इकडे निखिल तिला अस चिडलेल बघून हसू येत होत.... त्याला हायस वाटल की ती आता जॉब सोडून नाही जाणार ते... तोही रिलॅक्स होवून आपल काम करू लागला.....
पुढे....
आरोही रागातच काम करत होती... तिला निखिल चा खूपच राग आलेला , कारण त्याने अगोदर ओरडला आणि आता ती सोडून जात होती तर रिझाईन पेपर फाडला.... म्हणजे तिला कुठलाच चान्स उरला नव्हता त्याचा विरुद्ध....
थोड्यावेळाने ऑफिस सुटायचा टाईम झालेला.... आरोही अजूनही काम करत होती कारण खूप काम पेंडिग राहिली होती ती तेच पूर्ण करत होती , तेही पटापट..... कारण तिला लवकरात लवकर आश्रमात जायचं होतं पार्टी आहे ना म्हणून.... तिचं लक्षच नव्हतं आजूबाजूला की अर्धी लोक गेली आहेत ते पूर्ण लक्ष तिचं कामात गुंतल होत....
आरोही काम करत असताना तिथल्याच एका स्टाफ ने ऑफिस सुटल्याची तिला आठवण करून दिली..... तिने घड्याळात पाहिलं की ऑफिस सुटून अर्धा तास झाला होता.....
तिने राहिलेलं काम पटापट आवरून आपल सामान घेऊन ऑफिस मधून निघाली आणि रिया ला थोड लेट होईल असं कळवून , रिक्षा येण्याची वाट बघत उभी राहिली.....
ती रिक्षाची वाट बघत असताना अचानक एक कार तिच्या समोर येऊन उभी राहते... त्यामुळे आरोही दचकते आणि रागात समोर बघते.... समोर कोणाची कार आहे हे समजून तिला आणखी राग येतो पण तरी ती स्वताला शांत ठेवते.... आणि त्या कारला दुर्लक्ष करून पुढे निघून जाते.... तरी ती कार पुढे येवून परत तिच्यासमोर उभी राहते.... असं दोन ते तीन वेळा होतो....
तिच्या अश्या वागण्याने कार मधला माणूस वैतागून तिच्या समोर येतो.....
कार मधला माणूस " मिस आरोही तुमच्या समोर कार स्वतः उभी आहे ( म्हणजे कार मध्ये कोणी आत्मा आहे का जी स्वतः उभी राहील.... 😳 ) ती लिफ्ट देतेय तरी तुम्ही पुढे पुढे जात आहात....."
आरोही आपल हसू दाबत " म्हणजे कार औटोमेटिकली चालते का... की त्यात आत्मा वैगरे कोणी आहे.... 🙄🤔"
समोरील व्यक्ती विचित्र नजरेने तिच्याकडे बघत " व्हॉट.... तुम्ही ठीक आहात ना , कुठे डोक्यावर पडले नाही ना... "
आरोही " हे मी तुम्हाला विचारायला हवं... "
ती बोलते आणि इकडे समोरील व्यक्तीला लगेच समजत की तिने त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला आहे....
आणि तिच्या अश्या इंनोसेंट विचाराने त्याला खूप हसू येत होतं तरी त्याने मुश्किलीने रोखून ठेवले होते.... पण तो हसू जास्त वेळ रोखू शकला नाही.... आणि जोरजोरात हसायला लागला...
त्याला अस हसताना पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि विचित्र नजरेने त्याच्याकडे रोखून पाहत होती...
ती अशी बघतेय म्हणून त्याने तिला विचारल " काय बघतेय अशी ?.... "
आरोही " निखिल सर तुम्ही नक्की डोक्यावर पडून आला आहात का ? तब्येत तर ठीक आहे ना तुमची.... "
निखिल हसू रोखत " सिरिअसली मिस आरोही हे मी तुला विचारायला पाहिजे होत तुमची तब्येत ठीक आहे का.... गाडीत कोण आत्मा घुसत का , तू आत्मा या गोष्टीवर कधीपासून विश्वास ठेवायला लागली...."
आरोही कनसून हसत कारण तिला कळलं होत की आपण किती बेकार विचार केला होता....
ती त्याला इनोसेंट फेसने " ते मुव्ही मध्ये दाखवतात ना आत्मा कुठे पण घुसते... म्हणून मला वाटलं तस... "
निखिल " ओह्..... "
तिला तस बघून निखिल ला अजुन हसू येत होतं... तो आणखी हसू लागला मोठ्याने....
ती त्याला असं हसताना बघून तिला थोड गिल्टी वाटत होते.... तिने उदासपणे आपली मान खाली केली आणि घड्याळासोबत खेळत बसली.... अचानक तिचं लक्ष घडळ्यातल्या टायमिंग वर गेलं आणि टायमिंग बघून ती थोड ओरडून पण हळू आवाजात म्हणाली....
आरोही " ओह शीट.... हे बघा तुमच्यामुळे मला लेट होतोय , उगाच इकडे टाईमपास करत बसले... 😫😫"
निखिल " व्हॉट.... मी... टाईमपास 😳 तू करत होती की मी करत होतो.... "
अरोहीला अजुन टाईम वेस्ट करायचा नव्हता म्हणून ती आपणच बोलते " हो मीच करत होते टाईमपास झाल आता समाधान , जाऊ शकता तुम्ही आता.... "
निखिल " हा.... आता कसं सत्य बोललीस , आणि मी तुला लिफ्ट द्यायला आलो होतो.... मग मला जायला का सांगतेस घ्यायची नाही आहे का लिफ्ट तुला...."
आरोही " ( मनात : यांच्या सोबत जाणे म्हणजे डोकं खराब करणे होय.... ऑफिस मध्ये पण असच आणि आता इथे पण असच....😫😢 ). न.... नाही मी जाईल माझी मला नको लिफ्ट.... "
निखिल " अग पण रात्रीची अशी एकटी रिक्षाने वेळ बघ किती झालाय.... आय नौ की मी तुझा कोणी लागत नाही पण आपल बॉस आणि एम्प्लाॅयी च नात तर आहे.... ते म्हणतात ना प्रत्येक बॉस ला आपल्या एम्प्लाॅयी चे कर्तव्य असत.... मग मी तेच करतोय जर तुम्हाला माझ्याशी फ्रेंडशिप करावीशी वाटत असेल तर करू शकता.... "
आरोही " नको मला लिफ्ट... चला मी जाते रिक्षा आली.... "
निखिल काही बोलणार तर ती लगेच रिक्षात बसली आणि रिक्षावाल्याला निघायला सांगितलं....
तिने अस वागल्याने त्याला वाईट आणि थोडा राग आलेला...
आणि त्याने मनात ठरवलं की " आरोही मी तुम्हाला फ्रेंड बनवून च राहणार..... हा निखिल चा शब्द आहे.... "
त्याने मनाशी ठरवून तो गाडीत बसून घराच्या दिशेने निघाला.....
इकडे रिक्षात.....
आरोही मनात " मी चूक तर नाही ना केली अस डायरेक्ट निघून ( कमाल आहे बाबा हीच आधी चूक करायची आणि आता अस 😢 तोंड करायचं ) ते तर माझी हेल्प करत होते.... ओह गॉड मला काही समजत नाही , मला खूपच वाईट आहे यार.... काहीही झाले तरी ते बॉस आहेत माझे.... उद्या मी त्यांची माफी मागते.... "
रिक्षावाल्या च्या आवाजाने ती भानावर आली... बाजूला बघितल तर ती आश्रमात पोहोचली होती...
तिने पैसे देऊन , आश्रमात आली आणि समोर रियाला पाहून जी तिची खूप वेळेपासून वाट बघत उभी होती....
आरोही " सॉरी सॉरी मला खूप काम पेंडीग होत म्हणून लेट झाला सॉरी.... "
रिया " इट्स ओके आय नौ तू सकाळी बोलली होतीस.... जा लवकर फ्रेश हो आणि मस्त पैकी तयार होऊन ये , पार्टीला लेट होतोय... "
आरोही गोड हसत " हो... हो... आले लगेच "
नंतर थोड्यावेळाने....
आरोही फ्रेश होऊन , छान तयार होऊन हॉल मध्ये आली पार्टी साठी....
ते पार्टी एन्जॉय करत होते...
एका साइडला रिया आणि आरोही गप्पा मारत बसल्या होत्या....
अरोहिने सहज फोन चेक करण्यासाठी तिने फोन हातात घेतला...
आणि तिने मेसेज नोटीफिकेशन ऑन केला त्यात एक मेसेज होत , ती तो मेसेज वाचून गालातल्या गालात हसत होती...
रिया ने तिला अस हसताना बघितल...
आणि तिला हसत रिया " अग आरोही अशी एकटी एकटी काय हसत आहेस जरा आम्हाला पण सांग...."
आरोही ने लगेच आपल्या फोन मधल मेसेज दाखवून " हे बघ.... 😊😊"
रिया मेसेज बघून शॉक झाली होती....
आणि शॉक मधेच ती अरोहिला बघत होती...
आरोही ती गालात हसत तिच्याकडे पाहत होती....
क्रमशः
© भाग्यश्री परब
पार्ट मध्ये काही चूक झाली तर माफी असावी 🙏
आणि पार्ट कसा वाटला कमे्ट्स करून नक्की सांगा....
तब तक...
💖 Stay tuned 💖
😍 Stay happy 😍
🥰 Take care 🥰