Sobati - 6 in Marathi Moral Stories by Saroj Gawande books and stories PDF | सोबती - भाग 6

सोबती - भाग 6

भाग ६


"आधी तू तर हो म्हण..घरचे होतील ग..तुम्हा दोघांमध्ये नाव ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला.." शील्पा म्हणाली.. बाॅस ऑफिसमध्ये आले तसे त्यांनी बोलणे थांबविले..आणि कामाला लागल्या..रीया तीचं काम करत होती पण शील्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत होती...


आता पुढे...


दोन दिवस असेच निघून गेले... दिवसभर कामात जायचा..रात्री विचार करुन करुन डोकं दुखायचे पण तीचा निर्णय होत नव्हता..शील्पा ने तरीही तीची बरीच मदत केली होती..तुषार तसा योग्यच मुलगा होता... आईबाबांनाही वाटायचं तीला सोबत हवी कुणाचीतरी..आता तर तीलाही वाटायचं..एकटं आयुष्य जगायचा तीलाही कंटाळा आलाच होता...त्यात संध्याकाळी मॅसेज यायचे तुषार चे निर्णय झाला का म्हणून विचारायचा..


आज रविवार...सुटी होती.. रीया आज ब-याच उशीरा उठली..पिहुल अजुनही झोपलेलाच होता..तीने उठून स्वतःच आवरलं..नाश्ता तयार केला..पिहुल ला उठविले..त्याच आवरुन दिले..दोघांनी नाश्ता केला..


"पिल्लू आज आपण फिरायला जातोय.." रीया पिहुल ला जवळ घेत म्हणाली..


"खरचं मम्मा.." डोळे मोठे करत आनंदाने म्हणाला..


"हो अगदी खरं.." रीया त्याला टाळी देत म्हणाली..


"पण कुठे जायचं.."


"तू सांग तूला कुठे जायचं आहे.." रीया म्हणाली


"ऊ..ऊ..मला नाही सुचत आहे तूच ठरव.." पिहुल विचार करत म्हणाला..


"आवर मग तूझ्यासाठी सरप्राइज पण आहे..आणि हो तूषार अंकल येत आहेत आपल्या सोबत.." रीया


"वाॅव मम्मा मला खुप आवडतात तूषार अंकल..थॅंक तु मम्मा.." तो रीया च्या गालाची पप्पी घेत म्हणाला..रीयाने त्याच्या गालावर ओठ टेकवले..


थोड्याच वेळात रीया आणि पिहुल तयार झाले..तीने तूषार ला काॅल केला..तोही वेळेत पोहोचणार होता..घराला लाॅक करुन ती बाहेर पडली..ऑटो करुन एका बिचवर आले..पिहुल तर बिच बघून उड्याच मारायला लागला..त्याला आनंदी बघून रीया ची कळी खुलली...तुषार आधीच येऊन तीची वाट बघत होता...पिहुल तो दिसताच धावतच तुषार कडे गेला..तुषार ने त्याला कडेवर उचलून गेले..रीया ही त्या दोघांजवळ आली..


"अंकल आपण तिकडे जाऊ ना.." पिहुल लाटांकडे बोट दाखवत म्हणाला..


"तिकडे जायचं आहे.." तुषार म्हणाला..


"हो मला भिजायचं आहे ही मम्मा मला कधीच जाऊ देत नाही.." पिहुल नाक फुगवून म्हणाला..


"चल मी नेतो..चल रीया.." तुषार म्हणाला..


"अरे पण कशाला दुरुन बघू देत त्याला..तो हट्ट करतो पुढे जायचा.." रीया म्हणाली..


"रीया मी आहे ना बघतो त्याला.." तुषार म्हणाला..रीया ही आता रीलाॅक्स झाली..पिहुल लाटांच पाणी अंगावर घेत मस्ती करत होता..तूषार त्याचा हात पकडून त्याच्याशी खेळत होता...रीया मात्र थोडं दूर उभी राहून त्या दोघांना बघत होती..लाट जवळ आली की तीचा जीव घाबरायचा..पण तुषार घट्ट पकडून ठेवायचा तूषार ला..किती वेळ दोघं त्या बिचवर मस्ती करत होते..ते दोघं आता रीयाजवळ आले..पिहुल ने तीला ओढतच खेळायला आणले..तीही आता मस्ती करत होती..मनमोकळ हसत होती..तूषार तीच्याकडे एकटक बघत राहिला..' प्रत्येकामध्ये बालपण लपलेलं असतं...पण आपण समजूतदारीचा बुरखा पांघरून अलगद त्याला लपवून ठेवत असतो..' असंच काही रीयाच झालं होतं.. जबाबदारीच ओझं घेऊन जगत होती ती.. स्वतःच्या भावना मनाच्या एका कोपऱ्यात बंद करुन ठेवलेल्या..त्या भावना बाहेर येण्यासाठी तीला गरज होती सोबतीची..


"अंकल तू पण ये ना .." पिहुल ने हाक मारली तेव्हा तो भानावर आला..तोही आता त्यांच्यासोबत खेळत होता ..तीघेही एकमेकांवर पाणी उडवत होते...बराच वेळ त्यांचा खेळ चाललेला..


"पिहुल तूला भूक लागली असेल ना.." तूषार म्हणाला..


"हु..मला भूक लागली..मम्मा चल ना मला खायला दे.." पिहुल रीया ला म्हणाला


"चला आपण पेट पुजा करुया ..." तूषार पिहुलचां हात धरुन म्हणाला... रीयाही त्यांच्या मागे गेली.


"काय खाणार.." तूषार पिहुल ला म्हणाला..


"पावभाजी.." पिहुल


"रीया तू.."


"मलाही पावभाजी चालेल.." रीया..तीघे तीथल्या टेबलवर बसले पावभाजीचा ऑर्डर दिला.. थोड्यावेळाने पावभाजी आली ..पोटभर खाऊन परत बाहेर आले..रीया आता थकली होती..


"ये आता बसुया शांत मस्ती नाही करायची.." रीया म्हणाली..


"काय गं मम्मा ..मी अंकलसोबत खेळणार.." पिहुल तुषार चां हात धरुन म्हणाला..


"मी बसते ..थकले मी आता.." रीया खाली वाळूत बसत म्हणाली..जवळच पिहुल मस्ती करत होता..आणि तूषार त्याच्यासोबत खेळत त्याला सांभाळत होता..रीया दुरुनच हे सर्व बघत होती..तूषार पिहुल ला सांभाळून घेतो हे बघून तीला समाधान वाटत होते..आपण योग्य तोच निर्णय घेत आहोत याची खात्री होत होती...


"पिहुल मी आता थकलोय तू खेळ मी जरा बसतो.." तूषार त्याला रेतीचा किल्ला करायला सांगून म्हणाला...


"ठिक आहे अंकल मी हा किल्ला बनवतो तोपर्यंत तु रेस्ट कर.." तो खेळतच बोलत होता..तूषार रीया जवळ येऊन बसला...दोघेही तो किल्ला बनवताना बघत होते..आणि हसतही होते..पिहुल मात्र अगदी मन लावून आपलं काम करत बसलेला...


"फार छान वाटत ना याला असं खेळताना बघून.." तूषार रीया कडे बघत म्हणाला...


"हु..घरी याला असं मोकळं नाही खेळता येत .. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना किती आनंद होतो.. त्यांचं बालपण खुलून येतं ना.." तूषार म्हणाला..


"हो फार आनंदात आहे आज...तू काय ठरवलस रीया..लग्न करतेस ना माझ्याशी.." तूषार तीच्याकडे बघत म्हणाला..


"तूषार आज एक दिवस ठिक आहे रे..पण नेहमीसाठी पिहूलची जबाबदारी घ्यायला जमेल का तूला.." रीया म्हणाली..


"काय कठिण आहे त्यात सांग ना..तूला नाही वाटत आहे का मी घेऊ शकणार म्हणून..आणि तो छोटा आहे तो लगेच एक्सेप्ट करेल मला बाबा म्हणून.."


"आणि तूझ्या घरचे..?"


"मी आहे ना करतो त्यांना तयार..तू हवी आहेस मला..त्यासाठी एवढं मान्य करतीलच ते.." तूषार म्हणाला..


"खरं बोलतोस तू.." रीया म्हणाली..


"मी खरच बोलतोय..पण तूझा निर्णय काय झाला ते सांग.." तूषार म्हणाला..


"तयार आहे मी तूझ्याशी लग्नाला.." रीया त्याच्या हातात हात गुंफून म्हणाली..


"ओ..थॅंक यू डिअर..तो तीच्या खांद्यावर हात ठेवून तीला जवळ घेत म्हणाला..


"अरे अरे..बघतात ना सगळे असं काय करतोस.." रीया म्हणाली..


"काय करतोय फक्त खांद्यावर तर हात ठेवलाय..रीया तूला मनापासून आवडतो ना मी.." तूषार म्हणाला..


"हो रे मनापासून आवडतोस.." रीया


"मला वाटतं होते तूला मी आवडतो..पण दूर का पळायचीस तू ..फोनवर पण जेवढ्यास तेवढंच बोलायची.." तूषार म्हणाला..


"कारण तू गुंतत चाललास माझ्यात हे लक्षात येतं होतं..मलाही नव्हतं गुंतायच तूझ्यात.." रीया म्हणाली..


"का..?" तूषार


"सोड ते..आता पुढे कसं करणार आहेस..माझ्याही आईवडीलांना तयार करावं लागेल..बाबांपेक्षा दादाची भीती जास्त वाटते.." रीया म्हणाली..


"तू घरी सांग स्थळ आहे बघायला येणार आहे..बाकी मी आलो की सांभाळतो सगळं..शेवटी त्यांनाही आपल्या मुलीला सूखीच बघायचं आहे की नाही.." तूषार म्हणाला..


"हो..कधीचेच लागले माझ्यामागे लग्न कर म्हणून..पण तूझी गोष्ट वेगळी आहे म्हणून जरा टेन्शन आलय.." रीया म्हणाली


"वेगळी बिगळी काही नाही..तूलाच वाटतं असं .." तूषार म्हणाला..


"आणि पिहुल त्याला काय सांगायचं..?" रीया म्हणाली..


"त्याला सांगुया ना दोघं मिळून..खरंतर आता त्याला खरच गरज आहे वडिलांची.. " तूषार म्हणाला..


"मी काहीच कमी करत नाही त्याला..पण असं बाहेर फिरायला आणण तेवढंच नाही जमत.. एकतर माझं रुटिन..आणि हा मस्ती करतो म्हणून भीती वाटते मला.. जवळ कुठेतरी नेते..तरीही एवढ्यात असं वाटतं त्याला त्याच्या पप्पाच नसणं जाणवतं.." रीयाच्या डोळ्यात बोलताना पाणी आले..


"साहजिक आहे, जाणवणारचं.. मुलांना शाळेत सोडायला,घ्यायला, फिरायला नेणारे पप्पाचं असतात..त्याच्या वयाची मूल बघतो ना तो पप्पासोबत फिरताना..पण काही बोलून नाही दाखवत ना तो.." तूषार म्हणाला..


"बोलून नाही दाखवत पण रुसतो हल्ली..त्याच्या वयाची मूल पप्पासोबत दिसली कि एकसारखा बघत राहतो..त्यालाही वाटतं असेल आपले लाड करुन घ्यावेसे.." रीया पिहुलकडे बघत बोलत होती..


"आज तर नाही बघतांना दिसला मला..बघं आजुबाजुला किती मूल आहेत त्याच्या पप्पा सोबत.." तूषार म्हणाला..


"आज तू आहेस ना त्याच्यासोबत..कसा निर्धास्त होवून खेळतोय तो बघ ना.." रीया तूषारच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली..


"त्याला पप्पांची कमतरता नाही जाणवू देणार मी..विश्वास ठेव माझ्यावर.."


"या विश्वासावर तर मी लग्नाला तयार झाले .." रीया


"हेऽऽऽय..अंकल झाला माझा किल्ला तयार.." पिहुल ओरडत म्हणाला.. तो तूषार जवळ आला आणि त्याला खेचत घेवून गेला..


"अंकल बघं ना कसा झालायं माझा किल्ला छान दिसतो ना.." तो उड्या मारत म्हणाला..


"हो फारच सुंदर बनवलास.." तो त्याला उचलून घेत म्हणाला.."बघू काय काय केलं.." ..तो त्याला खाली ठेवून किल्ला कसा बनवला ते बघू लागला..रीयाही आली..तीने पिहुलला जवळ घेतले..


"छान बनवलाय पिल्लू ..मला फार आवडला.."रीया म्हणाली.. तेवढ्या छोट्या बाळाला काय बनवता येणार होता.. वाळूचा ढिगारा जमा करुन उंच रचत बनवण्याचा प्रयत्न केला होता त्याने.. दोघांनी फार कौतुक केलं त्यामुळे त्याला अजुनच छान वाटतं होते..त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आज बघण्यासारखा होता...रीयाही आनंदात होती.. स्वप्न बघायला लागली होती भावी आयुष्याची...खरी होणार की नाही याची भीती अजुनही मनात होतीच..


"चल ना पिल्लू आता जायला हवं ना आपल्याला.." रीया म्हणाली..


"मम्मा थांब ना..थोडा वेळ खेळू दे मला ..हो ना रे अंकल.." पिहुल चेह-यावर क्युट एक्स्प्रेशन आणून म्हणाला...


"बरं पण थोडाच वेळ हा.." रीया डोळे मोठे करुन म्हणाली..


"हो गं मम्मा ..चल रे अंकल.." तो तूषार चां हात घरुन म्हणाला..तूषार ने पिहुल च्या हाती एक हात दिला दुसऱ्या हाताने रीयाला ये असा इशारा केला..तीही आता त्यांच्यासोबत खेळायला गेली..बाजूला एक खेळणी वाला उभा होता..त्याच्याकडून तूषार ने बाॅल विकत घेतला आणि तिघेही बाॅल खेळायला लागले..बराच वेळ गेला त्यांचा खेळण्यात..दुपार असल्याने तशीही बिचवर जास्त गर्दी नव्हती..दिवस थंडीचे असल्याने उन सुद्धा छान वाटतं होते..


"बसं ना पिहुल आता..?" तूषार म्हणाला..


"हो चल आता..मम्मा मला खेळणी पण पाहिजे.." तो इवलासा चेहरा करुन म्हणाला..


"हो खेळणी पण मिळणार आणि आपण जाताना पिझ्झा पण खाणार आहोत.." तूषार म्हणाला..


"तूषार कशाला उगाच..नको जास्त लाडावू त्याला.." रीया


"तू मध्ये नको पडू आमच्या..हो ना पिहुल बेटा.." तूषार म्हणाला..


"मम्मा खाऊया ना पिझ्झा.." पिहुल चेहरा बारीकसा करून म्हणाला...


"ओके..चल खाऊया.." रीया ..


तीघांनी तीथून परत जाताना पिहुल साठी खेळणी घेतली..रीया ने तूषार ने नको द्यायला म्हणून स्वतःच खेळण्याचे पैसे दिले..तरीही तूषार ने त्याला आणखी खेळणी घेवून दिली..तूषार च्या बाईकवर बसून तीघेजण जवळच्या एका कॅफे मध्ये गेले...तीथे त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला...मस्ती मजाक करत संपवला..तूषार या दोघांसोबत एन्जॉय करत होता..त्याला त्याची फॅमिली मिळाल्यासारखी वाटतं होती..पाच वाजत आले होते..आता रीया घरी जायला घाई करत होती...तूषार ने त्यांना टॅक्सीमध्ये बसवून दिले..आणि तो बाईक घेऊन घरी निघून गेला..


रीया आणि पिहुल घरी आले...तीने पिहुल ला आंघोळ घातली स्वतःही आंघोळ करुन..केस सुकवत बसली होती..पिहुल खेळणी बघत होता..काही खेळत होता..


"मम्मा तुषार अंकल छान आहे ना..मला फार आवडतो तो.." पिहुल म्हणाला..


"हु..आहे छान.." रीया म्हणाली..


"त्या आरुष च्या पप्पासारखा..त्याचे पप्पा पण असेच आहेत.." पिहुल बोलला..आणि रीया त्याच्याकडे बघतच राहिली.. कळतं नकळत पिहुल तूषार मध्ये वडिलांना शोधायला लागलेला..तूषार चां मॅसेज आला मी आलोय घरी तुम्ही पोहोचलात का..रीया ने हो म्हणून रिप्लाय केला..नकळतच ओठांवर गाण्यांच्या ओळी आल्या..


सूने सूने ख़्वाबों में

जब तक तुम ना आये थे

खुशिया थी सब औरों

की गम भी सारे पराये थे

अपने से भी छुपाई

थी धड़कन अपने सीने की

हमको जीना पड़ता था

ख्वाईश कब थी जीने की

अब्ब जो के तुमने हमे

जीना सिखा दिया हैं

चलो दुनिया नई बसायेंगे

बेताब दिल की तमन्ना यही है


पिहुल आज दमून लवकरच झोपी गेला..तो झोपल्यावर रात्री ती तूषार सोबत फोनवर बोलत होती..तीच्या आईवडीलांची परवानगी घ्यायची होती... त्यावरच दोघांची चर्चा चालली होती..रीया आधी त्यांना स्वतः सांगतो म्हणाली...तूषारचं त्यांच्या समोर असं अचानक जाण बरोबर दिसणार नाही..असं वाटतं होतं तीला..तूषारलाही रीयाच म्हणनं पटलं..


आज ऑफिस मधून आल्यावर तीच्या माहेरी जायचं असं ठरवलं..पिहुल ला सांगितले मामाकडे जायचे आहे..तो तर खुपचं खुश झाला...छोट्या बाळासोबत खेळायला जे मिळणार होतं ...तीने त्याच आवरुन त्याला स्कूल बस मध्ये बसवून दिले..घरी येऊन स्वतःची तयारी केली..तूषार ने सोबत येतेस का विचारले पण ही नाही म्हणाली..उगीच ऑफिसमध्ये चर्चा नको..ती रोजच्यासारखी बसने गेली.. आतमध्ये गेली तूषार तीचीच वाट बघत होता.. त्याच्याकडे लक्ष जाताच तीने स्माईल दिली..तीलाही त्याच असं बघण आता आवडायला लागलं होतं..तसं आधीही आवडत होतं पण आता हक्क वाटतं होता...


तीने आज थोडी लवकर सुटी घेतली..


"मम्मा आज तू लवकर आलीस.."


"हो पिल्लू आपल्याला जायच आहे ना बाळाकडे.."


"हो..मी तर तयार पण झालो बघं.." पिहुल म्हणाला..


"गुड बाय आहे माझा बच्चा.." रीया त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली..तीने पिहुल ला रेडी केलं आणि आईबाबांच्या घरी आली...


क्रमशः

©® सरोज गावंडे