Love is your new color... 35 ( Final ) in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... 35 ( अंतिम )

प्रेमा तुझा रंग नवा... 35 ( अंतिम )

पार्थ " निख्या शांत हो आधी यांना अरेस्ट तरी करू दे मग यांची चांगलीच चौकशी करेन हा.. तू नको काळजी करुस... आ..."

पार्थ पुढे काही बोलणार सोहम मध्येच " अरे इतक का कष्ट घेत आहात सांगतो ना मी कसा वाचलो ते..."

सोहम ने बोलायला सुरुवात केली...

पुढे....

सोहम " तुम्ही ( पार्थ कडे बघून...) मारल तेव्हा मी मेलो असच समजून सोडून दिल होत पण मी ते नाटक केल होत मेल्याच म्हणजे तुम्ही मला मेलेल समजून सोडून द्याल आणि झालही तसच... नंतर मला लपून च काम कराव लागल... "

विजय " मग मला समजल की तू जिवंत आहेस तर मी तुला मारण्याचा प्लॅन केला... पण तू तर..."

सोहम " हो तेव्हाही मी वाचलो.... मला माहित नव्हत की मला मारणारा तू आहेस , नाही तर तुला तडफवून मारल असत... आता समोर आहेस तर हा चान्स मी नाही सोडणार , ज्याने मला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला त्याला मी सोडत नाही..."

विजय क्रूर हसत " तुम्ही वाचाल तेव्हा ना...."

विजय च अस न घाबरण बघून रक्षित रागात " हे जास्त माज नाही दाखवायचा समजल...."

विजय पुढे काही बोलणार निखिल मध्येच विजय ला " तुम्हाला या तिघांशी देणघेण होत तर माझ्या डॅडना हानी का पोहोचवली...."

विजय " मला या विश्वनाथ विरूद्ध चे पुरावे पाहिजे होते , ते देत नव्हते तर मला तस कराव लागल...."

निखिल " व्हॉट डॅड कडे पुरावे..."

विजय काही बोलणार तर त्यांना कोणाचातरी आवाज ऐकू येतो " मी सांगतो कसले पुरावे..."

सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने जातात तस निखिल " डॅड तुम्ही इथे..."

सारंग " हो मी इथे... मी पाणी घ्यायला खाली येताना तुला घाईत बाहेर जाताना बघितल मग मीही तुझ्या मागून आलो...."

निखिल " डॅड तुम्ही का इथे आलात..."

सारंग " एका डॅड ची काळजी म्हणून..."

निखिल पुढे बोलणार तर सारंग त्याला गप्प राहण्याचा इशारा करत " हा तर कुठे होतो आपण पुरावा ना... ते मला आरोही चे वडील वासुदेव यांनी माझ्या कडे दिलेले..."

तस आरोही आणि निखिल ला मोठा धक्का बसला ते डोळे मोठे करून वासुदेव आणि सारंग कडे बघू लागले...

नंतर निखिल भानावर येत " म्हणजे तुम्ही दोघ... तुम्हा दोघांना माहीत होत.."

वासुदेव " हो मी आणि तुझे वडील कॉलेज पासून चे मित्र आहोत... माझ्या कडे या विश्वनाथ विरूद्ध व्हिडिओ होता त्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझे वडील मला भेटायला आले तेव्हाच मी सारंग ला सगळ सांगितल आणि त्यालाच हा पुरावा अश्या ठिकाणी लपवून ठेवायला सांगितल जेणेकरून कोणाला सापडणार नाही... आणि आतापर्यंत कोणाला समजल नाही की पुरावे सारंग कडे आहेत..."

सारंग " माझ्यावर झालेल्या हमल्याच बोलशील तर ते खर होत पण यांना माहीत नव्हत की ते पुरावे माझ्या कडे आहे... मला माहित सुद्धा नव्हत की आरोही वासुदेव ची मुलगी आहे ते , जेव्हा तू तिच्याबद्दल बोलला तेव्हा खूप आनंद झालेला... मला आरोही आपल्या घरची सून झालेली आवडेल....दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लपवून ठेवल कारण माझ्याकडे पुरावे आहेत ही गोष्ट कोणाला कळू द्यायची नव्हती , जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा अनोळखी म्हणूनच बोलायचो..."

सारंग ने आपली सून म्हटल्यावर आरोही च्या गालावर लाली पसरलेली....

या सगळ्यांना अस बोलताना बघून सोहम ओरडत " हे तुमचा ड्रामा ना वरती जाऊन दाखवा समजल... इथे गप्पांची मैफिल चालू आहे का... सगळ्यांनी एका साईड ला उभ रहा नाही तर ( आरोही ला आणखी घट्ट पकडून...) हीच काही खर..."

वासुदेव " हे सोड तिला नाहीतर तुझ्या वडिलांच काही खर नाही समजल..."

विजय " त्यांना मी मरणार आहे ( पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत...) सोडा मला माझा बदला घ्यायचा आहे...."

पार्थ " हे शांत बसा... ( विजय कडे बघत..) तुम्ही आहात तरी कोण आणि या तिघांचा तुमच्याशी काय संबंध... आणि इतका कसला राग की तुम्ही असे विचित्र मर्डर केलेत... ( पार्थ ते काही बोलत नाही म्हणून जोरात ओरडत..) बोला पटकन..."

शेवटी विजय ने सगळ्यांकडे बघत बोलायला सुरुवात केली " मी विश्वास शिंदे यांचा लहान भाऊ आहे.. ( विजय ने आपली ओळख करून दिली तसे वासुदेव आणि सारंग त्याच्या कडे बघू लागले..) मी आऊट ऑफ इंडिया होतो म्हणून कोणाला माहीत नाही की मी त्यांचा भाऊ आहे आणि मीच दादाला सांगितल की माझी ओळख ही रहस्य राहू दे त्यामुळे कोणाला काही माहीत नाही माझ्याबद्दल... जेव्हा दादा , वहिनी आणि त्यांचा मुलांचा मृत्यू च्या दिवशी मी इंडिया मध्ये आलो होतो.. मी कोणाला काही सांगितल नव्हत कारण मला दादाला सरप्राइज द्यायच होत पण मलाच सरप्राइज भेटल , तेव्हा खूप तुटलो मी.. मला जिवापेक्षा जपणारा माझा दादा खांदा सोडून गेला होता.. दोन दिवस मी मेंटली डिस्टर्ब झालो होतो , नंतर मला पोलिसांकडून समजल की दादाच्या मृत्यूच्या मागे कोणाचा तरी हात आहे , पण कोण आहे ते माहीत नव्हते... पोलिसांनी यामागे कोण आहे शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा हाती काही लागले नाही ही केस एक वर्ष चालू होती... नंतर पोलिसांनी काही सापडत नाही म्हणून ती केस क्लोज करून टाकली , त्यांनी केस बंद केली म्हणून मला खूप राग आला होता , मी त्यांना जाब विचारायला गेलो तर तिथे जाऊन मला समजल की कोणीतरी ही केस बंद करण्यासाठी पैश्याची आमिष दिलेली , मग समजल की या पोलिसांची मदत घेऊन काही अर्थ नाही.. तेव्हा मी निश्चय केला की जे काही करायच आहे ते मला करायच दादाच्या खुनी ला शिक्षा देऊनच राहीन... नंतर मी शोध घ्यायला सुरुवात केली , सहा महिन्यात मला त्या खुनी बद्दल त्याच्या बद्दल सगळी माहिती भेटली... तो खुनी विश्वनाथ राव होता , मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विश्वनाथ च्या माणसांना भेटत होतो , त्यांच्याकडून विश्वनाथ बद्दल काही सापडल नाही मग मी त्यांना मारून टाकत होतो म्हणजे यांच्या मेल्याची बातमी ऐकून विश्वनाथ राव समोर येथील.. पण तस काही झाल नाही , मी हार नाही मानली उलट त्यांच्याबद्दल चा राग अजुन वाढत होता... नंतर एक दिवस माझ्या माणसांकडून समजल की विश्वनाथ राव आता कुठे असेल त्या अगोदर मला गीता चा बंदोबस्त करायचा होता ते करून मी विश्वनाथ आणि त्यांच्या मुलांना कायमच संपवणार होतो... पण तुम्ही मध्येच आलात... ( विजय विश्वनाथ , रक्षित आणि सोहम कडे रागाने बघत..) काहीही होऊ दे मी या तिघांना संपवून च राहणार.. ( विजय पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत...) सोडा मला यांना मी जिवंत नाही सोडणार..."

पार्थ " तुम्ही अस करून कायदा हातात घेतला आहे , तुम्हाला माहीत नाही का फाशी होऊ शकते तुम्हाला काही झाल तर तुमच्या मुलाच काय.. जे काही शिक्षा द्यायची ते कोर्ट देणार यांना..."

पार्थ ने त्यांच्या मुलाच विषय काढताच विजय शांत होतात..
मग अचानक एक मोठा आवाज येतो " आ..."

सगळे त्या आवाजाच्या दिशेने बघतात तर विश्वनाथ रावांच्या छातीत गोळी लागली होती आणि ती गोळी विजय ने मारली होती.. हे इतक अचानक झाल की कोणाला काही समजल नाही , विश्वनाथ रक्षित आणि सोहम वर गोळी मारणार त्या अगोदरच पार्थ ने विजयच्या ज्या हातात बंदूक होती हात वर केला आणि त्यांच्या हातातून लगेच ती बंदूक काढून घेतली..

पार्थ आपल्या टीमला ऑर्डर देत " घेऊन जा यांना..."

पार्थ ने ऑर्डर दील्याबरोबर त्याच्या टीम ने त्या तिघांना पकडुन पोलिस व्हॅन मध्ये बसवल आणि तिथून निघून गेले...

विश्वनाथ रावांचा छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला... रक्षित , सोहम आणि विजय ला जेलमध्ये टाकण्यात आल.. या तिघांना जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली.. रक्षित , सोहम आणि विश्वनाथ राव या तिघांचा जिथे जिथे काळा बाजार सुरू होता त्या जागेवर आग लावण्यात आली....

फायनली निखिल आणि आरोही चे रस्ते मोकळे झाले होते...

सहा महिन्यानंतर...

निखिल न सांगताच अचानक कुठे तरी निघून गेला होता या गोष्टीला दोन महिने होऊन गेले होते... आरोही तो कॉल , मेसेज करेल म्हणून वाट बघत बसली होती तरी त्याचा कॉल , मेसेज नाही आला...
आरोही ने कॉल करून बघितल तर त्याचा फोन च बंद येत होता , ती दोन दोन दिवसांनी फोन करत होती पण फोन बंद.. निखिल च वागण बघून तिची चिडचिड होत होती , तिला भीती पण वाटत होती त्याला काही झाल तर नसेल.. निखिल शी कस कॉन्टॅक्ट होईल याचा प्रयत्न करत होती पण काही होत नव्हत...

दोन तीन दिवसांनी तिला समजल की निखिल एक दिवस अगोदर च घरी आला आहे त्यामुळे तिला खूप राग येत होता...

आरोही रागात आपल्या बेडरूम मध्ये निघून जाते.. ती दरवाजा उघडून लगेच आत येते तर समोरचा नजारा बघतच राहते...

समोर वेगवेगळ्या रंगीबेरंगी रिबीन ने पूर्ण बेडरूम सजवल होत.. पायाखाली वेगवगळ्या फुलांनी आणि रिबीन पसरवलेल्या होत्या.. बेडवर एक छोट्याशा कपड्यावर दिसेल अस जांभळ्या आणि रेड कलरच्या धाग्यांनी सॉरी अस शिवल होत आणि सॉरी च्या खाली बाजूला पिवळ्या धाग्याने स्माईल सारख शिवल होत.... तिला लगेच समजल की हे सगळ निखिल ने केल आहे...

हे सगळ बघून नकळतपने आरोही च्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरले आणि निखिल वर असलेला राग क्षणात निघून गेला.. आरोही सगळ बारकाईने बघत असताना अचानक तिच लक्ष बेडच्या एका कोपऱ्यात गेल तिथे एक बॉक्स होता.. आरोही ने पटकन जाऊन बॉक्स घेत बघितल तर बॉक्स च्या वर एक छोटीशी चिठ्ठी चीटकवलेली..

आरोही ती चिठ्ठी वाचते..
" टेरेस पे आपका इंतजार रहेगा "

वाचून झाल्यावर आरोही तो बॉक्स उघडून बघते.. त्यात निळ्या रंगाची बारीक मोर नक्षीकाम केलेली कॉटन ची साडी होती... आरोही ने त्या साडीला मनभरून बघून झाल्यावर चेंज करायला निघून गेली...




थोड्यावेळाने आरोही साडी सांभाळत टेरेस वर आली आणि बघते तर तिथे खूप अंधार होता.. तिने एक पाऊल पुढे टाकले तस सगळ्या लाईट चालू झाल्या...

आरोही ने सगळीकडे निरखून बघितल टेरेस ची अशी सजावट केली होती की कोणी बघितल तर तो बघतच राहील... तिने चहूबाजूंनी नजर फिरवून तिची नजर समोर गेली , समोर एक गोलाकार टेबल होत टेबलाच्या समोरासमोर दोन खुर्च्या आणि टेबलावर मधोमध कँडल्स ठेवलेले , त्या कॅंडल्स च्या दोन्ही बाजूला फ्रेम होते आणि त्या फ्रेम मध्ये काही तरी होत....
ते बघण्यासाठी आरोही त्या टेबलाजवळ गेली तिने बघितल तर तिचा चेहरा आश्चर्य चकित झाला त्यासोबत तिच्या ओठांवर मिलियन डॉलर वाली स्माईल आली...

त्या फ्रेम मध्ये एक त्यात मावेल असा चौकोनी कपडा होता त्यावर धाग्यांनी कविता लिहिली होती (म्हणजेच शिवली होती....) ही आठवण आयुष्यभर राहील म्हणून निखिल ने अशी फ्रेम बनवली होती...

पहिल्या फ्रेम मध्ये निळ्या धाग्याने :

" तुझ माझ्यावरच प्रेम म्हणजे
गवत पात्यावर फुललेल्या
मोहक फुलासारखं
मोराच्या पिसाऱ्यावरील
वेधक मोरपंखी डोळ्यांसारख
समुद्रातील पेसाळलेल्या
उधाण लाटेंसारखं
क्षितीजावरील उगवलेल्या सूर्याच्या
विखुरलेल्या उन्हासारख
माळेवर चांदण्याची
लयलूट करणाऱ्या चंद्रासारख "

आय लव्ह यू आरोही माय लाईफ


( कविता गूगल बाबाच्या कृपेने भेटली 🤭 )


दुसऱ्या फ्रेम मध्ये ब्राऊन धाग्याने :

" प्रिये ,
माझा प्राण नाही पण
आत्मा तू आहेस
माझा श्वास तूच आहेस
आता माझ्या जगण्याची आस तूच आहेस

जग किती सुंदर आहे बघ
माझ्या मिठीत येऊन
डोळे लाऊन भिजून जा
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात

कितीही झाल तरी प्रिये
तू माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तूच आहेस "

विल यू मेरी मी

निखिलच वेगळ्या प्रकारे केलेल प्रपोजल बघून आरोही ला भरून आल....

आरोही ने समोर उभ्या असलेल्या निखिल ला बघितल तर त्याचे डोळे प्रेमाने भरलेले होते , त्याच्या डोळ्यात तिच्याप्रती अखंड प्रेम दिसत होत.... निखिल ला एकदा मनभरून बघितल्यावर ती पटकन पळत जाऊन त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या कानाजवळ ओठ नेत हळू आवाजात त्याला " आय लव्ह यू निखिल , मला आयुष्यभर तुझी सौभाग्यवती बनून राहायला आवडेल...."

आरोही च उत्तर ऐकताच निखिल मिठी घट्ट करत " आय लव्ह यू टू माय हार्ट..."

थोड्या वेळाने ते दोघ एकमेकांचा सहवास घेत तसेच उभे होते..

निखिल ने मिठी सोडवत आरोही च्या कपाळावर किस करून बाजूला होत आपला उजवा हात तिच्या समोर धरत " कॅन यू डान्स विथ मी "

आरोही त्याच्या हातात आपला हात देत " येस "

निखिल आणि आरोही एकमेकांच्या डोळ्यात हरवून डान्स करत होते...

बॅक ग्राउंड ला म्युझिक चालू होत , दोघ त्या गाण्याला फील करत एकमेकांच्या सहवासात बुडालेले...

ये राते ये मौसम नदी का किनारा
ये चंचल हवा
कहा दो दिलो ने की मिलकर
कभी हम ना होंगे जुदा
ये राते ये मौसम नदी का किनारा
ये चंचल हवा

डान्स करत दोघ बोलत होते..

आरोही " आता समजल दोन महिने कुठे गायब होता ते... आणि फोन पण स्विच ऑफ करून ठेवल.."

निखिल " हो... तुझ्यासाठी काही तरी स्पेशल करायच होत अस की कोणी विचारही केला नसेल , तर त्यासाठी इतका वेळ लागला सॉरी पुन्हा एकदा.."

आरोही " इट्स ओके... मला खूप भीती वाटली तुमच काहीच काँटेक्ट नव्हत , मी वेडी झालेली तुमच्याशी बोलायला प्रयत्न केलेले पण काहीच झाल नाही..."

निखिल " समजल तरी तू किती प्रेम करतेस ते माझ्यावर.."

निखिल च्या बोलण्यावर आरोही ने त्याच्या छातीत चेहरा लपवला...

डान्स झाल्यावर दोघांनी डिनर केल , मग तिथेच बसत दोघ गप्पांच्या मैफिलीत भविष्याची स्वप्न रंगवत होते....




_समाप्त_

©® भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी...
बहुत मिस करेंगे आरोही और निखिल को...

💖 Stay Happy 💖
💖 Take care 💖