Datla, this suspicion was terrible ... - 4 in Marathi Women Focused by Bhagyashree Parab books and stories PDF | दाटला हा संशय भीषण होता... - 4

दाटला हा संशय भीषण होता... - 4

कल्पना रात्री उशिरा झोपल्याने सकाळी उशिरा उठतात...

उशिर झाल्याने घाईगडबडीत नाष्टा बनवतात पण नाष्ट्यात पोह्यामध्ये मीठ नसत आणि घाईगडबडीत त्या विसरून जातात त्यांना वाटत की मीठ टाकलेलं आहे...

किचन मधल सगळ आवरून त्या विश्वास आणि कल्पेश या दोघांना नाष्ट्यासाठी बोलावतात...

थोड्यावळाने विश्वास आणि कल्पेश नाष्ट्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात , कल्पना नाष्टा वाढतच असते की विश्वास त्यांना थांबवतात...

विश्वास थंड आवाजात शांतपणे " आध्या कुठे आहे उठली नाही का अजून , वेळेचं भान आहे की नाही तिला..."

त्यांचा असा धारधार शांत आवाज ऐकुन कल्पना दचकल्या , नंतर त्यांनी स्वताला सावरून त्यांच्याशी बोलू लागल्या...

कल्पना " तुम्हीच काल रात्री तिला बंद केलं होत रूम मध्ये विसरलात का..."

कल्पना यांच्या आवाजात शांतपणा असला तरी त्यांच्या बोलण्यावरून समजत होत की त्या किती रागवल्या आहेत...

त्या सकाळी उठल्या उठल्या आध्या च्या रूम मध्ये जाणारच होत्या पण पुढे आणखी काही घडू नये म्हणून त्या नाही गेल्या , आध्या शी आपण नंतर बोलू अस मनाशी ठरवून कामाला लागल्या....

कल्पना च बोलण ऐकून विश्वास " हो माहिती मला... जा घेऊन ये तिला..."

विश्वास यांनी सांगितल्यावर त्या लगेच आध्या च्या रूम मध्ये निघून जातात....


आध्या च्या रूम मध्ये...

कल्पना तिच्या रूमच दार उघडून आत येते , बघते तर आध्या पाय पोटाशी धरून तशीच झोपली होती... त्यांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटत त्या स्वताला च दोष देत असतात...

काही वेळ त्या तिच्या निरागस चेहरा न्याहाळत असतात , नंतर भानावर येत त्या तिला उठवतात... कल्पना ला तिला उठवू वाटत तरी विश्वास यांनी बोलावलं म्हणून नाईलाजाने त्यांना तिला उठवाव लागत...

कल्पना तिला हलके हलवत " आध्या बाळा उठ..."

त्यांच्या हलवल्याने आध्या हळूच आपल डोकं वर करून हळू हळू डोळे उघडते आणि आपल्या समोर आईला बघून तिला भरून येत , रडतच लगेच ती आईला मीठी मारते...

आध्या रडत आईच्या मिठीत " आई , मी... मी... इतकी वाईट आहे का जी मला एवढी मोठी शिक्षा दिली बाबांनी..."

कल्पना " नाही ग तू नाही वाईट आणि असा विचार पण नको करू समजल..."

आध्या " मग बाबांनी अविश्वास का दाखवला माझ्यावर ?... बोल ना..."

तिचं अस विचारलेल प्रश्न ऐकून त्यांच्याकडे उत्तरच नव्हत तिला द्यायला , त्यांना काय उत्तर द्यावं काही समजत नव्हत....

कल्पना ला अस गप्प बसलेल बघून ती परत म्हणाली " बोल ना आई... अस का केलं बाबांनी , तूच बोलली होती ना की बाबा खूप प्रेम करतात माझ्यावर मग काल अस अविश्वास असल्यासारखं का वागत होते माझ्याशी..."

कल्पना " बाळा आपण यावर नंतर बोलू आता बाबा बोलवत आहे , नाही तर ते आणखी रागवतील मग..."

आध्या " नाही आई मला आताच ऐकायचं आहे..."

कल्पना " मी म्हंटल ना नंतर आता चल बघू फ्रेश होऊन ये लवकर बाहेर..."

आध्या " नाही मी नाही येणार तू आधी सांग मला..."

कल्पना " तुला माझी शप्पथ आहे आता नाही ऐकणार माझं..."

कल्पना ने शप्पथ दिलेली बघून त्यांचं ऐकुन फ्रेश होण्यासाठी निघून जाते...

कल्पना तिथेच बसून आध्या चा विचार करत असतात...

कल्पना मनात " आध्या अजूनही थरथर कापत होती कशी राहिली असेल रात्रभर , तिचे डोळे सांगत होते ती खूप घाबरली होती आणि रडतही होती किती लाल झालेले तिचे डोळे... हे सगळ माझ्यामुळे झाल आहे मी... मी... खोटी आशा दाखवली की तिचे बाबा खूप प्रेम करतात तिच्यावर पण इथे तर त्यांनाच समजत नाही आहे की ते चूक करत आहेत अस वागून..."

विचार करता करता त्या भानावर येतात आणि आध्या ला लवकर बाहेर यायला सांगून त्या रूम मधून निघून जातात...
थोड्यावेळाने आध्या फ्रेश होऊन बाहेर येते आणि गप्प पणे डायनिंग टेबलवर जाऊन बसते...

नंतर कल्पना सगळ्यांना पोहे वाढून देते...

कल्पना पोहे वाढत असतानाच विश्वास आध्या ला शांत पण थंडपणे " अभ्यास पूर्ण झाला ?..."

विश्वास च्या बोलण्याने आध्या घाबरते आणि घाबरतच " ह... हो... झाला..."

विश्वास " हम..."

एवढ बोलून विश्वास नाष्टा करतात....

एक घास खाल्ल्यावर त्यांना चव नाही लागत आणि ते रागात कल्पना ला " पोह्यात मीठ नाही आहे..."

त्यांचा असा राग बघून कल्पना घाबरते...

कल्पना अडखळत " अहो ते गडबडीत विसरून गेले असेल कदाचित मला वाटल टाकल असेल मीठ..."

विश्वास आणखी रागात " अस कस विसरलीस तू आणि तुझी मुलगी एकच आहात..."

त्यांचं अस बोलण आध्या ला आणि कल्पना ला खूप वाईट वाटत...

कल्पना " दहा मिनिट थांबा मी दुसरे पोहे बनवून देते..."

विश्वास " नको आता लेट झाला आहे खूप सगळा मूड गेला आता , ऑफिस मध्येच खातो काही...."

अस बोलून विश्वास आपली बॅग घेऊन ऑफिस साठी निघून जातात...

कल्पेश कल्पना ला " बनवता येत नाही तर बनवायचं कशाला..."

तो तोंड वाकड करून आपल्या रूम मध्ये निघून जातो...

कल्पेश छोटा असला तरी त्याच्या बोलण्यात वागण्यात मोठेपणा होता... तो कोणाशी पण बोलताना मोठ्यांसारखा बोलायचा , वागायचा आणि मोठ्यांना कधी कधी उलटूनही बोलायच्या त्याला असे वागताना काहीच वाटायचं नाही... त्याच्या मनात कोणासाठी कोणतीही भावना नव्हती....


विश्वास आणि कल्पेश असे निघून गेलेले बघून आध्या आणि कल्पना दोघी एकमेकांकडे बघत राहतात....

क्रमशः

© भाग्यश्री परब

यात काही चूक असल्यास माफी असावी....


Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 11 months ago

Pooja

Pooja 1 year ago