आभा आणि रोहित..- ७

आभा आणि रोहित..- ७

 

शनिवार उजाडला. आभाला सकाळी लवकर जाग आली. ती गादीवर उठून बसली. खिडकीवरचा पडदा बाजूला सारला आणि तिने एक नजर बाहेर टाकली. सूर्य उगवत होता. अंधार नाहीसा होत होता. सुर्योदयाच दृश्य अतिशय सुंदर दिसत होत. ते दृश्य पाहून आभाला एकदम सकारात्मक वाटल. एक छोटस हसू तिच्या चेहऱ्यावर विसावल. तिच्या मनात विचार चक्र चालू झाल..आणि आभा स्वतःशीच बोलायला लागली.

 

"रीमा काकू ने रोहितच स्थळ आईला सांगितलं काय, मी रोहित ला भेटले काय आणि आता काहीतरी वाटतंय रोहित बद्दल.. त्याचे पैसे बघून नाही.. पण माणूस म्हणून रोहित खरच एक उत्तम व्यक्ती आहे. मला असाच जोडीदार हवा होता." हे विचार येत असतांना आभा गालातल्या गालात हसली..

 

"आता काय आभा तू रोहित च्या आई बाबांना भेटणार.. ओह नो! ऑकवर्ड होईल. पण मला एक कळत नाही.. आम्ही तसे साधे.. रोहित कडचे एकदम बडे.. तरी आम्ही भेटलो. म्हणजे लग्नाच्या गाठी खरच स्वर्गात जुळतात हे खर वाटायला लागलय हल्ली मला...म्हणजे अजून लग्न ठरलं नाहीये पण रोहित शी भेट हे काहीतरी अनपेक्षित होत माझ्यासाठी.. आयुष्याने इतका मोठा टर्न घेतलाय.. जो स्वप्नात सुद्धा वाटला नव्हता. कस आहे आयुष्य... कधी काय घडेल सांगता येत नाही." आभा विचार करत होती. पण सगळे विचार आभाने बाजूला झटकले,  "असो, आता उठते आवरते.. मग संध्याकाळी जायचं रोहितच्या घरी..."

 

इतका विचार करून आभा बेड वरून उठली. आणि आवरायला लागली.. आजचा दिवस तिच्यासाठी खास होता. आणि आभाचा मूड पण एकदम मस्त होता. तिला रोहित ला फोन करण्याचा मोह झाला पण तिने तो मोह आवरला. आणि आभाने सगळी काम उरकून घेतली. मग बाहेर जायला निघाली. आभाला बाहेर पडतांना पाहून तिची आई बोलायला लागली,

 

"कुठे दौरा आता आभा? सांगून जात जा.."

 


"इथेच जातीये आई.. रोहित च्या घरी जायचं आहे ना.. काहीतरी छोटी गिफ्ट आणते. तुला माहिती आहे, मी रिकाम्या हाताने कोणाच्या घरी जात नाही.."

 

"हो हो आभा माहिती आहे तुझी ही सवय... छानस गिफ्ट आण..."

 

"हो आई.. निघते आता.."

 

आभाची एक सवय होती की ती कधीही कोणाच्या घरी रिकाम्या हाताने जायची नाही. त्यामुळे ह्यावेळी सुद्धा तिने एक छोटीशी भेट आणली.. एक छानशी भेट म्हणून छोटी गणपतीची मूर्ती तिने आणली. आणि मग मी निवांत पुस्तक वाचत बसली...

 

पाहता पाहता ३ वाजले. आभा ने घड्याळ पाहिलं. ३ वाजलेत सुद्धा.. वेळ कसा पटापट जातो असा विचार करत ती बेड वरून उठली. तोंडावर पाणी मारलं. मग परत बेड वर बसली.. आणि विचार करायला लागली. आता कपडे ठरवू असा विचार करत तिने कपाट उघडल आणि ५-६ कपडे बेड वर काढले.. त्यातला एक एक कपडा अंगावर ठेऊन पाहत होती आणि नाक मुरडून बेड वर फेकत होती आभा... कितीतरी कपडे बघून आभाने बेड वर फेकले होते. तिची आई बाहेरून हा सगळा प्रकार पाहत होती. शेवटी तिला हसू आल आणि ती जोरात हसली. आभा ने आईच आवाज ऐकला आणि बोलायला लागली,

 

"आत ये ग आई.. बाहेरून माझी मजा नको पाहूस! आणि किती वेळ आहेस बाहेर उभी.. आत का नाही आलीस?"

 

"नाही नाही किती वेळ नाही.. आत्ताच आले... आणि मी बाहेरून मजा बघत नव्हते." आभाची आई परत हसली,

 

"हसून नकोस ग आई... इथे कपडे मिळत नाहीयेत.. आता शॉपिंग केली पाहिजे... ते करू पण आत्ता आई...मला जरा मदत कर.. रोहित च्या आई बाबांना भेटायला जायचं ना.. काय कपडे घालू कळत नाहीये..आता तर शॉपिंग ला जाता येणार नाही.. सो आहे त्यातले कपडे पाहते.."

 

"ते पहातीये मी...बराच वेळ तुझा गोंधळ चालूये..नेहमी जो मिळेल तो कपडा अंगावर चढवून बाहेर पडणारी तू...आज किती वेळ कपडे पहात बसली आहेस.. आणि शॉपिंग ला जाऊन हे तू म्हणती आहेस?" आभाची आई आश्यार्याने बोलले आणि आईला हसू आवरत नव्हत

 

"हसू नकोस न आई.. आधीच बर्डन आलाय... पहिल्यांदी भेटणार रोहित च्या आई बाबांना आणि कपड्यांवरूनच गोंधळ चालूये माझा.. आत्ता वाटतंय माझ्याकडे काहीच कपडे नाहीत.."

 

"कपडे नाईट की रोहित च्या घरी जातांना कपडे योग्य वाटत नाहीयेत?" आभाला चापटी मारत तिची तिची आई बोलली... "आणि बर्डन काय घ्यायचं आभा... रीमा काकू म्हणाली आहे ना...रोहित चे आई बाबा साधेच आहेत. श्रीमंत असले तरी उगाच गर्व नाही त्यांना आपल्या श्रीमंतीचा.. तू काहीही घाल.. त्यांना फक्त तुला भेटायचं आहे. काप्ध्यांवरून पारख करणारे नाहीत ते... आणि परवा बोलले तेव्हा सांगत होत्या रोहित च्या आई, रोहित खूप कौतुक करतो तुझ..आणि मी पण भेटले आहे की दोघांना.. एकदम मिळून मिसळून राहणारे आहेत दोघे.."

 

"अरे देवा.. रोहित ने माझ्याबद्दल काय काय सांगितलं आहे काय माहिती...आणि रोहित म्हणला होता.. जसा देश तसा वेश.. पण मी का कोणाला दाखवायला जगू?" आभा स्वतःशीच बोलली.."बर आई काय घालू सांग.. पिवळा पंजाबी ड्रेस?"

 

"हो हो... तो घाल.. छान दिसतेस तू त्या ड्रेस मध्ये. आणि गळ्यात काहीतरी घाल.. मोकळा गळा चांगला दिसत नाही.."

 

"ठीके आई.. आणि आहेच माझी चेन गळ्यात... बाकी काही नाही घालणार.. समारंभ थोडी आहे. आणि मी जशी आहे तशी भेटणार..मी आवरते आता. ५ला भेटायचं ठरलंय.."

 

"हो हो.. आवरून जा मस्त.. आणि तुला आवडतील दोघे.. आम्ही भेटलो होतो तेव्हा खूप छान बोलले.."

 

"हाहा... रोहित पण म्हणाला.. आवरते आणि निघेन जरा वेळात.."

 

आभा आवरायला लागली आणि आई बाहेर तिची काम करायला गेली. आभा ने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला... थोडा टच अप केला... केसांचा बॉ घातला पण आरश्यात न्याहाळल स्वतःला आणि केस मोकळे सोडले.. मस्त परफ्युम मारल आणि आरश्यात पाहिलं.. तिने ओढणी थोडी सावरली.. पण काहीतरी कमी वाटत होत. तिने पटकन एक टिकली लावली आणि परत स्वतःला आरश्यात पाहिलं. आभा छान दिसत होती. आरश्यात बघून तिने हास्य केल आणि पर्स उचलली. घडाळ्यात वेळ पहिले...आणि पर्स मधून तिच्या अॅकटीव्हा ची किल्ली काढायला लागली. तेव्हाच तिचा फोन वाजला.. तिच्या ओळखीची रिंग होती. आभा खुश झाली आणि तिने झटकन फोन उचलला,

 

"हाय.. आत्ता वेळ नाहीये. मी बाहेर निघते आहे आत्ता.. डोंट डिस्टर्ब प्लीझ.. मला महत्वाच्या लोकांना भेटायला जायचं आहे सो नंतर बोलू ह.." आभा गोड हसली,

 

"हो का.. बर बर! भेट ह महत्वाच्या लोकांना.. पण हे सांगायला फोन केलाय की तू गाडीवर येऊ नकोस..." रोहित बोलला. आणि आभा विचारात पडली, "मी बाहेर आलोय तुला घ्यायला...जास्ती विचार नको करूस.. आणि काढलेली किल्ली पर्स मध्ये ठेऊन दे.." आभाची उत्सुकता जास्ती न ताणत रोहित बोलला.

 

आभा विचारात पडली," तुला कस कळल की मी आत्ता किल्ली काढते आहे रोहित? ओह माय गॉड..मी घाबरले! आणि कशाला आलास घ्यायला? मी आले असते की."

 

"तू ये ग बाहेर.. मग बोलू.. मला ताटकळत ठेऊ नकोस!"

 

"हो आले.." इतक बोलून आभा धावत हॉल मध्ये आली आणि आईला हाक मारून बोलली, "जाते आई.. बाहेर रोहित आलंय मला न्यायला...तो थांबला आहे. सो मी निघते." पायात सॅडल घालत आभा बोलली..

 

"हळू जा.." आभाची आई बोलली पण ते ऐकायला आभा होती कुठे?.. आभा कधीच बाहेर गेली होती..

 

रोहित शिट्टी वाजवत गाडीत बसला होता. तितक्यात तिथे आभा आली. त्याने आभा कडे पाहिलं आणि तो बघतच राहिला. आभा आज एकदम वेगळी आणि अजूनच सुंदर दिसत होती. रोहित आभा ला पाहून तंद्रीत गेला.. गाडीच्या काचा बंद होत्या.. आभाने काचेला टक टक केल.. आणि तो भानावर आला... आणि स्वतःशीच बोलला,

 

"काय सुंदर दिसते आभा.." आणि गाडीच दार उघडल..आभा गाडीत बसली. आणि रोहितला म्हणाली,

 

"आत्ता काय बोललास?"

 

"तुला काही नाही म्हणालो.. निघायचं आता?"

 

"हो हो..." आभा हसली आणि रोहित ने गाडी चालू केली.

 

***

Rate & Review

Verified icon

Shashi 6 months ago

Verified icon

VaV 6 months ago

Verified icon

Prathamesh 6 months ago

Verified icon

Archana 6 months ago

Verified icon

Suvarna Kadam 6 months ago