दीड वर्षानंतर.....
एका खोलीत एक व्यक्ती अर्धमेल्या अवस्थेत आरोही च्या फोटो कडे बघून तिच्याशी बोलत होता....
" आरु कुठे आहेस तू प्लीज लवकर ये मी नाही जगू शकत तुझ्यशिवाय... "
पुढे...
एका खोलीत एक व्यक्ती एका मुलीच्या फोटोला बघून बोलत होता....
ती व्यक्ती " आरु मी तुला भेटायला येणार होतो पण तू भेटलीच नाही , अचानक कुठे गायब झाली होती तू... मी.... मी.... तुला खूप शोधल कुठेच नाही दिसली... मी येणार म्हणून समजल्यावर तू लांब सोडून गेलीस , एकदा सांगायचं होत ना मग आलो नसतो मी तुला भेटायला... आरु कुठे आहेस तू लवकर ये मी... मी... नाही राहू शकत तुझ्याशिवाय... "
येवढं बोलून त्याने फोटो व्यवस्थित जागेवर ठेवला आणि उठून तो साईड च्या भिंतीवर पंचींग करू लागला...आपल्या हृदयाच्या जवळ असलेलं ते आपल्या पासून खूप दूर कुठे तरी निघून गेला आहे परत न येण्यासाठी असच त्याला वाटत होत... तो मानसिकदृष्ट्या हतबल झालेला... गेली दोन वर्षे तो आरोही ची वाट बघत होता की ती परत येईल पण दोन वर्षे झाली तिचा काही पत्ताच लागत नव्हता... कुठे गेली असेल , कशी असेल असे अनेक विचार त्याच्या डोक्यात घुमत होते... विचार करून करून त्याचा संयम सुटला होता...
त्याच्या हाताला लागत होत , त्यातून खूप रक्त वाहत होते तरीही त्याला कसलंच भान राहिलं नव्हत तो कन्टीन्यू त्या भिंतीवर मारत होता...
त्याच्या खोलीचा दरवाजा उघडून दोन व्यक्ती आत आले आणि त्याला अश्या अवस्थेत बघून त्यांना भयंकर भीती वाटली...
त्यातली एक व्यक्ती त्याच्या जवळ जात " काय करतोय तू वेडा आहेस का..."
तरीही त्याच भिंतीवर हात आपटन चालू होत...
तो थांबत नाही म्हणून त्या दोन व्यक्तींनी त्याला दोन्ही बाजूंनी पकडलं... त्या दोघांनी पकडल्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होता...
तो ऐकत नाही म्हणून त्यातली एक व्यक्ती रागात त्याच्या कानाखाली मारत " निखिल..."
कानाखाली मारल्याने त्याचे कान एकदम सुन्न झाले...
काही वेळ शांततेत गेला....
तो अचानक ओरडला " आरोही..."
आणि ज्या व्यक्तीने मारल त्या व्यक्तीच्या खुशीत जोरजोरात रडू लागला...
तो हुंदके देत " मॉम मी नाही राहू शकत तिच्याशिवाय..."
निखिल आरोही सापडत नाही तेव्हापासून त्याने प्रत्येक वेळी स्वताला त्रास करून घेतले होते...
सुमित्रा आणि सारंग निखिल ला अस त्रास करून घेताना बघून खूपच टेन्शन आलेलं , म्हणून ते त्याला समजावण्यासाठी त्याच्या रूम मध्ये आले... पण समोरचं दृश्य बघून ते हादरले होते....
तरीही त्यांनी हिम्मत ठेवून त्याला समजावण्यासाठी पुढे आले , पण तो काही ऐकत नव्हता...
नाईलाजाने त्याच्या मॉम ला कानाखाली मारावी लागली...
सुमित्रा निखिलची आई " ती भेटेल लवकर , तूच असा खचून राहिलास तर तिला कस शोधशील त्यासाठी एनर्जी पाहिजे ना... मला तिची इतकी सवय झाली आहे की एका एका सेकंदाला तिची आठवण येते... तरी बघ मी त्रास करून न घेता ती एक दिवस भेटणारच इतका विश्वास आहे..."
दुसरी व्यक्ती सारंग निखिलचे बाबा " हो बाळा तू अस स्वताला त्रास देत राहिला तर ती कशी भेटेल , मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू तिला नक्की शोधून काढशील... सुमित्रा म्हणते तशी मलाही तिची सवय झाली आहे... निखिल आरोही ला शोधून काढशील ना
आणि तिला या घरात कायमची घेऊन येशील ना..."
सुमित्रा आणि सारंग च ऐकुन निखिल थोड शांत झाला...
निखिल " हो मॉम डॅड मी आरु ला काहीही झालं तरी आरु ला शोधून काढेन...आणि तिला कायमची इथे घेऊन येईन..."
सारंग निखिल चे बाबा " हो बाळा मी आहे तुझ्यासोबत काही अडचण आली तर सांग मी लगेच धाऊन येईल मदतीला...."
निखिल " थँक्यू डॅड थँक्यू मॉम तुम्ही नसता तर माहीत नाही माझं काय झालं असत..."
सुमित्रा निखिल ची आई " तुला अस बघून जीव तीळ तीळ होतो... अस त्रास नको करून घेऊ रे स्वताला... आणि आरोही ती तर मला मुली सारखीच आहे ती जिथे असेल आशा करते सेफ असू दे..."
निखिल " मॉम आरु लवकरच येईल या घरात..."
सुमित्रा निखिल ची आई " मला तुझ्यावर विश्वास आहे तू नक्की आरोही ला घेऊन येशील..."
सारंग निखिल चे बाबा " चला जेऊन घे बाळा हालत बघ कशी करून ठेवली स्वतःची तुला आम्ही काय आरोही पण नाही ओळखणार असा झाला आहेस तू... आम्हाला आधीचा निखिल पाहिजे एकदम ठणठणीत..."
निखिल " काय हो डॅड माझी खेचताय..."
सुमित्रा निखिल ची आई " खेचताय नाही बरोबर बोलत आहेत ते... मी आता तुला पहिला सारखं करेन बघ म्हणजे समाधान होईल की हा माझाच मुलगा निखिल आहे..."
सारंग निखिल चे बाबा " हो हो कर तुला काय करायचं ते... आपला मुलगा पहिला सारखा दिसला पाहिजे एकदम... "
निखिल " म्हणजे अस काय करणार आहात... अस काही करू नका नाही तर खरच आरु मला नाही ओळखणार..."
त्याच्या बोलण्यावर तिघेही खळखळून हसले...
सुमित्रा निखिल ची आई " पुरे झाली नाटक चला जेवायला..."
निखिल आणि सारंग निखिल चे बाबा एकत्रच " हो चला..."
निखिल ला समजावून आणि त्याला समाधानात पाहून सारंग आणि सुमित्रा ला बर वाटल...
गप्पा मारत मारत त्यांचं जेवण झालं आणि ते आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले....
निखिल रूम मध्ये आल्यावर बेड वर पालथा झाला....
आरोही च्या विचारात त्याला झोप लागत नव्हती...
मध्यरात्री कधी तरी त्याला झोप लागली...
एके ठिकाणी....
एका विचित्र घरात दोन मुली हळू आवाजात आपापसात बोलत होत्या....
पहिली मुलगी " आपण मिस्टर इंडिया ला बोलवू आणि त्याला रिक्वेस्ट करू की आमचा निरागस चेहरा बघा , आमच्यावर दया करा आणि तुमची शक्ती थोड्या वेळासाठी उधार द्या आम्हाला त्या नीच माणसाला चांगलाच धडा शिकवायचा आहे...मग आमचं काम झाल की तुमची शक्ती परत देऊ..."
दुसरी मुलगी तिला हीच काही होऊ शकत नाही अश्या अविर्भावात तिच्याकडे बघून " आणि त्यांनी जर शक्ती दिली तर काय करशील..."
पहिली मुलगी " दिली तर मी त्या माणसाला उल्टा लटकवून त्याचे केस डोक्यापासून वेगळे करणार मग त्याला लोखंडाने इतकं मारेल की तो स्वतःला विसरून गेला पाहिजे.... मग नंतर मी त्याला अश्या जागी डांबून ठेवेल की माणूसच काय देव पण नाही शोधू शकेल..."
दुसरी मुलगी तीच ऐकुन हात जोडूनच " धन्य आहात माते तुम्ही धन्य आहात..."
पहिली मुलगी हसत च " तथास्तु बाळा..."
त्या बोलत असताना च कोणीतरी ओरडतो....
" काम करा लवकर..."
त्याने ओरडल्याने त्या दोघी गप्पपणे काम करू लागतात...
क्रमशः
©भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी...