एके ठिकाणी कोर्टाच्या बाहेर...
एक मुलगी एका मुलाला " सापडल काही... "
तो मुलगा " सापडल तर आहे पण त्याने काही सिध्द नाही होणार... "
ती मुलगी " काय सापडल कार्तिक ?..."
कार्तिक " तन्मयी तो इंडियात आलेला आणि लगेच निघून गेला... "
तन्मयी ओरडून " व्हॉट.. हे तू मला आता सांगत आहेस "
कार्तिक कानावर हात ठेवून " हे बाबा ओरडू नको बघत आहेत आपल्याकडे सगळे.. ( तन्मयी आजूबाजूला बघते तर सगळे त्यांच्याकडे बघत होते.. तशी ती नॉर्मल होते..) आणि आता सांगत आहे कारण त्याची माहिती तो विमानात बसल्यानंतर भेटली..."
तन्मयी " हम सॉरी , आता परत त्याची इथे येण्याची वाट पाहावी लागेल... ( कार्तिक कडे बघत..) पण आता पुढच्या वेळी लक्षात ठेव तो हातातून निसटून जाता कामा नये..."
कार्तिक " हो बाबा पुढच्या वेळी लक्षात ठेवेन , चल आता टाईम झाल खूप निघाव लागेल मीटिंग आहे माझी एका क्लायंट सोबत ..."
तन्मयी " हो चल..बाय.. भेटू नंतर.. "
तसे दोघे वेगवेगळ्या रस्त्याने निघून गेले....
एअरपोर्ट वर...
पार्किंग मध्ये एका कारमध्ये एक माणूस डोळ्यावर गॉगल आणि तोंडावर मास्क लावून त्याने आपला चेहरा झाकला होता जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये..
तो माणूस डोक्यावरचा गॉगल काढत राक्षसी हसत मनातच " तुम्ही कितीही शोधा मी कधीच तुमच्या हाती नाही लागणार.. ह..हा..हा..हा.." एवढ बोलून गॉगल लावून कार स्टार्ट केली आणि आपल्या वाटेला निघून गेला आपल काम पूर्ण करण्यासाठी...
डी अँड वी इंडस्ट्री... ( वंश ची कंपनी..)
वंशला त्याच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करण्याचा थोडा पण इंटरेस्ट नव्हता म्हणून त्याने स्वतः च्या कष्टाने आपल्या आई च नाव आणि त्याच नाव देऊन स्वतः ची कंपनी ओपन केली.. डी अँड वी इंडस्ट्री म्हणजेच धनश्री आणि वंश इंडस्ट्री....
वंश आपल्या कॅबिन मध्ये विचार करत काम करत होता " मी अस कस वागलो.. निवृत्ती ला मिस रामेश्वरी ने बोललेल त्यात मला का राग आला... आणि निवृत्ती कडे बघून अस वाटत होत की खूप वर्षांपासून ओळखत आहे... काय होतय मला ह... " वंश ला विचार करून करून डोक फुटायची वेळ आलेली.. नंतर त्याने तो विचार झटकून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल....
कॅफे मध्ये...
रामेश्वरी एक तास अगोदरच कॅफे मध्ये येऊन बसली होती... एक तास होऊन गेला तरी तो आला नव्हता म्हणून तिला खूपच राग येत होता...
ती फोन लावणार तर एक चिडलेला आवाज तिच्या कानी पडला " तुला मी किती वेळा बोललो आहे , अस भेटायला नको बोलवू..." चिडून तो रामेश्वरी च्या समोर जाऊन बसला...
रामेश्वरी पण चिडून " हो मिस्टर ए. आर अजुन किती दिवस चालणार आहे हे सगळ लवकरात लवकर काय ते करा... मला त्या नरकात नाही राहायच अजुन नुसत कटकट आहे डोक्याला..."
ए. आर " हे बघ तुला जर ते पेपर्स हवे असतील तर शांत बसायच समजल नाही तुला बरबाद करायला एकच मिनिट लागतील माहीत आहे ना मी काय काय करू शकतो... आणि ते नरकाच म्हणशील तर सहन कर गप्प पणे जर ते पेपर्स हवे असतील तर , तू थोडीशी पण चूक केली ना सगळ धुळीस मिसळेल.. मी आहे आणि तू आहे... "
त्याचा असा ॲटीट्यूड बघून क्षणात रामेश्वरी च्या कपाळावर भर एसीत पण घाम आला... तिला माहिती होत तो कसा माणूस आहे.. एक चूक झाली की मारायला पण मागे पुढे बघत नाही...
रामेश्वरी ला अस घाबरलेल बघून ए. आर तिच्याकडे खुनशी नजरेने तिच्याकडे बघून हसू लागला...
ए. आर " मग आता घरी जा आणि पुढच्या कामाला लागा... लक्षात असू द्या तुमची एक चूक खूप महागात पडेल..."
तशी रामेश्वरी आता सहन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता म्हणून नाईलाजाने ती तिथून निघून गेली...
रामेश्वरी निघून गेली तस इथे ए. आर मनात " रामेश्वरी तुला काय वाटल मी तुला ते पेपर्स देईन... हा.. हा.. हा... नाही अजिबात नाही जसे ते पेपर हातात येतील तस तुझा खेळ खल्लास.. हा.. हा.. हा... एकदा का सगळ माझ्या हातात आल की एकेकाचा गेम ओव्हर कोणीच नाही जिंवत राहणार कोणीच नाही...."
एवढ बोलून तो तिथून निघून जातो....
अमृता बिल्डिंग...
त्या व्यक्तीचा धाक म्हणून अशोक आणि शीतल पटापट आपल सामान पॅक करून त्या घराच्या बाहेर पडले आणि अचानक कोणीतरी समोर येऊन त्यांच्यावर स्प्रे मारला तस ते दोघ काही कळायच्या आत बेशुध्द झाले....
अशोक आणि शीतल बेशुध्द झालेले बघून त्या स्प्रे मारणाऱ्या व्यक्तीने कोणालातरी कॉल केला...
फोन उचलल्या वर तो व्यक्ती " बॉस आपल काम झाल आता काय करायच यांच... "
पलीकडून " गूड , त्यांना आपल्या नेहमीच्या जागेवर घेऊन जा... माहीत आहे ना कुठे..."
तो व्यक्ती " हो बॉस माहीत आहे... "
पलीकडून " हम... "
फोन कट झाल्यावर त्या व्यक्तीने त्यांना नेहमीच्या जागेवर घेऊन गेला आणि त्यांना शुद्ध आल्यावर पळून जाऊ नये म्हणून खुर्चीवर दोरीने घट्ट बांधून ठेवले... आणि आपण आरामात त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसून त्याच्या बॉस ची वाट बघत बसला....
साई बिल्डिंग...
साहिल आणि स्वाती लाईट आली तस ते दोघ आत आले...
साहिल आत आल्यावर स्वाती ला बेडवर बसवून तोही तिच्या बाजूला बसत अडखळत " अ.. स्वाती ते.. मला... तुला..."
स्वाती " अहो काही तरी विचारायच आहे का तुम्हाला जे इतके अडखळत आहात..."
साहिल " ह.. हो... पण तू चिडणार नसशील तर सांगतो..."
स्वाती " नाही चिडणार बोला..."
साहिल " अ... ते...ते..."
साहिल ला अजून अडखळताना बघून स्वाती साहिल चा हात हातात घेत " नाही चिडणार बोलले ना... बोला शांतपणे काय आहे ते... "
साहिल एका दमात " ते... आपल्याला इथून दुसरीकडे ट्रान्स्फर व्हाव लागेल..." एवढ बोलतो आणि डोळे मिटून घेतो...
स्वाती अजुन काही बोलली का नाही ते बघण्यासाठी एक डोळा उघडून बघतो तर स्वाती त्याला बघून हसत होती... तस साहिल दुसरा पण डोळा उघडून " हसत का आहेस.."
साहिल चा अस प्रश्न ऐकुन स्वाती ला आणखी हसू येत होत ती हसू दाबत " इतकच ना येवढ बोलण्यासाठी इतक घाबरत होते मला..."
साहिल " तुला राग नाही आला..."
स्वाती " नाही हो... मला का राग येईल तुमच कामच अस आहे की सारख तुम्हाला ट्रान्स्फर व्हाव लागत.. मग यात एक पत्नी समजून नाही घेणार तर कोण घेणार... "
स्वाती च समजून घेणे साहिल ला खूपच सुखावून गेल... सोबत वाईट सुद्धा वाटत होते की आपण एक गोष्ट लपवली आहे...
साहिल मनातच " स्वाती सॉरी मी तुझ्याशी एक गोष्ट लपवली पण काय करणार नाईलाज आहे... पण हे सगळ नीट झाल की मी स्वतःहून तुला सगळ सांगेन आय प्रॉमिस...."
साहिल अस विचार करताना बघून स्वाती त्याला हलवून " अहो विचार काय करत बसला आहात पॅकिंग नाही करायची का... "
स्वाती च्या आवाजाने साहिल भानावर येत " हा... हो... आपल्याला लवकर निघाव लागेल इथून त्यामुळे पटपट हात चालवावे लागतील..."
साहिल बोलत असताना मध्येच कोणाचातरी कॉल येतो तस तो रिसिव्ह करून स्वाती ला इशाऱ्याने पाच मिनिटांत आलो बोलून बाल्कनीत निघून जातो...
इथे साहिल गेल्यावर स्वाती मनात " साहिल तुम्हाला कोणती तरी गोष्ट त्रास देतेय म्हणून माझ्याशी शेअर करायला इतक घाबरत आहात... पण काहीही झाल तरी मी कधीच तुमचा हात नाही सोडणार..."
जीवनश्री बंगलो...
वंश आपल काम करून घरी आल्यावर तो फ्रेश व्हायला बेडरूम मध्ये जाणार तर त्याला हॉल मधल्या गॅलरी मध्ये कोणीतरी रडताना दिसत तस त्याची पावले त्या दिशेने जातात...
वंश तिथे जाऊन एका साईड उभ राहतो आणि तो जे काही ऐकतो तस त्याच्या कपाळावर आठया पडतात...
क्रमशः
- भाग्यश्री परब