यासाठी एक बेस्ट फ्रेंड म्हणून राहायचे म्हणून सांगताना पण तिला काही वाटायचं नाही.... ")
आनंद ( पल्लवी चे बाबा ) " अरे आमची पल्ली हुशार झाली , बुक पत्र वैगरे हा... आध्या चे गुण तुझ्यात आले वाटत..."
पल्लवी " काहीही काय बाबा आध्या पण अशीच बोलत होती , म्हणजे मी आधी हुशार नव्हते का..."
सुलोचना ( पल्लवी ची आई ) " मग काय अजुन झोपली होतीस का , आता डोळे उघडत आहे...."
पल्लवी " आई तू पण..."
आनंद " अग मस्करी करत होतो , तू तर हुशार च आहे आणि सोबत एक चांगली मैत्रीण , मुलगी..."
सुलोचना " हो बरोबर..."
आनंद " आध्या च्या बाबांची कठोर शिक्षा ऐकुन तर अंगावरच काटा आला अस कोण वागत का आपल्या पोटच्या मुलीसोबत , मी त्यांना तर याही पेक्षा कठोर शिक्षा दिली असती पण पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही... आणि आध्या पण आपल्या बाबांविषयी काही बोलणार नाही.... तिला त्यांच्यात असलेला गैरसमज दूर करायचा आहे ना मग मी आणि आई आहे तुमच्या सोबत काही मदत लागली तर सांगा.... हो पण अस काही करू नका जेणेकरून चांगलं व्हायच्या ऐवजी आणखी वाईट होईल...."
पल्लवी " हो बाबा याची काळजी घेऊ आम्ही..."
आनंद " हो... "
सुलोचना " चला आता जेवायला खूप वेळ झाला आहे..."
आनंद " हो चला..."
आनंद आणि सुलोचना बाहेर निघून जातात...
पल्लवी ती बुक आपल्या बॅग मध्ये ठेऊन देते...
जाता जाता तिला आठवत पल्लवी स्वतःशी " अरे मी अस कस विसरू शकते सुशीला आजींना फोन करायचा आहे ते... जेवून झाल्यावर करते नंतर आता...."
थोड्यावेळाने जेऊन झाल्यावर...
पल्लवी आनंद ना " बाबा एक फोन करायचा होता सुशीला आजी ना घेऊ का फोन..."
आनंद " हो घे पण लवकर झोप उद्या जायचं आहे शाळेत..."
पल्लवी " हो..."
पल्लवी फोन घेऊन आपल्या रूम मध्ये जाते आणि सुशीला आजी ना कॉल करते....
त्यांना आध्या च्या शिक्षेबद्दल ते बुक पत्र पर्यंत सगळ सांगते आणि आध्या ला भेटायचं आहे ते पण सांगते....
सुशीला आजी तिला उद्याच जिथे पल्लवी ने शाळेच्या मागच्या बाजूला जी भेटण्याची जागा ठरवली होती तिथेच त्या भेटायला सांगतात....
दुसऱ्या दिवशी सकाळी शिवचे घर....
शिव शाळेत जातच असतो की सुशीला आजी त्याला अडवत " अरे शिव मला आज माझ्या नातीला भेटायच आहे तर तू येशील माझ्यासोबत..."
शिव " नाती कोण ?...."
सुशीला आजी " आहे ते मी तिला भेटून झाल्यावर सांगेन , सध्या माझ्या सोबत ये आता...."
शिव " चालेल पण कुठे भेटायच आहे..."
सुशीला आजी " मी येतेय तुझ्या शाळेत मग जाऊ आपण..."
शिव " ठीक आहे चालेल..."
शिव आई , बाबा आणि आजी , आजोबांना बाय बोलून निघून जातो....
आध्या च्या घरी...
आध्या आणि कल्पेश च आध्या च्या रूम मध्ये भांडण चालू होत...
कल्पेश " हे जास्त शहाणपणा नको करू समजल आणि हो एवढ मोठ बनून समजवण्याची गरज नाही मी काय करतो काय नाही याचं तुझ्याशी काही देणं घेणं नाही...."
आध्या " कल्पेश जास्त बोलतोय हा तू , तुझ बाबांना नाव सांगणार आहे...."
कल्पेश " जा सांग हिम्मत तरी आहे का , ते तर तुझ्या एका शब्दावर पण विश्वास नाही ठेवत...आली मोठी बाबांना नाव सांगणारी...."
रागात आध्या त्याच्यावर हात उचलणार होती पण त्याला मारण्यासाठी उचललेला हात पटकन खाली केला....
तेवढ्यात या दोघांचा भांडणाचा आवाज ऐकुन घरातले सगळे रूम मध्ये आले....
विश्वास रागात " काय चालू आहे हे...."
कल्पेश रेडवेला चेहऱ्याने नाटकी आवाजात त्यांच्या कडे जात " बाबा हिने मला मारल..."
विश्वास आणखी रागात येऊन " तुला समजत नाही का तो छोटा आहे त्याला समजावून सांगण्याऐवजी त्याला मारल , तुला थोडी तरी अक्कल आहे का.... "
कल्पना " अहो , चूक कल्पेश ची आहे , तिने..."
विश्वास कल्पना ला मध्येच अडवत " आता तू तिची बाजू घे प्रत्येक चुकीला माफ करत रहा आणि ही अशीच बिघडत राहील...( आध्या ला ) तू तुला शाळेत नाही जायचं आहे की आज दांडी मारणार आहेस आणि माझे पैसे वाया घालवणार आहेस..."
आध्या स्वताला सावरून " ह... हो...जाते..."
आध्या जातच होती की विश्वास तिला मध्येच थांबवून " शिक्षा विसरली का..."
आध्या मागे " न... नाही..."
विश्वास कडक आवाजात " चल " बोलून पुढे निघून गेले त्यांच्या पाठोपाठ आध्या पण निघून गेली.....
दुपारी शाळेच्या मागच्या बाजूला....
पल्लवी " मी सुशीला आजी ला फोन करून बोलावलं आहे येतील त्या आता..."
आध्या निर्विकार पणे " हो...."
पल्लवी काही बोलणार त्या अगोदर पाठून आवाज आला....
" आध्या बाळा "
आध्या त्या व्यक्तीला बघून पळतच जाऊन त्यांना घट्ट मीठी मारते " आजी..."
आजी सोबत आलेली व्यक्ती आध्या ला बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात....
क्रमशः
©® भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....