इथे आरोही आणि रिया आहे त्या घरात...........
एक हट्टी कट्टी बाई रागातच दरवाजा उघडून आत आली आणि सगळ्यांना रागाने घुरत होती....
ती रागात काही बोलण्यासाठी तोंड उघडणार त्याअगोदर च तिच्या गालावर कोणी तरी एकदम जोरात कानाखाली मारली.....
पुढे........
कानाखाली मारल्याने ती बाई आणखीनच त्या मारलेल्या व्यक्तीला घुरून बघत होती....
त्या बाईला मारले ती व्यक्ती " हो मोहतरमा इतक घुरुन नका बघू मला पण येत घुरता.... तेही तुमच्या पेक्षा चांगल समजल का...."
तरीही ती तिला घूरून बघत होती जस काही तिला तिच्या बोलण्याचा फरक च पडला नाही....
ती व्यक्ती " अच्छा माझ्याशी पंगा... "
एवढ बोलून ती व्यक्ती गुढपणे हसत त्या बाईला बघत होती....
आणि त्या बाईला काही कळायच्या आत अजुन तीन चार हात त्या बाईच्या दोन्ही गालावर पडले....
एवढ्या जोरात मारल होत की त्या बाईच्या ओठांतून रक्त निघत होत सोबत गाल इतक दुखत होत की तिने दोन्ही गालावरच ठेवून घेतला......
त्या बाईला अस बघताना तिथे असलेल्या मुलींना खूपच हसू येत होत आणि त्या जोरात हसू लागल्या....
त्यांना हसताना बघून त्या बाईला राग येत होता , पण ती काही करू शकत नव्हती , कारण लुक दिला तर मार आणि काही बोलल तरी मारच भेटणार हे बघून गप्पच बसली.... काय करणार मगाशी दाखवलेला डेमो जो भारी पडला 🤣.....
इथे रिया हसतच अरोहीला " यार आरु आल्या आल्या या बाईला कानाखाली मारलीस ( येस ती आरोही होती...😁) बापरे तिचा चेहरा तर बघण्यासारखा होता.... आणि आता तर खूपच हसू येतंय कंट्रोल च होत नाही आहे बाबा हे हसन....."
आरोही चिडत " मग काय हिने मारून मारून काम करायला लावल , शरीराची बेकार हालत झाली होती..... इतक मारल होती की वाटल आता ही चटणी बनून खाते की काय.... इतका राग येत होता ना की अस वाटत होत हिला किड्यांसकट मातीत गाढाव.... हुंह 😏....."
रिया तिच्या पाठीवर हळू हात फिरवत " रिलॅक्स बच्चा रिलॅक्स..... झाल ना समाधान मारून मग शांत हो.... या
बाईच काय करायच हे बघ आता....."
आरोही कपाळावर आठ्या पाडत रिया ला " काय करायच म्हणजे सिंपल ( तिथे एका कोपऱ्यात बेशुद्ध करून ठेवलेल्या माणसाकडे बघत....) या सडलेल्या काचऱ्याना कस फेकून दिले तसच..."
रिया " ओह.... ( थंम्स अप 👍...करत ) ओके ओके.... लगे रहो...."
नंतर त्या बाईला बेशुध्द करत कचऱ्याला जस फेकून देतो तस त्या बाईला फेकून दिले ( फेकून दिले म्हणजे दोन मुलींनी उचलून त्या माणसाच्या बाजूला नेऊन हळूच खाली आपटल.... जोरात आपटल असत तर डोक जमिनीला लागून मेली असती.... त्यांना मारून टाकायच नव्हत फक्त बेशुद्ध करून तिथून पळून जायच होत....)
असेच त्यांनी अजुन जे कोणी पहारेकरी गुंड होते त्या सगळ्यांना एकेक करून बेशुद्ध करत त्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवले आणि सोबत ते जागे झाल्यावर पळून जाऊ नये म्हणून एका रस्सी मध्ये पुरुषांना आणि दुसऱ्या मध्ये बायकांना एकदम घट्ट बांधून ठेवले.....
सगळ्यांना बांधून झाल्यावर थकून सगळ्या मुलींनी बसून घेतल.....
आरोही " चला आता या कचऱ्याची तर सोय करून झाली आता फक्त लीडर बाकी आहे यांचा त्याची सोय करून झाली की मग आपले रस्ते मोकळे....."
( नियती क्रूरपणे हसत " नो आरोही इतनी आसानी से रास्ते नहीं खुलते.... थोड़ा और झेलना पड़ेगा तुझे.... हा हा हा ....)
इथे एका आलिशान बंगल्यात एक व्यक्ती त्याचा बेडरूम च्या खिडकीतून बाहेर बघत विचार करत होता.....
तो जसा विचार करत होता तस क्षणाक्षणाला त्याचा राग वाढत जात होता आणि रागाने त्याच्या मुठी एक घट्ट आवळल्या जात होत्या....
शेवटी ती एकदम जोरात गरजली " सोडणार नाही तिला इतका त्रास देईन की तुला जिवंतपणी मृत्यू दिसेल 😡😡😡..... वाट बघ लवकरच तुझ्या समोर येणार आहे आतापर्यंत पाठून त्रास दिला आहे आता समोरून त्रास देईन 😈😈😈......"
ती व्यक्ती इतक्या जोरात गरजला की तिचा आवाज पूर्ण बंगल्यावर घुमत होता..... त्या बंगल्यात त्या व्यक्ती शिवाय कोणीही नव्हत , तो बंगला स्मशानभूमी सारखा एकदम शांत होता......
निखिल च ऑफिस.....
फोनच्या रिंग ने त्याची तंद्री तुटली , त्याने नंबर आणि नाव न बघताच फोन रिसिव्ह केला होता.....
निखिल काही बोलणार तर पलीकडची व्यक्ती रागातच त्याला " रक्षित..... कुठे आहे ?...."
त्या व्यक्तीच बोलण ऐकून निखिल चे डोळेच मोठे झाले " व्हॉट ?...."
पलीकडची व्यक्ती तितक्याच रागात " मी म्हटल रक्षित कुठे आहे ?..... त्याला तूच पकडल आहे माहीत आहे मला , पण त्याच काय करायच हे मी बघेन तू नाही समजल.... त्याला शिक्षा मीच देणार फक्त आणि फक्त मीच....."
निखिल शांतपणे " मी नाही पकडल रक्षित ला आणि मला नाही माहित तो कुठे आहे.... आणि तुझा त्याच्याशी काय संबंध...."
पलीकडची व्यक्ती अजूनही रागात होती " तुला काय करायच आहे माझा त्याच्याशी काहीही संबंध असू दे.... मला माहित आहे रक्षित ला तूच पकडुन ठेवल आहे..... शहाण्यासारख माझ्याकडे आणून दे नाही तर समज तुझे आई बाबा गेले...."
त्या पलीकडच्या व्यक्तीने त्याच्या आई बाबा बद्दल बोलल्यावर निखिल ला खूपच राग आला तो रागात " हे माझ्या आई बाबांना काही करायच नाही समजल नाही मी काय करेन सांगता नाही येणार....."
पलीकडची व्यक्ती " मग सांग रक्षित कुठे आहे...."
निखिल " मला नाही माहित रक्षित कुठे आहे.... समजल परत त्रास दिला ना माझ्या सारख वाईट कोणी नाही समजल....."
एवढ बोलून निखिल ने सरळ फोन कट केला.....
तो व्यक्ती जसा बोलत होता त्यावरून निखिल ला समजल की तो जे बोलतो ते नक्की करेल , म्हणून निखिल त्याच्या ला आई बाबांची काळजी वाटू लागली....
तस निखिल ने लगेच पार्थ ला फोन लावतो पण त्याचा कॉल लागतच नव्हता डिस्कनेक्ट येत होता....
निखिल तीन चार वेळा ट्राय करतो पण काही केल्या पार्थ चा कॉल लागत नव्हता....
मग वैतागून निखिल टेबलवर हात आपटतो....
निखिल वैतागून स्वतःशीच बोलत होता आणि दुसरीकडे कॉल करण तरीही चालू होत " या कॉल ला आताच डिस्कनेक्ट व्हायच होत का.... काहीही करून मला पार्थ शी बोलाव लागेल...."
स्वतःशीच बोलून तो पार्थ शी बोलायला पोलिस स्टेशन ला जायच निर्णय घेतो..... आणि तो उठून खुर्चीवर लटकवलेल ब्लेझर हातात घेऊन घाईतच निघून जातो पोलिस स्टेशन ला.....
आरोही आणि रिया आहे त्या घरात......
सगळ्या गुंडांना बांधून ठेवले म्हणुन सगळ्या जणी रिलॅक्स झाल्या..... यांचा लीडर कधी येईल याची ते वाट बघत होते , त्याला पण बेशुध्द करून बांधून ठेवणार होते मग तिथून निघून जाणार होते.....
आरोही एके जागी शांत बसून मनात हरवली होती " त्या दिवशी निखिल आले असतील भेटायला , मी नाही म्हणून खूपच अस्वस्थ झाले असतील.... खूप त्रास करून घेतला असेल त्यांनी स्वताला , त्यांच्या डोळ्यात प्रत्येक वेळी माझ्यासाठी प्रेम , काळजी दिसत होती.... निखिल तुम्ही पण माझ्यावर प्रेम करायला लागला हो ना मीही प्रेम करते तुमच्यावर.... तुमच्यासोबत एक सेफ्टी वाली फिलिंग येते , काहीही झाल तरी तुम्ही आहात म्हणून मन एकदम फ्रेश होत कुठलीच भीती नाही वाटत , उलट हिम्मत येते तुमच्यासोबत असल्यावर.... आताही तुम्ही माझ्या ह्रदयात आहात म्हणून लढत आहे.... बस यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला भेटून सांगायच आहे आय लव्ह यू निखिल... आय लव्ह यू सो मच......"
आरोही मनात बोलत असताना एक रागीट आवाज तिच्या कानी पडतो आणि ती भानावर येते.....
यात काही चूक असल्यास माफी असावी.....